शनिवार, १५ एप्रिल, २०१७

[11/04, 10:53 PM] Maheshrao:                    सहजच मनात आले
आरसा म्हणतो सावलीला तू माणसासोबत का असते कायमच? त्यावर सावली आरश्याला म्हणते,माझ्यामुळे मनुष्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते.
मग सावली विचारते आरश्याला,तुझे काय महत्त्व आहे मानवी जीवनात? आरसा सांगतो,माझ्यामुळे मनुष्याला त्याच्या वास्तवाची जाणीव होते.वास्तव हे बदलू शकते पण आपलं अस्तित्व बदलू शकत नाही.पण याच वास्तवा मुळे आपल्या अस्तित्वालापण ठेच पोहोचू शकते.आरश्याची साथ आपणास सोडावी वाटत नाही आणि सावली आपली साथ सोडू देत नाही.तरीपण माणूस हा आपल्याच सावलीला घाबरतो,लांब पळतो.ती राहते आपल्या पाठीशी खंबीरपणे सदैव.आरसाच कळलाव्या मुनीसारखं मनात द्वंद्व घडवून आणतो.मनाला पार उंदरासारखं कुरतडतो तरीपण तो सगळ्याला प्रिय असतो.म्हणून काय फरक पडतो,सावलीला मात्र कायम उपेक्षाच वाट्याला आलीय म्हणून काय तिने आपला खंबीर पाठबळ काढून घेतला नाही....


                             माही ऊर्फ महेश बिराजदार,लातूर

[15/04, 1:01 PM] Maheshrao: सहज मनात आले
             क्रमांक-2
असे म्हणतात की,आपला जेव्हा जन्म होतो त्यावेळी सटवाईदेवी आपल्या कपाळावर आपलं नशीब लिहिते.आपल्या उर्वरित आयुष्यात काय काय होणार आहे याचा लेखाजोखा असतो.आयुष्यात नशिबाप्रमाणेच घडामोडी घडत असतात.याप्रमाणे मग 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या वाक्याचा अर्थच कळेनासा होतो.माणसाच्या आयुष्यातील पाप-पुण्य जर देवच ठरवत असतील तर त्याने केलेल्या पापामध्ये त्याची काहीच चूक नसणार.कारण हे असं घडनारय हे अगोदरच तय होतं.
असे पण बोलले जाते की,आपण केलेल्या पाप-पुण्याच्या हिशोब आपल्या मरणानंतर द्यावा लागतो.कर्ता करविता हाच परमेश्वर आहे आणि तोच हिशोब ठेवतो.मग यात माणसाचं कुठे चुकतं कळतच नाही.
(ग्रामीण भागातल्या अंधश्रद्धेवरुन सांगीतलेल्या गोष्टीवरून माझं वैयक्तिक मत)

                            माही उर्फ महेश बिराजदार,लातूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा