शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१८

कविता

कविता - बहिणाई खानदेशाच्या शेतात बहिणाई उमलली तिच्या गोड गळ्यातुन श्रृंगारली रोप वेली माझी बहिणाई बहिणाई भोळी भाबडी सोज्वळ मुर्तीमंत परमेश्वर जशी मुक्ताई साजर माझी बहिणाई माय सा-या महाराष्ट्राचं लेणं गुंजते हो कानोकानी तिच्या गळ्यातलं गाणं तिच्या शब्दाची जादू किती सांगु नवलाई कधी वा-यासंगे बोले पंढरीची रखुमाई तिच्या गाण्यातुन फुटे मायेचा पाझर हरिनामाचा जागर रात्रंदिन चालतसे माझी बहिणाई माय सा-या जगताची आई तिच्या निघुन जाण्यानं जिवा लागली बोचणी @ श्याम गिरी,लामजना,ता.औसा जि. लातूर

रविवार, ९ सप्टेंबर, २०१८

अंधश्रद्धेचा विळखा शाळा सुटल्यानंतर काही शाळकरी मुले मैदानावर खेळत होती.मी गावाकडे निघालो होतो.मैदानावर एक अनोळखी मुलगा हातात गुलेर घेऊन आला होता.मी त्याला विचारलो की तू कोणत्या वर्गात शिकतोस? तुझं गाव कोणतं? त्याने मी नववी वर्गात शिकतो व परगावचा असुन आजीकडे आलो आहे. तिला लकवा मारलं आहे. तिला बरं करण्यासाठी म्हणुन आजोळी आलो आहे.मी विचारलो तुझ्या हातात गुलेर कशासाठी आणलास? तो म्हणाला, पारवा मारण्यासाठी आणलोय .त्याचं पंख आजीच्या हातावरुन फिरवलं की तिचा आजार कमी होईल.आजीचं फिरणं बंद झालं आहे सर.त्याच्या या उत्तरानं मी अवाक झालो.मी त्याच्या खांद्यावर हात ठेवताचं एक दूसरा मुलगा म्हणाला,सर त्याला शिवु नका.घरी गेल्यावर गाईचे गवतर( गोमुत्र) शिंपडावे लागते.मी त्या मुलाला विचारलो,तुला मी शिवलो तर काय होईल ? तो मुलगा म्हणाला सर शिवाशिव चालत नाही.आजीचे हातपाय हळूहळू वाकडे होतील तिला पुन्हा कधीच चालता येणार नाही.आता मात्र मी या उत्तराने चमकलोच. त्या मुलाची मी समजुत घातली .आज विज्ञान इतके प्रगत असताना आपण काय करत आहोत? डॉक्टरांच्या औषधाने तुझ्या आजीचा आजार कमी होईल.यासाठी पक्षी मारण्याची गरज नाही.पारव्याचा पण परिवार असतो.आपण एक पक्षी मारला तर त्याच्या परिवारातील इतर पक्ष्यांना वाईट वाटणार नाही का? त्यांना रडु येणार नाही का?असं म्हणताचं त्या मुलाच्या चेह-यावरील भाव बदलत होते.तो विचार करु लागला होता.त्याच्या मनावर या गोष्टींचा किती खोल पगडा बसला आहे.गेल्या कित्येक महिन्यापासुन तो आजीला बरं करण्यासाठी शाळा सोडुन आला होता.त्याच्या चेह- यावरील चिंता वाचत होतो.अंधश्रद्धेची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत. पारवा पक्षी मारुन उपचार केल्यावर लकवा ( अर्धांगवायु) रोग बरा होतो हा भाग माझ्यासाठी नवीन होता. माझ्या मनात अनेक प्रश्नांनी थैमान घातला .विचार करत करत मी गावाकडे चाललो की अजुनही समाजाच्या मनात अंधश्रद्धा किती खोल घर करुन बसल्या आहेत? शिक्षण नसल्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन नाही.योग्य उपचार नसल्यामुळे रुग्णांची मानसिक व शारीरिक कुचंबना होत आहे. चुकीचे उपचार केल्याने वेळ निघुन जात आहे.परिणामी रुग्णांचा आजार वाढत जात आहे.अंधश्रद्धेच्या विळख्यातुन लोकांची सुटका करण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. गिरी श्यामसुरेश गुमानगिर माध्यमिक शिक्षक जि.प.प्रशाला अंबुलगा( बु.)

बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

धमन्यातुन धावणा-या त्या विषारी राक्षसांचा नंगानाच सुरुय... शरीर अधाश्यासारखं खात सुटणा-या त्या दैत्यांना तमा नाही... पण एक सूर्यपुत्र त्यांच्यावर विवेकाची विजेरी चालवतोय... त्यांचा एकचं मंत्र विनाश विनाश संपवुन टाकीन मी तुला... त्याच्या या धमकीची सवय झालेल्या जगण्यांने त्यांच्याकडुन मिळणा-या मृत्युवर मात करण्याची शक्ती दिलीय त्याने... श्वेतांबर रुपी सुर्यपुत्राने विवेकदीप पेटवलाय .अखंड धगधगणारे विषमतेचे आगीचे लोळ विझु पहात आहेत... त्याच्या धैर्यरुपी नांगराने समाजाची मने मशागत करण्यास केंव्हाचं सुरुवात केलीय... त्याच्या धमन्यातुन वाहणा-या रुधिराच्या धगीने दैत्याची गती मंदावलीय... त्याच्या स्वयंभू जगण्यातुन मनांना आशेची पालवी फुटतेय... तो विश्वासाने सांगतोय मी सुर्यपुत्र रवी त्याचाच वारसा घेऊन आलोय... खबरदार दैत्यानो. खबरदार दैत्यानो. दैत्य-( एड्सचे विषाणु)

शाहु कॉलेजच्या आठवणी

[8/4, 6:23 PM] ☔: कृतज्ञता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या अभ्यासकेंद्रात एम.ए मराठी विषयासाठी प्रवेश घेतला.या महाविद्यालयात रविवारी तास होतात याच अप्रुप व नवल वाटायचं मराठीला शिकवणारे समंत्रक जवळपास सर्व प्राध्यापक वर्ग डॉक्टरेट प्राप्त होते ते परीसासम होते.विचारांचा परीसस्पर्श व्हावा व जीवनाचे सोने व्हावे असा दोन वर्षातील अनुभव.अभ्यास समीक्षणात्मक कसा करावा याचे नवे तंत्र सापडले.अनमोल जीवनविद्या प्राप्त झाली.लोकसाहित्याची गोडी पाटील सर मुळे लागली.संत तुकाराम होळकुंदे सरांमुळे समजला.मराठी भाषेचे विज्ञान कदम सरांनी सांगितले.तर संत साहित्य जाधव सरांमुळे खोलवर समजले.देशमुख सरांचा सहवास कमी लाभला पण एका तासात सुद्धा विषय कसा संपवावा याचेही तंत्र ( विनोदाने) समजले.त्यांचे आशीर्वाद आम्हाला नवी आशा देतील.सरवदे मामांच्या हस-या चेह-यामुळे व प्रसन्न मनाने सकाळी स्वागत केले जात असे.रविवार असुनसुद्धा ज्ञानगंगा घरोघरी पोहचवणारे प्राध्यापक गुरुजन मला भगीरथापेक्षाही श्रेष्ठ वाटले.त्यांची तेजस्विता,तपस्विता व तत्परता मनापासुन आवडली.याचे फलित सर्व हजर विद्यार्थी अ श्रेणीत पास झाले.आम्ही एम.ए मराठीचे सर्व विद्यार्थी कृतज्ञ व कृतार्थ आहोत.कांही चुकले असेल तर मनापासुन क्षमा मागतो. सर्व गुरुजनांना परमेश्वराजवळ उदंड आयुष्य लाभो म्हणुन प्रार्थना करतो. 🌸🌸🌸🌸🌸👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 [8/4, 11:26 PM] ☔: सरवदे तात्या 22 मार्च 2000 साली शिक्षक पदावर रुजु झालो.पदवीसाठी मी यशवंतराव मुक्त विद्यापीठांतर्गत राजर्षी शाहु महविद्यालय लातूर येथील प्रवेश केंद्रावर प्रवेश घेतला.तेथेचं ओळख झाली सरवदे मामाची सर्वजण त्यांना तात्या नावाने हाक मारतात.तात्यांचा स्वभाव मितभाषी व मोजकचं बोलण्याची शैली.गेली कित्येक वर्षापासुन हजारो विद्यार्थ्यांना काम करत करत संधी मिळाली शिक्षणाची.तात्यांची भेट रविवारी होत असे.रविवारी प्राध्यापकांना तात्या लवकर वेळेवर या असा आग्रह करीत असत.प्रवेशाचे,पुस्तकांचे,परीक्षांचे,प्रवेशपत्र वाटपाचे,गुणपत्रक वाटपाचे अफलातून तंत्र तात्यांकडे आहे.तात्यांना मी कधीच आळसावलेलं पाहिलं नाही.हजारो प्रश्नांची उत्तरं तात्यांकडे तयार असत.त्यांचा उत्साही ,शांत, संयमी,स्वभाव सर्वांना आवडतो.विद्यापीठाचे सर्व पत्रव्यवहार वेळेवर व अचूक करतात.मेसेज पाठवुन तास केंव्हापासुन सुरु होणार आहेत हे सांगतात.नवनवीन गरजु लोकांना ओळखुन तासिकांचे काम देण्याचे तंत्र फक्त तात्यांकडेच आहे.परीक्षा काळात सर्व अवघड परिस्थिती तात्यांनी हाताळली आहे.साधी रहाणी व प्रेमळ स्वभावात तसुभरही फरक पडला नाही.गेली कित्येक वर्षांपासुन तात्यांचा कामाचा आलेख पहाता तो असाधारण आहे.जीवनाचे अनेक चढ उतार पाहिलेले तात्या मनाने करारी व कर्तव्य कठोर आहेत.तात्यांचे अभ्यासकेंद्रावरील व्यवस्थापनाचे काम विद्यापीठातील कर्मचा-यांना लाजवेल असे आहे. सतत कामात बिझी असणा-या तात्यांना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य चिंततो. 🌸🌸👏🏻👏🏻गिरी सर लामजना
मनाचा व बुद्धिचा खंबीर शाश्वतपणा ज्यामध्ये असते तिमिराला जिंकण्याची नव्हे आपलसं करुन प्रकाशात रुपांतरित करण्याची धमक... म्हणजे स्वातंत्र्य मनाच्या सुपीक मातीमध्ये सृजनाचे बीजे पेरुन विश्वसमता पिकवण्याची शक्ती... म्हणजे स्वातंत्र्य विश्वशांतीच्या मार्गावर अग्रक्रमण करणा-या सत्यरुपी देवदूताच्या अंतकरणातील परमकारुण्य अनुभवण्याची परमोच्च स्थिती...म्हणजे स्वातंत्र्य अध्यात्मामधील चेतनरुपी बिंदुच्या सहाय्याने ज्ञानरुपी अथाहसिंधु प्राशन करुन अमरत्वातील क्षितिजावर विश्वमांगल्याचा जाप करणे... म्हणजे स्वातंत्र्य सदाचाराचा परमोच्च अविष्कार,लोकशाहीतील लोकशाही,मानवातील मानवतावादाचा साक्षात्कार...म्हणजे स्वातंत्र्य अविवेकाची काजळी दूर सारुन विश्वकल्याणासाठी स्वत: हून स्विकारलेले व्रत... म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य... रचनाकार श्याम गुमानगिर गिरी

गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

दैत्यानों सावधान धमन्यातुन धावणा-या त्या विषारी राक्षसांचा नंगानाच सुरुय... शरीर अधाश्यासारखं खात सुटणा-या त्या दैत्यांना तमा नाही... पण एक सूर्यपुत्र त्यांच्यावर विवेकाची विजेरी चालवतोय... त्यांचा एकचं मंत्र विनाश विनाश संपवुन टाकीन मी तुला... त्याच्या या धमकीची सवय झालेल्या जगण्यांने त्यांच्याकडुन मिळणा-या मृत्युवर मात करण्याची शक्ती दिलीय त्याने... श्वेतांबर रुपी सुर्यपुत्राने विवेकदीप पेटवलाय .अखंड धगधगणारे विषमतेचे आगीचे लोळ विझु पहात आहेत... त्याच्या धैर्यरुपी नांगराने समाजाची मने मशागत करण्यास केंव्हाचं सुरुवात केलीय... त्याच्या धमन्यातुन वाहणा-या रुधिराच्या धगीने दैत्याची गती मंदावलीय... त्याच्या स्वयंभू जगण्यातुन मनांना आशेची पालवी फुटतेय... तो विश्वासाने सांगतोय मी सुर्यपुत्र रवी त्याचाच वारसा घेऊन आलोय... खबरदार दैत्यानों. खबरदार दैत्यानों. दैत्य-( एड्सचे विषाणु)
तेजाची आरती.. मातीत गाढ झोपलेले बी पावसाच्या मायेच्या स्पर्शाने जागे झाले.... दोन पानाच्या पाकळ्यांनी टाळ्या वाजवु लागले... गवत फुलांनी त्याच्याशी गट्टी केली.व गवतात तो हरवुन गेला... धरतीला इवल्या हातांनी बिलगुन त्यांने गगन पित्याकडे पाहिले... त्याच्या किलकिल्या डोळ्यातील स्वप्न पाहुन त्याला वरुणाने हाक मारली... पावसाच्या टपो-या थेंबांनी त्याचे इवले गाल हसरे झाले... भन्नाट रान वा-याशी ते रात्रीच्या मंद प्रकाशात तेजाची आरती गाऊ लागले... रानभर उगवलेल्या हजारो रानपणत्यांनी त्याच्या सुरात सुर मिसळला... टिपूर चांदण्याच्या प्रकाशात चमकणारा अबोल कदंब डोळ्यांनी खुणवु लागला... अरे, तुम्ही गगनपुत्र पण सुर्योपासक.केवड्याने कदंबाच्या या वचनाने मान डोलावली... तिमिरातुनी तेजाच्या प्रवासाला तारे निघालेले पाहुन अबोली म्हणाली, चरैवती चरैवती...

सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८

राजे पुन्हा जन्माला या... आम्ही किती वर्षापासुन वाट पहातोय... राजे तुम्ही पुन्हा जन्माला या... तुम्हीचं घ्यावी हातात नितीची तलवार अन् उधळून टाकावी अन्यायाचे भींत... दुर्जनाचे काळीज चिरुन फाटावी द्या अशी तुम्ही आरोळी... खुपसा तुमचा बिचवा दुर्दैवाच्या काळोखात अन् खेचा अन्यायाने पोखरलेली आतडी... करा हल्ला असमानतेची दुही माजवणा-या कावेबाज गनिमांवर अन् टांगा भ्रष्टाचाराची लक्तरे उंच वेशीवर... तोडुन टाका विषमतेचे अभेद्य तट अन् बांधा पुन्हा एकदा बंधुतेचे बुरुज... वाचवा कुस्करणा-या कळ्या रानटी शिका-याच्या हातून... दहशतीचे डोळे फोडा अन् फडकवा समतेचे निशाण... राजे पुन्हा जन्माला या.. रचनाकार... गिरी श्याम गुमानगिर...6.8.18

गुरुवार, २९ मार्च, २०१८

कोकया दिवसभर चालतो कोया कोया कोया झाडाखाली गोळा झाल्या रानातल्या सया सया सया एकमेकाच्या जवळ बसुनी करती कोया कोया कोया धरतीची आम्ही बाळं तिची आमच्यावर माया आता सुगी संपली संपली मनामध्ये एक भीती दाटली तळ्यातलं पाणी सारं आटलं तसं आमच्या डोळ्यातलं पाणीही आटलं कुणीतरी ठेवा घोटंभरं पाणी रानातली आम्ही पाखरं उपाशी गातो गाणी आमच्या कर्माची रेखा हे ही दिसं जातील मृगाच्या नक्षत्रात ढगोबा बंधु भेटतील. @©® श्याम गिरी लामजना

बुधवार, १४ मार्च, २०१८

https://youtu.be/ViDI3yz5DXk कविता बीज अंकुरे अंकुरे
https://youtu.be/8yRNcsA2t6U कविता माझ्या गोव्याच्या भूमीत
*ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टिफन हाॅकिंग्ज यांचं निधन* 🎯 स्टीफन विल्यम हॉकिंगश(८ जानेवारी १९४२ ते १४ मार्च २०१८) 🔸स्टीफन विल्यम हॉकिंग (८ जानेवारी १९४२) हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ आहेत. त्यांची पुस्तके आणि जाहीर कार्यक्रम यांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे. ते रॉयल सोसायटी ऑफ आर्टसचेमानद सदस्य आहेत. सन २००९ मध्ये त्यांना प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेले. केंब्रिज विद्यापीठात तीस वर्षे त्यांनी गणिताचे अध्यापन केले आहे. विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि पुंज गुरुत्व (क्वांटम ग्रॅव्हिटी) या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भाने त्यांनी दिलेले योगदान गौरविले जाते. कृष्णविवरेही किरणोत्सर्ग करीत असावीत, हे त्यांचे सैद्धांतिक अनुमान प्रसिद्ध आहे. अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम या त्यांच्या ग्रंथाने जगभरात लोकप्रियता मिळविली आहे. *🔖स्टीफन हॉकिंग* *जन्म* :- जानेवारी ८ १९४२ ऑक्सफर्ड, इंग्लंड *मृत्यू* :- १४ मार्च २०१८ कॅम्ब्रिज, इंग्लंड *नागरिकत्व* :- इंग्लंड *कार्यक्षेत्र* :- (१) खभौतिकशास्त्र, (२) गणित *प्रशिक्षण* :- ऑक्सफर्ड विद्यापीठ केंब्रिज विद्यापीठ *डॉक्टरेटचे मार्गदर्शक. :-* डेनिस विल्यम सियामा *ख्याती* :- कृष्णविवर *पुरस्कार* :- कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर *वडील* :- डॉ. फ्रँक हॉकिं *आई* :- इसोबेल हॉकिंग *पत्नी* :- (१) जेन वाइल्ड, (२) इलेनी मेसन *अपत्ये* :- (१) रॉबर्ट (पुत्र), (२) लूसी (कन्या), (३) तिमोथी (पुत्र) *🔖जन्म व बालपण* ■ स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ या दिवशी ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांची आई इझाबेल ऑक्सफर्डची पदवीधर होती. त्यांना फिलिपा आणि मेरी या दोन बहिणी आणि एडवर्ड हा दत्तक भाऊ अशी भावंडे होती.हॉकिंग यांच्या जन्माच्या वेळी, डॉ. फ्रँक आणि इझाबेल या दांपत्त्याने उत्तर लंडनहून ऑक्सफर्डला स्थलांतर केले, कारण त्यावेळी दुसरे महायुद्ध चालू होते. त्यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. लहानपणी हॉकिंग यांना वाचनाचीखूप आवड होती. *🔖शिक्षण* ■ स्टीफन यांच्या जन्मानंतर हॉकिंग कुटुंबाने परत लंडनला स्थलांतर केले, कारण त्यांचे वडील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये पार्सिटॉलॉजी विभागाचे प्रमुख झाले होते. १९५० मध्ये हॉकिंग कुटुंबाने सेंट अल्बान्स येथे स्थलांतर केले. येथेच १९५० ते १९५३ अशी तीन वर्षे त्यांचे शिक्षण, सेंन्ट अल्बान्स स्कूल या शाळेत झाले. हॉकिंग यांना संगीत, वाचन, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड विद्यार्थीदशेपासूनच होती. हॉकिंग यांना पहिल्यापासून विज्ञान विषयात रस होता. गणिताच्या शिक्षकाच्या प्रेरणेमुळे त्यांना विद्यापीठात गणिताचे शिक्षण घ्यावयाचे होते पण त्यांच्या वडीलांना असे वाटत होते कि त्यांनी "युनिव्हर्सिटी कॉलेज, ऑक्सफर्ड" येथे प्रवेश घ्यावा, त्यांनी १९५९ साली वयाच्या १७ व्या वर्षी कॉसमॉलॉजी हा विषय निवडून प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली. त्यांनी १९६२ यावर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी स्टीफन यांनी केंब्रिज विद्यापीठ येथे प्रवेश घेतला. *🔖संशोधन* ■ एकदा लंडनमध्ये गणितज्ञ रॉजर पेनरोज यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले. तार्‍यातील इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो असे निष्कर्ष पेनरोज यांनी त्या भाषणात मांडले होते. यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही तार्‍याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला, या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली. याच प्रबंधाचा पुढचा भाग सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला. या प्रबंधासाठी १९६६ सालचे ऍडम्स प्राईझ त्यांना मिळाले. ■ स्टीफन हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर या विषयाकडे आपले लक्ष वळविले. यावर आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांताची जोड देऊन गृहिते मांडणे सुरू केले. त्यावेळी हॉकिंग आपल्या शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ होत गेले. एवढी अवघड गणिते त्यांनी केवळ मनातल्या मनात सोडविली. १९७४ साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंज यामिक आणि सापेक्षतावादाचा सिद्धांतची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्‍या किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली. ■ १९८० च्या दशकात हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला. ■ विज्ञान विषयात काम करीत असतांनाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. यासाठी हॉकिंग यांना १९७९ Royal Association for Disability and Rehabilitation या संस्थेकडून मॅन ऑफ दि इयर हा किताब देण्यात आला. 🔗 https://t.me/Mpscrockers88 *🔖आजार* ■ १९६२ मध्ये हिवाळी सुट्यांसाठी स्टीफन आपल्या घरी गेले असता त्यांना अचानक त्रास होऊ लागला. उपचारासाठी अनेक डॉक्टरांकडे दाखवून झाले पण रोगाविषयी काहीच माहिती मिळेना. त्यातच रोगाचा जोर वाढला आणि ८ जानेवारी १९६३ रोजी, २१ व्या वाढदिवस साजरा करीपर्यंतच दिवशीच स्टीफन यांना एक असाध्य रोग झाल्याचे स्पष्ट झाले. या रोगाला इंग्लंडमध्ये मोटर न्यूरॉन डिसीज (MND) तर अमेरिकेत अमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस (A. L. S.) असे म्हणतात. या रोगामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. याच्या सुरूवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद होत जाते. स्टीफन हॉकिंग जेमतेम दोन वर्षे जगतील असे त्यांना सांगण्यात आले. आधी ते खूप निराश झाले पण त्याच इस्पितळातील एका रोग्याला असाध्य रोगाशी झगडतांना पाहून स्टीफन यांनाही आशेचे किरण दिसू लागले. ■ स्टीफन यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हील चेअरचा आधार घ्यावा लागला. मग या व्हील चेअरलाच एक संगणक जोडण्यात आला. फक्त एक बोट वापरून स्टीफन या संगणकावर हवे ते काम करू शकत. १९८५ साली हॉकिंग यांना न्यूमोनिया रोग झाला. केवळ श्वास नलिकेला छिद्र करूनच शस्त्रक्रिया होऊ शकणार असल्याने तशी शस्त्रक्रिया हॉकिंग यांच्यावर करण्यात आली पण त्यामुळे हॉकिंग यांचा आवाज कायमचा गेला. यावर संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून ती त्या संगणकात कार्यरत करून दिली. यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे हॉकिंग यांना शक्य झाले. *🔖जीवनावरील चित्रपट* The Theory of Everything 〰〰〰〰〰〰〰〰〰〰
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 26......परफेक्ट गुरूमंत्र.. *DEVELOP SELF-CONFIDENCE* (आत्मविश्वास विकास) 1. *Empower smiling*. _चेहऱ्यावर हास्य असू द्या_ 2. *Relax yourself*. आरामशीर / तणावमुक्त रहा 3. *Have a clear understanding*. आपले विचारात सुस्पष्टता असू द्या 4. *Avoid misconceived thoughts*. गैरसमज / चुकीचे समज टाळा 5 *Prompt decision - making*. तात्काळ निर्णयक्षमता 6. *Avoid inferiority complex*. न्यूनगंड बाळगू नका 7. *Believe yourself*. स्वतःवर विश्वास ठेवा 8. *Be inspirational*. प्रेरणादायी रहा 9. *Develop challenging attitude*. आव्हानात्मक दृष्टिकोन विकसित करा 10. *Be a positive thinker*. सकारात्मक विचार ठेवा 11. *Have self – encouragement*. स्वयंप्रेरित रहा 12. *Avoid procrastination*. चालढकल (दिरंगाई) टाळा 13. *Learn lessons from others*. इतरांकडून प्रेरणा घ्या 14. *Dont lose your spirit*. हिंमत / धीर सोडू नका 15. *Think about time-use*. वेळेचे काटेकोर नियोजन करा 16. *Be smart at all costs*. नेहमी चाणाक्ष रहा 17. *Be a goal setter*. ध्येय निश्चित करा 18. *Be punctual*. तत्पर रहा 19. *Focus Involvement*. कामावर लक्ष केंद्रित करा 20. *Possess mental alertness*. मानसिकरित्या तत्पर रहा 21. *Sharpen your intelligence*. आपली बुद्धीमत्ता अधिक तीक्ष्ण करा 22. *Try to be intellectual*. बुद्धीमान बनण्याचा प्रयत्न करा 23. *Be co-operative*. सहकार्याची भावना बाळगा 24. *Avoid fearful feelings*. मनातील भीतीची भावना टाळा 25. *Strengthen your will power*. आपली इच्छाशक्ती प्रबळ असू द्या 26. *Never bother about failure*. कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका 💎💎👍🙏🏻
🚩 *पसायदान....* 🚩 🙏मनाला थक्क करणारी निस्पृह विश्वप्रार्थना...🙏 ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर वसलेला आहे असे संत ज्ञानेश्वर. ज्यांना सर्व भागवत भक्त "माऊली" हि प्रेममय हाक देतात. आपल्या नावाचा अर्थ आपल्या जीवनातून दाखवून देणारा हा अवलीया. माऊली तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार. माऊली नी ज्ञानेश्वरीची सुरुवात ईश्वराच्या आद्य रुपास आणि वेदांच्या निर्मात्यास स्मरून केली. ओम नमोजी आद्या.. वेद प्रतिपाद्या...जय जय श्री संवेद्या.. तसेच ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या -(ओवी १७९४ ते १८०२)- १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या अनंतसाधारण प्रार्थनेने केले. आपल्या सर्वाना अगदी तोंडपाठ असेल ना पसायदान.. अगदी लहानपणापासून आपण लता मंगेशकरांच्या आवाजातील सुमधुर पसायदान ऐकत आलोय किंवा शाळेतल्या प्रार्थनेमध्ये सुद्धा पसायदान चा समावेश असायचा. पण कधी आपल्याला त्याचा अर्थ सांगितला गेला नाही हे आपले दुर्दैव आहे. मी जेव्हा याचा अर्थ वाचला तेव्हा खरे तर थक्क झालो. खरंच आयुष्यात इतके मोठे कार्य करून ज्ञानेश्वरांनी आद्य ईश्वराकडे स्वतःसाठी काही मागितलेच नाही. आपण आता या विश्वप्रार्थनेचा अर्थ पाहू... *आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ॥ १ ॥* - या विश्वात्मक (विश्वाच्या कणा कणांमध्ये भरून राहिलेल्या ) माझ्या भगवंता, माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू आहे. त्या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावे आणि मला हे प्रसादाचे दान दयावे. *जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥* - मग ऐक माझे मागणे. या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्ती चे लोक आहेत त्यांच्या चा नाश कर. कारण कुठलाही मनुष्य हा कधी वाईट नसतो त्याचे गुण वाईट असू शकतात. तू फक्त तेच काढून टाक आणि दुष्प्रवृत्ती काढून टाकल्यावर त्यांच्या सत्कर्मामध्ये वाढ कर. हे जर केलेस तर नक्कीच या पृथ्वीतलावरील सर्व जीव प्रेममय होऊन जातील. - भगवंताकडे मागणे मागताना माउलींना आपल्या वाईट म्हणवल्या जाणाऱ्या मुलाची जास्त काळजी वाटते. कारण प्रत्येक मनुष्य सत्प्रवृत्तीमधून देवत्वाकडे वाटचाल सर्व करू शकतो हा त्यांना विश्वास आहे. *दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥* - जगामध्ये पाप हे फक्त अज्ञानरूपी अंधारामुळे आहे. हा अंधार नाहीसा होण्यासाठी जगात स्वधर्मरुपी सूर्याचा उदय होवो. प्राणीमत्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत. - इथे विश्व स्वधर्म म्हणजे हिंदू, मुस्लीम, बौध्ह इत्यादी धर्म नव्हेत तर "माणुसकी" हा धर्म प्रतीत आहे. हा धर्म जर आचरणात आणला तर प्राणीमात्रास इच्छेप्रमाणे सर्व काही मिळेल. *वर्षत सकळमंगळी । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥* - या विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहो. सध्या "नश्वर" गोष्टींवर निष्ठा असणारी प्रवृत्ती वाढत आहे. धन संपत्तीलाच "सुख" मानणारे लोक नकोत तर आत्म्याचे चिरंतन सुख मागणारे लोक जन्मास यावेत. *चला कल्पतरुंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥* -ईश्वरनिष्ठ लोक म्हणजेच संत हे कल्पतरूंचे उद्यान आहेत, चेतानारूपी चिंतामणी रुपी गाव आहेत, त्यांची वाणी म्हणजे जणू अमृताचे समुद्रच आहेत. कल्पतरू किंवा चिंतामणी म्हणजे जे मन इच्छील त्याची पूर्तता करणाऱ्या गोष्टी. जर ईश्वरनिष्ठ लोकांशी संग ठेवला तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही असा या ओवीचा मतितार्थ. - माउलींच्या काव्यामध्ये उपमात्मक दृष्टांत सदैव खूप सुंदर असतात. संतांना इतकी सूचक उपमा देऊन त्यांच्या कार्याचा अभिव्यक्त गौरवच केला आहे. *चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥* - जो मनुष्य, चारित्र्यावर कोणताही डाग नसलेला चंद्रच आहे (अंधारामध्ये सुद्धा दुसर्याला साथ देणारा) आणि रागीट स्वभाव नसणारा ज्ञानरूपी प्रकाशाचा सूर्यच आहे. त्याला सदैव सज्जन लोकांचाच संग मिळतो व त्याचे सोयरे ही अगदी त्याच्यासारखेच होतात. *किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥* - विश्वामध्ये (तिन्ही लोकातील) लोक सर्वसुखी होऊन अखंड या आदिपुरुषाची भक्ती करत राहोत. तसे पाहता सर्व सुख मिळाल्यानंतर भगवंत भक्तीकडे जाण्याचा लोकांची इच्छा कमी होत जाते. आणि ते न होण्याची मागणी माउली करतात. *आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टाद्दृष्ट विजयें हो । आवें जी ॥ ८ ॥* - आद्य भगवंताने जे वेद आणि ग्रंथांची निर्मिती केली आहे, त्या ग्रंथांचा अभ्यास हेच लोकांच्या जीवनाचे लक्ष व्हावे. आणि त्याच ग्रंथांमध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्य व्यतीत करावे. - जीवन सुखी करणे हे काही Rocket Science नाहीये. जीवनातील कठीण प्रसंगावरचा उपाय हा नेहमीच मार्गदर्शक ग्रंथ आणि वेगवेगळ्या पुस्तकामधून आपल्याला भेटतो. ग्रंथांना जीवन माना आणि जीवनच बदलून टाका. *येथ म्हणे श्रीविश्वेशरायो । हा होईल दानपसावो । येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥* - हे विश्वेशराया... हे जगाच्या मायबापा बापा... तू जेव्हा म्हणशील ना कि हे दान दिले.....तेव्हाच हा ज्ञानदेव चिरंतन सुखी होईल... तर असा आहे या विश्व प्रार्थनेचा गुढार्त... ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ९००० ओव्यांचे हे सार आहे... एका आदर्श समाजव्यवस्थेचे स्वप्न या जगद्माउली ने ८०० वर्षापूर्वी पाहिले. आज तागायत अखंड आषाढी वारी सुरु आहे, लाखो लोक या भक्तीसागरात बुडून सदैव आळंदी ते पंढरपूर हा भक्तीचा सेतू बांधत आहे.. ते करता करता आपण आजच्या सगळ्यात जलद माध्यमाचा म्हणजेच Internet चा वापर सत्कार्यासाठी करूया.
* इमानदारीचं फळ *

सकाळची वेळ.शिल्पाने भाजीबाजाराच्या कडेला गाडी लावायला ड्रायव्हरला सागितलं आणि गाडीतून उतरुन ती एका भाजीच्या गाडीकडे निघाली.तिला असं सकाळी भाजी घ्यायला फार आवडायचं. कलेक्टर झाल्यापासून तिला वेळ फार कमी मिळायचा पण जमेल तेव्हा ती भाजी आणायला निघायची.
भाजीच्या गाडीवर एक नऊ-दहा वर्षाची गोड चेहऱ्याची मुलगी बसली होती.भाजी घेऊन शिल्पाने तिला पर्समधून पैसे दिले.तेवढ्यात फोन वाजला तशी मोबाईलवर बोलता बोलता ती आपल्या गाडीकडे आली.बोलणं संपल्यावर ती गाडीत बसणार तेवढ्यात तिला मागून कोणीतरी स्पर्श केल्यासारखं जाणवलं.चमकून तिने मागे वळून पाहीलं तर भाजीवाली मुलगी उभी होती.
"काय झालं?पैसे तर दिलेना मी तुला?"
त्यामुलीने काही न बोलता पर्स पुढे केली.
"तुमची पर्स.गाडीवर राहीली होती."
शिल्पाने ती पर्स हातात घेऊन पाहीली.पैसे,क्रेडिट कार्ड्स, बँकेचे कार्ड्स जागच्या जागी होती.तिला त्या मुलीच्या इमानदारीचं कौतुक वाटलं.
"थँक्स बेटा.काय नाव तुझं?"
"सोनाली"
तेवढ्यात फोन वाजला आणि शिल्पा बोलता बोलता गाडीत बसली.त्या मुलीने दुर जाणाऱ्या गाडीकडे क्षणभर बघितलं आणि मग ती आपल्या भाजीच्या गाडीकडे निघाली.
 संध्याकाळी आँफिसमधून परत आल्यावर चहाचे घोट घेता घेता शिल्पाला त्या भाजीवाल्या मुलीची आठवण झाली आणि दुसऱ्या क्षणाला तिला तिचा भुतकाळ आठवला.होय असंच तर घडलं होतं तिच्याबाबतीत! आणि तिच्या इमानदारीचं जे बक्षीस मिळालं होतं त्यामुळेच तर ती इथपर्यंत पोहोचली होती.सगळा जीवनपट शिल्पाच्या डोळ्यासमोरुन सरकू लागला.

   अठरा वर्षांपुर्वीची ती गोष्ट.शिल्पा तेव्हा पाचवीत होती.दुपारची वेळ.शाळा आटोपून शिल्पा आपल्या घराकडे चालली होती.चालता चालता अचानक तिला आपल्या पायाने काहीतरी उडाल्याचं जाणवलं.पुढे जाऊन पहाते तर एक पाकिट पडलेलं दिसलं.उत्सुकतेने तिने ते उचललं आणि उघडून पाहीलं.नोटांनी गच्च भरलेलं होतं ते पाकिट.तिचं ह्रदय धडधडू लागलं.आजच शाळेत बाई सांगत होत्या.ईमानदारीचं फळ गोड असतं म्हणून!ते पाकिट तिथंच टाकून द्यावं असं तिला वाटू लागलं.काय करावं काय नाही या संभ्रमात तिनं आजुबाजुला पाहीलं.एक माणूस आपल्या आलिशान कारला टेकून फोनवर बोलत होता.नक्कीच!नक्की त्याचंच असावं हे पाकिट.शिल्पा विचारातच त्याच्याजवळ पोहोचली.त्याच्या हाताला स्पर्श करुन तिने त्याचं लक्ष वेधून घेतलं.
"काय आहे?" बोलण्यात व्यत्यय आल्यामुळे त्याने थोडं चिडूनच विचारलं.
"हे पाकिट तुमचं आहे?"
शिल्पाने पाकिट पुढे करत विचारलं.पाकिट पाहून तो चमकला.झटकन त्याचा हात पँटच्या मागच्या खिशाकडे गेला.
"हो माझंच आहे ते.कुठं सापडलं?"
"त्या तिथे पडलं होतं" शिल्पा पाकिट सापडलेल्या जागेकडे बोट दाखवत म्हणाली.
त्याने पाकिट उघडून पाहीलं.सगळं जागच्या जागी असलेलं पाहून एक दिर्घ निश्वास सोडला.तेवढ्यात मागून दुसऱ्या गाडीचा हाँर्न वाजला.त्या माणसाने पटकन  पाकिट खिशात कोंबलं आणि गाडीत बसून गाडी पुढे नेली.शिल्पाही आपल्या रस्त्याने पुढे निघाली.घरी पोहोचतांना शिल्पा खुप आनंदात होतीआपल्या इमानदारीचा तिला अभिमान वाटत होता.घरी जाऊन कधी एकदा आईला ही घटना सांगते असं तिला झालं होतं.
ती घरी आली तेव्हा आई चुलीवर पोळ्या करत होती.तिचं ते झोपडीवजा घर धुराने भरलं होतं.शिल्पाने दप्तर एका बाजुला टाकून आईला मोठ्या अभिमानाने झालेली घटना सांगितली.तिला वाटलं आई तिला शाबासकी देईल.पण पोळ्या करणं सोडून आई उठली.शिल्पाला धरुन हातातल्या लाटण्यानेच तिला मारु लागली.
"कारटे.इथे खायला काही नाहीये आणि तू हातातली लक्ष्मी फेकून दिली.काय गरज होती तुला ते पाकीट परत करायची.टाकून द्यायचं होतं दप्तरात! तुझ्यावर कोणाला संशय आला असता?" बोलता बोलता आई शिल्पाला मारत होती.शिल्पा जोरजोरात रडत होती,आईला 'नको ना मारु आई'अशी विनवण्या करत होती.आईच्या हातातल्या बांगड्या फुटल्या तेव्हाच शिल्पाची सुटका झाली.
 संध्याकाळी तिचा बाप दारु पिऊन आला.शिल्पाचा रडवेला चेहरा पाहून त्याने काय झालं विचारलं.शिल्पा काही बोलायच्या आतच तिच्या आईने सगळी कहाणी त्याला सांगितली.शिल्पाला वाटलं बाप तरी तिला सहानभुती दाखवेल.पण त्याने तिच्याच दप्तरातील पट्टी काढून तिला मारायला सुरुवात केली.सोबतीला शिव्या होत्याच.शिल्पाला मारणं चालू असतांना तिचा लहान भाऊ एका कोपऱ्यात थरथर कापत रडत होता.इमानदारी दाखवली की काय होतं याची जणू शिकवणच त्याचे आईबाप त्याला देत होते.शिल्पाला मारुन थकल्यावर तिचा बाप दारुच्या नशेत बडबडत बसला.मार खाऊन थकलेली शिल्पा न जेवताच झोपून गेली.
 दुसऱ्या दिवशी झालेली घटना शिल्पाने शाळेतल्या मैत्रिणींना सागितली.तिच्यासारख्याच झोपडपट्टीत रहाणाऱ्या त्या मुली.त्यांनी शिल्पालाच दोषी ठरवलं.

    दोन दिवसांनी संध्याकाळी शिल्पा आपल्या झोपडीत ग्रुहपाठ करत असतांना तिला बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला.पाठोपाठ दारावर टकटक ऐकू आली.तिची आई दार उघडून बाहेर गेली.
"शिल्पा बाहेर ये.हे कोण आलेत बघ"
धडधडत्या छातीने शिल्पा बाहेर आली.समोर एका आलिशान कारजवळ एक माणूस उभा होता.होय.तोच तो माणूस ज्याला तिने पाकिट उचलून दिलं होतं.तिला पाहून तो हसला.
"हीच ती मुलगी."तो शिल्पाच्या आईला म्हणाला.
" बेटा त्या दिवशी तुला थँक्यू म्हणायचं आणि तुला बक्षीस द्यायचंही राहून गेलं.बोल काय पाहीजे तुला?"
शिल्पा भांबावली.काय बक्षीस मागावं ते तिला कळेना.
" आईस्क्रीम चालेल?"
"हो आईस्क्रीम. मला आईस्क्रीम पाहीजे" शिल्पाच्या आधी तिचा बाहेर आलेला भाऊच आनंदाने ओरडला.शिल्पानेही मान डोलावली.
"चला तर मग.बसा गाडीत"
त्या आलिशान गाडीत बसायच्या कल्पनेनेच दोघं हुरळून गेले आणि पटकन गाडीत जाऊन बसले.शिल्पाच्या आईने नाराजीनेच त्यांच्याकडे पाहीलं.या आईस्क्रीम ऐवजी या शेठजीने पाचशे हजार बक्षीस म्हणून दिले असते तर साचलेली उधारी कमी तरी करता आली असती असं तिला वाटून गेलंं.
 शेठजीने त्या दोघांना अगोदर भेळ,पाणीपुरी खाऊ घातली.मग नंतर पोट भरुन आईस्क्रीम.
ते घरी परत आले तेव्हा शिल्पाचा बाप घरात बसला होता.एका मोडक्या खुर्चीवर शेठजी बसले.
" तुमची मुलगी खुप इमानदार  आणि हुशारही आहे.आता गाडीत बसल्या बसल्या मी तिला बरेच प्रश्न विचारले.खुप छान उत्तरं दिलीत तिने.मला वाटतं तुम्ही तिला एखाद्या चांगल्या शाळेत टाकावं"
" शेठजी आम्ही बांधकामावर मजुरी करणारी माणसं.आम्हाला ते कसं परवडणार?"शिल्पाचा बाप हात जोडत म्हणाला.
" तुम्ही काही काळजी करु नका.ते काम माझ्याकडे लागलं.तिच्या सर्व शिक्षणाचा खर्च मी करेन.मात्र एक गोष्ट. तिला या वस्तीवर ठेवता येणार नाही.आपण तिला होस्टेलवर ठेवू.त्याचाही खर्च मीच करेन."
शिल्पाच्या बापाला हायसं वाटलं.खाणारं एक तोंड कमी होणार होतं.तो म्हणाला.
"मग तर आम्हाला काहीच अडचण नाही.पोरीचं भलं होतंय त्यातच आमचं सुख!"
    शेठजींनी चक्र फिरवली.नगरपालिकेच्या शाळेतून शिल्पा उच्चभ्रूंच्या शाळेत गेली.फाटके कपडे आणि तुटक्या चपलांच्या जागी कोराकरीत युनिफॉर्म आणि चकचकीत बुट आले.नवीकोरी पुस्तकं, आधुनिक स्कुलबँग आली.त्या इंग्लिश बोलणाऱ्या मुलांमध्ये गरीब शिल्पा अवघडून,बावचळून गेली.ती झोपडपट्टीतली आहे हे कळल्यावर बाकीची मुलंमुली तिला टोमणे मारायचे,टिंगलटवाळी करायचे.शिल्पा कोपऱ्यात जाऊन रडत बसायची.हे प्रकार तेव्हाच थांबले जेव्हा वार्षिक परीक्षेत शिल्पा वर्गातून पहीली आली . त्यानंतर शिल्पाने मागे वळून पाहीलं नाही.सातवीत स्काँलरशिप मिळवून तिने शेठजींवरचा आपला भार थोडा हलका केला.दहावीच्या परीक्षेत ती जिल्ह्यात पहीली आली तेव्हा तिच्या आईवडिलांसोबत शेठजींनाही खुप आनंद झाला.एका नामांकित काँलेजमध्ये त्यांनी तिचा प्रवेश करुन दिला.बारावीत तर शिल्पाने कमालच केली.राज्यात ती पहीली आली.ते कळताच शेठजींनी तिला मेडिकल काँलेजमध्ये प्रवेश घेण्याविषयी सुचवलं.पण तिला आय.ए.एस.करायचं होतं.तिचा निर्णय ऐकून शेठजींनी तिला विरोध केला नाही.पदवी मिळवल्यावर शिल्पाने युपीएससीचा अभ्यास सुरु केला.कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली.एक झोपडपट्टीतील मुलगी कलेक्टर झाली.
      निकाल कळाल्यावर शेठजी तिला सन्मानाने आपल्या घरी घेऊन गेले.त्यांचा आलिशान बंगला पाहून तिचे डोळे दिपून गेले.बंगल्यापेक्षाही विशाल असलेल्या त्यांच्या  मनाने शिल्पा भारावून गेली.शेठजींनी तिची सगळ्या परिवाराशी ओळख करुन दिली.' शिल्पा माझी मुलगीच आहे' असे ते सारखे म्हणत असतांना शिल्पाला अश्रु अनावर होत होते.तिच्या इमानदारीचं केवढं मोठं बक्षीस शेठजींनी तिला दिलं होतं.तिच्या कलेक्टर बनण्याच्या आनंदाप्रित्यर्थ शेठजींनी अख्ख्या झोपडपट्टीला जेवण दिलं.शिल्पाच्या आईवडिलांच्या तर आनंदाला पारावर उरला नव्हता.

   एक मुलगी शिकली की घरादाराचा स्वर्ग बनवते हे शिल्पाने सिध्द केलं.नोकरीला रुजू झाल्यानंतर एका वर्षातच तिने आईवडिल आणि भावाला झोपडपट्टीतून बाहेर काढून एका चांगल्या घरात हलवलं.भावाला चांगल्या काँलेजमध्ये घातलं.वयस्कर वडिलांना मजूरी सोडायला लावून दुकान उघडून दिलं.

      सकाळी शिल्पा परत बाहेर निघालेली पाहून तिच्या पोलिस अधिक्षक असलेल्या नवऱ्याला आश्चर्य वाटलं.
"आज परत सकाळी कुठे ?"त्याने विचारलं.
"काल माझी पर्स इमानदारीने परत करणाऱ्या त्या मुलीला आयुष्यभराचं बक्षीस द्यायला निघालेय" हे सांगतांना शिल्पाच्या चेहऱ्यावर आनंदासोबतच एक ठाम निश्चय दिसत होता.
*अनमोल विचार*  🙏  🌸🌸🌸               एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू, संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल.मला कायम आनंदी ठेवेल.
अखेर एका फकिराने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले.विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.कळाल्यावर दुष्ट  प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार.  त्या क्षणी त्याला फकिराच्या अंगठीची आठवण आली.ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते,

"This too shall pass "
 म्हणजे
"हाही क्षण निघून जाईल"

केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले.सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला. ते परतले.राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला.  विजयाचा जंगी समारंभ चालू असताना, नवीन प्रधानाने पाहिले की महाराज कुठेही अति-उत्साहित न होता प्रशांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले,
" महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे." राजा म्हणाला, " नाही, आता मला माझ्या मंत्राचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही राहात नाही, दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले आहे.म्हणून दुःखात खचू नये, सुखात नाचू नये."

This too shall pass !
हे क्षणही निघून जातील.
ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल.नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्लीच इथे दिलेली आहे.

ही कथा पासवर्ड आहे आनंदी आयुष्याचा.

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

हीच अमुची प्रार्थना
अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे

भोवताली दाटला
अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या
उगवेल आहे खात्री,

तोवरी देई आम्हाला
काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे

धर्म, जाती, प्रांत, भाषा
द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा,
एक रंगी रंगू दे

अन् पुन्हा पसरो मनावर
शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे

लाभले आयुष्य जितके
ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे..
जे थांबले ते संपले

घेतला जो श्वास आता
तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे
एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा. एकेदिवशी तो एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, "पोस्टमन ssssss"
आतून एका मुलीचा आवाज आला,. "जरा थांबा, मी येतेय"

दोन मिनिटे झाली, पाच मिनिटे झाली. दार काही उघडेना. शेवटी पोस्टमन वैतागला. आणि जोरात म्हणाला, "कुणी आहे का घरात ? पत्र द्यायचेच"
आतून मुलीचा आवाज आला, "काका, दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा. मी नंतर घेते"
पोस्टमन, "तसे चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे. सही लागेल"

पाच मिनिटे पुन्हा शांतता. आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले. दारातली मुलगी पाहून पोस्टमन शॉक्ड !! दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती. काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता. हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन, सही घेऊन तो निघून गेला.
***
असेच अधून मधून तिची पत्र यायची, आता मात्र पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे. असेच दिवस जात होते. दिवाळी जवळ आलेली तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज पोस्टमन अनवाणी पायानेच आलाय.

ती काही बोलली नाही. मात्र पोस्टमन गेल्यावर दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या पावलाचे ठसे उमटले होते, त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले. नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील चांभाराकडे तो कागद देऊन एक सुंदर चप्पल जोड खरेदी केली.
***
रिवाजाप्रमाणे पोस्टमनने गावात इतरांकडे "दिवाळी पोस्त" (म्हणजे बक्षिशी) मागण्याची सुरुवात केली. अनेकांनी त्याला बक्षिशी दिली. असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. हिच्याकडे काय बक्षिशी मागणार ? बिचारीवर आधीच अपंगचे दुःख आहे.

 पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ, असा विचार करून त्याने तिला आवाज दिला. मुलीने दार उघडले. तिच्या हातात सुंदर पॅकिंगचा बॉक्स होता. तो तिने त्याला दिला आणि सांगितले, ही माझ्याकडून बक्षिशी आहे. पण घरी जाऊन बॉक्स उघडा"

घरी येऊन त्याने बॉक्स उघडला. त्यात सुंदर चप्पला, त्याही त्याच्या मापाच्या पाहून त्याचे डोळ्यातून पाणी वाहू लागले.
***
दुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला. आणि म्हणाला, " मला फंडातून दहा हजार रुपये कर्ज हवे आहे"
साहेब म्हणाला," अरे आधीच तुझ्यावर कर्ज आहे. पुन्हा आता कशाला ?

पोस्टमन म्हणाला, "मला जयपूर फूट (लाकडी पाय) घ्यायचे आहेत. त्यासाठी हवे आहेत."
साहेब : "पण तुझा मुलगा तर धडधाकट आहे. जयपूर फूट कुणासाठी?

पोस्टमन : "साहेब, जे माझ्या धडधाकट मुलाला उमजले नाही, ते एका परक्या अपंग मुलीला उमजले आहे. माझे "अनवाणी" दुःख तिने कमी केले आहे. तिच्यासाठी मी किमान कर्जाने ना का होईना पण पाय घेऊन देऊ शकतो. म्हणून कर्ज हवे आहे.
***
साहेबासह सर्व स्टाफ निशब्द !! सारेच गहिवरलेले!!
****
नाती ही केवळ रक्ताची असून भागत नाही ! तर नात्याची भावना रक्तात असावी लागते. ती ज्याच्या अंगी, (मग भले ही तो कुटुंबातला नसला तरी) तो आपला नातेवाईक मानायला हरकत नाही !!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏  🌹🌹🌹🌹🌹🌹🌹