बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८
शाहु कॉलेजच्या आठवणी
[8/4, 6:23 PM] ☔: कृतज्ञता
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या अभ्यासकेंद्रात एम.ए मराठी विषयासाठी प्रवेश घेतला.या महाविद्यालयात रविवारी तास होतात याच अप्रुप व नवल वाटायचं मराठीला शिकवणारे समंत्रक जवळपास सर्व प्राध्यापक वर्ग डॉक्टरेट प्राप्त होते ते परीसासम होते.विचारांचा परीसस्पर्श व्हावा व जीवनाचे सोने व्हावे असा दोन वर्षातील अनुभव.अभ्यास समीक्षणात्मक कसा करावा याचे नवे तंत्र सापडले.अनमोल जीवनविद्या प्राप्त झाली.लोकसाहित्याची गोडी पाटील सर मुळे लागली.संत तुकाराम होळकुंदे सरांमुळे समजला.मराठी भाषेचे विज्ञान कदम सरांनी सांगितले.तर संत साहित्य जाधव सरांमुळे खोलवर समजले.देशमुख सरांचा सहवास कमी लाभला पण एका तासात सुद्धा विषय कसा संपवावा याचेही तंत्र ( विनोदाने) समजले.त्यांचे आशीर्वाद आम्हाला नवी आशा देतील.सरवदे मामांच्या हस-या चेह-यामुळे व प्रसन्न मनाने सकाळी स्वागत केले जात असे.रविवार असुनसुद्धा ज्ञानगंगा घरोघरी पोहचवणारे प्राध्यापक गुरुजन मला भगीरथापेक्षाही श्रेष्ठ वाटले.त्यांची तेजस्विता,तपस्विता व तत्परता मनापासुन आवडली.याचे फलित सर्व हजर विद्यार्थी अ श्रेणीत पास झाले.आम्ही एम.ए मराठीचे सर्व विद्यार्थी कृतज्ञ व कृतार्थ आहोत.कांही चुकले असेल तर मनापासुन क्षमा मागतो.
सर्व गुरुजनांना परमेश्वराजवळ उदंड आयुष्य लाभो म्हणुन प्रार्थना करतो.
🌸🌸🌸🌸🌸👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
[8/4, 11:26 PM] ☔: सरवदे तात्या
22 मार्च 2000 साली शिक्षक पदावर रुजु झालो.पदवीसाठी मी यशवंतराव मुक्त विद्यापीठांतर्गत राजर्षी शाहु महविद्यालय लातूर येथील प्रवेश केंद्रावर प्रवेश घेतला.तेथेचं ओळख झाली सरवदे मामाची सर्वजण त्यांना तात्या नावाने हाक मारतात.तात्यांचा स्वभाव मितभाषी व मोजकचं बोलण्याची शैली.गेली कित्येक वर्षापासुन हजारो विद्यार्थ्यांना काम करत करत संधी मिळाली शिक्षणाची.तात्यांची भेट रविवारी होत असे.रविवारी प्राध्यापकांना तात्या लवकर वेळेवर या असा आग्रह करीत असत.प्रवेशाचे,पुस्तकांचे,परीक्षांचे,प्रवेशपत्र वाटपाचे,गुणपत्रक वाटपाचे अफलातून तंत्र तात्यांकडे आहे.तात्यांना मी कधीच आळसावलेलं पाहिलं नाही.हजारो प्रश्नांची उत्तरं तात्यांकडे तयार असत.त्यांचा उत्साही ,शांत, संयमी,स्वभाव सर्वांना आवडतो.विद्यापीठाचे सर्व पत्रव्यवहार वेळेवर व अचूक करतात.मेसेज पाठवुन तास केंव्हापासुन सुरु होणार आहेत हे सांगतात.नवनवीन गरजु लोकांना ओळखुन तासिकांचे काम देण्याचे तंत्र फक्त तात्यांकडेच आहे.परीक्षा काळात सर्व अवघड परिस्थिती तात्यांनी हाताळली आहे.साधी रहाणी व प्रेमळ स्वभावात तसुभरही फरक पडला नाही.गेली कित्येक वर्षांपासुन तात्यांचा कामाचा आलेख पहाता तो असाधारण आहे.जीवनाचे अनेक चढ उतार पाहिलेले तात्या मनाने करारी व कर्तव्य कठोर आहेत.तात्यांचे अभ्यासकेंद्रावरील व्यवस्थापनाचे काम विद्यापीठातील कर्मचा-यांना लाजवेल असे आहे.
सतत कामात बिझी असणा-या तात्यांना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य चिंततो.
🌸🌸👏🏻👏🏻गिरी सर लामजना
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा