रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

पारवा



दूपार ढळून गेलीय

पाखरांची विश्रांती संपलीय

दूर रानातुन स्पष्ट ऐकु येतेय

पारव्याचे ते घुमणे

कांही पक्षी क्षीण स्वरात गात आहेत


निरव् शांततेत ऐकू येतोय


कोकयाचा कलकलाट

बस बस करा म्हणतेय एखादी साळुंकी किंवा चुईक पक्षी



चिमण्यांचा आवाजही स्पष्ट येतोय


भुईमुगाच्या शेंगा वेचन्याचं काम मंदावलय

एखाद्या बैलजोडीला किंवा शेळ्यांना हाकलत शेतगडी घराकडे चाललाय


आंब्यावर खारुताई चित्कारतेय


तळ्यातल्या पाण्यावर काही पक्षी झेपावत आहेत


लगबगीने पाखरे ऊसाच्या शेतावरुन गिरक्या मारताहेत


आंब्याच्या झाडावरुन हा कोण नवखा? या दृष्टीने खारुताई बघते आहे.


पारव्याच्या घुमण्याचा वेग मधुनच वाढतोय बंद सुरु होतोय सादाला प्रतिसाद



ऊन्ह आता थंड झाली आहेत

आभाळात पांढ-या ढगांची गर्दी होतेय



मध्येच कावळ्याचा काव काव कर्कश ध्वनी विचलीत करतोय,

का....आ....व....अश्या लांब ओरडण्यातुन त्याचा शिणवटा व दिवस मावळतीला गेल्याचा  जाणवतोय



पारवा अजुनही घुमतोय

मनाच्या गाभा-यात खोलवर त्याचा ध्वनी रुततोय



रानातल्या कविता

@©®श्याम गिरी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा