मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७

माझे शिक्षण

[23/08, 4:56 AM] 👏🏻: मी गावात फिरत होतो.तेंव्हा एक भला माणूस मुलांची नावे लिहित होता.मी म्हटलं,अहो काका ही नाव कशासाठी लिहिताय.' त्यांच्या त्या प्रसन्न चेह-यावर हसु फुललं.त्यांच्या मिशा हलल्या.गालात स्मित हास्य करीत तो म्हणाला,"लातूरला आम्ही भूकंपग्रस्त मुलांसाठी शाळा सुरु करतोय; तू येणार का?"
मी लगेच होकार दिला.त्या भल्या माणसानं माझं नाव लिहिलं, श्याम गुमानगिर गिरी.तारीख सांगितली व "या "असं म्हणाले.
तो भला माणुस म्हणजे एम.डी सर.यांचं नाव एम.डी.सर आहे हे जनकल्याण निवासी विद्यालयात गेल्यावर मला समजलं.दत्तमंदिर पाटीजवळ एका मोकळ्या जागेत भलं मोठं पत्र्याचं शेड मारलं गेलं.तोच वर्ग आणि वसतिगृह हे समीकरण नवीन होतं.१९९३ सालचा हा काळ.शिवाजी चौकातुन झुकझुक आगीनगाडी जायची मला खुप अप्रुप वाटायचं.
 भल्या पहाटे आम्हाला उठवले जायचे.भल्या पहाटे किंवा शाखेतुन आल्यानंतर थंड पाण्याने अंघोळ करीत असे.ओम नम: सच्छिदानंद रुपाय परत्माने...या एकात्मता स्तोत्राने दिवसाची सुरुवात अंबडचे  वाघमारे सर करीत असत.त्यांची ती प्रसन्न मुर्ती सोज्वळ व प्रेमळ चेहरा अजुनही लक्षात आहे.मनाचे श्लोक मला अजुनही पाठ आहेत.राजीव गांधी पुतळ्याजवळ असणा-या मैदानात बोयणे सर आम्हाला घेऊन जात.संघ दक्ष.आ रम.असा आवाज सर काढत.आम्हाला समजत नसे.नंतर हळूहळू प्रार्थना म्हणु लागलो.नमस्ते सदा वत्सले मातृभूमी.....प्रार्थना तोंडपाठ झाली.सर्व प्रभात शाखेचे नियम माहित झाले.प्रभात शाखेतील खेळात मी खुप रमत असे.सुर्यनमस्कार हा माझा आवडता व्यायामप्रकार होता.मी व माझ्या चमुने १०१ सुर्यनमस्कार घालुन शाळेला ढाल मिळवुन दिली होती.शाळेत स्वादिष्ट पोहे व दूध दिले जात असे.दूपारी रुचकर जेवण दिले जाई.मग आम्ही शिकवणीला जात असु कधी हिबारे सर,कधी केशवराज शाळेचे दीक्षित सरांकडे गणित तर संगीत शिक्षक असणारे कुलकर्णी सरांचे वडील गणित शिकवत असत.संध्याकाळी यशवंत विद्यालयाचे कदम सर इंग्रजी शिकवत असत.प्रफुल्ल कुलकर्णी सर कांही महिने मुख्याध्यापक होते.प्रफुल्ल कुलकर्णी सरांचे मराठीवर अफाट प्रभुत्व होते.कुकडे काका ब-याच वेळा भेट देऊन मार्गदर्शन करीत असत.लोमटे सर वसतिगृहाची जबाबदारी सांभाळत असत.अजय रेणापुरे सर मुलांचे इंग्रजी विषयाचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी प्रयत्न करीत असत.खेडकर सर विज्ञान विषय शिकवत असत.

