रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

लढा मनात दाटलेली काहीतरी मिळवण्याची जमवण्याची बजबजपुरी मग काहीही असो त्याला फक्त जमवण्याचा छंद नसती उठाठेव तो जमवतोय अखंडपणे आणि विसरतोय की सर्व काही विरुन जाणारयं नश्वरतेचा शाप असुनही सौंदर्य चाचपतोय मग हाताला काहीच गवसत नाही स्वप्नांचेही तसेच मग तो वळवतोय आपला मोर्चा अमरत्वाकडे सोबत काहीच आयुधे नसताना लढवतोय भयाण अंधारी युद्ध द्वंद्वाचे मग काहीच सापडत नाही मग हताशपणे तो माघारी फिरतोय...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा