रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

विचार सुमन

[28/09, 9:07 PM] Shyam Giri Lamjana: गुणवत्ता ही कोणाचीही गुलाम नाही ती एखाद्या झोपडीत अन्सार शेख च्या रुपाने नांदते व कलेक्टरची परीक्षा पास होऊन यशोशिखरावर बसते.पण आपण कमी पडतो ती गुणवत्ता पारखण्याच्या दृष्टीत.कारण जवाहीर सुद्धा कोहीनूर हि-याला प्रथमत: काला पत्थर समजतो.यात हि-याचा काहीही दोष नाही मग तो हिरा एखाद्या सामान्य रुपातल्या असामान्य जवाही-याला सापडतो.कठोर परीश्रम करुन त्याला नावारुपास आणतो.हि-याला हिरा का म्हणतात हे जवाहीर जगाला सांगतो पण त्याच्यामध्ये गर्विष्ठपणा नसतो.


गुरुजी हा जवाहि-याचं काम करतो अचुकपणे परंतु जवळच्या गाजरपारख्यांना त्याची किंमत नसते.फक्त प्रतिष्ठेसाठी हपापलेल्या लोकांना गुरुजी फक्त कामानेच उत्तर देतात याची समज समोरच्याला असते फक्त स्वार्थापोटी कांही वेळ नाटकं सुरु असतात.गुरुजीच्या कामावर विश्वास ठेवावयास हल्ली लोकांना कमीपणा वाटतो.कारण घर बदलले की घराचे वासे सुद्धा बदलतात.
[28/09, 9:07 PM] Shyam Giri Lamjana: समाजातील  काही लोक मान सन्मानाला हपापलेले असतात.त्यांच्या ठिकाणी स्वार्थ व अज्ञानाची मुळे खोलवर रुजलेली असतात.गावातील इतर अधिका-यांना तो साहेब म्हणतो.पण कोणालाही न दुखवणा-या गुरुजींच्या नावानं खडे फोडत असतो.अधिका-यांना लाच देऊन कामासाठी हातापाया पडतो पण त्यांच्याच मुलाबाळांना घडविणा-या गुरुजींना वाईट शब्द वापरतो.समाजात ही एक मानसिक विकृती पसरत आहे.गुरुजीकडे साधी टु व्हिलर आली की त्याला वाईट वाटते व एखाद्या गुरुजीकडे फोर व्हिलर आली की त्याचा तीळपापड होतो.गुरुजी सुखात आहेत याचीच त्याच्या मनात सतत सल असते.पण गुरुजींना आपण नीट का नाही बोलतो ? याचे त्याला काहीच वाटत नाही.


समाजात गुरुजींनी करोडो लोकांना घडवुन त्यांचे जीवन उज्ज्वल केले आहे.गुरुजीबद्दल आपण सदैव आदरचं बाळगला पाहिजे.

भूकंप

३० सप्टेंबर १९९३ चा गुरुवार


१) मी नववी वर्गात शिक्षण घेत होतो.२९ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन झाले.

२) पहाटे मी ३:३० वाजता अभ्यासाला उठलो.

३) पृथ्वीच्या पोटातुन मोठ मोठे आवाज येत होते.जमीन हळूहळू कंप पावत होती.

४) ३:५५ ला भूकंप सुरु झाला.१ मिनिटे जवळपास भूकंप होता.

५) वडिलांनी मला "भूकंप" आहे .पलंगाखाली जायला सांगितलं.

६) मग लाईट गेली सर्वत्र अंधार.भूकंपाचे नाव काढले की अजुनही अंगावर शहारे येतात.


७) मी लामजन्यात होतो.घर जुने होते.सुदैवाने कसलीच पडझड झाली नाही.बचावलो.

८) भूकंपानंतर घराबाहेर पडलो.५० गावात भूकंपाने मृत्युचा तांडव झाला होता.

९) नंतर पाऊस सुरु झाला.मदत व बचाव कार्यात खुप अडथळे आले.

१०) रा.स्व.संघ व अनेक संस्थांनी मदत केली.घरे उभारली.माणसे हळूहळू सावरली.अमेरिकेतुन मदत आली.

रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

रावा





रावा



दूपारची नीरव शांतता..
आम्रवृक्षावर एक रावा अगदी निवांत निद्रा घेतोय...
त्याचे ते काळसर मण्यांचे डोळे..
अगदी स्पष्ट दिसतात उघड झाप करताना अगदी सावधपणे..
हळुच वा-याची झुळुक येते
मग तो पाने सळसळ करतात
मध्येच एखाद्या पाखराच्या
पंखाचा फडफडाट अथवा
दुरुन येतेय रानपक्ष्याचे घुमणे
अगदी थोडा वेळ तो घेतोय सावधपणे विश्रांती
निसर्गाच्या सान्निध्यात..
पंधरा मिनिटानंतर तो सावध होतो
मग उडी मारुन दुस-यावर फांदीवर येतो साथीदारासोबत थोडा आवाज काढत मग वेगाने स्वारी निघुन जाते दुस-या झाडावर
मी झाडाखाली दूपार झालीय म्हणुन पहुडलेला.
मग डोळा कांही लागत नाही.
मग मनाच्या कोप-यात त्या राव्याचे देखणेपण भरत जाते...