रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९
कविता नात्यांची वीण
नात्यामध्ये हवी मायेची वीण
जशी सुगरण घरटे वीण
प्रत्येक धागा विणते छान
मग बनते घरटे मायेचे धन
नात्यात हवी अनामिक गोडी
जसे वासरु गाईकडे ओढी
नात्यात नसावा दूरावा फार
अश्रुंनी वाढे विरहाचा सागर
त्यात हवी स्वच्छ मने मोकळी
हळुवार संवादाची खोल तळी
नात्यात हवा विश्वासाचा श्वास
मग फुलेल मोग-यास सुवास
मग असावी काळजी सर्वांची
असावी आतुर ओढ भेटीची
नात्यात नको कणभर स्वार्थ
थोधावा अर्थ सहवासाचा
नात्यात नको गर्व अहंकार
नको तीळमात्र पैशाचा विचार
नात्यात असाे मतांचा स्विकार
आणि असावा दु:खा आधार
नात्यांच्या असो रेशीमगाठी
नको अपमान स्वार्थासाठी
नात्यात नको उसने पासने
जुळावी मने प्रेमाने
रचनाकार
गिरी श्यामसुरेश गुमानगिरी
जि.प.माध्यमिक शिक्षक अंबुलगा ( बु.) ता निलंगा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा