[17/08, 1:32 PM] 👏🏻: माझा डी.एड. ला प्रवेश
मी सहज उस्मानाबाद जिल्ह्यात पोस्टाने फॉर्म पाठवला.व माझा नंबर डी एड कॉलेज नळदुर्ग येथे लागला.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित हे कॉलेज कै.बापूजी साळुंखे यांच्या पुण्याईने उभारण्यात आले होते.या कॉलेजमधील पहिला दिवस खुप आठवतो.पहिल्या दिवशी मी वडाच्या झाडाखाली बसलो होतो.तेथे मगतराव बालाजी व काळे गुणवंत यांची ओळख झाली.निसर्गरम्य प्रदुषण मुक्त वातावरण.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे ब्रीद ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे होते.मी फलकावर दररोज सुविचारांचे लेखन करीत असे.आम्ही सर्वजण गणवेशात जात असु.प्रथम वर्षाचे सुक्ष्म पाठ,सेतु पाठ व सराव पाठ खुप लक्षात राहिले.सुरुवातीला भीतीने पाय थरथरत असत.आमच्या प्रथम वर्षातील सर्व छात्र अध्यापक खेळीमेळीने दडपणमुक्त रहात असत.प्राचार्य देवकर सर आम्हाला हिंदी विषय शिकवत असत.मला सांगवे सरांच्या तासात खुप हसु येत असे.माझ्या डेस्कजवळीत खिडकीत घुबडाची पिल्ले चिंचेवर बसुन माना हलवत त्यांची मान सांगवेसरांच्या मानेसारखी हलते हे पाहुन खुप हसु येई.सांगवे सर खुप वृद्ध झाले होते.अणदूर जवळचं खुदावाडी हे त्यांचं गाव.
प्रथम वर्षातचं छात्रअध्यापकांना व्हॉलीबॉल खेळण्याचा लळा लागला होता.कोण कत्ता चांगला मारतो ? याची चुरस लागलेली असे.मला व्हॉलीबॉल येत नसे.मला मँच पाहण्यात मजा वाटत असे.प्रथम वर्षापासुन मी अभ्यासाकडे लक्ष देत असे. ब-याच जणांना अभ्यासाचे गांभीर्य नव्हते.
कॉलेज सुटल्यानंतर मी व जीवन भोसले नियमित वाचनालयात जात असे.मी खोलीवर हाताने स्वयंपाक करीत असे.मी व्यासनगरात शहापुरकर यांच्या वाड्यात रहात असे.तेथेच जीवन भोसले जवळच सोमवंशी ,राठोड शिवाजी व राम माने रहात असे.काही दिवसानंतर कल्याणी व इतर समोरच्या घरात रहायला आले होते .गोविंद सुर्याजी पाटील हा त्यांचे मामा बाबरे सर यांच्या घरी रहात असे.मी व गोविंद पाटील मिळुन कॉलेजला जात असत .कॉलेज रुमपासुन जवळपास दीड ते दोन कि. मी. अंतरावर होते.नळदुर्ग मधील किल्ल्याजवळ भरणारा बाजार खुप आठवतो.त्या वेळी खुप स्वस्ताई होती.नानी मां चा दर्गा खुप पावित्र्याने भरलेला वाटे.मी केंव्हातरी मैलारपूरला सुट्टीच्या दिवशी तसेच किल्ल्यातही जात असे.नळदुर्गचा तो किल्ला मी कित्येक वेळा पाहिला होता.व ब-हाणपुरला जाऊन आलो होतो.नळदुर्गच्या किल्ला परीसराची भटकंती मी कित्येकवेळा पायीच केली होती.
बालाघाट कॉलेजजवळील मागासवर्गीय वसतिगृहावर माझा मित्र वायदंडे रहात असे.माझ्या रुमवर तो येत असे.ब-याच जणांना मी एकलकोंडा वाटत असे.मी सर्व प्रात्यक्षिक कार्य पुर्ण करुन चांगले अंतर्गत गुण मिळवलो होतो.मी शहापुरकरांच्या वाड्यात संचार हा पेपर नियमितपणे वाचत असे.वाड्यातील रविवार सुद्धा कामात जात असे.
क्रमश:
[17/08, 1:32 PM] 👏🏻: डि एड कॉलेज १९९७ते ९९
कॉलेजमध्ये पाठाच्या सादरीकरणाचं जास्त गांभीर्य नसे.जसे सिनीयर तसेच ज्युनीयर .विद्यालयात परिपाठ अतिशय चांगला होत असे.रामकृष्ण रहिम ख्रिस्त बुद्ध झरतुष्ट .....या प्रार्थनेने वातावरण मांगल्याने भरुन जात असे.सर्वजण आनंदाने रहात असत.गाव ऐतिहासिक असल्यामुळे काही कमी नसे.एकदा माझ्या रुमवरील रॉकेल संपले होते.तर अंगुले भरत व शशिकांत कुलकर्णी यांनी मला रुमवर आणुन दिले होते.सोमवंशीला मी खुप चिडवत असे.जवळगे श्रीराम हा व्यायामाकडे जास्त लक्ष देत असे.पुजारी श्रीराम मी व्हॉलीबॉल चँपियन आहे या गुंगीत रहात असे.चौगुलेची नजर आकाशाकडे असे.तर देशमाने सिनियर असल्यामुळे सर्वांना समजावुन सांगत असे.मुगळे रवीराज हा नावाप्रमाणे कॉलेजला लवकर न येता उशीरा येत असे.सतत पासची व बसची चर्चा करीत असे.मुगळे रविराज याचे अभ्यासाकडे लक्ष नसे.कांबळे हा निष्पाप नजरेने पहात असे.राजु लोहारे पारले बिस्कीटची हसुन जाहीरात करीत असे तर माणिकशेट्टी सुनील शेट्टीची स्टाईल मारत असे.मुली मात्र कोणी कितीही चांगली कामगिरी केली तरी कुणालाच भाव देत नसत.प्रत्येकजण आपल्या विश्वात आनंदी होता.लातूरचा माने अन्यायग्रस्त व अभावग्रस्त चेहरा करत असे.वायदंडे दयानंद व ईरले सदाशिव हे दुष्काळग्रस्तांसारखा चेहरा करत असत.मोहन व आबाराव कांबळे मला फिल्म शोलेमधल्या गब्बरसिंग व त्याचे साथीदार यांच्यासारखे दिसत.
ग्रामोपाध्ये सर अध्यापन पद्धतीकडे जास्त लक्ष देत असत.ते गणित का शिकवत नाहीत याबद्दल छात्रअध्यापकाच्या मनात राग असे.घोडके सर मला विज्ञान विषयातील ८४ गुणांचे रेकॉर्ड सांगत.मी ते ८८ गुण घेऊन मोडलो हे सांगण्याकरीता पुन्हा जाणे झाले नाही.पुराणिक कारकुनाचे सर्वांकडे लक्ष असे.अंतर्गत गुणाच्या धमकीला कांही जण घाबरत असत.मला तुळजापुरहून येणा-या शिक्षकांचे नवल वाटत असे.संगीत शिक्षकांच्या सुरात कांही विद्यार्थी वेगळाच सुर लावत असत.कळंत्रे सरांनी आपल्या जीवनाची वाताहात केली होती...जाने कहॉ गये वो दिन हे गीत ते का गात...? का पित असत...? असले नसले प्रश्न मला पडत असत? माझ्या एका प्रिय मित्राला टपरीवर सिगरेट ओढताना पाहिल्यावर माझ्या नैतिक स्वभावाला धक्का बसला होता.
आमचे घरमालक जीवन वाकळे वर सतत लक्ष ठेवत असत? कारण पाणी गरम करताना तो अंडी बॉईलकरत असे.व टरफले समोर टाकत असे.याचा त्याना राग होता.घरमालकाचा डोळा चुकवुन पेरु फस्त करणे हा आमचा उद्योग होता.
क्रमश:
[17/08, 5:00 PM] 👏🏻: डी एड १९९७ ते ९९
कॉलेजमध्ये असताना मला नेहमी मांगल्य व पवित्रता याचा शोध घेण्याची सवय होती.मी अजुनही शाकाहारी व निर्व्यसनी राहिलो याचे श्रेय आजुबाजुला सामान्य जीवन जगणा-या माणसाकडे जाते.माझं इंग्रजी चांगलं होतं.त्याचा फायदा शिक्षकांना व विद्यार्थ्यांना झाला.मी डि.एड ला असताना वेळेवर नियमित जात असे.ती सवय अजुन का़यम आहे.गेल्या १७ वर्षात २ते ३वेळा कांही अपरिहार्य कारण वगळता मी शाळेत नियमित जाऊ शकलो.
डि.एड ला असताना छात्र अध्यापकावर जसे संस्कार होतात तेच कायम रहातात.जीवनात नेहमी चांगल्या गोष्टीचा शोध घेतल्याने स्वत:चा व इतरांचा विकास होतो.जीवनमुल्ये व संस्कार मुल्ये आत्मसात केल्याने आपणास कोणतेही काम केल्यानंतर अपराधीपणाची भावना रहात नाही.आपले कर्म चांगले असतील तर मन प्रसन्नतेने काम करते अन्यथा कामात मन लागत नाही.वेळ मारुन नेऊन थातुरमातूर काम केल्यास मन पश्चातापाच्या अग्नीत जळते.व पश्चातापाच्या स्थितीत मन नसेल तर नियती त्याला जबरदस्त शिक्षा देते.मुलांचे आयुष्य बिघडवण्यासारखे दूसरे पाप नाही .डि.एड मध्ये प्रशिक्षण म्हणजे रंगीत तालीम असते.२२ मार्च २००० रोजी मी लातूर जि.प.मध्ये सेवेत रुजु झालो.माझे स्वप्न होते.आपल्या जीवनकालात कमीत कमी दोन विद्यार्थी तरी MBBS झाले पाहिजेत या वर्षी माझे स्वप्न दोन विद्यार्थ्यांनी करुन दाखवले.माझे पाच विद्यार्थी नवोदय प्रवेशासाठी निवड झाली.पैकी तीन शिकले.एक विद्यार्थी MIT पुणे येथे लागला.एक विद्यार्थी नेव्ही मध्ये गेला.सत्य सुंदर मांगल्याची आराधना केल्याने परमेश्वर जवळ असल्याची जाणीव होते.डि.एड चे प्रशिक्षण व वरील सर्व गोष्टीचा मेळ कसा बसतो याचा मी प्रयत्न करतो.तर नवल वाटते.वट वृक्षाचे बी किती सुक्ष्म असते पण त्याचे सामर्थ अचाट असते.
जीवनात जे काही मिळाले ते जवळच्या सर्व गुरु ,मार्गदर्शक ,मित्रांनी दिले.आपण एका दिव्यत्वाच्या सोबत आहोत.याची जाणीव सतत होते.

खूपच छान मांडणी...डी.एड.च्या आठवणींची
उत्तर द्याहटवाअसेच लिहा... जुने सर्वकाही आठवते आणि वाटते... पुन्हा तेथेचि जावे.
खूपच छान सर,आपले व्यक्तिमत्व खूप प्रभावी आणि प्रेरणादायी आहे.
उत्तर द्याहटवासुंदर आठवणी....!!!
उत्तर द्याहटवाखूप छान सर डी एड च्या आठवणी उजळून निघाल्या
उत्तर द्याहटवा