कोकया
दिवसभर चालतो
कोया कोया कोया
झाडाखाली गोळा झाल्या
रानातल्या सया सया सया
एकमेकाच्या जवळ बसुनी
करती कोया कोया कोया
धरतीची आम्ही बाळं
तिची आमच्यावर माया
आता सुगी संपली संपली
मनामध्ये एक भीती दाटली
तळ्यातलं पाणी सारं आटलं
तसं आमच्या डोळ्यातलं पाणीही आटलं
कुणीतरी ठेवा घोटंभरं पाणी
रानातली आम्ही पाखरं उपाशी गातो गाणी
आमच्या कर्माची रेखा हे ही दिसं जातील
मृगाच्या नक्षत्रात ढगोबा बंधु भेटतील.
@©® श्याम गिरी लामजना
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा