शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

माझ्या विद्यार्थ्याने रचलेली कविता..

अंदमान येथे भारतीय नौसेनेत कार्यरत आहे.

नाव- महेश धनराज बिराजदार 

या जगाला कळलं पाहिजे.....

अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात असणारी बुद्धिमत्ता,कौशल्य,
तुझ्यात असणारी विचारशैली,साहस,
तुझ्यात असणारी 'अंधरूनी शक्ती',
तुझ्यात असणारा आत्मविश्वास,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे संभाजीराजेंचा पंजा
संकटांचा जबडा उघडून दात पाडायला,
तुझ्यात आहे 'ढाई किलो का हाथ'
शत्रुंचा चकनाचूर करायला,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे वज्रमुठ
संकटांचा माउंट एवरेस्ट फोडायला,
तुझ्यात आहे 'पोलादी' 'भरभक्कम' पाऊल
जिथं लाथ मारील तिथं पाणी काढायला,
अरे गडया,तुझ्यात काय आहे 
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे एक निरागस,गोंडस मुलगा
आईचा,
तुझ्यात आहे एक कर्तव्यदक्ष,आज्ञाधारक बेटा
बाबांचा,
तुझ्यात आहे एक फौजी भाऊ सीमेवर लढणारा
बहिणीचा,
तुझ्यात आहे एक गुणवान विद्यार्थी
शिक्षकांचा,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे ती ज्योत,क्रांती घडवून आणण्याची,
तुझ्यात आहे ती लढाऊ वृत्ती,समाजातील अनिष्ठ
रुढी-परंपरांच्या विरोधात लढण्याची,
तुझ्यात आहे तो युवाशक्तीचा गुरगुरणारा आवाज,
समाजातील बुरसटलेल्या विचारांना हादरवुन,
उखडून फेकायला,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे.....

तुझ्यात आहेत पुढारलेले विचार,
तुझ्यात आहेत नवीन संकल्पना,
तुझ्यात आहेत नाविन्यपूर्ण उपक्रम,
तुझ्यात आहेत असंख्य नवविचारांनी भरलेलं गोदाम,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे.....

तुझ्याकडे आहे संस्कृतीचा अमूल्य ठेवा,
तुझ्यात आहे तो प्रयत्न अमूल्य ठेवा जपण्याचा,
तुझ्याकडे आहे महापुरुषांच्या पराक्रमाचा वारसा,
तुझ्यात आहे ती धडपड या पराक्रमाला follow करण्याची,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्याकडे आहे क्रांतिकारी विचारांचा खजिना,
तुझ्यात आहे ती इच्छा या विचारातून नवसमाज घडवण्याचा,
तुझ्याकडे आहे नावजलेल्या लेखकांच्या ग्रंथाची 'मांदियाळी'
तुझ्यात आहे ती धडपड वाचक वर्गात उत्साह जागवण्याचा,
वाचन चळवळ टिकवण्याचा,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे इच्छा समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्याची,स्त्रियांना सन्मान मिळवून देण्याचा,
तुझ्यात आहे ती प्रेरणा,युवक वर्गाला त्यांच्या मेलेल्या 
दिलात नवचेतना जागवण्याचा,
तुझ्यात आहे शिक्षणाबद्दलचा आधुनिक दृष्टिकोन,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे एक आदर्शवादी मुलगा,
वृद्धपकाळात आई-बाबांची सेवा करणारा,
तुझ्यात आहे एक कर्तृत्ववान फौजी भाऊ,पती
कर्तव्य बजावत असताना सुद्धा विचारपूस करणारा,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे.....

तुझ्यात आहे एक संस्कारशील पिता,आजोबा
आपल्या पाल्यांना संस्कारबरोबरच जगण्यातील संकटांना
खंबीरपणे लढायला शिकवणारा,
तुझ्यात आहे एक आज्ञाधारक विद्यार्थी,
आपल्या कर्तृत्वाने समाजाला बदलवणारा,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे भारताचे उद्याचे भविष्य,
तुझ्यात आहे भारताचे उभरते नेतृत्व,
तुझ्यात आहे golden boy अभिनव बिंद्रा,
तुझ्यात आहे उद्योगपती रतन टाटा,अंबानी,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे 
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहेत ते विचार आणि कर्म,
जातिभेदविरहित समाज निर्माण करण्याचे,
तुझ्यात आहे तो सुज्ञपणा,समंजसपणा,
माणसाला माणूस म्हणून मानुसकीने जगवण्याचा,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

                                          --माही उर्फ महेश

1 टिप्पणी: