रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९
लढा
मनात दाटलेली
काहीतरी मिळवण्याची जमवण्याची
बजबजपुरी
मग काहीही असो
त्याला फक्त
जमवण्याचा छंद
नसती उठाठेव
तो जमवतोय
अखंडपणे
आणि विसरतोय
की सर्व काही
विरुन जाणारयं
नश्वरतेचा शाप
असुनही
सौंदर्य चाचपतोय
मग हाताला काहीच
गवसत नाही
स्वप्नांचेही तसेच
मग तो वळवतोय
आपला मोर्चा अमरत्वाकडे
सोबत काहीच आयुधे
नसताना लढवतोय
भयाण अंधारी युद्ध द्वंद्वाचे
मग काहीच सापडत नाही
मग हताशपणे तो माघारी फिरतोय...
कविता
कविता मला सुचत नव्हती
मी शब्दांचा शोध घेतला
एकएक शब्द मी पेरत गेलो
कवितेचा मळा फुलुन गेला
वृत्त आणि अलंकारानी रचनेचे सौंदर्य बहरत गेलेे
शब्दांच्या नवनव्या छटांनी भाषा सौंदर्य बहरत गेले
कल्पनेच्या अंगणात प्रतिभा चैतन्याने बहरु लागली
नवरसांच्या पावसातुन शब्दांची कळी खुलु लागली
भाषेच्या नभात शब्दांचे ढग
मनाच्या मृदेवर चिंब बरसात
चिंब भिजलो शब्द पावसात
मनाच्या बनात कवितेची धग
[1/27, 7:51 PM] @: आई
मूल लहान असताना
आईचा पदर सोडत नाही
तेच मूल मोठं झाल्यावर
आई जवळ रहात नाही
बालपणी मुलगा आईसाठी
टाहो फोडुन मोठ्याने रडतो
मोठेपणी आईचा टाहो
त्याला कमी ऐकू येऊ लागतो
बालवयात त्याला हवा
आईचा सारखा सहवास
मोठेपणी आईला मात्र
देत नाही एक घास
ती येते आणि तो बिघडतो
तो नाचतो तिच्या तालावर
वाळु सिमेंटच्या जंगलावर
आठवतो आईला कधीतर
गावातील पडक्या वाड्यात
आई वडील धुराळ्यात
तो मात्र चकचकीत बंगल्यात
पिझ्झा बर्गरच्या संस्कृतीत
आई घरी तळमळते
हवा असतो मुलाचा सहवास
तो मात्र बिग बाजारात
सुखाचा घास शोधत असतो
आईला कोण सांभाळावे❓
भावात,जावात असते भांडण
प्रश्न काही मिटत नाही
आईचे हाल संपत नाहीत
आई मृत्यु शय्येवर
सर्वांची उडते तारांबळ
आई केंव्हा जाईल ❓म्हणुन
डॉक्टरांना जाते निमंत्रण
डॉक्टर, हाल बघवत नाहीत
द्या तिला इंजेक्शन
आता तिचं काय राहिलय❓
तोडुन टाका कनेक्शन
फटाक्याच्या आवाजात
गर्दीला येतो महापूर
आई चाललीय म्हणुन
डोळ्यात खोटाचं अश्रुंचापूर
तेरवीला आईचा फोटो
पडक्या वाड्यात अडकवतो
तेरवीचा हिशोब मात्र
भावाभावात वाटत रहातो
खोट्या नाट्या रडण्याने
दिवस सारे संपुन जातात
बाप जाण्याच्या अगोदरचं
प्रॉपर्टीची विल्हेवाट लावतात
बापाचे हाल हाल हाल
कुणाला काही घेण देण नाही
हाय रे अभाग्या
तुझे हाल बघवत नाहीत
तुझ्या पिंडाला कावळा
माणसा कसं शिवल❓
आई वडीलांचा श्राप
पिढ्यानपिढ्या भोवल
@,®© गिरी श्यामसुरेश गुमानगिरी
[1/27, 7:54 PM] @: माध्यमिक शिक्षक जिल्हा परिषद प्रशाला अंबुलगा ( बु.) ता. निलंगा जि.लातूर
शोध देवाचा
देव नाही दगडात
देव नाही राऊळात
देव आहे माणसात
कणाकणात मनामनात
देव शोधायाला गेला
शोधता शोधता थकला
गंगा तिर्थात भिजला
देव सज्जनात सापडला
केली मनाची स्वच्छता
देव जगाचा निर्माता
तोच दाता तोच पिता
देव अनाथांचा त्राता
देव सगुण निर्गुण
देव अमंल परिपुर्ण
देव मांगल्याचा प्राण
देव चैतन्य हे जाण
नको एकादशी काशी
नको उपासाच्या राशी
देव सत्याचा शशि
जाणुन घे मनाशी
नको बकरं कोंबडं
आणि पातळ तांबडं
नको यात्रेचं सोंगाड
देव अवघाची गोडं
@®© गिरी श्यामसुरेश
बाप
पोरा! पोरा! पोरा !!
बाप म्हणत सुटला
पोराचा ओ आला नाही
बापाचा कंठ सुकला
डोळ्यात अश्रुंची नदी
सोग्याने डोळे पुसला
माझं पोरं आलं का❓ म्हणुन
बाप लटपटत उठला
काठीने तोल सावरत
त्याने पार गाठला
केविलवाण्या नजरेने
वाट पाहत बसला
मळक्या टोपीत चाचपली
दहाची फाटकी नोट
सुरकुतल्या शरीरावर
तुळशीचा विठ्ठलहार
म्हातारी गेली आमदा
एकुलता एक पो-या सदा
वृंदावन अवघं सुकलं
राजंणातलं पाणी आटलं
घरावर फिरला नांगर
अंगण झाले उजाड
झोप नाही डोळ्याला
सगळीच कशी परवड
आयुष्यभर भजन करुन
पुण्याई सारी कमवली
कोणतं असं पाप होतं?
पोराची माय दुरावली?
श्वास आता जड झाला
बाप बाजंवर आला
सुरकुतले डोळे पाणावले
जीवन आता संपले
सांग विधात्या का ही परीक्षा?
नको मोक्ष एकचं मागणे
दे बाबा सगळ्यांना
आपुलकीचे देणे...
आपुलकीचे देणे...
@,,®© गिरी श्यामसुरेश
गुमानगिरी
जिल्हा परिषद प्रशाला अंबुलगा( बु.) ता.निलंगा जि.लातूर
लेख:- क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले
सावित्रीबाईंचे नाव घेताचं मनामध्ये एक आदर्श प्रतिमा उभी राहते.यमाच्या हातातुन जसे सत्यवानाचे प्राण सावित्रीने परत आणले त्याच अर्थाने शिक्षणरुपी पतीचे प्राण सावित्रीबाई फुलेंनी परत आणुन मृतप्राय झालेल्या स्रियांच्या जीवनाला नव संजीवनी दिली.चांडाळ चौकडीला न घाबरता सावित्रीबाईने मुलींच्या शिक्षणाची गंगा दारोदार फिरवली.स्वर्गातून गंगा आणणा-या भगीरथालाही सावित्रीबाईंचा अभिमान वाटला असेल.देशातील पहिली स्री शिक्षिका व मुख्याध्यापिका होण्याचा बहुमान सावित्रीबाईंना मिळाला.सावित्रीबाईंचे कार्याचा गौरव पुणे विद्यापीठाला त्यांचे नाव देऊन सरकारने केला.आज ही सरकार दरबारी फुले दांपत्य भारतरत्न पुरस्कारापासुन पासुन वंचित राहिले आहेत.
अविद्येने भरुन गेलेल्या समाजात ज्ञानाची पहाट उगवणे व फुलणे तारेवरची कसरत होती.हजारो वर्षांची गुलामी व बुरसटलेल्या परंपरा यांनी समाजाचे अध: पतन झालेले होते.सुर्याचा प्रकाश पसरताच तिमिर दूर होतो त्याचप्रकारे स्रियांच्या जीवनाच ज्ञान सूर्य येताचं त्यांच्या जीवन प्रकाशमान झाले आहे.सेवा करताना सेवेकरी मेवा पहात नाहीत.सावित्रीबाईंचे कार्य हे निस्वार्थ होते.समाजाकडुन त्यांना कसलीच अपेक्षा नव्हती.समाजसेवेचे सोंग आणणा-या विविध संस्थांना सावित्रीबाईंने कानशीलात लगावलेली निस्वार्थपणाची चपराक आहे.पुण्यासारख्या शहरात क्रांतीची मशाल पेटवणे हे काम सोपे नव्हते. रंजल्या गांजल्याबद्दलचा आतून वाटणा-या कळवळ्यामुळे हे सर्व शक्य झाले.बुडता हे जग देखवेना डोळा,येतो कळवळा या तुकोबांच्या वचनाप्रमाणे सावित्रींच्या मनात मुली शिकाव्यात म्हणुन कळवळा व प्रेम निर्माण झाला.
'हातात लेखणी ,मुखी गोड वाणी' या वचनाप्रमाणे जात,धर्म, पंथ भेद यांच्या पलिकडे जाऊन शिक्षणाची शिदोरी सावित्रीबाईंनी समाजात वाटली.ज्योतीराव फुलेंनी सावर्जनिक सत्यधर्म सांगितला त्याचे सावित्रीबाईंनी कार्यात रुपांतर
केले.
विद्यमुळे मती आली
मतीमुळे गती आली
गतीमुळे वित्त आले
वित्तामुळे शुद्र तरले
एवढे सारे सार्थक सावित्रीबाईंनी केले.
प्लेग झालेल्या रुग्णाची सेवा करताना सावित्रीबाईंना प्लेग झाला व त्यातचं त्यांचा अंत झाला.
सावित्रीबाईंच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा.
रचनाकार
गिरी श्यामसुरेश गुमानगिरी
माध्यमिक शिक्षक बी.ए.इंग्रजी,बी.ए.
वृतपत्रविद्या
एम.ए.मराठी,एम.ए.
शिक्षणशास्त्र,एम.ए.
शै.संप्रेषण, बी.एड.
भ्रमणध्वनि-9923060128
जिल्हा परिषद प्रशाला अंबुलगा ( बु.) ता.निलंगा जि. लातूर पिन 413521
शिवरायांचा पोवाडा
चाल पारंपारिक
शिवराय रत्ने असे थोर
आ आ आ आ
आले भूवर, जसा कोहीनूर
धरली त्यांनी न्यायाची तलवार
केला हो अन्यायाचा प्रतिकार
स्वराज्याचा केला निर्धार
जी जी जी
शिवबाचे शूर मावळे
रुप सावळे ,शत्रु पुढे पळे
त्राण त्यांचे गळे
लावली जुलुमाची त्यांनी वाट
शत्रुचा केला हो नायनाट
मुघलशाहीचा संपला थाट
जी जी जी
तानाजी- संताजी वीर
आ आ आ आ
मदारी मेहतर बाजीप्रभु धीर
किल्ला चढ सरसर
अडवुनी शत्रुची ती वाट
सह्याद्रीचा चढुनी अवघड घाट
स्वराज्याचा झाली पहाट
जी जी जी
लेखाचे नाव :-
🌸*मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उपाय*🌸
माझा मराठाची बोल कौतुके |अमृतातेही पैजा जिंके | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन||
मराठी तुमची, माझी, पुर्वजांची अभिजात भाषा .अभिजात भाषा म्हणुन तिला कोणाच्या 📝प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
✒ज्ञानदेव रचिला पाया|
तुका झालासे कळस||✒
संत चक्रधर,ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ, नामदेव, बहिणाई तेआधुनिक काळातील अनेक लेखक, कवी,नाटककार यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी खुप काम केले.👥
🧕मराठी आम्हाला आई समान आहे.आईने जसे प्रेमाने ,मायेने वाढवले तसेच मराठीने वाढवले आहे .बहिणाबाईंच्या कवितांनी मराठी नटली तर कुसुमाग्रजांच्या कवितांनी तिची प्रतिभा आकाशाला भिडली.साने गुरुजींनी तर मातृप्रेमाचे महामांगल्य स्तोत्र मराठी भाषेतून जगाला सांगितले तर वि.स.खांडेकर व भालचंद्र नेमाडेंनी साहित्य अकादमी दिल्लीचा ज्ञानपीठ 🎖पटकावला .आईचे जसे 👨👩👧👧मुलावर प्रेम असते तसे प्रेम मराठीने तुम्हा आम्हावर केले. मराठीच्या संवर्धनासाठी भाषेवर मनापासुन प्रेम करणे, व्यवहारात व कार्यालयात मराठी भाषेेचा आग्रह धरणे,परकीय भाषेचा द्वेष न करता व्यवहारात मराठीचा वापर करणे,प्राथमिक ते उच्च शिक्षण मराठीतुन होईल असा आग्रह धरणे.वसुधैव कुटुंबकम याप्रमाणे जगातील🌐 सर्व देशात मराठी भाषा पोहचली आहे. दूरदर्शन, फेसबुक, यासारख्या समाजमाध्यमात मराठी मोठे विक्रम गाठत आहे.
