बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

मनाचा व बुद्धिचा खंबीर शाश्वतपणा ज्यामध्ये असते तिमिराला जिंकण्याची नव्हे आपलसं करुन प्रकाशात रुपांतरित करण्याची धमक... म्हणजे स्वातंत्र्य मनाच्या सुपीक मातीमध्ये सृजनाचे बीजे पेरुन विश्वसमता पिकवण्याची शक्ती... म्हणजे स्वातंत्र्य विश्वशांतीच्या मार्गावर अग्रक्रमण करणा-या सत्यरुपी देवदूताच्या अंतकरणातील परमकारुण्य अनुभवण्याची परमोच्च स्थिती...म्हणजे स्वातंत्र्य अध्यात्मामधील चेतनरुपी बिंदुच्या सहाय्याने ज्ञानरुपी अथाहसिंधु प्राशन करुन अमरत्वातील क्षितिजावर विश्वमांगल्याचा जाप करणे... म्हणजे स्वातंत्र्य सदाचाराचा परमोच्च अविष्कार,लोकशाहीतील लोकशाही,मानवातील मानवतावादाचा साक्षात्कार...म्हणजे स्वातंत्र्य अविवेकाची काजळी दूर सारुन विश्वकल्याणासाठी स्वत: हून स्विकारलेले व्रत... म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य... रचनाकार श्याम गुमानगिर गिरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा