रविवार, १७ डिसेंबर, २०१७

मार्गशीर्ष अमावस्या

( वेळा अमावस्या)


आज वेळा अमावस्या हा सण महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात साजरा केला जातो.शेतात सर्वप्रथम एक कोप( झोपडी) वजा केली जाते किंवा एका झाडाखाली कडब्याच्या पेंड्या झाडाच्या बाजुने गोल आकारात लावली जाते.मातीचे किंवा दगडाचे पाच पांडव ,कर्ण,द्रौपदी असे देव तयार केले जातात.त्यांना पांढ-या चुन्याने रंगवीले जाते.समोर हिरवा कपडा ठेऊन त्यावर लक्ष्मीची पुजा मांडली जाते.शेतात पिकलेल्या धान्याच्या सहाय्याने तयार केलेले पदार्थांनी उदा.भजी( भाजी), ज्वारी व बाजरीचे उंडे,अंबील(आंबट ताक),सडलेल्याज्वारीचा भात,वांग्याचे भरीत,शेंगदाण्याचे लाडू,खीर ,केळी,पेरु,बोरं,ऊस वगैरे नैवेद्य म्हणुन ठेवले जाते.नारळ फोडले जाते.कोप किंवा झाडाभोवती व्हलगे व्हलगे सालन पलगे...हर भगत राजो हार बोला...हर हर महादेव असा नाम घोष केला जातो पाणी शिंपडले जाते.मग म्हसोबा व इतर देवांची पुजा केली जाते.मग सर्व मित्र मंडळींना घेऊन वनभोजन केले जाते. दिवसभर म्हवाळ शोधणे यात मोठी मुलं मग्न होतात.शेतात हरभरा,गहु ,करडई,तूर, पीक जोम धरु लागते.सर्वत्र आनंदी आनंद असतो. पाच ते सहा वाजता एका छोट्या मटक्यात बोळीत दूध व शेवाया ऊतू घालतात.येळवस हा प्रचलित शब्दावरुन इथली संस्कृती लक्षात येते.शेवटी शेताभोवती टेंभा(हेंडगा) फिरवला जातो.दुष्ट शक्तीचा नाश होऊन लक्ष्मी घरात नांदो अशी प्रार्थना केली जाते.सुखासमाधानाने येळवस घरी परतते.


©®गिरी एस.जी.
           माध्यमिक शिक्षक
           अंबुलगा (बु.) ता.निलंगा जिल्हा लातूर

रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

पारवा



दूपार ढळून गेलीय

पाखरांची विश्रांती संपलीय

दूर रानातुन स्पष्ट ऐकु येतेय

पारव्याचे ते घुमणे

कांही पक्षी क्षीण स्वरात गात आहेत


निरव् शांततेत ऐकू येतोय


कोकयाचा कलकलाट

बस बस करा म्हणतेय एखादी साळुंकी किंवा चुईक पक्षी



चिमण्यांचा आवाजही स्पष्ट येतोय


भुईमुगाच्या शेंगा वेचन्याचं काम मंदावलय

एखाद्या बैलजोडीला किंवा शेळ्यांना हाकलत शेतगडी घराकडे चाललाय


आंब्यावर खारुताई चित्कारतेय


तळ्यातल्या पाण्यावर काही पक्षी झेपावत आहेत


लगबगीने पाखरे ऊसाच्या शेतावरुन गिरक्या मारताहेत


आंब्याच्या झाडावरुन हा कोण नवखा? या दृष्टीने खारुताई बघते आहे.


पारव्याच्या घुमण्याचा वेग मधुनच वाढतोय बंद सुरु होतोय सादाला प्रतिसाद



ऊन्ह आता थंड झाली आहेत

आभाळात पांढ-या ढगांची गर्दी होतेय



मध्येच कावळ्याचा काव काव कर्कश ध्वनी विचलीत करतोय,

का....आ....व....अश्या लांब ओरडण्यातुन त्याचा शिणवटा व दिवस मावळतीला गेल्याचा  जाणवतोय



पारवा अजुनही घुमतोय

मनाच्या गाभा-यात खोलवर त्याचा ध्वनी रुततोय



रानातल्या कविता

@©®श्याम गिरी


रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

विचार सुमन

[28/09, 9:07 PM] Shyam Giri Lamjana: गुणवत्ता ही कोणाचीही गुलाम नाही ती एखाद्या झोपडीत अन्सार शेख च्या रुपाने नांदते व कलेक्टरची परीक्षा पास होऊन यशोशिखरावर बसते.पण आपण कमी पडतो ती गुणवत्ता पारखण्याच्या दृष्टीत.कारण जवाहीर सुद्धा कोहीनूर हि-याला प्रथमत: काला पत्थर समजतो.यात हि-याचा काहीही दोष नाही मग तो हिरा एखाद्या सामान्य रुपातल्या असामान्य जवाही-याला सापडतो.कठोर परीश्रम करुन त्याला नावारुपास आणतो.हि-याला हिरा का म्हणतात हे जवाहीर जगाला सांगतो पण त्याच्यामध्ये गर्विष्ठपणा नसतो.


गुरुजी हा जवाहि-याचं काम करतो अचुकपणे परंतु जवळच्या गाजरपारख्यांना त्याची किंमत नसते.फक्त प्रतिष्ठेसाठी हपापलेल्या लोकांना गुरुजी फक्त कामानेच उत्तर देतात याची समज समोरच्याला असते फक्त स्वार्थापोटी कांही वेळ नाटकं सुरु असतात.गुरुजीच्या कामावर विश्वास ठेवावयास हल्ली लोकांना कमीपणा वाटतो.कारण घर बदलले की घराचे वासे सुद्धा बदलतात.
[28/09, 9:07 PM] Shyam Giri Lamjana: समाजातील  काही लोक मान सन्मानाला हपापलेले असतात.त्यांच्या ठिकाणी स्वार्थ व अज्ञानाची मुळे खोलवर रुजलेली असतात.गावातील इतर अधिका-यांना तो साहेब म्हणतो.पण कोणालाही न दुखवणा-या गुरुजींच्या नावानं खडे फोडत असतो.अधिका-यांना लाच देऊन कामासाठी हातापाया पडतो पण त्यांच्याच मुलाबाळांना घडविणा-या गुरुजींना वाईट शब्द वापरतो.समाजात ही एक मानसिक विकृती पसरत आहे.गुरुजीकडे साधी टु व्हिलर आली की त्याला वाईट वाटते व एखाद्या गुरुजीकडे फोर व्हिलर आली की त्याचा तीळपापड होतो.गुरुजी सुखात आहेत याचीच त्याच्या मनात सतत सल असते.पण गुरुजींना आपण नीट का नाही बोलतो ? याचे त्याला काहीच वाटत नाही.


समाजात गुरुजींनी करोडो लोकांना घडवुन त्यांचे जीवन उज्ज्वल केले आहे.गुरुजीबद्दल आपण सदैव आदरचं बाळगला पाहिजे.

भूकंप

३० सप्टेंबर १९९३ चा गुरुवार


१) मी नववी वर्गात शिक्षण घेत होतो.२९ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन झाले.

२) पहाटे मी ३:३० वाजता अभ्यासाला उठलो.

३) पृथ्वीच्या पोटातुन मोठ मोठे आवाज येत होते.जमीन हळूहळू कंप पावत होती.

४) ३:५५ ला भूकंप सुरु झाला.१ मिनिटे जवळपास भूकंप होता.

५) वडिलांनी मला "भूकंप" आहे .पलंगाखाली जायला सांगितलं.

६) मग लाईट गेली सर्वत्र अंधार.भूकंपाचे नाव काढले की अजुनही अंगावर शहारे येतात.


७) मी लामजन्यात होतो.घर जुने होते.सुदैवाने कसलीच पडझड झाली नाही.बचावलो.

८) भूकंपानंतर घराबाहेर पडलो.५० गावात भूकंपाने मृत्युचा तांडव झाला होता.

९) नंतर पाऊस सुरु झाला.मदत व बचाव कार्यात खुप अडथळे आले.

१०) रा.स्व.संघ व अनेक संस्थांनी मदत केली.घरे उभारली.माणसे हळूहळू सावरली.अमेरिकेतुन मदत आली.

रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

रावा





रावा



दूपारची नीरव शांतता..
आम्रवृक्षावर एक रावा अगदी निवांत निद्रा घेतोय...
त्याचे ते काळसर मण्यांचे डोळे..
अगदी स्पष्ट दिसतात उघड झाप करताना अगदी सावधपणे..
हळुच वा-याची झुळुक येते
मग तो पाने सळसळ करतात
मध्येच एखाद्या पाखराच्या
पंखाचा फडफडाट अथवा
दुरुन येतेय रानपक्ष्याचे घुमणे
अगदी थोडा वेळ तो घेतोय सावधपणे विश्रांती
निसर्गाच्या सान्निध्यात..
पंधरा मिनिटानंतर तो सावध होतो
मग उडी मारुन दुस-यावर फांदीवर येतो साथीदारासोबत थोडा आवाज काढत मग वेगाने स्वारी निघुन जाते दुस-या झाडावर
मी झाडाखाली दूपार झालीय म्हणुन पहुडलेला.
मग डोळा कांही लागत नाही.
मग मनाच्या कोप-यात त्या राव्याचे देखणेपण भरत जाते...

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७

माझे शिक्षण

[23/08, 4:56 AM] 👏🏻: मी गावात फिरत होतो.तेंव्हा एक भला माणूस मुलांची नावे लिहित होता.मी म्हटलं,अहो काका ही नाव कशासाठी लिहिताय.' त्यांच्या त्या प्रसन्न चेह-यावर हसु फुललं.त्यांच्या मिशा हलल्या.गालात स्मित हास्य करीत तो म्हणाला,"लातूरला आम्ही भूकंपग्रस्त मुलांसाठी शाळा सुरु करतोय; तू येणार का?"
मी लगेच होकार दिला.त्या भल्या माणसानं माझं नाव लिहिलं, श्याम गुमानगिर गिरी.तारीख सांगितली व "या "असं म्हणाले.
तो भला माणुस म्हणजे एम.डी सर.यांचं नाव एम.डी.सर आहे हे जनकल्याण निवासी विद्यालयात गेल्यावर मला समजलं.दत्तमंदिर पाटीजवळ एका मोकळ्या जागेत भलं मोठं पत्र्याचं शेड मारलं गेलं.तोच वर्ग आणि वसतिगृह हे समीकरण नवीन होतं.१९९३ सालचा हा काळ.शिवाजी चौकातुन झुकझुक आगीनगाडी जायची मला खुप अप्रुप वाटायचं.
 भल्या पहाटे आम्हाला उठवले जायचे.भल्या पहाटे किंवा शाखेतुन आल्यानंतर थंड पाण्याने अंघोळ करीत असे.ओम नम: सच्छिदानंद रुपाय परत्माने...या एकात्मता स्तोत्राने दिवसाची सुरुवात अंबडचे  वाघमारे सर करीत असत.त्यांची ती प्रसन्न मुर्ती सोज्वळ व प्रेमळ चेहरा अजुनही लक्षात आहे.मनाचे श्लोक मला अजुनही पाठ आहेत.राजीव गांधी पुतळ्याजवळ असणा-या मैदानात बोयणे सर आम्हाला घेऊन जात.संघ दक्ष.आ रम.असा आवाज सर काढत.आम्हाला समजत नसे.नंतर हळूहळू प्रार्थना म्हणु लागलो.नमस्ते सदा वत्सले मातृभूमी.....प्रार्थना तोंडपाठ झाली.सर्व प्रभात शाखेचे नियम माहित झाले.प्रभात शाखेतील खेळात मी खुप रमत असे.सुर्यनमस्कार हा माझा आवडता व्यायामप्रकार होता.मी व माझ्या चमुने १०१ सुर्यनमस्कार घालुन शाळेला ढाल मिळवुन दिली होती.शाळेत स्वादिष्ट पोहे व दूध दिले जात असे.दूपारी रुचकर जेवण दिले जाई.मग आम्ही शिकवणीला जात असु कधी हिबारे सर,कधी केशवराज शाळेचे दीक्षित सरांकडे गणित तर संगीत शिक्षक असणारे कुलकर्णी सरांचे वडील गणित शिकवत असत.संध्याकाळी यशवंत विद्यालयाचे कदम सर इंग्रजी शिकवत असत.प्रफुल्ल कुलकर्णी सर कांही महिने मुख्याध्यापक होते.प्रफुल्ल कुलकर्णी सरांचे मराठीवर अफाट प्रभुत्व होते.कुकडे काका ब-याच वेळा भेट देऊन मार्गदर्शन करीत असत.लोमटे सर वसतिगृहाची जबाबदारी सांभाळत असत.अजय रेणापुरे सर मुलांचे इंग्रजी विषयाचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी प्रयत्न करीत असत.खेडकर सर विज्ञान विषय शिकवत असत.

क्रमश:
[23/08, 4:56 AM] 👏🏻: जनकल्याण निवासी विद्यालय





जनकल्याण निवासी विद्यालय ही शाळा जनकल्याण समिती लातूरने सुरु केली होती.या शाळेत मुलांच्या संस्कारावर अधिक भर असे.मुख्याध्यापक सर्वांचे काम कडक शिस्तीने करुन घेत असत.शाळेमध्ये सर्व तास नियमित होत असत.सर्वत्र शिस्तीच दरवळ असे.रात्री मुले दहा वाजेपर्यंत अभ्यास करीत असत.शाळेतील कांही मुलांना केशवराज विद्यालयात जाण्याची संधी मिळे.मी दत्तमंदिर ते श्यामनगर पर्यंत पायी जात असे.तेथे कुलकर्णी सर प्रयोगशाळेत मुलांना प्रयोग करुन दाखवत असत. नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी....हे प्रभो आनंददाता,ज्ञान हमको दिजीए अशी सुंदर प्रार्थना गीते मी केशवराज शाळेत शिकलो.होनराव सरांचा भूगोलाचा तास अविस्मरणीय वाटला.संजय जगताप सर ,मोगरगे सर,खैरनार सर यांचीही आठवण येते.केशवराज विद्यीलयात संघाची बैठक होत असे.मला ही जाण्याचा योग आला.मी पद्य गात असे
१) केशवांनी संघरुपे कल्पवृक्षा लावले..

२) हिंदु जगे तो विश्व जगेगा..

३) चंदन है इस देश की माटी...

४) भारत देश महान अमुचा..

५) मनुष्य तू बडा महान है..

६) संघठन गडे चलो सुपंथपर बढे चलो..


७) जय भवानी जय शिवराय

अशी कित्येक पद्ये मला मुखोद्गत झाली.खेळांचे प्रकार मला माहित झाले.जनकल्याण निवासी विद्यालयातील प्रत्येक व्यक्ती अहोरात्र काम कसे काय करतात ? याचे नवल वाटत असे.
आमची दहावीची प्रथम तुकडी १९९५ साली बाहेर पडली.
मी गुणवत्तेच्या जोरावर स्वयंशासन दिनाचा मुख्याध्यापक झालो होतो.जनकल्याण विद्यालयात मुलांना स्वावलंबी जीवनाचे व राष्ट्रसेवेचे पाठ शिकता आले.मुलांचे मन खुप रमले होते.अनाथ सनाथ मुलांसाठी शाळा आईच्या भूमिकेत होती.शाळेने मला घडविले.गुरुजनांनी आवश्यक तो बदल माझ्यात केला.शाळेचे नाते आई व मुलासारखे असते.आईपासुन दुरावल्यावर मुलाला वाईट वाटते.


क्रमश:



ओम सहनाववतु ....भोजनमंत्र तिथेच शिकलो.
[23/08, 4:56 AM] 👏🏻: विद्यीलय ऐवजी विद्यालय असं वाचावे.
[23/08, 4:56 AM] 👏🏻: जागृती शिबीर


पुण्यातील स्वरुप वर्धिनी समितीचे ज्ञानेश पुरंदरे,र.ज.नरवणे यांनी तीन दिवसाचे जागृती शिबीर घेतले होते.अजुनही दोघे संपर्कात आहेत.र.ज.नरवणे यांनी मला अनेक पत्र पाठवुन माझे वैचारिक प्रबोधन केले.जनकल्याण निवासी विद्यालयातील प्रत्येक मुलाची विचारपुस केली जायची.आज कदाचित ते भाग्य दुस-या शाळेतील मुलांना क्वचित मिळत असेल.शिपायापासुन प्रशासनापर्यंत सर्वचजण हे राष्ट्रीय काम आहे या भावनेने काम करीत असत.यावर्षी खेडकर सरांनी मला त्यांच्या शाळेत प्रमुख वक्ते म्हणुन बोलावले होते.अतिशय प्रेमाने माझ्याबद्दल गौरवोद्गार सरांनी काढले होते.प्रेम,आपुलकी,जिव्हाळा, सदाचार या सर्व सद्गुणांचा परिचय जनकल्याण विद्यालयात झाला.मी थोड्या काळात जी शिदोरी मिळवली ती अजुनही जपुन ठेवली.माझ्यातील विवेक विचारांना विद्यालयातुन प्रेरणा मिळाली.

इदम् राष्ट्राय इदम् न मम्

जे काही आहे ते राष्ट्राचे आहे.गेली २२ वर्षे  त्या संस्काराचा प्रभाव अाहे.


कृतार्थ मी कृतज्ञ मी👏🏻

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

एक कविता

खूप छान कविता  वाचायला मिळाली…

    *भूतकाळात डोकावल्या शिवाय*

*मजा काही मिळत नाही*

*मागे वळून पाहिल्यावर*

*हसावं का रडावं कळत नाही*



*साऱ्याच गोष्टी मध्ये*

*खूप खूप बदल झाले*

*पहिल्या पेक्षा प्रत्येकाला*

*नक्कीच बरे दिवस आले*



*खरं वाटणार नाही पण*

*एवढं सगळं बदललं*

*निगरगट्ट माणूस सुद्धा*

*मुळा सकट हादरलं*



*शाळेतून घरी गेल्या गेल्या*

*दप्तर कोनाड्यात जायचं*

*दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना*

*बाहेर काढल जायचं*



*अहो दप्तर म्हणजे काय*

*वायरची पिशवी असायची*

*जुन्या फाटक्या पुस्तका सोबत*

*फुटकी पाटी दिसायची*



*अभ्यास कर म्हणून कुणी*

*म्हणलंही नाही*

*अन मार्क कमी पडले म्हणून*

*हाणलंही नाही*



*कोणताही ऋतू असो*

*काळपट चहा असायचा*👌

*तडकलेल्या बशीवर*

*कानतुटका कप दिसायचा*



*बारा महिने अनवाणी पाय*

*चप्पल म्हणजे श्रीमंती*

*पायाला चटके बसायचे*

*पण सगळ्या गावात हिंडायचे*



*कुणाचं गुऱ्हाळ लागलं की*

*चला रस प्यायला*

*खळे दळे लागले की*

*चालले शेतात झोपायला*



*मरणाची गरिबी होती*

*पण मजा मात्र खूप*

*लग्ना कार्यात माणसं , नाती*

*व्हायची एकरूप*



*अमावस्येच्या दिवशी पोरं*

*मारुतीच्या पारावर*

*नारळाच्या टूकड्यासाठी*

*एकमेकाच्या अंगावर*



*ओ मामा द्या नं , ओ मामा द्या नं*

*एकच गलका व्हायचा*

*रेटा रेटी  केल्यामुळं*

*सदरा टरकून जायचा*



*पाहुण्याला पाहुणचार म्हणून*

*खिचडी भजे व्हायचे*

*तेवढ्यातच सारयांचे*

*डोळे भरून यायचे*



*तेलच्या-गुळवणी आणि पापडांची*

*काय मामलात होती*

*तरीही त्या माणसां मधे*

*माणुसकी होती*



*रात्र रात्र गप्पा व्हायच्या*

*डोळ्यात यायचं पाणी*

*आडपडदा न ठेवता*

*दुःखाची व्हायची गाणी*



*कुठे गेला तो साधेपणा*

*कुठे गेलं ते सुख  ?*

*खरं सांगा पहिल्या सारखी*

*लागते का आता भूक ?*



*इतकुसाक पेढ्याचा तुकडा*

*मिडकू मिडकू खायचा*

*कधी तरी कुणी तरी*

*प्रसाद म्हणून द्यायचा*



*सारं सारं संपून गेलं*

*आता पैसा बोलत असतो*

*माणूस मात्र भ्रमिष्टा सारखा*

*खोटं खोटं डोलत असतो*



*पेढ्याच्या बाॅक्स कडे*

*ढुंकूनही कुणी पहात नाही*

*एवढंच काय पहिल्या सारख्या*

*मुंग्याही लागत नाही*



*सुखाचं बोट कधी सुटलं*

*आपल्या लक्षात आलं नाही*

*श्रीमंतीत सुख मिळेल वाटलं*

*तसं काही झालं नाहीे*

*ते सुख आणि वैभव*

*पुन्हा घरात येईल का ?*

*चिरेबंदी वाड्या मधून*

*हसण्याचा आवाज येईल का?😌😔😊*
       
*🌳🌳🌳 माझं गाव🌾🌾🌾*

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

माझे डि.एड. शिक्षण

[17/08, 1:32 PM] 👏🏻: माझा डी.एड. ला प्रवेश


मी सहज उस्मानाबाद जिल्ह्यात पोस्टाने फॉर्म पाठवला.व माझा नंबर डी एड कॉलेज नळदुर्ग येथे लागला.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित हे कॉलेज कै.बापूजी साळुंखे यांच्या पुण्याईने उभारण्यात आले होते.या कॉलेजमधील पहिला दिवस खुप आठवतो.पहिल्या दिवशी मी वडाच्या झाडाखाली बसलो होतो.तेथे मगतराव बालाजी व काळे गुणवंत यांची ओळख झाली.निसर्गरम्य प्रदुषण मुक्त वातावरण.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे ब्रीद ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे होते.मी फलकावर दररोज सुविचारांचे लेखन करीत असे.आम्ही सर्वजण गणवेशात जात असु.प्रथम वर्षाचे सुक्ष्म पाठ,सेतु पाठ  व सराव पाठ खुप लक्षात राहिले.सुरुवातीला भीतीने पाय थरथरत असत.आमच्या प्रथम वर्षातील सर्व छात्र अध्यापक खेळीमेळीने दडपणमुक्त रहात असत.प्राचार्य देवकर सर आम्हाला हिंदी विषय शिकवत असत.मला सांगवे सरांच्या तासात खुप हसु येत असे.माझ्या डेस्कजवळीत खिडकीत घुबडाची पिल्ले चिंचेवर बसुन माना हलवत त्यांची मान सांगवेसरांच्या मानेसारखी हलते हे पाहुन खुप हसु येई.सांगवे सर खुप वृद्ध झाले होते.अणदूर जवळचं खुदावाडी हे त्यांचं गाव.
प्रथम वर्षातचं छात्रअध्यापकांना व्हॉलीबॉल खेळण्याचा लळा लागला होता.कोण कत्ता चांगला मारतो ? याची चुरस लागलेली असे.मला व्हॉलीबॉल येत नसे.मला मँच पाहण्यात मजा वाटत असे.प्रथम वर्षापासुन मी अभ्यासाकडे लक्ष देत असे.     ब-याच जणांना अभ्यासाचे गांभीर्य नव्हते.

कॉलेज सुटल्यानंतर मी व जीवन भोसले नियमित वाचनालयात जात असे.मी खोलीवर हाताने स्वयंपाक करीत असे.मी व्यासनगरात शहापुरकर यांच्या वाड्यात रहात असे.तेथेच जीवन भोसले जवळच सोमवंशी ,राठोड शिवाजी व राम माने रहात असे.काही दिवसानंतर कल्याणी व इतर समोरच्या घरात रहायला आले होते .गोविंद सुर्याजी पाटील हा त्यांचे मामा बाबरे सर यांच्या घरी रहात असे.मी व गोविंद पाटील मिळुन कॉलेजला जात असत .कॉलेज रुमपासुन जवळपास दीड ते दोन कि. मी. अंतरावर होते.नळदुर्ग मधील किल्ल्याजवळ भरणारा बाजार खुप आठवतो.त्या वेळी खुप स्वस्ताई होती.नानी मां चा दर्गा खुप पावित्र्याने भरलेला वाटे.मी केंव्हातरी मैलारपूरला सुट्टीच्या दिवशी तसेच किल्ल्यातही जात असे.नळदुर्गचा तो किल्ला मी कित्येक वेळा पाहिला होता.व   ब-हाणपुरला जाऊन आलो होतो.नळदुर्गच्या किल्ला परीसराची भटकंती मी कित्येकवेळा पायीच  केली होती.
बालाघाट कॉलेजजवळील मागासवर्गीय वसतिगृहावर माझा मित्र वायदंडे रहात असे.माझ्या रुमवर तो येत असे.ब-याच जणांना मी एकलकोंडा वाटत असे.मी सर्व प्रात्यक्षिक कार्य पुर्ण करुन चांगले अंतर्गत गुण मिळवलो होतो.मी शहापुरकरांच्या वाड्यात संचार हा पेपर नियमितपणे वाचत असे.वाड्यातील रविवार सुद्धा कामात जात असे.

क्रमश:
[17/08, 1:32 PM] 👏🏻: डि एड कॉलेज १९९७ते ९९

कॉलेजमध्ये पाठाच्या सादरीकरणाचं जास्त गांभीर्य नसे.जसे सिनीयर तसेच ज्युनीयर .विद्यालयात परिपाठ अतिशय चांगला होत असे.रामकृष्ण रहिम ख्रिस्त बुद्ध झरतुष्ट .....या प्रार्थनेने वातावरण मांगल्याने भरुन जात असे.सर्वजण आनंदाने रहात असत.गाव ऐतिहासिक असल्यामुळे काही कमी नसे.एकदा माझ्या रुमवरील रॉकेल संपले होते.तर अंगुले भरत व शशिकांत कुलकर्णी यांनी मला रुमवर आणुन दिले होते.सोमवंशीला मी खुप चिडवत असे.जवळगे श्रीराम हा व्यायामाकडे जास्त लक्ष देत असे.पुजारी श्रीराम मी व्हॉलीबॉल चँपियन आहे या गुंगीत रहात असे.चौगुलेची नजर आकाशाकडे असे.तर देशमाने सिनियर असल्यामुळे सर्वांना समजावुन सांगत असे.मुगळे रवीराज हा नावाप्रमाणे कॉलेजला लवकर न येता उशीरा येत असे.सतत पासची व बसची  चर्चा करीत असे.मुगळे रविराज याचे अभ्यासाकडे लक्ष नसे.कांबळे हा निष्पाप नजरेने पहात असे.राजु लोहारे पारले बिस्कीटची हसुन जाहीरात करीत असे तर माणिकशेट्टी सुनील शेट्टीची स्टाईल मारत असे.मुली मात्र कोणी कितीही चांगली कामगिरी केली तरी कुणालाच भाव देत नसत.प्रत्येकजण आपल्या विश्वात आनंदी होता.लातूरचा माने अन्यायग्रस्त व अभावग्रस्त चेहरा करत असे.वायदंडे दयानंद व ईरले सदाशिव हे दुष्काळग्रस्तांसारखा चेहरा करत असत.मोहन व आबाराव कांबळे मला फिल्म शोलेमधल्या गब्बरसिंग व त्याचे साथीदार यांच्यासारखे दिसत.


ग्रामोपाध्ये सर अध्यापन पद्धतीकडे जास्त लक्ष देत असत.ते गणित का शिकवत नाहीत याबद्दल छात्रअध्यापकाच्या मनात राग असे.घोडके सर मला विज्ञान विषयातील ८४ गुणांचे रेकॉर्ड सांगत.मी ते ८८ गुण घेऊन मोडलो हे सांगण्याकरीता पुन्हा जाणे झाले नाही.पुराणिक कारकुनाचे सर्वांकडे लक्ष असे.अंतर्गत गुणाच्या धमकीला कांही जण घाबरत असत.मला तुळजापुरहून येणा-या शिक्षकांचे नवल वाटत असे.संगीत शिक्षकांच्या सुरात कांही विद्यार्थी वेगळाच सुर लावत असत.कळंत्रे सरांनी आपल्या जीवनाची वाताहात केली होती...जाने कहॉ गये वो दिन हे गीत ते का गात...? का पित असत...? असले नसले प्रश्न मला पडत असत? माझ्या एका प्रिय मित्राला टपरीवर सिगरेट ओढताना पाहिल्यावर माझ्या नैतिक स्वभावाला धक्का बसला होता.


आमचे घरमालक जीवन वाकळे वर सतत लक्ष ठेवत असत? कारण पाणी गरम करताना तो अंडी बॉईलकरत असे.व टरफले समोर टाकत असे.याचा त्याना राग होता.घरमालकाचा डोळा चुकवुन पेरु फस्त करणे हा आमचा उद्योग होता.


क्रमश:
[17/08, 5:00 PM] 👏🏻: डी एड १९९७ ते ९९

कॉलेजमध्ये असताना मला नेहमी मांगल्य व पवित्रता याचा शोध घेण्याची सवय होती.मी अजुनही शाकाहारी व निर्व्यसनी राहिलो याचे श्रेय आजुबाजुला सामान्य जीवन जगणा-या माणसाकडे जाते.माझं इंग्रजी चांगलं होतं.त्याचा फायदा शिक्षकांना व विद्यार्थ्यांना झाला.मी डि.एड ला असताना वेळेवर नियमित जात असे.ती सवय अजुन का़यम आहे.गेल्या १७ वर्षात २ते ३वेळा कांही  अपरिहार्य कारण वगळता मी शाळेत नियमित जाऊ शकलो.
डि.एड ला असताना छात्र अध्यापकावर जसे संस्कार होतात तेच कायम रहातात.जीवनात नेहमी चांगल्या गोष्टीचा शोध घेतल्याने स्वत:चा व इतरांचा विकास होतो.जीवनमुल्ये व संस्कार मुल्ये आत्मसात केल्याने आपणास कोणतेही काम केल्यानंतर अपराधीपणाची भावना रहात नाही.आपले कर्म चांगले असतील तर मन प्रसन्नतेने काम करते अन्यथा कामात मन लागत नाही.वेळ मारुन नेऊन थातुरमातूर  काम केल्यास मन पश्चातापाच्या अग्नीत जळते.व पश्चातापाच्या स्थितीत मन नसेल तर नियती त्याला जबरदस्त शिक्षा देते.मुलांचे आयुष्य बिघडवण्यासारखे दूसरे पाप नाही .डि.एड मध्ये प्रशिक्षण म्हणजे रंगीत तालीम असते.२२ मार्च २००० रोजी मी लातूर जि.प.मध्ये सेवेत रुजु झालो.माझे स्वप्न होते.आपल्या जीवनकालात कमीत कमी दोन विद्यार्थी तरी MBBS झाले पाहिजेत या वर्षी माझे स्वप्न दोन विद्यार्थ्यांनी करुन दाखवले.माझे पाच विद्यार्थी नवोदय प्रवेशासाठी निवड झाली.पैकी तीन शिकले.एक विद्यार्थी MIT पुणे येथे लागला.एक विद्यार्थी नेव्ही मध्ये गेला.सत्य सुंदर मांगल्याची आराधना केल्याने परमेश्वर जवळ असल्याची जाणीव होते.डि.एड चे प्रशिक्षण व वरील सर्व गोष्टीचा मेळ कसा बसतो याचा मी प्रयत्न करतो.तर नवल वाटते.वट वृक्षाचे बी किती सुक्ष्म असते पण त्याचे सामर्थ अचाट असते.


जीवनात जे काही मिळाले ते जवळच्या सर्व गुरु ,मार्गदर्शक ,मित्रांनी  दिले.आपण एका दिव्यत्वाच्या सोबत आहोत.याची जाणीव सतत होते.

क्रमश:

बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

[06/08, 4:21 PM] 👏🏻: इतिहासाचा मागोवा



लामजना जि.प.प्रशालेची स्थापना स्वातंत्र्यापुर्वी झाली.या शाळेचा इतिहास पाहता मनात खुप आठवणी दाटुन येतात.आम्ही कालपरवाचे परंतु या शाळेबद्दल पंचक्रोशीत आदराने नाव घेतले जात असे व आताही घेतले जाते.शाळेचा नावलौकीक त्या शाळेतील शिक्षक,अभ्यासु विद्यार्थी ,व जागरुक ग्रामस्थामुळे होतो हे काही वेगळे सांगायला नको.शाळेला चांगले गुरुजन लाभले त्यामुळे संस्था येथे येऊ शकली नाही.काही प्रयत्न वावटळी सारखे झाले असतील.कै.साखरे गुरुजींचे कार्य,गांधीजींचा पुर्णाकृती पुतळा,हनुमान मंदिर,लक्ष्मी व खंडोबाचे मंदिर,बालाजी मंदिर,सरकारी दवाखाना,जुनी मशीद,शेख सुल्तान साहेबांची दर्गा,मारुतीवाडी,भव्य वाडे,गढ्या,जुनी आडं या सारख्या कित्येक भौतिक सांस्कृतिक खुणांनी गावपण भरुन गेलेलं.लोकमान्य क्रीडा मंडळ,माऊली गणेश मंडळ,नवरात्रमहोत्सव,गांधी क्रिकेट क्लब,ग्रामविकास वाचनालय यासारख्या कित्येक मंडळांच्या कार्याची आठवण येते.गावाची समृद्ध बाजारपेठ,गावात वेळेवर येणा-या बसेस,बँका,टेलीफोन ऑफीस,तलाठी सज्जा,ग्रामपंचायत कार्यालय व तेथे मँच पाहण्यासाठी होणारी गर्दी,गावातील अखंड हरिनाम सप्ताह यासारख्या कित्येक गोष्टींनी गावपण कसं भरलेलं असे.सर्वात महत्वाची गोष्ट सर्वांचा एकोपा नजरेत भरण्यासारखा होता.मतभेद,धर्मभेद,जातीभेद याला काही मुळी थारा नव्हता.
दसरा ,रंगपंचमी व पोळा हे सण कायम लक्षात राहिले.गावातील राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते पुन्हा सर्वजण एकोप्याने रहात असत.गावातील प्रत्येकाची सर्व नागरिकांना ओळख असायची.गावात     येणा-या व कायम रहाणा-याला काही जण पाणी लागलं वाटतं इथलं असं विनोदानं म्हणत असत.



३० सप्टेंबर १९९३ ची भीषण पहाट मला आठवते.मी जागा होतो.पृथ्वीचे ते भीषण रुप पाहुन बोबडीचं वळाली.एका दणक्यात या सा-या ऐतिहासिक खुणांना तडे गेले.गाव मेन रोडवर आले.मग नवीन संस्कृती.नवीन घरे.शेजारी बदलले.गावात कोण नवीन आले कोण गेले फक्त कांहीजणांना समजते.एकमेकांना भेटायचे म्हंटले तर दोन घरात बरेचसे अंतर.जुन्या गावात वर्षभर  पाणी भरपूर मिळायचे.आता ही मिळते परंतु नियमित मिळेल का? याची काही गँरंटी नाही.कारण पाऊस नाही तर नळाला तरी पाणी कोठुन येणार?जुन्या गावात गरजा कमी व प्रश्नही कमी होते.कष्ट करणारे शेतकरी व शेतमजुर यांनी गावाला गावपण आणलं होतं.येथे येणा-या कित्येक राजकारणी ,समाजसुधारक,
शिक्षकांनी वैचारिक बैठक पक्की केली होती.सावळकर साहेबांपासुन ,प्रशासन व इतर अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक,वकील,इंजिनिअर,पोलीस,वायरमन या पदावर जाण्याची अनेकांना  संधी मिळाली.

इतिहासाच्या पाऊलखुणा पाहने महत्वाचे आहे.कारण नव्या पिढीला काहीतरी शिकायला मिळते.आपण ही जुन्या पाऊलखुणा मांडा!



   संकलन    श्याम गिरी
[06/08, 4:42 PM] 👏🏻: लक्षात राहिलेले शिक्षक


   किल्लारीचे जिडगे सर


लामजना प्रशालेत लक्षात राहिलेले शिक्षक म्हणजे किल्लारीचे जिडगे सर.ते नियमित शाळेत येत असत.स्वच्छ पांढरे धोतर,डोक्यावर गांधी टोपी तसाच सदरा.सर खुप कडक पण तितकेच मायाळु होते.मी पाचवीला होतो सर आम्हाला विज्ञानाचे प्रयोग करुन दाखवत असत.सर पान खात असत पण त्यांना इतरत्र थुंकताना कधी पाहिलेलं नव्हतं.सर कधी आजारी पडत नसत.त्यांची शिकवण्याची पद्धत चांगली होती. सर विज्ञानाचा पाठ शिकवताना चार्टचा वापर करीत असत.सरांना मी तासावर कधीचं लेट आल्याचे पाहिले नव्हते.शाळेतील त्यांचे वर्तन आदर्श होते.त्यांनी पुरस्कारासाठी कधीही फाईल केली नाही.
[06/08, 7:25 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक

श्री वसंत सिताराम टेंकाळे


नाव काढताचं हात आपोआप जोडले जातात असे विज्ञान विषय शिकवणारे कडक शिस्तप्रिय,शांत स्वभाव,प्रचंड अभ्यास ,शांत व संयमी मुर्ती,मनाने तितकेच चांगले व प्रेमळ मुर्ती  डोळ्यासमोर उभी रहाते.तास पडला की पटकन वर्गात पाऊल टाकुन कामाला लागणारे.हातात प्रयोगाचे साहित्य
घेऊन शिस्तबद्धपणे उभे रहात किंवा  हातात भौतिकशास्र,जीवशास्त्र,रसायनशास्र यापैकी एखादे पुस्तक असे.
विषयावर प्रचंड प्रभुत्व असणारे टेकांळे सर दिसले की प्रचंड आदर वाटत असे.सरांना पुस्तक पाठ होते.त्यांच्या अध्यापनामुळे विज्ञाननिष्ठा निर्माण होऊन विद्यार्थी डोळस बनले.पाठ्यपुस्तकातले ज्ञान ते सहजपणे जीवनाशी जोडत असत.मायक्रोस्कोपचा वापर करुन स्पायरोगायरा ही वनस्पती आम्ही पाहिल्याचे आठवते.टेंकाळे सर वैज्ञानिक जाणिवा रुजवण्यासाठी विविध  परीक्षा घेत असत.वाचनाची प्रचंड आवड असणारे टेंकाळे सरांची प्रयोगशाळा सदैव सज्ज असे.विविध भारतीय सणांमागील वैज्ञानिक पार्श्वभूमी सर सांगत असत.सर जानेवारी २०१७ महिन्यात भेटले .प्रकृती अतिशय चांगली दिसली.चेहरा प्रसन्न वाटला.सरांचे जीवन सुखाचे जावो ही ईश चरणी प्रार्थना.


संकलन. श्याम गिरी
[06/08, 10:25 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक
 
  वाघोलीकर सर


विनोदाचा बादशहा ,इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व असणारे सर म्हणजे वाघोलीकर सर.संपुर्ण बालपण व दहावीचे  शिक्षण लामजना गावात पुर्ण झाल्यावर सरांनी बी.एड केलं व त्यानंतर इंग्रजी विषयाचे माध्यमिक शिक्षक म्हणुन त्यांनी पदभार स्विकारला.त्यांचे वडील गावातचं शिक्षक होते.वाघोलीकर सर खुप वेळा प्रभारी मु.अ.म्हणुन राहिले.प्रशासनाचा सरांना प्रदीर्घ अनुभव होता.सरांचे गावावर निस्सिम प्रेम होते.सरांबरोबर त्यांच्या मँडमही प्रशालेत शिक्षिका  होत्या.

सरांचे अध्यापन उत्कृष्ट होते.इंग्रजी भाषेतल्या कथेचा प्रसंग ते वर्गात उभा करीत असत. त्यांनी शिकवलेली kidnapped कथा अजुनही आठवते.सर मुलांना खुप हसवत असत.पुर्वी शाळेतल्या अध्यापनाची गावात खुप चर्चा केली जात असे.वाघोलीकर सरांचा स्वभाव प्रचंड विनोदी व ते अभिनय उत्तम करायचे.मुले माराच्या भीतीने खुप अभ्यास करत असत.बेस कच्चा असणा-या मुलांना सरांचे इंग्रजी कळत नसे.सरांचे ग्रामरवर प्रभुत्व होते.त्यांना गावात खुप मान होता.


ते शाळेत रात्रअभ्यासिका चालवत असत.गडबड करणा-या ब-याच मुलांना डोक्यावर पेटी देऊन घरी हाकलुन लावत असत.
सर योग करत असत.अजुनही प्रकृती उत्तम आहे.त्यांच्या कार्याला नमन.
[07/08, 3:40 AM] 👏🏻: आठवणीतले शिपाई लांडगे मामा



मोगरगा गावचे लांडगे मामा एक दीर्घ कर्मयोगी माणुस.सतत शाळेत दिसायचे.ब-याच वेळेस शाळेत मुक्कामाला असायचे.लांडगे मामा म्हटलं की डोक्यावर पांढरी टोपी,पांढरा शर्ट,पांढरी पँट असणारा सावळ्या रंगाचा कष्टकरी मुर्ती डोळ्यासमोर
उभी रहाते.वर्गाची स्वच्छता असो की ऑफीसमधले काम असो लांडगे मामा आळस कधी करत नसत.पंधरा ऑगस्टला चुरमुरे देताना त्यांच्या चेहरा खुप मोठा कृतार्थ भाव रहात असे.वाघोलीकर सर त्यांना "लक्ष्मण" नावाने हाक मारत असत.लांडगे मामांना कधी गणवेशात नसताना कधीच पाहु शकलो नाही.त्यांचा तो नियमितपणा मला खुप आवडायचा.लांडगे मामा मुलांचे, शिक्षकांचे मित्र होते.येणा-या पाहुण्यांचे ते हसत मुखाने स्वागत करत असत.त्यांच्या सेवानिवृतीच्या कार्यक्रमास मी हजर होतो.लांडगे मामा या दोन चार वर्षात भेटले नाहीत.मोगरगा गावात रहाणारे लांडगे मामा सदैव स्मरणात राहतील.ईश्वर त्यांना दीर्घ आयुष्य प्रदान करो.
[07/08, 3:53 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक


मोगरग्याचे निकम सर



दीर्घआयुष्य लाभलेले निकम सरांचे वय ८० च्या पुढे आहे.ते लामजना गावात सतत येतात.शरीर पोलादी .मला ते नेहमी सरदार वल्लभभाई पटेलांसारखे पोलादी पुरुष वाटत.शाळेला उशीरा येणा-या मुलांच्या मनात निकम सरांची भीती होती.कांही जणांनी त्यांचा चांगलाच मार खालेल्ला असेल.निकम सर सरळ स्वभावी.अनलंकृत भाषा (अलंकार नसणारी भाषा ) वापरणारे नेहरु शर्ट ,धोतर पायात करकर करकर वाजणारा जोडा घालणारे सर  अजुनही स्मरणात आहेत.कै.जगताप सर,कै.वडवळे सर यांना निकम सरांबाबत खुप आदर वाटते.विद्यार्थाच्या ढोंगी पणावर सर सतत लक्ष ठेवत असत.सर गावात येतात.बँकेत येतात.खुप छान वाटते.त्यांची साधी रहाणी व उच्च विचार सरणी कायम स्मरणात राहिल.सरांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
[07/08, 4:08 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक नंदर्गे सर



कसगी कर्नाटक गावचे रहिवासी नंदर्गे सर जॉईन झाले भूंकपापुर्वी दोन वर्ष अगोदर.मी सातवी वर्गात शिकत होतो सर आम्हाला इ.भू.ना विषय शिकवत असत.सर कार्यानुभव विषयाचे शिक्षक होते.परंतु वाघोलीकर सरांनी त्यांना इ.भू.ना विषय शिकवण्यास सांगितले होते.सरांचे इ.भू.ना विषयावर प्रचंड प्रभुत्व होते.खेळ व कवायत हे सरांचे आवडते विषय असत.त्यांचा तो पहाडी आवाज आजही लक्षात आहे.राष्ट्रीय सण व नंदर्गे सरांचा उत्साह प्रचंड असायचा.शाळेतील लाऊडस्पीकर व लाईटींगचे काम सर सहज करत असत.अनेक तांत्रिक विषय त्यांना येत असत.टारगट पोरांना नंदर्गे सरांनी वळण लावले.ध्वज के लिए सलामी दो! हे सरांचे बोल कानात घुमतात.नंदर्गे सर अजुनही सेवेत आहेत.त्यांचा तो उत्साही स्वभाव तिळमात्रही कमी झालेला नाही.सरांच्या कार्याला प्रणाम.
[07/08, 4:14 PM] 👏🏻: लक्षात राहिलेले शिक्षक


कै.मधुकर दत्तात्रय जोशी
गाव गुडसूर ता .उदगीर

असावे घरटे आपुले छान...
या लाडक्या मुलांनो..

यासारख्या कित्येक गाण्यातुन जोशी सरांनी मुलांवर संस्कार केले.जोशी सरांचा आवाज खुप चांगला होता.सर कै.दिगंबर पाटील यांच्या नवीन वाड्यात रहात असत.शेजारी श्री अरविंद शिंदे मामा यांचे दुकान होते.सर कुटुंबापासुन खुप दूर होते.स्वत: हाताने स्वयंपाक करत असत.सरांना सांस्कृतिक कार्यक्रमाची खुप आवड होती.धोतर व सदरा हा त्यांचा साधा वेष.त्यांच्या डोक्यावर मी कधी टोपी पाहिली नाही.जोशी सर खुप प्रेमळ होते.उशीरा येणा-या मुलांच्या तळपायावर छडी मारत.सर संयमी,शांत,वृत्तीचे होते.प्राथमिक वर्गाला शिकवताना ते तन्मय होऊन जात.जोशी सर दोन ते तीन महिन्यानंतर गावाकडे जात असत.त्यांनी मी कधीच आजारी पडल्याचं पाहिलो नाही.सरांच्या खोलीवर मी कधीतरी जात असे.सर या जगात नाहीत असं ऐकलो.स्वातंत्र्य दिना दिवशी त्यांच्या चेह-यावर आनंद ओसांडुन वाहत असे.सर विद्यार्थी प्रिय शिक्षक प्रिय होते.त्यांनी पुरस्कारासाठी कधी फाईल केल्याचे आठवत नाही.सर निर्व्यसनी होते,त्यांच्यासम आम्ही निर्व्यसनी राहिलो.

सरांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.
[07/08, 4:15 PM] 👏🏻: त्यांना मी कधी आजारी पडल्याचं पाहिलो नाही.

असं वाचा.
[07/08, 4:38 PM] 👏🏻: सुतार सर

आठवणीतले गुरुजी.

मी चौथी वर्गात होतो.वर्गशिक्षक म्हणुन सुतार सरांचे आगमन झाले.सरांमुळे मला पहिल्या बाकड्यावर बसायला मिळे.सुतार सर पाढंरे धोतर,डोक्यावर टोपी,पांढरी टोपी घालत.त्यांच्या रंगाकडे पाहिल्यानंतर पंढरीच्या सावळ्या  विठोबाची आठवण येत असे .सर शेडोळ गावचे रहिवासी.लामजना गावात बहुतेक ८०% शिक्षक रहात असत.सुतार सरांच्या कडक शिस्तीमुळे अभ्यासाकडे वळलो.सुतार सर विषय समजुन देत व त्याचबरोबर फलकावरील मजकुर वाचायला लावत असत.मी सुतार सरांमुळे चांगल्या प्रकारे वाचायला शिकलो.माझे हस्ताक्षरही हळूहळू सुधारले.सुतार सर आले नसते तर चौथीच्या वर्गात प्रथम येऊ शकलो नसतो.सरांजवळ फक्त गुणवत्तेला किंमत होती.कधीच अभ्यास न करणारी मुले त्यांच्या मुळेच तर अभ्यासाला लागली.सरांना सेवानिवृत्ती पुर्वी डायबिटीझचा त्रास जाणवु लागला होता.सर कर्मयोगी होते.मेहनतीनेच सर्व कांही मिळते.जगताप सरांना प्रेमाने सावकार म्हणत असत.
[07/08, 4:57 PM] 👏🏻: लांडगे मामाचे भूत





मगर सर गावात आले आणि सर्वजण  व्यायामाला लागलो.मी पहाटे लवकर उठुन शाळेत व्यायाम करायला जात असे.     ब-याच मुलांना हे जमेनासे झाले.कारण व्यायाम ही संकल्पना आमच्या दृष्टीने नवीन होती.कोणीतरी शाळेत भूत असल्याचे सांगितले.मोठ्या चिंचेजवळ भूत रात्री फिरते असे कानावर आले.कोणीतरी लांडगे मामाचे भूत असल्याचे सांगितले.मग माझ्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.मी पहाटे चार वाजता निघालो.पहातो तर भल्या पहाटे अंधारात पांढरे कपडे घातलेली व्यक्ती फिरत होती.ती बरोबर चिंचेच्या झाडाजवळ होती.माझी घाबरगुंडी उडाली.तरी सुद्धा मी जवळ गेलो.मी म्हटलो कोण आहे? ती व्यक्ती काहीच बोलली नाही.मी आणखी जवळ गेलो.मी म्हणालो,"कोण लांडगे मामा का?" ती व्यक्ती म्हणाली ,"हो मीच!"मी म्हणालो ,"इथं लांडगे मामाचं भूत फिरतय मला बघायचं आहे." त्यावर लांडगे मामा म्हणाले," बघा हो ते दहावीचे पोरं मला भूत म्हणलाल्यात ,गावात काय बी सांगत फिरत्यात."मला मात्र हसु आवरलं नाही.
[07/08, 9:33 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक


कै.विठ्ठल काशिनाथ जगताप

मी एकदा वाचनालयात गेलो पेपर वाचल्यानंतर रजीस्टर मध्ये स्वाक्षरी केली.रजीस्टर मधील पाने चाळताना मला जगताप सरांची स्वाक्षरी दिसली .मी चौकशी केली तेंव्हा सर येथे येत नसतात कोणीतरी दुस-याच व्यक्तीने त्यांची हुबेहुब सही केली होती मी ही अचंबित झालो.√''''''''''' त्यांच्या आडनावाची सुरुवात J ह्या इंग्रजी  अक्षराने होते .जगताप  सरांनी गणितातील वर्गमुळच्या चिन्हाचा व कँपिटल J अक्षराचा स्वाक्षरीमध्ये  सुंदर मिलाफ घातला होता.


जगताप सर गणित व भूमिती विषय शिकवत असत.आज ही त्यांनी शिकवलेले प्रमेय लक्षात आहेत. त्यांचे विषयावरील प्रभुत्व अचाट होते.अतिशय शिस्तीत फलकावर भौमितीक आकृत्या कंपास पेटीच्या सहाय्याने काढत असत.जगताप सरांचे संकल्पना ज्ञान पक्के होते.बीजगणितातील उदाहरणे फलकावर समजावुन देऊन मुलांचा सराव सर घ्यायचे.सर मितभाषी,स्पष्ट वक्ते होते.कमी बोला व अधिक वाचा.हे सुत्र सर मुलांना वहीत लिहायला सांगत असत.गृहपाठावर Good मिळवण्यासाठी मुले स्पर्धा करत.एखाद्याचा सदगुण व दुर्गूण सर समोर सांगत.हाफ शर्ट व पँट हा त्यांचा आवडता पोशाख .सर नियमितपणे तासावर जात असत.कुणाची निंदा व टवाळी यापासुन सर दूर रहात.सरांनी पहिले वाहन M 80 घेतली होती.सेवानिवृत्ती पुर्वी एक वर्ष अगोदर सरांनी पांढरी टाटा कार घेतली होती.त्यांचे गाव उत्का होते.परंतु सर लामजन्यात रहात असत.सर म्हणत मी केलेल्या कष्टाचं चीज झालं म्हणुन लामजनापाटी येथे असलेल्या कापड दुकानाचे नाव मी  'श्रमसाफल्य' ठेवलं आहे.तुम्ही सुद्धा कष्ट करा.असा त्यांचा कानमंत्र होता.सर सेवानिवृत्त झाले कांही महिन्यातचं त्यांचं अकाली निधन झालं.

मी एकदा दीपावलीचा पगारीचा चेक घेऊन कारकुन पठाण सोबत सरांच्या घरी गेलो होतो.सर मळ्यात गेले होते.मग आम्ही मळ्यात गेलो.सर ऊसाला पाणी देत होते.मी सरांना हाक दिली.सर आले व म्हणाले "अरे ,गिरी तू माझी सही केलास तर चालले असते की ,कशाला बेजार झालास ."

एकदा सर मला म्हणाले ,"तुम्ही कोरे बॉंड पेपर घेऊन या व माझ्या सह्या घ्या."सरांचा आपल्या विद्यार्थ्यावर खुप विश्वास होता.सर अजातशत्रु स्वभावाचे होते.

सरांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.
[08/08, 4:02 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक

वडवळे सर



"मी सकाळी सात वाजता ग्राऊंडवर असतो;कुणाला कांही प्रश्न असतील तर विचारत चला."
अस वडवळे सर म्हणत.ते ग्राउंडवर आहेत की नाहीत हे पहाण्यासाठी मी जात असे. असत.वडवळे सर पर्यवेक्षक होते.बीजगणित व भूमिती हा विषय शिकवायचे.प्रत्येक शिक्षकाला रुजु करुन कार्यान्वित करणे हा वाघोलीकर सरांचा स्वभाव होता.सरमान्यता हीच संचमान्यता होती.त्यांच्या काळात ४० ते ५० शिक्षक कार्यरत असल्याचे मी पाहिले होते.वडवळे सर राठोडा गावचे.शिकवताना खुप तन्मय व्हायचे.खुर्चीवर बसल्यानंतर त्यांचा  उजवा पाय  थरथर कापत असे.आम्हा मुलांना त्यांचे खुप हसू येई.वडवळे सर उशीरा आलेल्या मुलांना कोपरावर वाळुत चालवायला लावत असत.पांढरा शुभ्र सदरा व धोतर हा त्यांचा पोशाख.वडवळे सर कधी आजारी पडत नसत.वडवळे सर कर्मयोगी शिक्षक होते.ते शिस्तप्रिय शिक्षक होते.ते मुलांमध्ये सतत रमलेले असत.सर आता जगात नाहीत.त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.
[08/08, 4:19 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक



बाबुराव मुळजे सर


गळ्या शपथ हो! माईचान खरं सांगतो! पाप! .हे डायलॉग त्यांच्या तोंडात सतत असत.बाबुराव मुळजे हे क्रीडा शिक्षक होते.सांगवी( को.) हे त्यांचे गाव.सर शांत ,मनमिळावु,संयमी शिक्षक होते.सरांचा तास केंव्हा येतो हे आम्ही आतुरतेनं वाट पहात असु.सर उत्कृष्टरित्या कवायत घेत असत.कदम ताल शुरु कर.बाए मुड ,दाहिने मुड.हे शब्द अजुनही आठवतात.सर खुप उत्साही होते.त्यांचा एक नावलौकिक होता.त्यांचा मुलगा धनराज उत्तम कवायत करत असे.सरांमुळे मला खो- खो या खेळाचा परिचय झाला.त्यांच्या काळात मुलांना व्यायाम व खेळाचा परिचय झाला.चिंचेच्या झाडाखाली थांबलेली ती सावळी मुर्ती मला अजुनही आठवते.स्वातंत्र्य दिनादिवशी ते मैदान आखत असत.सर वृक्षप्रेमी होते.ते गंगाधर मुळजे सरांचे सोयरे असतील असं मला आडनाव साधर्म्यावरुन वाटत असे.स्वामी सर त्यांना बाबुराव या नावाने हाक मारत असत.सरांचा साधेपणा व गरीब स्वभाव खुप लक्षात राहिला.





सरांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी वंदन..


संकलन गिरी एस.जी
[08/08, 4:38 AM] 👏🏻: लक्षात राहिलेले शिक्षक



बोधले सर लांबोटा






गावातील शिक्षक संमद खजुरे यांचा वाडा शिक्षकाने सदैव भरलेला असे.त्यांच्या वाड्यात आम्ही किरायाने रहात असु.तिथेच बोधले सर रहात असत.त्यांच्या मंडळी १६ सोमवार व्रत करत असत.बोधले सर भूकंपापुर्वी जुन्या गावात शिक्षक होते.मुले कोणाचही का ऐकत नसतात याची एक कथा ते मनोरंजकपणे सांगत असत.बोधले सर मराठी विषय शिकवत.ते शांत,संयमी होते.त्यांनी कुणाला मारल्याचे आठवत नाही.सर नियमितपणे तासावर येत असत.त्यांचा तो निर्वीकार चेहरा मला अजुनही तुकारामांच्या, चित्ती असु द्यावे समाधान! या श्लोकाची आठवण येते.बोधले सरांच्या नावातचं बोध     हा शब्द होता.बोध (ज्ञान) ले (घे) असं मिश्किलपणे ते सुचवत असत.मी चुकीचे उत्तर सांगितल्यावर सर हसत असत.त्यांचे ते हसणे जिवाला लागायचे व अभ्यासात सुधारणा असे.

बोधले सरांची प्रकृती चांगली आहे.सेवा चांगली केल्याचा कृतार्थ भाव त्यांच्या चेह-यावर दिसतो.



कृतार्थ मी .कृतज्ञ मी.🌷🙏🏻
[08/08, 5:01 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक





खरोश्याचे स्वामी सर







मी पाचवी वर्गात होतो.सर आमचे क्लास टीचर होते.

ABCDEFG Come on Meena read with me...

या गाण्यातुन मला इंग्रजी विषयाची अवीट गोडी लागली.त्यांच्यामुळेच तर मी स्पेशल बी.ए.सहा पेपर इंग्रजी विषय घेऊन करु शकलो.स्वामी सरांचा नियमित तीन वर्षे सहवास लाभला.मी सातवीला आल्यावर इंग्रजी उत्तमरित्या वाचु लागलो.निबंधलेखन करु शकलो.स्वामी सर खरोश्याहून बरेच वर्ष नियमित चालत येत असत.नंतर ते सायकलवर येऊ लागले.स्वामी सर प्रेमळ होते.सरांचे हस्ताक्षर अप्रतिम होते.स्वामी सरांच्या नियमित अध्यापनामुळे इंग्रजी विषयाची गोडी वाढली नंतर कधीच भीती वाटली नाही.गाडीवरुन पडल्यामुळे सरांचा पाय मोडला होता.याचे मला खुप वाईट वाटत असे.सर्व स्टाफ सोबत त्यांचे वर्तन प्रेमाचे होते.सर मत्सरापासून कोसो दूर होते.ते पेटी उत्तम वाजवत असत.गायन उत्कृष्टपणे करत असत.त्यांनी गाईलेले  बलसागर भारत व शारदे   वंदन तुला ही गीते आठवतात.प्रसिद्ध लेखक यदुनाथ थत्ते यांनी शाळेला भेट दिली त्यावेळचा प्रसंगात स्वामी सर आठवतात.




शिक्षक वयानं वृद्ध झाला तरी ज्ञानानं तरुण असतो.याची आज ही प्रचिती स्वामी सरांना भेटल्यावर येते.
[08/08, 6:06 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक





श्री बाबुराव मडोळे ( परीट सर)




करील मनोरंजन जो मुलांचे
जडेल नाते प्रभुशी तयाचे!

या साने गुरुजींच्या वचनानुसार दिसणारे सर म्हणजे परीट सर.परीट सर डोक्यावर गांधी टोपी,पांढरा नेहरु शर्ट व पांढरी पँट घालत असत.सर साने गुरुजींचे प्रतिरुप.मुलांनी उत्कृष्ट काम करताच ते मुलांना खांद्यावर घेत असत.खरा तो एकचि धर्म ! जगाला प्रेम अर्पावे ! ,या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार, बलसागर भारत होवो हीवगीते सर शाळेत सतत गात असत.मुलांना ज्ञानाबरोबर संस्काराचे बाळकडु सरांनी पाजले.त्यांच्या हातातुन घडलेली मुले सर्वाधिक संख्येने शिक्षक झाले.सर एका मला विद्यापीठासारखे दिसत होते. सोज्वळ प्रसन्न हसरा चेहरा.त्यांचे ते विनोद झाल्यावर खळाळुन हसणे.सरांचा चेहरा तणावमुक्त होता.सर विनोदी स्वभावाचे होते.सर मुलांकडुन पसायदान पाठ करुन घेत असत.पाढे पाठांतरावर भर देत असत.सुबक हस्ताक्षराकडे मुलांना वळवत असत.



ग्रामस्थांचा गुरुजींवर प्रचंड विश्वास होता.मोकळेपणा हा त्यांचा स्वभावविशेष होता.त्यांचा मुलगा निलमकुमार मडोळे हे ही प्रशालेत शिक्षक म्हणुन आले होते.सरांचा तो स्पष्ट आवाज अजुनही कानात घमतो...




ध्यास एक साधका ,
अंतरात ठेव तू,
जाण यत्न देव तू....


सर योगा शिकवतात.प्रकृती उत्तम आहे.किल्लारीत रहातात.सामाजिक कार्य करतात.सरांच्या चरणी साष्टांग दंडवत...🌷👏🏻
[08/08, 8:24 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक


निगडीकर सर





हिंदी विषयाची अवीट गोडी लावणारे निगडीकर सर एक अजब रसायन होते.निगडीकर सरांच्या चेह-यावर विद्वता ओसांडुन वहात असे.निगडीकर सर पाठ शिकवताना मन रमुन जायचे.तास केंव्हा संपला हे समजायचे नाही.निगडीकर सर वाघोलीकर सरांचे पाहुणे होते असं ऐकलो होतो.निगडीकर सरांच्या पिळदार मिशा पाहुन भीती वाटत असे.काळा चष्मा ,चेह-यावर मिश्किल हसु दिसत असे.सर हसताना गालावर खळी पडे.निगडीकर सरांच्या शब्दांच्या जादूने विद्यार्थ्यांना अभ्यासाचा छंद लागला होता.




निगडीकर सरांची पुन्हा भेट होऊन शकली नाही.





जिंदगी के सफर गुजर जाते हैं मकाम ओ फिर नहीं आते...
[08/08, 8:41 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक




बिडवे सर




सर आले पळा पळा....

एक काळ असा होता.कोणीतरी सहज म्हंटलं की बिडवे सर आले -या बाबो..पळा रे..पळा रे...असं म्हणत मुलं सापडलं त्या दिशेनं पळत सुटायचे.भीतीनं त्यांचा थरकाप होत असे.मी मुद्दाम सर आले रे म्हणत पळत सुटत असे.कारण दुस-या दिवशी बिडवे सर चांगली हजेरी घेत.बिडवे सरांचं नाव घेताचं मुलांची बोबडी वळत असे.बिडवे सर कडक शिस्तीचे होते.शाळेत बिडवे सर आहेत म्हटल्यावर विद्यार्थ्यी चिडीचुप असत.बिडवे सर धार्मिक होते.पोथीचा अर्थ सांगत असत.गावात सर्वत्र त्यांना खुप मान होता.बिडवे सरांनी टारगट पोरांना वेळोवेळी सरळ केलेलं होतं.



लामजना प्रशालेतील शिक्षकांमुळे मुलांची आयुष्ये बनली.   कित्येकांना नौक-या लागल्या.प्रशालेत माणुसकीचे शिक्षण मिळाले.प्रशाला ही संपुर्ण मराठवाड्यात नावारुपास आली.


बिडवे सरांचं गाव मुरुड( अकोला)
[11/08, 1:04 PM] 👏🏻: आदर्श गावकरी

होतकरु नागरिक


श्री सुग्रीव हरिदास सगर...







घरची परिस्थिती नाजुक,शिकण्याची प्रचंड आवड,मितभाषी ,मनमिळावु स्वभाव,कष्ट करण्याची वृत्ती व चिकाटी असणारा धडपड्या माणुस म्हणजे श्री सुग्रीव हरिदास सगर.या तरुणाचा होतकरुपणा पाहुन रामप्रसाद बजाज भाऊ यांनी त्यांच्याकडे वाचनालयाची जबाबदारी दिली.बरीच वर्षे ते सायकलवर पेपर वाटत असत.त्यांच्या या कष्टाळु स्वभावाचे फळ त्यांना मिळाले गावच्या पोस्ट ऑफीस मध्ये ब्रँच पोस्ट मास्तर म्हणुन नौकरी लागली.सतत कामाचा व्याप लोकांना बचतीची सवय त्यांनी लावली.अनेक वेळा डाक जीवन विमा  कलेक्शन योगदानामुळे त्यांना उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार मिळाला.मी त्यांच्याकडुन वक्तशीरपणा व कोणाचेही काम पेंडींग न ठेवणे हे गुण शिकलो.अजुनही त्यांचे कार्य सतत चालु आहे.उत्कृष्ट रेकॉर्ड व अचुकता हा त्यांचा हातखंडा आहे.त्यांच्या कार्याला प्रणाम.



संकलन श्याम गिरी
[11/08, 3:59 PM] 👏🏻: आदर्श नागरिक



श्री विठठ्ल (आण्णा) बिराजदार










गावातील प्रत्येक माणसाची बारीकसारीक माहिती असणारा व्यक्ती म्हणज श्री विठ्ठल आण्णा बिराजदार.विठ्ठल आण्णा गेली चाळीस वर्षे ग्रामपंचायत कार्यालयात काम करतात.विठ्ठल आण्णा मनमिळावु,मिश्किल व नर्म विनोद करणारे म्हणुन प्रसिद्ध.पांढरा शर्ट ,तशीच पँट ,व डोक्यावर गांधी टोपी घालत असत.विठ्ठल आण्णा नेहमी प्रसन्न दिसतात.गावातील अनेक त्यांचे  मित्र आण्णाभोवती दिसतात.गावातील अनेक समस्या अण्णांनी चुटकीसरशी सोडवल्या असतील.ग्रामपंचायत मध्ये मुला़ंना क्रिकेट दाखवणारे आण्णा आठवतात.विठ्ठल आण्णांना काही लोक प्रेमाने गांधी म्हणताना दिसत.विठ्ठल आण्णा ग्रामपंचायत मध्ये अजुनही कार्यरत आहेत.आण्णांचा सल्ला बरेच जण ऐकताना दिसतात.ग्रामपंचायत मध्ये आण्णा दिसतातच.ग्रामपंचायत मध्ये गेल्यावर आण्णा हसुन स्वागत करतात.




संकलन श्याम गिरी
[11/08, 7:09 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक


मगर सर



मगर सर भुकंपापुर्वी आलेले शिक्षक मला ते खुप आदरणीय वाटत.ते मुलांना भल्या पहाटे शाळेत बोलवत असत.सर सुंदर योगासने करत.सरांमुळेच मी व्यायामाकडे वळलो.सर निर्व्यसनी होते.सरांना मी कधीही  आजारी पडल्याचे पाहिले नाही.सर खुप लवकर उठत असत  याचेच मला खुप नवल वाटायचे.सर शरीराचा गाडा करुन फरशीवरुन वेगाने जात असत.योगामुळे सर प्रसन्न व तेजस्वी दिसत. इतिहास कधीही नष्ट होत नाही.तो कोठेतरी दडलेला असतो.त्याचा मागोवा घेतल्याने भविष्याचा अचूक वेध घेता येतो.भविष्यात पुन्हा सावरता येते इतिहासामुळेे.
मगर सरांमुळे आम्हाला व्यायामाची गोडी निर्माण झाली.येडशी रामलिंग हे  त्यांचे गाव.


मगर सरांना मनापासुन कोटी कोटी प्रणाम💐


संकलन श्याम गुमानगिर गिरी
[11/08, 7:23 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक


कै.गाडे सर ( तपसे चिंचोली)



माझ्या हि-यांनो व हिरकणींनो असं म्हणुन पाठाची सुरुवात करणारे गाडे सर खुप आठवतात.त्यांचे आडनाव गाढे असेल असं वाटायचं.कारण सर खुप अभ्यासु होते.पांढरा सदरा,तसेच धोतर व डोक्यावर गांधी टोपी घालणारे गाडे सर सायकलवर येत असत.मुलांना पाहताच त्यांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत असे.गाडे सर मुलांना इ.भू.ना विषय शिकवत असत.सर शैक्षणिक साहित्य चार्ट,नकाशा वापरुन अध्यापन करत असत.गाडे सर पाठ शिकवतांना खुप तन्मय होऊन जात.गाडे सरांवर हिटलरचा प्रभाव होता म्हणुन ते त्याच्यासारख्या मिशा कट करत असत.त्यांचा तो चेहरा पाहुन खुप हसु येई.गाडे सर विद्यार्थीप्रिय शिक्षक होते.त्यांना मी कधीच रागात आल्याचं पाहिलो नाही.जसा शिक्षक तसे विद्यार्थी गाडे सरांमुळे शांत व स्थिर व विचारी झालो.गाडे सरांच्या कानावर केस होते.याचे मला खुप नवल वाटे.


गाडे सर या जगात नाहीत.पण मी त्यांची आठवण काढतोय.हे त्यांना कदाचित समजले असेल.


त्यांच्या पुण्य स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.💐💐
[11/08, 8:39 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक



श्री बंडू गुरुजी ( अंबुरे सर)



जुन्या पिढीतील साधी रहाणी व उच्च विचार असणारे शिक्षक म्हणजे बंडु गुरुजी.पांढरा सदरा,तशीच टोपी,व पांढरी पँट घालणारे लामजना गावातील बंडु सर दूसरी"ब" वर्गाचे वर्गशिक्षक होते.गावातील कांबळे सर रजेवर गेल्यावर सर आम्हाला शिकवण्याकरिता येत असत."गप्प बसा रे आता. अभ्यास करा बरं !नाहीतर पाठीचं भद्द करीन एकेकाच्या.बाल्या आता तू थंड बसतूस का येऊ तिथं" सरांचे हे शब्द अजुनही कानावर घुमतात.बंडु गुरुजी मुलांना भींतीवर वस्तुसारखं उचलुन धरत असत.कोंबड्याचा आवाज काढत असत.बंडु गुरुजी मुलांचे आवडते शिक्षक होते.सर प्रमोषन होऊन निलंगा तालुक्यात बरेच वर्ष होते.मला प्रेमाने बोलत असत.सर आता खुप थकलेत.आजारी असतात.सरांचा तो शांत,संयमी,गरीब स्वभाव मुलांना खुप आवडायचा.सर आल्यावर मुलांना खुप आनंद होत असे.सर प्रत्येक मुलाची चौकशी करत असत.


सरांना दीर्घायुष्य लाभो.हीच प्रार्थना.
[11/08, 8:55 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक




श्री शेषेराव शिंदे गुरुजी







गावातील अनेक शिक्षकांपैकी जुन्या पिढीतले शिक्षक म्हणजे श्री शिंदे सर . सर कर्मयोगी म्हणजे फक्त कामावर विश्वास ठेवणारे.सर सायकलचा वापर करत असत.नियमित शेताकडे जाणे ही त्यांची सवय होती अजुनही आहे.सरांचा मुलगा युवराज हा उच्चपदावर कार्यरत आहे.आपले कर्म चांगले असतील तर त्याची फळेही चांगली मिळतात असं सर सांगत असत.सरांच्या घराशेजारी मी रहात असे.त्यांच्या मंडळी काकु खुप माया करत असत.सर खुप कष्ट करत असत.जे कष्टाने मिळते तेच कायम टिकते असं सर सांगत असत.



सर सेवानिवृत्त आहेत गावात असतात.प्रकृति चांगली आहे.सरांच्या कार्यास प्रणाम.💐👏🏻



सरांकडुन श्रमसंस्कृती शिकलो.
[11/08, 9:52 PM] 👏🏻: इतिहासाचा मागोवा


लामजन्याची माती म्हणजे फकीराची पांढर असं म्हटलं जात असे.याचा अर्थ मी असा काढला या मातीत शांतता,सुसंस्कार,स्थिरता,त्याग याचे भांडार आहे.मी व माझे बांधव या मातीत खेळलो याचं मातीने संस्काराचं बळ दिलं.या मातीला ज्ञानेश्वर गिरी माऊली महाराज उत्तरेश्वर पिपंरीकर ,नाशिकचे गहिनीनाथ महाराज व तपोनिधी तापीनाथ महाराजांचा ,हजरत शेख सुल्तान ,संत मक्सुद मामु यांच्या चरणाचा स्पर्श होऊन ती पवित्र झालेली आहे.फकीराची पांढर म्हणजे कष्टक-यांची भूमी.



मराठवाडा व हैद्राबाद मुक्तीसंग्रामात येथील तरुणांनी उडी घेतली होती.कोणाकडे तरी त्याचे पुरावे असतीलचं.हटकरवाडीत(मारुतीवाडीत) हत्ती विकला म्हणुन गाव सोडुन जुन्या गावात वस्ती झाली अशी आख्यायिका आहे.


आपण ज्या गावात सध्या रहातो आहे.इथं दुपारी सुद्धा येण्याची भीती वाटत असे.जुन्या गावातुन लोक दत्तापाटीला ( लामजनापाटी) चालत जात असत.पुर्वी गावच्या भोवताली खुप झाडी होती.जुन्या गावातील तकवा या भागात अजुनही दाट झाडी दिसते.तिथं शाडु मिळत असे मी लहानपणी त्याच्यापासुन गणपती बनवत असे.काही भागाला खटकाळी,लेंडकी,मोरंडी,
माळ अशी नावे गाववाल्याकडुन ऐकायला मिळत असत.मी त्या जागी जात असे व त्यांना अशी नावे का दिली याचा विचार करत असे.लोक मोठमोठ्या वाड्यात व गढीत रहात असत.श्री रामप्रसाद बजाज भाऊ यांचा तो जुना ऐतिहासिक वाडा पाहुन खुप नवल वाटत असे .महेश शर्मा( पापु) यांच्या वाड्यात मी जात असे त्यांच्या वडीलांकडे १०० वर्षाचे पंचांग होते.कै.दिंगबर पाटील यांच्याही घरी मी जात असे त्यांच्या वाड्यात ग्रंथाचे नियमित वाचन होत असे.त्यांच्या वाड्यातील पुर्वजांचे फोटो पाहुन माझे मन हरखुन जात असे.कै.दर्शन पाटील यांनी तसाच वाडा बांधण्याचा प्रयत्न केला. कै.नागनाथाप्पा कलशेट्टी यांच्या तेल घाण्याची घरघर कानावर येत असे.कै.सिद्रामप्पा मुळजे यांचा वाडा प्रशस्त होता.कै.दादाराव गोटे यांच्या वाड्यात पिठाची गिरणी होती.माळ्याच्या मळ्यातील नारळाचे उंचच उंच झाड पाहताना सुर्यामुळे डोळे दीपल्याचे आठवते.

जुन्या गावात एक अख्यायिका आहे.लामजना गावातील शेताजवळ निळकंठेश्वराचे मंदिर होते.त्याची सावली मोगरगा पाटीवर पडत असे.कांहीतरी घडले व लामजन्याचा देव रुसला व किल्लारीत जाऊन बसला.ही आख्यायिका  कोणीतरी सांगितल्याचे व त्याच्या चेह-यावरील हावभाव पाहुन हसु आल्याचे आठवते...




क्रमश:



गांधीजीच्या त्या वट्टयावर शिवराज पाटील चाकुरकर पाऊस आल्यावर सुद्धा हातात छत्री घेऊन भाषण करताना आजही आठवतात.बापुसाहेब काळदाते,कै.विलासराव देशमुख साहेब,दिलीपराव देशमुखयांच्यासारख्या कित्येक नेत्यांनी गावाला भेटी दिल्या होत्या.





गावाला लागुन बांधलेली दगडी शाळा हे माझे सर्वात आवडते ठिकाण.उंच निलगिरी वृक्षांचे कुंपन होते शाळेला.शाळेबद्दल सर्व नागरिकांमध्ये खुप आस्था होती व ती आजही आहे.
[11/08, 11:22 PM] 👏🏻: आदर्श नागरिक







श्री रामप्रसाद बजाज (भाऊ)



जुन्या पिढीतील भाऊ म्हणजे एक  प्रचंड अनुभवी व्यक्तिमत्त्व आहेत. सर्वांनाच भाऊंचा आदर वाटतो.भाऊंच्या हातावर जुने व नवीन हनुमान मंदिर ,पाटीवरील दत्तमंदिर,जुन्या गावातील शाळेचे बांधकाम झालेले आहे.पारमार्थिक ( धार्मिक वृत्ती) असलेले भाऊ गावच्या सरपंच पदावर खुप वर्ष राहिले.गावात प्रथम ते शिक्षक होते जुन्या गावातील मंदिराजवळ शाळेत ते जात असत.भाऊंचा नित्य नियम म्हणजे सकाळी शेताकडे जाणे.दररोज रात्री रोजनिशी लिहिणे.ग्रंथाचे वाचन करणे.वाचनालयाकडे फेरफटका मारणे.गावात भाऊनी वाचनालय आणले.गावातील ब-याच लोकांना बांधकामाबद्दल भाऊंचे मार्गदर्शन लाभले.भाऊ शाळेकडे नियमित जाऊन चौकशी करत असत त्यांना कै. श्रीमंत बिराजदार यासारख्या अनेकांची साथ लाभली.लामजना पाटीवरील दत्तजयंती कार्यक्रमात भाऊ पशुप्रदर्शन व कुस्त्यांची दंगल ठेवुन बक्षीस देत असत.  ब-याच उपक्रमात पंच म्हणुन भाऊ असत.त्यांची वृत्ती धार्मिक असल्यामुळे गावातील अखंड हरिनाम सप्ताहात मुख्य भूमिका बजावत असत.शिस्त व निटनेटकेपणा हा भाऊंचा स्वभावविशेष.जुन्या काळातील सर्व दिग्गज नेते भाऊंना ओळखत असत.जेवण झाल्यावर शतपावली करताना खुप वेळा भाऊ दिसतात.कल्याण या मासिकाचे भाऊ आजीव सभासद असुन त्याचे सर्व वार्षिक व विशेष अंक भाऊकडे पहायला मिळतात.पांढरे स्वच्छ धोतर,तसाच नेहरु शर्ट,व डोक्यावर गांधीटोपी हा भाऊंचा पोशाख.

भाऊ प्राणायाम व योगा करतात.त्यांची पुढील पिढी बिझनेस व शेतीत गुंतली आहे.परंतु जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद पुढे घेऊन जाणारे भाऊंचे व्यक्तिमत्त्व पुढील पिढीला मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.त्यांच्या कार्याला प्रणाम💐👏🏻
[12/08, 8:44 PM] 👏🏻: आदर्श नागरिक



कै. शेषेराव ग्यानदेव बिराजदार


पांढरे स्वच्छ तसेच धोतर परीधान करणारे कै.शेषेराव गुरुजी लक्षात राहिले.साधी रहाणी,स्वाभिमानी,गांधीवादी शेषेराव गुरुजी गावच्या सरपंचपदी राहिले.गावात एकोपा रहावा म्हणुन गुरुजी खुप झटत.त्यांचे मित्र म्हणजे शिवराज पाटील चाकुरकर साहेब.दीपावली व इतर सणाला त्यांचे मित्र भारत सरकार लोगो असलेले शुभेच्छा पत्र पाठवत असत.

जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण

याप्रमाणे चांगल्या माणसाला यातना सोसाव्या लागतात.गुरुजी कितीही संकटे आली तरी डगमगले नाहीत.राजकारणातुन लोकांचा विकास व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींनी रात्रंदिवस झटले पाहिजे असं गुरुजी सांगत.गुरुजी रोज वर्तमानपत्र वाचत असत.गुरुजींना पान खाणे आवडायचं.गुरुजी बरीच वर्षे पोस्टमास्तर होते.नंतर सरपंच झाले.गुरुजींना पैसे कमवण्याचे अनेक मार्ग होते.परंतु गुरुजी निर्मोही होते.जनतेच्या पैश्यावर फक्त जनतेचा हक्क असुन आपण जनतेचे सेवक आहोत असं गुरुजी सांगत असत.गुरुजींचे त्यांच्या गणेश या नातुवर खुप प्रेम होते.गुरुजी समाजसेवक व सच्चे देशभक्त होते.नियमित फिरायला जाणे गुरुजींचा आवडती दिनचर्या होती.गुरुजी एल आय सी चे काम पण करत असत.राजकारणात कशाचीच लालुच न ठेवता कसे काम करावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे गुरुजी.नशीबाला सुख आले काय नि दु:ख आले काय जे प्रारब्धात आहे ते होणारचं यावर गुरुजींची निष्ठा होती.स्वत: कष्ट करुन जीवन जगावे कोणाचे लुबाडु नये याची शिकवण गुरुजींनी दिली.


कै.शेषेराव गुरुजी राजकारणातले संत होते.त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.💐👏🏻
[12/08, 9:07 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक


मोरखंडे सर



मोरखंडे सरांचा तो प्रसन्न चेहरा आजही आठवतो.मोरखंडे सर आमच्या गल्लीत रहात असत.मोरखंडे सर कोणता विषय शिकवत हे काही लक्षात राहिले नाही.मी शाळेत असताना जवळपास ४० ते ५० च्या दरम्यान स्टाफ होता.शिक्षकांच्या बदल्यांचं प्रमाणही खुप कमी होतं.शिक्षक फक्त मुलांच्या प्रगती बद्दल चर्चा करत असत. मोरखंडे सरांचा सहवास कमी लाभला.
मोरखंडे सरांची ती सोज्वळ प्रसन्न मुर्ती पाहुन मन हरखुन जायचे.मोरखंडे सरांचे शिस्तीत काम चाले.मुलांना रागावतांना व छड्या मारतांना मी मोरखंडे सरांना कधी पाहिलो नाही.


सर अजुन सेवेत असतील.त्यांचीही आठवण प्रत्येकाला असेलचं.
[12/08, 9:20 PM] 👏🏻: आठवणीतील शिक्षिका

आळंगे मँडम ( माहेर लामजना)




मी पाचवीच्या वर्गात असताना वर्गशिक्षिका आळंगे बई होत्या.दर गुरुवारी वर्गात पूजा होत असे व मुलांना गोड खाऊ मिळत असे.आळंगे बई सर्व मुलांना समान वागणुक देत असत.छडीचा वापर कमी करत असत.मुलांना वाचन ,लेखन देत असत.त्या सर्व मुलांना विषय समजावुन सांगत असत.मायाळूपणा,नियमितपणा,
शांत स्वभाव या गुणांनी बई परीपुर्ण होत्या.

एक शिकलेली स्री शंभर शिक्षकांच्या बरोबरी इतकी असते.बईंच्या संस्कारात आम्ही वाढलो.मनात थोडीही भीती वाटत नसे.शाळा व घर यातले अंतर बईंनी दूर केले.माझ्या वर्गात १००% मुले हजर रहात असत.प्रेम,ज्ञान, व शक्ती यातुन व्यक्तीचा विकास होतो.

पगारासाठी नौकरी करणा-या लोकांसाठी बई आजही आदर्श आहेत.बईंना खुप दीर्घायुष्य लाभो हीच देवाजवळ प्रार्थना.💐👏🏻
[12/08, 9:45 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक



रामराव कांबळे सर (लामजना)


मी तपसे चिंचोली येथील जि.प.शाळेतुन पहिली पास झालो व लामजना येथे दूसरीला प्रवेश घेतला.माझे नाव दूसरी 'अ' वर्गात घातले गेले.कांबळे सर वर्गशिक्षक होते.सरांचा तेंव्हा परिचय झाला.पांढरा नेहरु  शर्ट व पांढरी पँट घालणारे कांबळे सर खुप मनमिळावु होते.मुलांच्या मनावर कसलाही ताण नसे.ताणरहित आम्ही शिकलो.पाटीवर क,का कि,की...कित्येक वेळा काढुन सरांना दाखविणे हे माझे आवडते काम असे.सर अजुन काढु का? हा प्रश्न विचारताचं सर मान डोलावुन होकार देत असत.कांबळे सर मुलांना मारत नसत.कांबळे सर बरीच वर्षे गावात होते.सध्या सेवानिवृत्त झाले आहेत.सरांना अर्धांगवायुचा अँटक आला होता.सर घरीच असतात.माझे मित्र मात्र विसरुन गेले असतील.कांबळे सर स्वभावाने खुप चांगले आहेत.त्यांचे आरोग्य चांगले रहावे म्हणुन ईश्वराजवळ प्रार्थना करतो.
💐👏🏻
[12/08, 10:11 PM] 👏🏻: आठवणीतील सेवक





गोविंदमामा ( जि.प.शाळा सेवक)






नवीन पिढीला गोविंदमामा कोण होते ? हे माहिती नसेल.गोविंदमामाचे घर शाळेजवळ होते.गोविंद मामा शाळेत शिपाई होते.लामजना शाळेच्या घंटीचा एक विशिष्ट आवाज होता.प्रत्येक टोलच्या आवाजावरुन वेळ समजत असे.सकाळी,दूपारी व शाळा सुटल्यानंतर प्रत्येक वेळच्या घंटेच्या आवाजाची लय व गती वेगळी होती.उदा.मधल्या लघु मध्यंतराची बेल लवकर वाजत असे व चौथा तास काही वेळाने लगेचच पडत असे.गोविंद मामाच्या बोटात ती जादू होती.लांडगे मामा व गोविंद मामा आळीपाळीने टोल टाकत असत.त्यांनी कधी उशीरा टोल दिल्याचे आठवत नाही.गावाचा पसारा पहाता गावाच्या संपुर्ण टोकाला घंटेचा आवाज जात असे.

गोविंद मामाच्या चेह-यावर प्रदीर्घ सेवा केल्याचा भाव असे.सुरकुत्या पडलेल्या चेह-यावर झुपकेदार पांढ-या मिशा वद्धत्वाच्या खुणा सांगत असत.गोविंद मामा मुलांना गोष्टी सांगत.त्यांना कुत्रे पाळण्याचा छंद होता.ते काठीचा आधार घेऊन चालत असत.शाळेतील साफ सफाई चांगली ठेवत असत.सर्वांना प्रेमाने बोलत असत.


मरावे परी किर्तीरुपी ऊरावे .
कै.गोविंदमामा जग सोडुन गेले.त्यांनी माणसाने माणसाला माणुसकीप्रमाणे वागायला काही पैसे लागत नाहीत याची आपल्या सहज वागणुकीतुन शिक्षण दिले.प्रेमळ  गोविंदमामा आज आठवतात.


त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी वंदन💐💐👏🏻
[12/08, 10:42 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक



गुलाबसाहब (लालासाहब)शेख ( सर)








यांचा तर बहुतेक जणांना विसर पडलेला असेल.मी सहाव्या वर्गात असताना शेख सरांचे शाळेत आगमन झालं.शेख सरांचा चेहरा लालसर दिसे.मला नेहमी वाटे त्यांच्या या गुलाबी रंगावरुन त्यांच्या आईने त्यांचे नाव ठेवलेले असे.सरांची मुलगी तबसुम (रुक्साना) अभ्यासात तितकी हुशार नव्हती.सर परीक्षेत तिला हुशार विद्यार्थ्याजवळ बसवत असत.शिक्षकांची मुले हुशार असतात असं मला वाटे परंतु तबसुम याला अपवाद होती.शेख सर हिंदी विषय शिकवल्याचे आठवते.सरांचा सहवास दीर्घ काळ लाभला नाही.शेख सर प्रेमळ होते.पांढ-या पोशाखातली ती प्रसन्न मुर्ती पाहुन मन हरखुन जाते.

सर कुठे आहेत माहित नाही.परंतु खुप आनंदात असतील.इतरांना आनंदी ठेवणा-यांना देव नेहमी सुखात ठेवतो.
[12/08, 11:12 PM] 👏🏻: आठवणीतील शिक्षक


श्री कोळसुरे सर ( चंद्रकांत यशवंतराव)





30 सप्टेंबर १९९३ च्या भूकंपानंतर कोळसुरे सरांचे शाळेत आगमन झाले.गणित विषयात माहिर असणारे कोळसुरे सर प्रदीर्घ सेवेनंतर प्रशालेतुन रीटायर झाले.मी नववीला असताना काही महिने सरांचे मार्गदर्शन लाभले.कोळसुरे सर हाफ शर्ट व पँट घालत असत.   ब-याच जुन्या व नवीन शिक्षकांना सरांचा सहवास लाभला.मूळचे माळेगाव(कल्याणी) निलंगा तालुका हे सरांचे गाव.सर नियमितपणे गणिताचा ज़्यादा वर्ग घेत असत.मनापासुन हसणारे कोळसुरे सर लोकनिंदेला जास्त भीत असत.आपलं काम भलं या विचाराने ते जगताप गुरुजीप्रमाणे गावात जास्त रमले नाही.साधेपणा हा त्यांचा श्रेष्ठ गुण .मितव्यय ( कमी) खर्च करत.पैशाची उगीचच उधळपट्टी करु नये असं सर सांगत असत.सर सुरुवातीला प्राथमिक शिक्षक होते.पदोन्नतीने माध्यमिक शिक्षक म्हणुन लामजना गावात रुजु झाले.सरांना विनाकारण कोणी वाद घातलेले आवडत नसे.शाळेतील शिक्षक सुजाण असतात त्यांना आपली कामे समजतात.प्रत्येकानं स्वत:ची बाजु तरी सुरक्षित ठेवावी असं सर सांगत असत.जि.प.प्रशालेचे प्रभारी मु.अ.म्हणुन सरांनी काम पाहिले.मुलांना शिकवण्याचा सरांना छंद होता.मी प्रशालेत सरांसोबत दहा वर्षे होतो.


सरांच्या दीर्घ अनुभवाचा फायदा सर्व विद्यार्थांना झाला.सेवानिवृतीनंतर सर लातूर शहरात रहातात.





त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच मंगल कामना करतो.💐👏🏻
[13/08, 6:24 AM] 👏🏻: आठवणीतले प्रयोगशाळा सहाय्यक


आतराम डी.बी



जि.प.प्रशाला लामजना येथे भूकंपापुर्वी श्री आतराम डी बी सरांचे आगमन झाले.ते मूळचे नांदेड जिल्ह्याच्या किनवट भागातील आदीवासी भागातुन आलेले.आतराम सर प्रयोगशाळा सांभाळत असत.नंतर सरांना विविध विषयाचे अध्यापन करावे लागले.काही वर्षे त्यांनी लिपिकाचेही काम केले.आतराम सर स्वभावाने शांत मनमिळावु व संयमी होते.अभ्यास न करणा-या मुलांनी सरांचा भरपूर मार खाल्लेला आहे.आतराम सर वेळेवर येत असत.राष्ट्रीय सणाला उत्साही दिसत.सर याच प्रशालेतुन या वर्षी  रिटायर झाले.नवीन व जुन्या पिढीतील सर्व शिक्षकांना आतराम सर ओळखत असत.त्यांना कधी आजारी पडल्याचे पाहिलो नाही.



आतराम सरांना सुदृढ आरोग्य लाभो हीच प्रार्थना.
[13/08, 6:50 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक





संमद खजुरे सर ( लामजना)




संमद सर गावातले शिक्षक .सरांच्या वाड्यात बरेच शिक्षक रहात असत.संमद सर पांढरा सदरा व पँट घालत असत.प्रकृतिने धिप्पाड असलेले सर उपक्रमशिल होते.सरांची बरीच सेवा तांबरवाडी गावात झालेली होती.सर कडक शिस्तीचे होते.सरांचा मुलगा मुजीब प्रथम वकील व नंतर न्यायाधीश झाला.सरांच्या वाड्यात बायोगँस व शौचालय होते.सरांच्या घराचे दार दगडी व भव्य होते.सर कुटुंबाकडे खुप लक्ष देत असत.सरांचा सहवास लाभला.त्यांनी मला कोणता विषय शिकवला नाही.परंतु त्यांच्याकडुन खुप काही शिकलो.बरेच शिक्षक सरांचा सल्ला घेत असत.सरांचा आजारपणामुळे मृत्यु झाला.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.💐👏🏻
[13/08, 2:25 PM] 👏🏻: रात्रअभ्यासिका




जुन्या पिढीतली मुले शाळेत अभ्यासाला जात असत.वाघोलीकर सर रात्र अभ्यासिका चालवत असत.काही मुले अभ्यास करताना डुलकी काढत व पेंगत असत.एकदा एक मुलगा रात्री शाळेत अभ्यासाला उशीरा गेला.त्याला काही अडचणीमुळे उशीर झाला होता.त्याचे मित्र स्वागताला तयारीत होते.एकाच्या हातात फडा,एकाच्या हातात उशी व एकजण हातात चप्पल घेऊन उभा होता.एक जण लाईटच्या स्वीचजवळ थांबला होता.सर्वजण काहीतरी मोहीमेची तयारी करत होते.मी खिडकीजवळ उभा होतो.काही कळण्याच्या आत लाईट बंद करण्यात आली.सर्वजण त्या मुलावर मारण्यासाठी तुटून पडले.
दुस-या दिवशीपण तोच प्रकार.अभ्यासिकेला उशीरा येणा-याचा असा समाचार घेतला जात असे.एका दिवशी त्या मुलाला बाकड्यावर झोपी गेल्यावर त्याचे हातपाय टारगट मुलांनी सुतळीने बांधले व भूत आलय -या बाबो..असा त्यांनी गोंधळ केलो.त्यांच्या असभ्य वर्तनाबद्दल वाघोलीकर सरांनी डोक्यावर पेटी,सतरंजी देऊन शाळेला एक फेरी मारुन घरी हाकलुन देण्याची कारवाई केली होती.




रात्र अभ्यासिकेतली मुलं पहाटे लवकर उठुन झाडांना पाणी देत असत.दहावी वर्गात थोडा हुडपणा मुलात असतोच.ते वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त करत असतात.आजकालची फार कमी मुलं पहाटे उठतात व जी उठतात ती व्यायाम करतील का? हे सांगता येत नाही.आधुनिक काळात पालकांच्या  अपेक्षा खुप  वाढल्या आहेत.खेड्यात मुलांना अभ्यासाचे कमी गांभीर्य आहे.मुलांचे हात काही निर्माण करण्यापेक्षा फक्त लिहिण्यात गुंतलेले दिसतात.बुद्धिमत्ता आहे पण चिंतन कमी आहे.लोकसंख्या वाढीबरोबर प्रत्येकाचे तितकेच प्रॉब्लेम वाढलेले आहेत.कौशल्य नसल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे.निखळ बालपण जाईल असे खेळ संपलेले आहेत.मोबाईल गेम व क्रिकेट यातच तरुणाईचा वेळ व्यर्थ चाललेला आहे.तरुण मुलांनी आई वडीलांना समोर ठेवुन अभ्यास करावा व त्यांचे स्वप्न पुर्ण करावे.
[15/08, 5:08 PM] 👏🏻: एकांताची शाळा...





मौन अभ्यास...





फलप्राप्ती काय होईल माहिती आहे?






सर्व शास्त्र तेथे चालत येतात..
[16/08, 6:37 PM] 👏🏻: नवे वारे नवे विचार


तरुण मुलामुलींनी पुढील कृती करावी व नवे वारे व नवे विचार रुजवावेत.


१) विकास या एकाच मुद्दयावर एकत्र यावेत .

२) लोकशाही मार्गाने निवडणुका लढवाव्यात.


३) भ्रष्टाचार करणा-यांना घरचा रस्ता दाखवावा.


४) आपल्या कामातुन तरुण मुले काय करु शकतात.हे जगाला दाखवावे


५) गावातील मुख्य समस्यांची यादी करुन त्यावर उपाय करावा.


६) जो काम करत नाही .त्याला पदावर रहाण्याचा हक्क नाही हे लोकशाही मार्गाने सांगावे.


७) गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता मोहिम राबवावी.


८)सार्वजनिक शौचालय निर्मिती व वापर,वैयक्तिक शौचालयाचा वापर, जनजागरण,स्वच्छता,कच-याची विल्हेवाट,स्पर्धापरीक्षा वर्ग,अभ्यासिका,क्रीडामंडळे,
सांस्कृतीक कार्यक्रम,आरोग्य तपासणी शिबिर,जलपुनर्भरण,
धार्मिक कार्यक्रम राबवावेत.



९)जनतेचा पैसा योग्य कामासाठीच वापरणे.


१०) गरीब व होतकरु मुलामुलींना शैक्षणिक साहित्याची मदत करणे.


११)दारुबंदी व मटकाजुगार बंदी यासाठी प्रयत्न करणे.



१२) व्यसनापासुन दूर रहाण्याकरीता विविध उपक्रम घेणे.


१३) गावातील अभ्यासात कच्च्या मुलांना वाचन व गणित शिकवणे.



१४) विविध उपक्रम राबवुन लोकात एकोपा निर्माण करणे.



१५) विविध क्षेत्रातील गुणवंत लोकांना पुरस्कार देणे.


उदा. आदर्श पालक, गुणवंत मुले,नवीन नौकरी लागणारे,आदर्श नागरीक, आदर्श माता,आदर्श शेतकरी,आदर्श व्यापारी


१६) सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावुन लोकांना विविध विषयावर प्रबोधन करणे.यातुन लोकांच्या चुकीच्या समजुती दूर होऊन जादूटोणा ,चमत्कार यापासुन लोक दूर जातील.पर्यायाने घरचा पैसा वाचेल.


१७) संपुर्ण गावातील लोकांच्या विमा पॉलीसी काढुन विमा संरक्षण मिळवुन देणे.


१८) गावात रात्री मोटारसायकलवरुन गस्त घालण्यासाठी पथक स्थापन करणे.महिन्यातुन तारखेनुसार एकदा किंवा दोनदा ड्युटी मिळेल अशी जबाबदारी घेणे.



१९) जो अनाथ आहे.किंवा आई किंवा वडील यापैकी एकजण वारले आहेत.शाळकरी मुला मुलींना शैक्षणिक साहित्याची मदत करणे.समाजातील दानशूर व्यक्तीकडुन मदत मिळवुन देणे.



२०) महिन्यातून कमीत कमी दोनदा सामाजिक विषयावर व्याख्यान आयोजित करणे.





२१) तरुणांना उद्योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा उद्योग मंडळाचे अल्पमुदतीचे रोजगार प्रशिक्षण व उद्योगासाठी मदत बँकेकडुन अर्थसहाय्य मिळवुन देणे.


२२) गावातील सर्व शासकीय कार्यालयांचा ,तेथील निधी व योजनांचा आढावा घेणे.



२३) उदगीर येथील नेत्र संस्थेमार्फत नेत्रतपासणी शिबीर व उपचार यांचे आयोजन करणे.



२४) गावातील बेरोजगार तरुणांना काम मिळुन देण्याचा प्रयत्न करणे.




२५) विविध शासकीय कार्यालयाशी उदा. जि.प.लातूर यांच्याशी संपर्क करुन विविध योजना गावात आणण्यासाठी प्रयत्न करणे.

शनिवार, १५ एप्रिल, २०१७

[11/04, 10:53 PM] Maheshrao:                    सहजच मनात आले
आरसा म्हणतो सावलीला तू माणसासोबत का असते कायमच? त्यावर सावली आरश्याला म्हणते,माझ्यामुळे मनुष्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते.
मग सावली विचारते आरश्याला,तुझे काय महत्त्व आहे मानवी जीवनात? आरसा सांगतो,माझ्यामुळे मनुष्याला त्याच्या वास्तवाची जाणीव होते.वास्तव हे बदलू शकते पण आपलं अस्तित्व बदलू शकत नाही.पण याच वास्तवा मुळे आपल्या अस्तित्वालापण ठेच पोहोचू शकते.आरश्याची साथ आपणास सोडावी वाटत नाही आणि सावली आपली साथ सोडू देत नाही.तरीपण माणूस हा आपल्याच सावलीला घाबरतो,लांब पळतो.ती राहते आपल्या पाठीशी खंबीरपणे सदैव.आरसाच कळलाव्या मुनीसारखं मनात द्वंद्व घडवून आणतो.मनाला पार उंदरासारखं कुरतडतो तरीपण तो सगळ्याला प्रिय असतो.म्हणून काय फरक पडतो,सावलीला मात्र कायम उपेक्षाच वाट्याला आलीय म्हणून काय तिने आपला खंबीर पाठबळ काढून घेतला नाही....


                             माही ऊर्फ महेश बिराजदार,लातूर

[15/04, 1:01 PM] Maheshrao: सहज मनात आले
             क्रमांक-2
असे म्हणतात की,आपला जेव्हा जन्म होतो त्यावेळी सटवाईदेवी आपल्या कपाळावर आपलं नशीब लिहिते.आपल्या उर्वरित आयुष्यात काय काय होणार आहे याचा लेखाजोखा असतो.आयुष्यात नशिबाप्रमाणेच घडामोडी घडत असतात.याप्रमाणे मग 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या वाक्याचा अर्थच कळेनासा होतो.माणसाच्या आयुष्यातील पाप-पुण्य जर देवच ठरवत असतील तर त्याने केलेल्या पापामध्ये त्याची काहीच चूक नसणार.कारण हे असं घडनारय हे अगोदरच तय होतं.
असे पण बोलले जाते की,आपण केलेल्या पाप-पुण्याच्या हिशोब आपल्या मरणानंतर द्यावा लागतो.कर्ता करविता हाच परमेश्वर आहे आणि तोच हिशोब ठेवतो.मग यात माणसाचं कुठे चुकतं कळतच नाही.
(ग्रामीण भागातल्या अंधश्रद्धेवरुन सांगीतलेल्या गोष्टीवरून माझं वैयक्तिक मत)

                            माही उर्फ महेश बिराजदार,लातूर

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१७

देशभक्ती यालाच म्हणतात .....

मोठमोठ्या मॉल्समध्ये जाऊन गडगंज शॉपिंग करणे,
आपल्या रक्तातून पिकवलेल्या भाजीपाल्याला रस्त्यावर
विकणाऱ्या शेतकऱ्याबरोबर घासाघीस करणे,
देशभक्ती यालाच म्हणतात......

अडाणी असलेल्या नेत्यांच्या आगे पीछे करणे
आणि त्यांच्यासाठी जीवपण द्यायला तयार,
जवान हे सीमेवर मरण्यासाठीच तैनात असतात,
दोन चार सैनिक मेले तर काय एवढं दुःख....?
देशभक्ती यालाच म्हणतात......

मुलीची छेडछाड  करताना मुलांची गर्दीतील हर व्यक्ती वाहत्या गंगेत हात धुवून घेतो व माणूसकीचं दर्शन घडवतो
आणि
हेच हात बलात्कारी नराधमांसमोर कुत्र्याच्या शेपटासारखं
गुंडाळून घेतात,
देशभक्ती यालाच म्हणतात......

राजकीय पक्षाला लाखों-करोड़ों रु.ची देणगी देताना कुचराई होत नसते
पण सामाजिक कार्यात दिल्या जाणाऱ्या 100 रु.मागे
हजार वेळेस केलेला विचार असतो,
मंदिरात दान पेटीत आपली श्रद्धा व भक्ती गहाण ठेवतो
पण,भिकाऱ्याला भीक देताना माणुसकी विसरून जातो
देशभक्ती यालाच म्हणतात.....

आतंकवादी भारतावर हमेशा हल्ले करुन नरसंहार घडवून आणतात आणि
आपण त्यांची जीवतोड मदत करतो
उद्योगपत्तीना कर्जमाफी दिली जाते आणि
शेतकऱ्याला कायम कर्जबाजारी व्हाव लागतं,
देशभक्ती यालाच म्हणतात......

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पक्षाला निवडून दिले जाते आणि सरकार स्थापनेसाठी पाठिंबासुद्धा,
पण सामाजिक संस्थांना त्यांच्या कार्यात आडकाठी
आणली जाते,
उच्चवर्गीयांना चूटकीसरशी न्याय मिळतो आणि
सामान्य मनुष्याला आयुष्याचे उंबरठे झिजवावे लागतात
देशभक्ती यालाच म्हणतात......

नेत्यांचे प्रकटदिन कायम आठवणीत ठेवतात आणि
महापुरूष्याच्या जयंती पुण्यतिथी तारखेवरून
समाजात गदारोळ माजवतात,
अपना काम बनता भाड मे जाये जनता म्हणत भ्रष्टाचाराला खतपाणी पुरवलं जाते आणि
भ्रष्टाचारविरोधी आंदोलन दडपून टाकले जाते
देशभक्ती याला�

रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७

........कुटुंब......

कुटुंब....
म्हणजे बुजुर्गांची अनुभवी 'बुनियाद',
म्हणजे युवांच्या उत्साहाची 'छत',
म्हणजे या दोहोंना घट्ट करणारी पालकांची 'इमारत',
म्हणजे चिमुकल्यांचे खुले 'आकाश'......

कुटुंब.....
म्हणजे सुंदर संस्काराची 'खाण',
म्हणजे अनुभवी विचारांचा 'खजिना',
म्हणजे नीतीमूल्यांची 'अमाप संपत्ती',
म्हणजे बऱ्या-वाईटांची 'अदालत'.....

कुटुंब....
म्हणजे मानवी जडणघडणीची 'पाठशाळा',
म्हणजे भावनिक गुंतागुंतीची 'सुलझन',
म्हणजे नात्यांबद्दलचा 'आदर',
म्हणजे खुलेपणाने व्यक्त होण्यासाठीचे 'व्यासपीठ'.....

कुटुंब.....
म्हणजे वाद-विवादांचा 'ठोस निकाल',
म्हणजे पुरोगामी विचारांची 'आवक',
म्हणजे गुणावत्तेला उपलब्ध 'पाठबळ',
म्हणजे भावनिक 'आधार'.....

कुटुंब.....
म्हणजे विनोदांचा हास्यकल्लोळ,
म्हणजे एकमेकांची खेचाखेची,
म्हणजे पाहूण्यांचे यथोचित आदर-सत्कार,
म्हणजे मानवी जीवनातील बंदिशाळा.....

कुटुंब......
म्हणजे सण-उत्सवांचे उल्हासाने स्वागत,
म्हणजे एकत्रित साजरायचा आनंद,
म्हणजे त्या दिवशी बनवलेली 'पूरणपोळी',
म्हणजे एकत्रित जेवताना केलेल्या 'दिलखुलास गप्पा'......

कुटुंब.....
म्हणजे सामूहिक आरती,
म्हणजे भक्तीमय भारावलेले वातावरण,
म्हणजे ज्ञानेश्वरी,गीता इ.ग्रंथांचे पारायण,
म्हणजे ग्रंथातील श्लोकांचा उलगडा......

कुटुंब.....
म्हणजे नवजात शिशूंचा जन्मसोहळा,
म्हणजे साक्षात लक्ष्मीचे घरात दमदार स्वागत,
म्हणजे आजींचे शिशूंना 'तेल मालीश',
म्हणजे शिशूंच्या कसदार,पिळदार शरीरांचा 'अखाडा'.....

कुटुंब.....
म्हणजे आजीच्या बटव्याची उत्सुकता,
म्हणजे आजीने सांजेला संगीतलेल्या शुरवीरांच्या गोष्टी,
म्हणजे आजोबांचे विचारात टाकणारे कोडी,
म्हणजे मनुष्याची लहानपणीची जडणघडण......

कुटुंब.....
म्हणजे आई-काकुंचा मिलाफ,
म्हणजे सासूबाईंचे प्रेमळ टोचक शब्द,
म्हणजे सासूबाईंचे आई-काकूवरील प्रेम,
म्हणजे माय-लेकरांचे अनोखे बंधन.......

कुटुंब.....
म्हणजे आई-बाबांची अखंड धडपड,
म्हणजे आजी-आजोबांचा वटवृक्षासारखा आशीर्वाद,
म्हणजे काका-काकुंचे खंबीर पाठबळ,
म्हणजे बच्चे कंपनीचे उज्ज्वल भविष्य.....

कुटुंब....आज
म्हणजे मतभेदाचे व्यासपीठ,
म्हणजे डोईजड होणारे रिश्ते-नाते,
म्हणजे अवघड जागचं दुखणं,
म्हणजे भावनिक अत्याचार.....

कुटुंब....आज
म्हणजे बुजुर्गांचे अनाहूत सल्ले,
म्हणजे विनाकारणाच्या जबाबदाऱ्या,
म्हणजे पुराणी जीवनशैली,
म्हणजे संस्कारी विचारांची विल्हेवाट......

कुटुंब....आज
म्हणजे 'हम दो,हमारे दो' संकल्पना,
म्हणजे 'छोटा परिवार,सुखी परिवार' विचारधारणा,
म्हणजे 'फोडा आणि राज्य करा' कूटनीति,
म्हणजे 'पैसाच सर्वोपरि' मानसिकता......

कुटुंब....आज
म्हणजे आई-बाबांचे ओझे,
म्हणजे नात्यांची फरफट,
म्हणजे छिन्नविच्छिन्न होणारी मन,
म्हणजे डबघाईला आलेली पारंपरिक संस्था.....

   
                                 ....माही उर्फ महेश....

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

माझ्या विद्यार्थ्याने रचलेली कविता..

अंदमान येथे भारतीय नौसेनेत कार्यरत आहे.

नाव- महेश धनराज बिराजदार 

या जगाला कळलं पाहिजे.....

अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात असणारी बुद्धिमत्ता,कौशल्य,
तुझ्यात असणारी विचारशैली,साहस,
तुझ्यात असणारी 'अंधरूनी शक्ती',
तुझ्यात असणारा आत्मविश्वास,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे संभाजीराजेंचा पंजा
संकटांचा जबडा उघडून दात पाडायला,
तुझ्यात आहे 'ढाई किलो का हाथ'
शत्रुंचा चकनाचूर करायला,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे वज्रमुठ
संकटांचा माउंट एवरेस्ट फोडायला,
तुझ्यात आहे 'पोलादी' 'भरभक्कम' पाऊल
जिथं लाथ मारील तिथं पाणी काढायला,
अरे गडया,तुझ्यात काय आहे 
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे एक निरागस,गोंडस मुलगा
आईचा,
तुझ्यात आहे एक कर्तव्यदक्ष,आज्ञाधारक बेटा
बाबांचा,
तुझ्यात आहे एक फौजी भाऊ सीमेवर लढणारा
बहिणीचा,
तुझ्यात आहे एक गुणवान विद्यार्थी
शिक्षकांचा,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे ती ज्योत,क्रांती घडवून आणण्याची,
तुझ्यात आहे ती लढाऊ वृत्ती,समाजातील अनिष्ठ
रुढी-परंपरांच्या विरोधात लढण्याची,
तुझ्यात आहे तो युवाशक्तीचा गुरगुरणारा आवाज,
समाजातील बुरसटलेल्या विचारांना हादरवुन,
उखडून फेकायला,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे.....

तुझ्यात आहेत पुढारलेले विचार,
तुझ्यात आहेत नवीन संकल्पना,
तुझ्यात आहेत नाविन्यपूर्ण उपक्रम,
तुझ्यात आहेत असंख्य नवविचारांनी भरलेलं गोदाम,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे.....

तुझ्याकडे आहे संस्कृतीचा अमूल्य ठेवा,
तुझ्यात आहे तो प्रयत्न अमूल्य ठेवा जपण्याचा,
तुझ्याकडे आहे महापुरुषांच्या पराक्रमाचा वारसा,
तुझ्यात आहे ती धडपड या पराक्रमाला follow करण्याची,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्याकडे आहे क्रांतिकारी विचारांचा खजिना,
तुझ्यात आहे ती इच्छा या विचारातून नवसमाज घडवण्याचा,
तुझ्याकडे आहे नावजलेल्या लेखकांच्या ग्रंथाची 'मांदियाळी'
तुझ्यात आहे ती धडपड वाचक वर्गात उत्साह जागवण्याचा,
वाचन चळवळ टिकवण्याचा,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे इच्छा समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्याची,स्त्रियांना सन्मान मिळवून देण्याचा,
तुझ्यात आहे ती प्रेरणा,युवक वर्गाला त्यांच्या मेलेल्या 
दिलात नवचेतना जागवण्याचा,
तुझ्यात आहे शिक्षणाबद्दलचा आधुनिक दृष्टिकोन,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे एक आदर्शवादी मुलगा,
वृद्धपकाळात आई-बाबांची सेवा करणारा,
तुझ्यात आहे एक कर्तृत्ववान फौजी भाऊ,पती
कर्तव्य बजावत असताना सुद्धा विचारपूस करणारा,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे.....

तुझ्यात आहे एक संस्कारशील पिता,आजोबा
आपल्या पाल्यांना संस्कारबरोबरच जगण्यातील संकटांना
खंबीरपणे लढायला शिकवणारा,
तुझ्यात आहे एक आज्ञाधारक विद्यार्थी,
आपल्या कर्तृत्वाने समाजाला बदलवणारा,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहे भारताचे उद्याचे भविष्य,
तुझ्यात आहे भारताचे उभरते नेतृत्व,
तुझ्यात आहे golden boy अभिनव बिंद्रा,
तुझ्यात आहे उद्योगपती रतन टाटा,अंबानी,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे 
या जगाला कळलं पाहिजे......

तुझ्यात आहेत ते विचार आणि कर्म,
जातिभेदविरहित समाज निर्माण करण्याचे,
तुझ्यात आहे तो सुज्ञपणा,समंजसपणा,
माणसाला माणूस म्हणून मानुसकीने जगवण्याचा,
अरे गड्या,तुझ्यात काय आहे
या जगाला कळलं पाहिजे......

                                          --माही उर्फ महेश

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१७

 -वसंत काळपांडे (माजी शिक्षण संचालक)
(महाराष्ट्र टाइम्स, दिनांक 29 जानेवारी, 2017)
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
🗞गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणक्षेत्र मुळापासून ढवळून निघेल, असे अनेक निर्णय घेतले. एसएससीची परीक्षा पुन्हा घेण्याच्या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाचले. दुसरी भाषा किंवा सामाजिक शास्त्र या विषयांना पर्याय म्हणून नववी दहावीला व्यवसाय शिक्षणाचे अभ्यासक्रम घेण्याची सोय उपलब्ध करून दिली हासुद्धा अतिशय चांगला निर्णय आहे. या वर्षी नव्याने प्रकाशित झालेली इयत्ता सहावीची पाठ्यपुस्तके अंतर्बाह्य सुंदर होती. शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी ही आकर्षक आणि दर्जेदार पुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात पडल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात समाधानाचे वातावरण होते.
ई-लर्निंग, डिजिटल शाळा आणि तंत्रस्नेही शिक्षक यांच्या चळवळीने या तीन वर्षांत चांगलाच जोर पकडला आहे. गेल्या दोन वर्षांत उच्चभ्रू शाळांची मक्तेदारी मोडून हजारो जिल्हा परिषद शाळा आयएसओ झाल्या. पहिलीपासून इंग्रजी, सेमी-इंग्रजी, बदललेले आकर्षक बहिरंग यामुळे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून जिल्हा परिषद शाळांकडे परत यायला लागले. व्यावसायिक विकासाच्या बाबतीत शिक्षक खूपच जागरूक झाले. विविध शैक्षणिक कार्यक्रमांना स्वेच्छेने, स्वखर्चाने, रजा घेऊन हजेरी लावायला लागले. वृत्तपत्रे, शैक्षणिक नियतकालिके आणि इतरत्र लिहायला लागले. स्वत:ची पुस्तके प्रकाशित करायला लागले. शैक्षणिक प्रकल्प हाती घ्यायला लागले. तंत्रज्ञानाचा वापर स्वत:च्या विद्यार्थ्यांना शिकवताना आणि स्वत:च्या व्यावसायिक विकासासाठी वाढत्या प्रमाणावर करायला लागले. शिक्षकांचे शैक्षणिक विचारांच्या देवाण घेवाणीसाठी शेकडो व्हाट्सअॅप समूह आणि फेसबुक समूह स्थापन झाले. थोडक्यात शैक्षणिक प्रगतीसाठी अतिशय पोषक वातावरण निर्माण झाले आहे; तरीही एक अस्वस्थता आहे, खदखद आहे. ‘आहे मनोहर तरी ...’ असे का व्हावे?
निर्णय घ्यायचे, त्यांना विरोध झाला की, विरोध करणाऱ्यांवर आगपाखड करायची आणि नंतर ते स्वत:हूनच मागे घ्यायचे किंवा त्यांची अंमलबजावणीच करायची नाही हा प्रकार शासनाच्या स्तरावर वारंवार घडायला लागला आहे. सेल्फीचा निर्णय, मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत न पोहोचवता रक्कम थेट त्यांच्या खात्यावर जमा करणे हे निर्णय याची ताजी उदाहरणे आहेत. २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद करून या विद्यार्थ्यांची इतर शाळांमध्ये व्यवस्था करायची हा दुसरा असाच एक अव्यवहार्य निर्णय. एकीकडे शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाबद्दल चिंता व्यक्त करायची आणि दुसरीकडे दुर्गम भागातील शिक्षणाच्या असलेल्या सोयी नष्ट करायच्या या प्रकाराला काय म्हणायचे? या निर्णयाची सुदैवाने अंमलबजावणी झाली नाही.परंतु शासनाने तो रद्द केल्याचेही जाहीर केले नाही.
*🔹काही वर्षांपूर्वी ज्ञानरचनावादाचा बराच बोलबाला होता.‘कुमठे बीट'मधील शाळांमध्ये वापरली जाते ती पद्धत म्हणजे ज्ञानरचनावाद. अशीच ज्ञानरचनावादाची व्याख्या करण्यात आली होती.*कुमठे मॉडेलप्रमाणे ज्ञानरचनावादी तक्ते, पुस्तके आणि इतर साहित्य शाळाशाळांमध्ये विकत घेतले गेले. *‘ज्ञानरचनावादी फरशा’* रंगवून घेण्यात आल्या. परंतु आजही आपण ज्ञानरचनावादी पद्धतीनेच शिकवतो, असे आत्मविश्वासाने सांगणारे शिक्षक दुर्मिळच आहेत. *‘मेंदूआधारित शिक्षण’*ही सध्या चलनात असलेली आणखी एक संकल्पना. ज्यांनी एकाही हॉस्पिटलमधील मेंदूची प्रयोगशाळा पाहिलेली नाही, माणसाचा मेंदू पाहिलेला नाही, ज्यांचा शरीरशास्त्राचा मुळीच अभ्यास नाही, ते या क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून वावरतात यापेक्षा आणखी दुर्दैव काय असू शकेल?
*🔸नुकतीच सिंगापूरला शिक्षकांची एक शैक्षणिक सहल जाऊन आली. राज्य शासन ज्ञानरचनावादाचा पुरस्कार करत असताना रचनावादाचे विरुद्ध टोक असलेली शिक्षणपद्धती ज्या देशात वापरली जाते, अशा देशाला शैक्षणिक सहल कशासाठी? या भेटीच्या वेळी सिंगापूरमधील शाळा बंद होत्या. मग तिला ‘शैक्षणिक सहल’ तरी कसे म्हणता येईल? गंमत अशी की, आज या सहलीत सहभागी झालेले शिक्षक राज्यभर फिरून इतर शिक्षकांना सिंगापूरची शिक्षणपद्धती अधिकारवाणीने समजावून देत आहेत!*
गेल्या वर्षी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाबद्दलचा शासन निर्णय निघाला. थोड्याच दिवसांनी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांनी महाराष्ट्र तेराव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकांकावर गेल्याचे जाहीर केले. हे कशाच्या आधारे जाहीर केले ते मात्र गुलदस्त्यात ठेवले. मधल्या काळात सर्व शाळांमध्ये पायाभूत चाचण्या झाल्या. परंतु त्यांच्या निकालांबद्दलही कोणतीच माहिती उपलब्ध नाही. या महिन्याच्या 
जलद शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमा’बद्दलचा शासन निर्णयात एक मोठेच ‘घुमजाव’ आहे. तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेल्या महाराष्ट्रात ५० टक्के प्राथमिक शाळा अप्रगत असल्याचे लक्षात आले. आता ३१ मार्च २०१७पर्यंत उरलेल्या सर्व शाळा प्रगत करण्याचे लक्ष्य आहे. न्यूपाच्या डाइस अहवालानुसार महाराष्ट्र तेराव्या क्रमांकावर आहे; तर असरच्या अहवालानुसार २०१०पासून सुरू झालेली महाराष्ट्राची घसरण इतर राज्यांच्या तुलनेत आजही सर्व बाबतीत सुरूच आहे.
🔹डिजिटल शाळा आणि तंत्रस्नेही शिक्षक जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. हजारो शाळा डिजिटल, तर शिक्षक तंत्रस्नेही म्हणून नोंदले गेले आहेत. प्रत्यक्षात केवळ शिक्षकांचा स्मार्टफोन आणि मॅग्निफायिंग ग्लास एवढेच साहित्य असलेल्या अनेक शाळांनी डिजिटल म्हणून नोंदणी केली आहे. तोच प्रकार तंत्रस्नेही शिक्षकांचा. हे सर्व करताना केंद्र सरकारचे National Policy on ICT in Schools नावाचे धोरण अस्तित्वात आहे आणि त्याचा वापर केला पाहिजे; पाठ्यपुस्तके, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आणि मूल्यमापन यांची ई-लर्निंगशी सांगड घालायला पाहिजे; यासाठी लागणारे साहित्य कसे तयार करायचे आणि कसे निवडायचे याबाबत शिक्षक मार्गदर्शिका तयार व्हायला पाहिजे, त्यांचे प्रशिक्षण व्हायला पाहिजे या गोष्टींची कोणाला जाणीव आहे, असे मुळीच दिसत नाही. शैक्षणिक तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या महाराष्ट प्राथमिक शिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर आजही २०११-१२ नंतरची माहिती उपलब्ध नाही ही आणखी एक धक्कादायक बाब. राज्यात सुरू असलेल्या विविध शिक्षक-प्रशिक्षणात अध्ययनाला, अध्यापनाला अतिशय दुय्यम स्थान दिलेले आहे.
🔸पूर्वी शासनाच्या इतर विभागांच्या शिक्षणेतर कामांबद्दल शिक्षकांची तक्रार असायची. आता ती शिक्षण विभागाच्याच शिक्षणेतर कामांबद्दल सुरू झाली आहे. ‘शालार्थ’मध्ये ऑनलाईन बिले पाठवण्याबरोबरच पारंपरिक पद्धतीनेसुद्धा बिले भरून समक्ष द्यावी लागतात. ‘सरल’चे काम प्रचंड, पण अजूनही यु-डाइस आणि इतर माहिती वेळोवेळी पाठवावीच लागते. दुर्गम भागात रेंज नसते. अनेक शाळांमध्ये वीजबिले थकल्यामुळे वीज तोडलेली आहे. शाळांना वीज सवलतीच्या दरात पुरवण्याबाबत शासनाने अजूनही निर्णय घेतलेला नाही. खूप कमी शिक्षकांना ऑनलाइन माहिती भरता येते. त्यांना पैसे भरून सायबर कॅफेची किंवा परिसरातल्या जाणकार शिक्षकांची मदत घ्यावी लागते. लोकसहभागातून पैसा मिळवायला मर्यादा असतात हे शासन लक्षात घेत नाही अशीही शिक्षकांची तक्रार आहे. शिक्षण हक्क कायद्याच्या आधारे बदललेल्या शिक्षक पदांचे निकष विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहेत. गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख यांचे सेवाप्रवेश नियम तयार असूनही नेमणुका न झाल्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त पदे रिकामी आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना गेल्या दोन वर्षांपासून सादिलखर्च, शाळा अनुदान, शिक्षक अनुदान आणि देखभाल व दुरुस्ती यासाठीचे अनुदान; तर अनुदानित शाळांना वेतनेतर अनुदानाची रक्कम मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे आज अनेक अनुदानित शाळा नियमात नसूनही विद्यार्थ्यांकडून वेगेवेगळ्या स्वरुपात रकमा आकारत असतात.
संस्थात्मक रचना मोडकळीला आल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळांचे पर्यवेक्षण करणे आणि तांत्रिक आणि धोरणविषयक बाबतीत सल्ला द्यायचा असतो; सनदी अधिकाऱ्यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ या पातळ्यांवरील बाबी आणि शासन निर्णय आणि अधिनियम यांच्याशी सबंधित बाबी सांभाळायच्या असतात आणि धोरणांच्या अंमलबजावणीचे नियंत्रण करायचे असते. लोकभावना, आपल्या पक्षाचा निवडणूक जाहीरनामा आणि पक्षाची धोरणे विचारात घेऊन संविधानाच्या चौकटीत मंत्र्यांनी निर्णय घ्यायचे असतात. आज सनदी अधिकाऱ्यांनी सर्वच क्षेत्रांवर अतिक्रमण केल्यामुळे समतोल ढळला आहे. राज्यपातळीपासून खालपर्यंत संवाद तुटलेला आहे. क्षेत्रीय पातळीवरील अधिकाऱ्यांचे नीतिधैर्य खच्ची झाले आहे. हे शिक्षणक्षेत्राला आणि विशेषतः विद्यार्थिहिताच्या दृष्टीने अतिशय घातक आहे.
हे सर्व चुकते आहे हे लक्षात घेऊन शिक्षणमंत्र्यांनी पुढाकार घेऊन मंत्रालयापासून खालपर्यंत तुटलेला संवाद पुन्हा मनापासून आणि पारदर्शकपणे सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला, अस्तित्वात असलेल्या संस्था सक्षम केल्या तर चांगले दिवस परतायला वेळ लागणार नाही.
वसंत काळपांडे 
वाचता नाही अंगावर काटा उभा रहावा अशी ही कविता...  खुप खुप छान लिहिलीय...
.
.❣❣❣❣❣
 शप्पत नक्की वाचा.
💝💘💝💘💝💘💝
"साद आईची"
.
.🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

महिनेमागून महिने,
शेवटी वर्ष सरुन जाते
वृध्दाश्रमाच्या पायरीवर ,
वाट तुझी पाहाते
.
.🏵🏵🏵🏵🏵

भिजून जातो पदर ,
अन मन रिते राहाते
कधी मधी मात्र ,
तुझी मनीऑर्डर येते
.
.⚜⚜⚜⚜⚜⚜

पैसे नकोत यावेळी ,
तूच येऊन जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा
.
.☯☯☯☯☯☯

तुझा बा होता तोवर ,
काळ बरा गेला
तुझी आठवण काढत ,
उघड्या डोळ्यांनी गेला
.💟💟💟💟💟💟💟
.
शेवटपर्यंत सांगत होता,
 लेक माझा भला
तू मोठा साहेब,
त्याचं मोठं कौतुक त्याला
.
.💝💝💝💝💝💝💝
माझ्याही ह्रदयात फोटो,
 तुझा तू पाहून जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा.
.
.💘💘💘💘💘💘
दुष्काळाच्या साली ,
जन्म तुझा झाला
तुझ्या दुधासाठी ,
आम्ही चहा सोडून दिला
.
.💖💖💖💖💖💖
वर्षाकाठी एक कपडा,
 पुरवून-पुरवून घातला
सालं घातली बापाने,
पण तुला शाळेमधी घातला..
.
.💗💗💗💗💗💗

हवं तर तू हे ,
सगळं विसरुन जा
पण बाळा मला ,
तुझ्या घरी घेऊन जा.
.
.💓💓💓💓💓💓💓
धुणी-भांडी करीन मी,
केरकचरा भरीन मी
पुरणपोळ्या, अळुवड्या ,
तुझ्यासाठी रांधीन मी
.
.💞💞💞💞💞💞

नातवंडांचं दुखलं-खुपलं ,
सगळं बघेन मी
घाबरु नकोस, त्याची आजी ,
असं नाही सांगणार नाही मी
.💕💕💕💕💕💕
.
तुझ्या घरची कामवाली ,
म्हणून घेऊन जा
पण बाळा मला
तुझ्या घरी घेऊन जा.
.
.❣❣❣❣❣❣
थकले रे डोळे बाळा,
प्राण कंठी आले
तुझ्याविना जगणे
आता मुश्किल झाले
.
.💜💜💜💜💜💜💜

विसरु कशी तुला मी,
तुझ्यामुुळे आई झाले
बाळ माझं 'कुलभूषण'
पोरकी मी का झाले?
.
.💚💚💚💚💚💚💚

आता माझ्या थडग्यापाशी
'आई' म्हणून जा
जमलंच तुला तर
हा वृध्दाश्रम पाडून जा.

💛💛💛💛💛💛💛.
.
हा मेसेज खुप  जणाना पाढवा तुमच्या सगळ्या ईच्छा पुर्ण होतील ...
.
❤❤❤❤❤❤❤
.
आईवर प्रेम करत असाल तर नक्की शेअर करा...
💖💖💖💖💖💖💖

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

*संपूर्ण आयुर्वेद लिहिलंय शॉर्ट मध्ये,*
हे वाचल्यावर अक्षरशः काही वाचायची गरज नाही!
वाचा आणि पालन करा.

|| शरीराला आवश्यक खनिजं ||

*🔺कॅल्शिअम*
कशात असतं?
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर
कमतरतेमुळे काय होतं?
हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे
कार्य काय असतं?
शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.
🌺🌺🌺े

*🔺लोह*
कशात असतं?
खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी
कमतरतेमुळे काय होतं?
शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
कार्य काय असतं?
शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.
🌺🌺🌺े

*🔺सोडिअम*
कशात असतं?
मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं
कमतरतेमुळे काय होतं?
रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.
कार्य काय असतं?
शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.
🌺🌺🌺े

*🔺आयोडिन*
कशात असतं?
शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.
कमतरतेमुळे काय होतं?
थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.
कार्य काय असतं?
शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.
🌺🌺🌺े

*🔺पोटॅशिअम*
कशात असतं?
सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.
कमतरतेमुळे काय होतं?
अ‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.
कार्य काय असतं?
शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.
🌺🌺🌺े

*🔺फॉस्फरस*
कशात असतं?
दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.
कमतरतेमुळे काय होतं?
ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.
कार्य काय असतं?
मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.
🌺🌺🌺े

*🔺सिलिकॉन*
कशात असतं?
गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,
कमतरतेमुळे काय होतं?
कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.
कार्य काय असतं?
जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.
🌺🌺🌺े

*🔺मॅग्नेशिअम*
कशात असतं?
बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.
कमतरतेमुळे काय होतं?
उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.
कार्य काय असतं?
पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.
🌺🌺🌺े

🔺सल्फर
कशात असतं?
दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.
कमतरतेमुळे काय होतं?
प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.
कार्य काय असतं?
इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.
🌺🌺🌺े

*🔺क्लोरिन*
कशात असतं?
पानी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.
कमतरतेमुळे काय होतं?
अ‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍ॅलर्जी.
कार्य काय असतं?
सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.
🌺🌺🌺े

*🔺खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे.🔺*
» फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.
» डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.
» काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.
» दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.
» फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.
🌺🌺🌺े

*▫ब्लड प्रेशर  आणि  नियंत्रण▫*
*============================*

ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. आज  तुम्हाला काही घरगुती उपायांची माहिती देत आहोत. तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तुम्ही हे घरुगुती उपाय अवश्य करून पाहा. या उपायांनी तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहील.
🌺🌺🌺े

*▫लसूण -*

ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण अमृतासमान औषधी आहे. यामध्ये एलिसीन नावाचे तत्त्व असते, जे नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते आणि यामुळे आपल्या मासपेशींना आराम मिळतो. ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीला आराम मिळतो. यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी.
🌺🌺🌺े

*▫शेवगा -*

यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसेच खनिज लवण आढळून येतात. एका संशोधनानुसार, या झाडाच्या पानांचा अर्क पिल्यास ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीवर सकारत्मक प्रबाव पडतो. ब्लडप्रेशरच्या रुग्णाने मसूरच्या डाळीसोबत शेवग्याचे सेवन करावे.
🌺🌺🌺े

*▫जवस -*

जवसामध्ये अल्फा लिनोनेलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमणात असते. हे एक प्रकारचे महत्त्वपूर्ण ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आहे. विविध संशोधनामध्ये समोर आले आहे, की ज्या लोकांना हायपरटेन्शनची समस्या असेल त्यांनी जेवणात जवसाचा उपयोग अवश्य करावा. यामुळे कॉलेस्टेरॉलची मात्रा कमी होते आणि याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
🌺🌺🌺े

*▫विलायची -*

एका संशोधनानुसार विलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. याच्या सेवनाने शर
हळद   Turmeric
🌺🌺🌺े

*गुणधर्म  -----*

तिखट,  कडवट,  रूक्ष,  गरम,  जंतुनाशक,  रक्तशुद्धीकारक,  वात,  पित्त,  कफ  शमन  करणारी.

*उपयोग -----*

*१)*  जखमेवर  किंवा  मुका  मार  लागणे.  हळद  लावा.
*२)*  रक्ती  मुळव्याध  -  बकरीचे  दूध  +  हळद  घ्या.
*३)*  सर्दी,  कफ,  खोकला -  गरम  दूध  +  तूप  +  हळद  घ्या.
*४)*  जास्त  लघवी  -  पांढरे  तीळ  +  गुळ  +  हळद  घ्या.
*५)*  आवाज़  बसणे  -  हळद  +  गुळ  गोळ्या  करून  खा.
*६)*  काविळ  -  ताक  +  हळद.
*७)*  ताप  -  गरम  दूध  +  हळद  +  काळीमिरी  पुड.
*८)*  लघवितून  पू  जाणे  -  आवळा  रस  +  हळद  +  मध.
*९)*  मुतखडा  ( स्टोन )  -   ताक  +  हळद  +  जूना  गुळ.
🌺🌺🌺े

      #    *आरोग्य   संदेश*    #
   
हळदच  आहे  जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक,
नक्कीच   आजारांना    आहे   ती   मारक.
 
*तोंडाचे  विकार*
 
*कारणे -----*

जागरण  करणे,  जास्त  तिखट  खाणे,  पोट  साफ  नसणे,  पित्त  होणे,  अपचन  होणे,  उष्णता  वाढणे,  रोगप्रतिकारक  शक्ति  कमी  होणे. व्यसन  करणे.

*उपाय -----*

*१)*  जेवणात  गाईचे  तूप  व  ताक  घ्या.
*२)*  गुलकंद  खा.
*३)* ज्येष्ठमधाची  कांडी  चघळावी.
*४)*  दुधाची  साय  आणि  शंखजीरे  मिक्स  करून  तोंडातून  लावा.
*५)*  हलका  आहार  घ्या.
*६)*  वरील  कारणे  कमी  करा. त्रिफळा  चूर्ण  घेऊन  पोट  साफ  ठेवा.
*७)*  दही  उष्ण  असल्याने  जास्त  खाऊ  नका.
*८)*  जाईची  पाने  किंवा  तोंडलीची  पाने  किंवा  पेरूची  पाने  किंवा  उंबराची  कोवळी  कांडी  चावून  थुंका.
*९)*  नियमित  प्राणायाम  करा.
*१०)*  आवळा  पदार्थ  खा.
*११)*  एकाचवेळी  सर्व  उपाय  करू  नका.
🌺🌺🌺े

*जीभेची  साले  निघत  असल्यास*

*उपाय -----*

*१)*  पुदिन्याची  पाने  आणि  खडीसाखर  मिक्स  करून  चावून  थुंकत  रहा.
*२)*  एक  केळ  गाईच्या  दूधाबरोबर  खावे.
*३)*  त्रिफळाच्या  काड्याने  गुळण्या  करा. जंतुसंसर्ग  कमी  होतो.
🌺🌺🌺े

     #     *आरोग्य  संदेश*    #

*व्यायामानेच  पचनशक्ती  वाढवा*

*उपाय -------*

*१)*  नारळाची  शेंडी  जाळून  राख  बनवा.
*२)*  ती  राख  २/३  ग्रँम  ताकातून  घ्या.
*३)*  रिकाम्या  पोटीच  घ्या.
*४)*  सकाळ  व  संध्याकाळ  घ्या.
*५)*  मुळा /  सुरण  भाजी  खा.
*६)*  अक्रोड  खाऊन  वर  दूध  प्या.
*७)*  जेवणात  कच्चा  कांदा  खा.
*८)*  श्वास  रोखू  बटरफ्लाय  व्यायाम  करा.
*९)*  हलका  आहार  घ्या.  गाईचे  तुप  खा.
*१०)*  पोट  साफ  ठेवा.
*११)*  नियमित  प्राणायाम  करा.
*१२)*  चोथायुक्त  पदार्थ  खा.
*१३)*  शाकाहारी  राहण्याचा  प्रयत्न  करा.
*१४)*  एकाचवेळी  सर्व  उपाय  करू  नका.
🌺🌺🌺े

#     *आरोग्य   संदेश*      #

पोट  राहूद्या  नियमित  साफ,
मुळव्याधीचा   चूकेल   व्याप.

*काळ्या द्राक्षांचे 10 फायदे, वाचाल तर रोज खाल*

*1. डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण*

काळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं. ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही मदत होते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही.

*2. एकाग्रता वाढायला मदत*

काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. तसंच मायग्रेनसारखा आजारही या द्राक्षांमुळे बरा होतो.
🌺🌺🌺े

*3. हार्ट ऍटेकचा धोका कमी*

काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स असतात जे हृदयाला स्वस्थ ठेवतात. तसंच या द्राक्षांमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं, ज्यामुळे हार्ट ऍटेकचा धोका कमी होतो.

*4. वजन होतं कमी*

नियमित काळी द्राक्ष खालली तर वजन कमी होऊ शकतं. यामध्ये असणारा एँटीऑक्साईड शरिरात जास्तीचं असलेलं टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतो. ज्यामुळे वजन कमी होतं.
🌺🌺🌺े

*5. अस्थमा होतो बरा*

काळी द्राक्ष शरिरात असलेल्या बॅक्टेरिया आणि फंगसला मारायचं काम करतात, जी इंफेक्शन तयार करतात. पोलिओविरुद्ध लढण्यासाठीही द्राक्ष हा चांगला उपाय आहे. काळ्या द्राक्षांमुळे अस्थमा बरा व्हायला मदत होते.

*6. कॅन्सरला रोखा*

काळी द्राक्ष खाल्यामुळे ब्रेस्ट, लंग, प्रोस्टेट आणि आतड्यांच्या कॅन्सरच्या धोक्यापासून वाचता येऊ शकतं.

*7. अपचन होत नाही*

काळ्या द्राक्षांमध्ये शुगर, ऑरगॅनिक ऍसिड आणि पॉलीओस जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि पोटाची जळजळ होत नाही.
🌺🌺🌺े

*8. डोळ्यांसाठी गुणकारी*

दृष्टी सुधारण्यासाठीही काळी द्राक्ष गुणकारी आहेत.

*9. सुरकुत्या होतात कमी*

काळ्या द्राक्षांमुळे डोळ्यांखाली होणारा काळा भाग कमी करतो. तसंच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही यामुळे कमी होतात.
🌺🌺🌺े

*10.  केस गळती थांबवायला मदत*

काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या विटॅमिन इ मुळे केस गळणं, केस पांढरे होणं यासारख्या समस्या दूर होतात. द्राक्ष खाल्यानं केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचायला मदत होते, त्यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात.
शरीरावरील  काळे  डाग
🌺🌺🌺े

*उपाय -----*

*१)*  नियमित  प्राणायाम  करा.
*२)*  पचनशक्ती  स्ट्राँग  ठेवा.
*३)*  पोट  साफ  राहूद्या.
*४)*  पालेभाज्या  व  फळभाज्या  खा.
*५)*  सकाळी  ऊठल्यावर  तोंडातील  लाळ  सर्व  डागांवर  चोळून  लावा.  तोंड  धुण्यापूर्वीची  लाळ  पाहिजे.  हा  जबरदस्त  उपाय  आहे.
*६)*  कोरफड  पानातील  गर  लावा.
*७)*  आवळा  रस /  पदार्थ  घ्या.
*८)*  डागांवर  कच्च्या  पपईचा  रस  लावा.
*९)*  कडुलिंबाची  पाने  आंघोळीच्या  पाण्यात  टाकून  पाणी  उकळवून  घ्या.  नंतर  त्याच  पाण्याने  आंघोळ  करा.  मात्र  साबण  वापरू  नका.
🌺🌺🌺े

     #     *आरोग्य   संदेश*     #

करा  योग,  पळतील  रोग. संपतील  भोग.
🍲 आहार तज्ञ - ऋजुता दिवेकर यांच्या मते  आहाराविषयीच्या संकल्पना.

🍲  *नियोजनबद्ध आहार कोणता?*

आपला भारतीय संस्कृतीतील आहार योग्य आहे. भाजी, पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य पदार्थांचे पर्याय शोधतो. म्हणून खाद्यसंस्कृती बदलते आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या चौरस आहाराची किंमत आपल्यालाच समजत नाही, याची खंत आहे.
🌺🌺🌺े

🏃 *वाढलेली चरबी कशी कमी करावी?*

आपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी वाढणार नाही. वाढली तरी कमी होण्यासही मदत होईल. सलग ३० मिनिटे एका जागेवर बसू नका. आपण शरीराचा पुरेसा वापर करीत नाही म्हणून चरबी वाढते. दरवर्षी अर्ध्या किंवा एक किलोने वजन वाढते. वजन वाढते, याचा अर्थ आपण आळशी होत आहोत, हे समजून घ्या. म्हणून गरज आहे ती `मूव्ह मोअर अँड सिट लेस` या मंत्राची.
🌺🌺🌺े

🍇 *कोणती फळे खावीत?*

आंबा, केळे, सीताफळ, चिकू आणि द्राक्ष ही फळे प्रत्येक भारतीयाच्या आहारात आवर्जून आलीच पाहिजेत. आरोग्यासाठी केळे हे सर्वोत्तम असल्याचा दुजोरा आता जगभरातून मिळत आहे. बाळाच्या आहारातही आईच्या दुधानंतर फळांमध्ये केळ्याचाच समावेश होतो.

◆ *मधुमेहासाठी आहार कसा असावा?*

खरं तर मधुमेहींनी जे पदार्थ खाल्ले पाहिजेत, तेच पदार्थ डॉक्टर टाळण्यास सांगतात. मात्र, भात, केळं आणि तुपाचा समावेश आहारात अवश्य असावा. दोन जेवणांमध्ये फार अंतर ठेऊ नये, व्यायाम भरपूर करावा आणि अगदी झोपेपर्यंत टीव्ही पाहणे टाळावे.
🌺🌺🌺े

◆ *शुगर-फ्रीचा वापर करावा का?*

शुगर फ्री आहारातून वर्ज्यच करा. आहारात जेवढी साखर आवश्यक असते, तेवढी खावी. लाडू, हलवा यासारख्या घरी बनणाऱ्या गोड पदार्थांत वापरली जाणारी साखर आरोग्यासाठी चांगली असते. ऊस आणि गूळ यांना एकमेकांशी रिप्लेस करू नये. आवश्यकतेनुसार पदार्थात साखर किंवा गुळाचा वापर करावा. शरीरातील उष्णता वाढवायला गुळाची मदत होते.
🌺🌺🌺े

◆ *वाढतं वजन आणि ताण यांचा संबंध कसा आहे?*

वाढत्या ताणामुळे वजन वाढतं. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉर्वर्ड या सूत्रानुसार जीवन जगायला सुरवात केल्यास आयुष्यातील तणाव कमी होतील.
🌺🌺🌺े

● *कडधान्य कशी खावीत..*

आपण उसळ करताना कडधान्य शिजवून घेतो. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये कच्ची कशासाठी खायची? ती उकडून, उसळ करून खाणेच योग्य.

● *जेवणात कोणते तेल आणि किती वापरावे?*

शेंगदाण्याचे घाण्यावरून करून आणलेले तेल स्वयंपाकासाठी सर्वोत्तम आहे. शंभर ग्रॅम शेंगदाण्याचे २५ ते ३० टक्के तेल निघते. बाकी चोथा वाया जातो. तेल बनविण्याची पारंपरिक पद्धत अतिशय शुद्ध आहे. आहारात तेल बदलण्याची गरज नसते. पिशव्या किंवा डब्यांमध्ये मिळणारे आणि हृदयाच्या आकाराचे चित्र डब्यांवर दिसणारे तेल आरोग्याला योग्य नाही. तेल जेवढे वापरावेसे वाटते, तेवढे वापरावे. लोणचे, तळलेला पापड, भजी हे पदार्थ आहारात आलेच पाहिजेत. जास्त तेल पोटात जाईल, म्हणून ते खाणे टाळू नये.
🌺🌺🌺े

🚫 *आहारातून ड जीवनसत्त्व कमी झाल्यास काय होते?*

शरीरात हवे असलेले फॅट मिळत नाहीत, म्हणून ड जीवनसत्व कमी होते. वेळेवर त्यावर उपाय न केल्यास हाडे दुखतात, केस गळतात, त्वचेवर डाग पडतात. मधुमेह किंवा कॅन्सर होण्यापर्यंत ही पातळी जाऊ शकते.

*आजकाल बिझी रुटीनमुळे व्यायाम करणे अनेकांना शक्य होत नाही. व्यायामाला दुसरा काही पर्याय आहे का?*

आजच्या युगात आपण नवीन गाडी घेतली, तरीसुद्धा ती नियमितपणे चालवतो. बाहेरगावी गेलो, तरी शेजारी किंवा नातेवाईकांना गाडी सुरू ठेवायला सांगतो. व्यायामाचेसुद्धा तसेच आहे. व्यायामाला कोणताही पर्याय नाही, तो नियमितपणे केलाच पाहिजे. अंग दुखतं, म्हणून व्यायाम करत नाही, अशी सबब अनेक जण देतात. पण खरे तर व्यायाम करत नाही, म्हणून अंग दुखतं. व्यायाम करण्यासाठी आठवड्यात फक्त १५० मिनिटे लागतात. आठवड्याच्या व्यायामाचे नीट प्लानिंग करून ते वेळापत्रक पाळले जायला हवे. व्यायाम अनेकदा उद्यावर ढकलला जातो, त्याचं योग्य नियोजन होत नाही, त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही.
🌺🌺🌺े

✌ *दोन- दोन तासाने खा, असे सांगितले जाते. हे योग्य की अयोग्य?*

सकाळी उठल्या उठल्या आपण चहाने सुरुवात केली, तर दिवसभराची भूक मरते आणि दिवसभराचे रुटीन बिघडते. दोन- दोन तासाने खावे. सकाळी उठून एखादं केळ खाल्लं की, आपण नंतर नीट नाश्ता करू शकतो. सकाळी नाश्त्याला डोसा, घावन, थालीपीठ असं खावं. त्यानंतर जेवणाआधी पन्हं, कोकम सरबत यासारखं पेय घेऊन त्यानंतर आपण नियमित जेवण घेऊ शकतो. जेवताना शक्यतो पाणि पिऊ नये,जेवणाच्या अर्धा तास आधी एक ग्लास पाणि प्यावे व जेवणानंतर एक तासाने पाणि प्यावे.त्यानंतर मध्ये एखाद- दुसरं फळ, संध्याकाळी चार ते सहाच्या मध्ये पुन्हा सकाळच्या नाश्त्याप्रमाणे आहार घेतला की, आपल्याला रात्री फार भूक लागत नाही. मग रात्री पेज किंवा भात खावा, म्हणजे आपल्याला शांत झोप लागू शकते.

🍚 *घरी केलेले चिवडा, लाडू खाण्याची योग्य वेळ कोणती?*

चिवडा आणि लाडू आपण कधीही खाण्यासाठीच तयार करून ठेवतो. चिवड्यासारखी व्हर्सेटाइल गोष्ट कोणतीच नाही. चिवडा कशातही मिक्स करून खाऊ शकतो, त्यामुळे चिवडा कोणत्याही वेळी खाता येईल. लाडूसुद्धा संध्याकाळी ५-६च्या आसपास किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा लाडू चांगला.
🌺🌺🌺े

👨👩 *वाढत्या वयाबरोबर कसा व्यायाम करावा ?*

वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये. आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे. आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम केला, तर ते कोणत्याही वयाला चालतं. वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही.

💧 *सकाळी उठून गरम पाणी प्यायल्याने चरबी कमी होते, असा समज आहे. यात किती तथ्य आहे?*

सकाळी उठल्यावर आवड म्हणून गरम पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. पण त्यामुळे चरबी अजिबात कमी होत नाही. सकाळी उठल्यावर साधं, माठाचं किंवा गरम कोणतेही पाणी आपण पिऊ शकतो.

🍲 *साखरेऐवजी गूळ वापरल्याने फायदा होतो का ?*

प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. त्यामुळे ज्या गोष्टीत साखर वापरण्याची गरज आहे, त्यात साखर वापरली पाहिजे आणि ज्या गोष्टीत गूळ वापरण्याची गरज आहे, त्यात गूळच वापरला पाहिजे. अन्यथा पदार्थाची चव बिघडते. साखर ही चांगलीच आहे. उगाच साखरेच नाव वाईट आहे. साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते. त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापरावा,
🌺🌺🌺े

🙆 *केस, त्वचेसाठी काय सल्ला.*

केस गळण्यापासून वाचण्यासाठी तसेच तजेलदार त्वचेसाठी आहारात भात, नारळ, तूप यांचा समावेश हवा. आहारामध्ये हळदीचा समावेश असण्याची गरज आहे. हळद केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.

🌞 *आपला दिवस कसा असतो?*
मी ज्या शहरात असेन, त्यानुसार दिवस प्लॅन करते. ऋतूमानानुसार आणि स्थानिक पदार्थांना आहारात प्राधान्य देतेत. रोज सकाळी पोहे खाते. सध्या उन्हाळ्यामुळे कोकम आणि पन्हं घेते. जे आवडतं, तेच पदार्थ खाते. जे पदार्थ शरीराला लागतात, ते आवर्जून खाते. कारण, आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसते.

🍌 *फळ किंवा सुका मेव्याने दिवसाची सुरुवात करा*

🍲 *नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा खा*

🍷 *जेवणापर्यंतच्या वेळेत सरबत घ्या*

🍎 *जेवणानंतर एखादे फळ खा*

🍲 *संध्याकाळी गूळ, तूप, पोळी किंवा फोडणीचा भात*

😇  *रात्री   ८.३०  च्या दरम्यान हलका आहार घ्या*

हलका आहार घेतल्याने झोप चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी व्यायाम करण्यास उत्साह राहतो.
🌺🌺🌺े

*आहारातून  उपचार*

पुढील  आजार  झाल्यास  त्यांच्या  खाली  दिलेले  अन्नपदार्थ  खा.  आजार  लवकर  बरे  होतील.

*१)  आम्लपित्त :-*
काळी  मनुका,  आलं,  थंड  दुध,  आवळा, जिरे  खा.

*२)  मलावरोध  :-*
पेरु,  पपई,  चोथा /  फायबरयुक्त  असलेले  अन्न,  दुध + पाणी,  कोमटपाणी ,  त्रिफळा  चूर्ण  घ्या.  पोटाचे  व्यायाम  करा,  टाँयलेटला  बसल्यावर  हनुवटी  प्रेस  करा.  लवकर  पोट  साफ  होते.

*३)  हार्टअटैक / ब्लॉकेज :-*
लसूण,  कांदा,  आलं  खा.  रक्ताच्या  गाठी  होत  नाहीत.  रक्ताभिसरण  उत्तम  होते.

*४)  डिसेन्टरी / जुलाब :-*
कापूर  +  गुळ  एकत्र  करून  खा.  त्यावर  पाणी  प्या.  लगेच  गुण  येतो.

*५)  खोकला :-*
२ / ३   काळीमिरी  चोखा.  दिवसातून  तीन  वेळा.  खोकला  थांबतो.

*६)  मुळव्याध :-*
नारळाची  शेंडी  जाळून  राख  ताकातून  दिवसातून  २ / ३  वेळा  घ्या.  चांगला  गुण  येतो.  रामदेव  बाबांचा  उपाय  आहे.

*७)  दारूचे  व्यसन :-*
वारंवार  गरम  पाणी  प्या.  तसेच  दारू  पिण्याची  आठवण  येईल  त्यावेळी  जरूर  गरमच  पाणी  प्या.  २ / ३  महीन्यात  दारू  सुटेल.

*८)  डोळे  येणे :-*
डोळ्यांना  गाईचे  तुप  लावा.  आराम  पडेल.  कापूर  जवळ  ठेवा.  संसर्ग  वाढणार  नाही.

*९)  स्टोन :-*
पानफुटीची  पाने  खा.  कुळीथ  भाजी  खा.  भरपूर  पाणी  प्या.

*१०)   तारूण्यासाठी :-*
भाज्यांचा  रस,  आरोग्य  पेय,  फळे  खा. गव्हांकुराचा  रस,  Green  Tea  ,प्या.
🌺🌺🌺े

    📢     *आरोग्य  संदेश*    🔔

*संतुलित  आहारात  उपचार  आहेत खरे, सर्वच    आजार    नक्कीच   होतील  बरे.*
 

*आर्टीकल जरा मोठे आहे ,पण जीवनावश्यक आहे*🙏🙏
🌺🌺🌺े

#स्रोत - आयुर्वेदाचा शोध लावणारे आणि जगातील पहिली शस्त्रक्रिया करणारे ऋषी सुश्रुत आणि वागभट्ट यांचा ग्रंथावर आधारित.