बालवयापासुन बालकांना मराठी भाषेचे पक्के बाळकडु मिळाले पाहिजे.स्वभाषा व स्वराज्य,स्वदेशी याचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे.मराठी भाषेतील साहित्याचा आस्वाद सर्वांना मिळण्यासाठी ई 📱मराठी साहित्य वापराचा मोठ्या प्रमाणात आग्रह धरला पाहिजे.परकीय भाषेबरोबरच मराठी भाषेत बोलताना सर्वांनाचं अभिमान वाटला पाहिजे.💡शासनाकडे स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठाचा आग्रह धरला पाहिले.👨🏻🏫मराठी भाषेत साहित्य निर्मिती कशी करावी याचे तरुणांना मार्गदर्शन मिळाले पाहिजे.तसेच मराठी भाषा रोजगाराचे साधन कसे होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.देशातील महत्त्वाच्या सर्वचं परीक्षा 🎯मराठी भाषेतुन देण्याची सोय केली पाहिजे.मराठीला मोठ्या प्रमाणात राजाश्रय व लोकाश्रय कसा मिळेल यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे.नवनवीन संकल्पनांना मराठी भाषेत पर्यायी शब्द निर्माण केले पाहिजेत.जसे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेत पर्यायी नवे शब्द दिले. उदा.📺टेलीव्हिजन या शब्दाला दूरदर्शन हा प्रतिशब्द तयार केला.
📢भाषा ही कृत्रिम उपायांनी संवर्धित होत नाही.युगानुयुगे प्रत्येक व्यक्तीने अंत: करणापासुन प्रयत्न केले पाहिजेत.✅भाषेविषयी असणारा प्रचंड कळवळा व तळमळीतुन हे शक्य होईल.मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कुटुंबापासुन प्रयत्न होणे गरजेचे आहेत.
स्पर्धक
गिरी श्यामसुरेश गुमानगिरी
माध्यमिक शिक्षक
एम.ए.मराठी,एम.ए.
शिक्षणशास्त्र,एम.ए.शैक्षणिक संप्रेषण,वृत्रपत्रविद्या पदवी,शालेय व्यवस्थापन पदविका,बी.एड.
UCL London - Becoming a better teacher course completd.
केंब्रीज लंडन - TKT teaching knowledge test( English) completed.
जिल्हा परिषद प्रशाला अंबुलगा( बु.) ता.निलंगा जि.लातूर
पिन कोड- 413521
कविता नात्यांची वीण
नात्यामध्ये हवी मायेची वीण
जशी सुगरण घरटे वीण
प्रत्येक धागा विणते छान
मग बनते घरटे मायेचे धन
नात्यात हवी अनामिक गोडी
जसे वासरु गाईकडे ओढी
नात्यात नसावा दूरावा फार
अश्रुंनी वाढे विरहाचा सागर
त्यात हवी स्वच्छ मने मोकळी
हळुवार संवादाची खोल तळी
नात्यात हवा विश्वासाचा श्वास
मग फुलेल मोग-यास सुवास
मग असावी काळजी सर्वांची
असावी आतुर ओढ भेटीची
नात्यात नको कणभर स्वार्थ
थोधावा अर्थ सहवासाचा
नात्यात नको गर्व अहंकार
नको तीळमात्र पैशाचा विचार
नात्यात असाे मतांचा स्विकार
आणि असावा दु:खा आधार
नात्यांच्या असो रेशीमगाठी
नको अपमान स्वार्थासाठी
नात्यात नको उसने पासने
जुळावी मने प्रेमाने
रचनाकार
गिरी श्यामसुरेश गुमानगिरी
जि.प.माध्यमिक शिक्षक अंबुलगा ( बु.) ता निलंगा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)