रविवार, १७ डिसेंबर, २०१७

मार्गशीर्ष अमावस्या

( वेळा अमावस्या)


आज वेळा अमावस्या हा सण महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात साजरा केला जातो.शेतात सर्वप्रथम एक कोप( झोपडी) वजा केली जाते किंवा एका झाडाखाली कडब्याच्या पेंड्या झाडाच्या बाजुने गोल आकारात लावली जाते.मातीचे किंवा दगडाचे पाच पांडव ,कर्ण,द्रौपदी असे देव तयार केले जातात.त्यांना पांढ-या चुन्याने रंगवीले जाते.समोर हिरवा कपडा ठेऊन त्यावर लक्ष्मीची पुजा मांडली जाते.शेतात पिकलेल्या धान्याच्या सहाय्याने तयार केलेले पदार्थांनी उदा.भजी( भाजी), ज्वारी व बाजरीचे उंडे,अंबील(आंबट ताक),सडलेल्याज्वारीचा भात,वांग्याचे भरीत,शेंगदाण्याचे लाडू,खीर ,केळी,पेरु,बोरं,ऊस वगैरे नैवेद्य म्हणुन ठेवले जाते.नारळ फोडले जाते.कोप किंवा झाडाभोवती व्हलगे व्हलगे सालन पलगे...हर भगत राजो हार बोला...हर हर महादेव असा नाम घोष केला जातो पाणी शिंपडले जाते.मग म्हसोबा व इतर देवांची पुजा केली जाते.मग सर्व मित्र मंडळींना घेऊन वनभोजन केले जाते. दिवसभर म्हवाळ शोधणे यात मोठी मुलं मग्न होतात.शेतात हरभरा,गहु ,करडई,तूर, पीक जोम धरु लागते.सर्वत्र आनंदी आनंद असतो. पाच ते सहा वाजता एका छोट्या मटक्यात बोळीत दूध व शेवाया ऊतू घालतात.येळवस हा प्रचलित शब्दावरुन इथली संस्कृती लक्षात येते.शेवटी शेताभोवती टेंभा(हेंडगा) फिरवला जातो.दुष्ट शक्तीचा नाश होऊन लक्ष्मी घरात नांदो अशी प्रार्थना केली जाते.सुखासमाधानाने येळवस घरी परतते.


©®गिरी एस.जी.
           माध्यमिक शिक्षक
           अंबुलगा (बु.) ता.निलंगा जिल्हा लातूर