बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

धमन्यातुन धावणा-या त्या विषारी राक्षसांचा नंगानाच सुरुय... शरीर अधाश्यासारखं खात सुटणा-या त्या दैत्यांना तमा नाही... पण एक सूर्यपुत्र त्यांच्यावर विवेकाची विजेरी चालवतोय... त्यांचा एकचं मंत्र विनाश विनाश संपवुन टाकीन मी तुला... त्याच्या या धमकीची सवय झालेल्या जगण्यांने त्यांच्याकडुन मिळणा-या मृत्युवर मात करण्याची शक्ती दिलीय त्याने... श्वेतांबर रुपी सुर्यपुत्राने विवेकदीप पेटवलाय .अखंड धगधगणारे विषमतेचे आगीचे लोळ विझु पहात आहेत... त्याच्या धैर्यरुपी नांगराने समाजाची मने मशागत करण्यास केंव्हाचं सुरुवात केलीय... त्याच्या धमन्यातुन वाहणा-या रुधिराच्या धगीने दैत्याची गती मंदावलीय... त्याच्या स्वयंभू जगण्यातुन मनांना आशेची पालवी फुटतेय... तो विश्वासाने सांगतोय मी सुर्यपुत्र रवी त्याचाच वारसा घेऊन आलोय... खबरदार दैत्यानो. खबरदार दैत्यानो. दैत्य-( एड्सचे विषाणु)

शाहु कॉलेजच्या आठवणी

[8/4, 6:23 PM] ☔: कृतज्ञता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या अभ्यासकेंद्रात एम.ए मराठी विषयासाठी प्रवेश घेतला.या महाविद्यालयात रविवारी तास होतात याच अप्रुप व नवल वाटायचं मराठीला शिकवणारे समंत्रक जवळपास सर्व प्राध्यापक वर्ग डॉक्टरेट प्राप्त होते ते परीसासम होते.विचारांचा परीसस्पर्श व्हावा व जीवनाचे सोने व्हावे असा दोन वर्षातील अनुभव.अभ्यास समीक्षणात्मक कसा करावा याचे नवे तंत्र सापडले.अनमोल जीवनविद्या प्राप्त झाली.लोकसाहित्याची गोडी पाटील सर मुळे लागली.संत तुकाराम होळकुंदे सरांमुळे समजला.मराठी भाषेचे विज्ञान कदम सरांनी सांगितले.तर संत साहित्य जाधव सरांमुळे खोलवर समजले.देशमुख सरांचा सहवास कमी लाभला पण एका तासात सुद्धा विषय कसा संपवावा याचेही तंत्र ( विनोदाने) समजले.त्यांचे आशीर्वाद आम्हाला नवी आशा देतील.सरवदे मामांच्या हस-या चेह-यामुळे व प्रसन्न मनाने सकाळी स्वागत केले जात असे.रविवार असुनसुद्धा ज्ञानगंगा घरोघरी पोहचवणारे प्राध्यापक गुरुजन मला भगीरथापेक्षाही श्रेष्ठ वाटले.त्यांची तेजस्विता,तपस्विता व तत्परता मनापासुन आवडली.याचे फलित सर्व हजर विद्यार्थी अ श्रेणीत पास झाले.आम्ही एम.ए मराठीचे सर्व विद्यार्थी कृतज्ञ व कृतार्थ आहोत.कांही चुकले असेल तर मनापासुन क्षमा मागतो. सर्व गुरुजनांना परमेश्वराजवळ उदंड आयुष्य लाभो म्हणुन प्रार्थना करतो. 🌸🌸🌸🌸🌸👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 [8/4, 11:26 PM] ☔: सरवदे तात्या 22 मार्च 2000 साली शिक्षक पदावर रुजु झालो.पदवीसाठी मी यशवंतराव मुक्त विद्यापीठांतर्गत राजर्षी शाहु महविद्यालय लातूर येथील प्रवेश केंद्रावर प्रवेश घेतला.तेथेचं ओळख झाली सरवदे मामाची सर्वजण त्यांना तात्या नावाने हाक मारतात.तात्यांचा स्वभाव मितभाषी व मोजकचं बोलण्याची शैली.गेली कित्येक वर्षापासुन हजारो विद्यार्थ्यांना काम करत करत संधी मिळाली शिक्षणाची.तात्यांची भेट रविवारी होत असे.रविवारी प्राध्यापकांना तात्या लवकर वेळेवर या असा आग्रह करीत असत.प्रवेशाचे,पुस्तकांचे,परीक्षांचे,प्रवेशपत्र वाटपाचे,गुणपत्रक वाटपाचे अफलातून तंत्र तात्यांकडे आहे.तात्यांना मी कधीच आळसावलेलं पाहिलं नाही.हजारो प्रश्नांची उत्तरं तात्यांकडे तयार असत.त्यांचा उत्साही ,शांत, संयमी,स्वभाव सर्वांना आवडतो.विद्यापीठाचे सर्व पत्रव्यवहार वेळेवर व अचूक करतात.मेसेज पाठवुन तास केंव्हापासुन सुरु होणार आहेत हे सांगतात.नवनवीन गरजु लोकांना ओळखुन तासिकांचे काम देण्याचे तंत्र फक्त तात्यांकडेच आहे.परीक्षा काळात सर्व अवघड परिस्थिती तात्यांनी हाताळली आहे.साधी रहाणी व प्रेमळ स्वभावात तसुभरही फरक पडला नाही.गेली कित्येक वर्षांपासुन तात्यांचा कामाचा आलेख पहाता तो असाधारण आहे.जीवनाचे अनेक चढ उतार पाहिलेले तात्या मनाने करारी व कर्तव्य कठोर आहेत.तात्यांचे अभ्यासकेंद्रावरील व्यवस्थापनाचे काम विद्यापीठातील कर्मचा-यांना लाजवेल असे आहे. सतत कामात बिझी असणा-या तात्यांना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य चिंततो. 🌸🌸👏🏻👏🏻गिरी सर लामजना
मनाचा व बुद्धिचा खंबीर शाश्वतपणा ज्यामध्ये असते तिमिराला जिंकण्याची नव्हे आपलसं करुन प्रकाशात रुपांतरित करण्याची धमक... म्हणजे स्वातंत्र्य मनाच्या सुपीक मातीमध्ये सृजनाचे बीजे पेरुन विश्वसमता पिकवण्याची शक्ती... म्हणजे स्वातंत्र्य विश्वशांतीच्या मार्गावर अग्रक्रमण करणा-या सत्यरुपी देवदूताच्या अंतकरणातील परमकारुण्य अनुभवण्याची परमोच्च स्थिती...म्हणजे स्वातंत्र्य अध्यात्मामधील चेतनरुपी बिंदुच्या सहाय्याने ज्ञानरुपी अथाहसिंधु प्राशन करुन अमरत्वातील क्षितिजावर विश्वमांगल्याचा जाप करणे... म्हणजे स्वातंत्र्य सदाचाराचा परमोच्च अविष्कार,लोकशाहीतील लोकशाही,मानवातील मानवतावादाचा साक्षात्कार...म्हणजे स्वातंत्र्य अविवेकाची काजळी दूर सारुन विश्वकल्याणासाठी स्वत: हून स्विकारलेले व्रत... म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य... रचनाकार श्याम गुमानगिर गिरी

गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

दैत्यानों सावधान धमन्यातुन धावणा-या त्या विषारी राक्षसांचा नंगानाच सुरुय... शरीर अधाश्यासारखं खात सुटणा-या त्या दैत्यांना तमा नाही... पण एक सूर्यपुत्र त्यांच्यावर विवेकाची विजेरी चालवतोय... त्यांचा एकचं मंत्र विनाश विनाश संपवुन टाकीन मी तुला... त्याच्या या धमकीची सवय झालेल्या जगण्यांने त्यांच्याकडुन मिळणा-या मृत्युवर मात करण्याची शक्ती दिलीय त्याने... श्वेतांबर रुपी सुर्यपुत्राने विवेकदीप पेटवलाय .अखंड धगधगणारे विषमतेचे आगीचे लोळ विझु पहात आहेत... त्याच्या धैर्यरुपी नांगराने समाजाची मने मशागत करण्यास केंव्हाचं सुरुवात केलीय... त्याच्या धमन्यातुन वाहणा-या रुधिराच्या धगीने दैत्याची गती मंदावलीय... त्याच्या स्वयंभू जगण्यातुन मनांना आशेची पालवी फुटतेय... तो विश्वासाने सांगतोय मी सुर्यपुत्र रवी त्याचाच वारसा घेऊन आलोय... खबरदार दैत्यानों. खबरदार दैत्यानों. दैत्य-( एड्सचे विषाणु)
तेजाची आरती.. मातीत गाढ झोपलेले बी पावसाच्या मायेच्या स्पर्शाने जागे झाले.... दोन पानाच्या पाकळ्यांनी टाळ्या वाजवु लागले... गवत फुलांनी त्याच्याशी गट्टी केली.व गवतात तो हरवुन गेला... धरतीला इवल्या हातांनी बिलगुन त्यांने गगन पित्याकडे पाहिले... त्याच्या किलकिल्या डोळ्यातील स्वप्न पाहुन त्याला वरुणाने हाक मारली... पावसाच्या टपो-या थेंबांनी त्याचे इवले गाल हसरे झाले... भन्नाट रान वा-याशी ते रात्रीच्या मंद प्रकाशात तेजाची आरती गाऊ लागले... रानभर उगवलेल्या हजारो रानपणत्यांनी त्याच्या सुरात सुर मिसळला... टिपूर चांदण्याच्या प्रकाशात चमकणारा अबोल कदंब डोळ्यांनी खुणवु लागला... अरे, तुम्ही गगनपुत्र पण सुर्योपासक.केवड्याने कदंबाच्या या वचनाने मान डोलावली... तिमिरातुनी तेजाच्या प्रवासाला तारे निघालेले पाहुन अबोली म्हणाली, चरैवती चरैवती...

सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८

राजे पुन्हा जन्माला या... आम्ही किती वर्षापासुन वाट पहातोय... राजे तुम्ही पुन्हा जन्माला या... तुम्हीचं घ्यावी हातात नितीची तलवार अन् उधळून टाकावी अन्यायाचे भींत... दुर्जनाचे काळीज चिरुन फाटावी द्या अशी तुम्ही आरोळी... खुपसा तुमचा बिचवा दुर्दैवाच्या काळोखात अन् खेचा अन्यायाने पोखरलेली आतडी... करा हल्ला असमानतेची दुही माजवणा-या कावेबाज गनिमांवर अन् टांगा भ्रष्टाचाराची लक्तरे उंच वेशीवर... तोडुन टाका विषमतेचे अभेद्य तट अन् बांधा पुन्हा एकदा बंधुतेचे बुरुज... वाचवा कुस्करणा-या कळ्या रानटी शिका-याच्या हातून... दहशतीचे डोळे फोडा अन् फडकवा समतेचे निशाण... राजे पुन्हा जन्माला या.. रचनाकार... गिरी श्याम गुमानगिर...6.8.18