क्रमश:
[23/08, 4:56 AM] 👏🏻: जनकल्याण निवासी विद्यालय





जनकल्याण निवासी विद्यालय ही शाळा जनकल्याण समिती लातूरने सुरु केली होती.या शाळेत मुलांच्या संस्कारावर अधिक भर असे.मुख्याध्यापक सर्वांचे काम कडक शिस्तीने करुन घेत असत.शाळेमध्ये सर्व तास नियमित होत असत.सर्वत्र शिस्तीच दरवळ असे.रात्री मुले दहा वाजेपर्यंत अभ्यास करीत असत.शाळेतील कांही मुलांना केशवराज विद्यालयात जाण्याची संधी मिळे.मी दत्तमंदिर ते श्यामनगर पर्यंत पायी जात असे.तेथे कुलकर्णी सर प्रयोगशाळेत मुलांना प्रयोग करुन दाखवत असत. नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी....हे प्रभो आनंददाता,ज्ञान हमको दिजीए अशी सुंदर प्रार्थना गीते मी केशवराज शाळेत शिकलो.होनराव सरांचा भूगोलाचा तास अविस्मरणीय वाटला.संजय जगताप सर ,मोगरगे सर,खैरनार सर यांचीही आठवण येते.केशवराज विद्यीलयात संघाची बैठक होत असे.मला ही जाण्याचा योग आला.मी पद्य गात असे
१) केशवांनी संघरुपे कल्पवृक्षा लावले..

२) हिंदु जगे तो विश्व जगेगा..

३) चंदन है इस देश की माटी...

४) भारत देश महान अमुचा..

५) मनुष्य तू बडा महान है..

६) संघठन गडे चलो सुपंथपर बढे चलो..


७) जय भवानी जय शिवराय

अशी कित्येक पद्ये मला मुखोद्गत झाली.खेळांचे प्रकार मला माहित झाले.जनकल्याण निवासी विद्यालयातील प्रत्येक व्यक्ती अहोरात्र काम कसे काय करतात ? याचे नवल वाटत असे.
आमची दहावीची प्रथम तुकडी १९९५ साली बाहेर पडली.
मी गुणवत्तेच्या जोरावर स्वयंशासन दिनाचा मुख्याध्यापक झालो होतो.जनकल्याण विद्यालयात मुलांना स्वावलंबी जीवनाचे व राष्ट्रसेवेचे पाठ शिकता आले.मुलांचे मन खुप रमले होते.अनाथ सनाथ मुलांसाठी शाळा आईच्या भूमिकेत होती.शाळेने मला घडविले.गुरुजनांनी आवश्यक तो बदल माझ्यात केला.शाळेचे नाते आई व मुलासारखे असते.आईपासुन दुरावल्यावर मुलाला वाईट वाटते.


क्रमश:



ओम सहनाववतु ....भोजनमंत्र तिथेच शिकलो.
[23/08, 4:56 AM] 👏🏻: विद्यीलय ऐवजी विद्यालय असं वाचावे.
[23/08, 4:56 AM] 👏🏻: जागृती शिबीर


पुण्यातील स्वरुप वर्धिनी समितीचे ज्ञानेश पुरंदरे,र.ज.नरवणे यांनी तीन दिवसाचे जागृती शिबीर घेतले होते.अजुनही दोघे संपर्कात आहेत.र.ज.नरवणे यांनी मला अनेक पत्र पाठवुन माझे वैचारिक प्रबोधन केले.जनकल्याण निवासी विद्यालयातील प्रत्येक मुलाची विचारपुस केली जायची.आज कदाचित ते भाग्य दुस-या शाळेतील मुलांना क्वचित मिळत असेल.शिपायापासुन प्रशासनापर्यंत सर्वचजण हे राष्ट्रीय काम आहे या भावनेने काम करीत असत.यावर्षी खेडकर सरांनी मला त्यांच्या शाळेत प्रमुख वक्ते म्हणुन बोलावले होते.अतिशय प्रेमाने माझ्याबद्दल गौरवोद्गार सरांनी काढले होते.प्रेम,आपुलकी,जिव्हाळा, सदाचार या सर्व सद्गुणांचा परिचय जनकल्याण विद्यालयात झाला.मी थोड्या काळात जी शिदोरी मिळवली ती अजुनही जपुन ठेवली.माझ्यातील विवेक विचारांना विद्यालयातुन प्रेरणा मिळाली.

इदम् राष्ट्राय इदम् न मम्

जे काही आहे ते राष्ट्राचे आहे.गेली २२ वर्षे  त्या संस्काराचा प्रभाव अाहे.


कृतार्थ मी कृतज्ञ मी👏🏻

1 टिप्पणी:

  1. एक आयुष्यातील अप्रतिम काळ विद्यार्थ्यासाठी व शिक्षकासाठी .विद्यार्थी घडवत घडवत शिक्षक सुध्दा घडले.एक अमूल्य ठेवा या काळात मिळाला .

    उत्तर द्याहटवा