रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

बाप पोरा! पोरा! पोरा !! बाप म्हणत सुटला पोराचा ओ आला नाही बापाचा कंठ सुकला डोळ्यात अश्रुंची नदी सोग्याने डोळे पुसला माझं पोरं आलं का❓ म्हणुन बाप लटपटत उठला काठीने तोल सावरत त्याने पार गाठला केविलवाण्या नजरेने वाट पाहत बसला मळक्या टोपीत चाचपली दहाची फाटकी नोट सुरकुतल्या शरीरावर तुळशीचा विठ्ठलहार म्हातारी गेली आमदा एकुलता एक पो-या सदा वृंदावन अवघं सुकलं राजंणातलं पाणी आटलं घरावर फिरला नांगर अंगण झाले उजाड झोप नाही डोळ्याला सगळीच कशी परवड आयुष्यभर भजन करुन पुण्याई सारी कमवली कोणतं असं पाप होतं? पोराची माय दुरावली? श्वास आता जड झाला बाप बाजंवर आला सुरकुतले डोळे पाणावले जीवन आता संपले सांग विधात्या का ही परीक्षा? नको मोक्ष एकचं मागणे दे बाबा सगळ्यांना आपुलकीचे देणे... आपुलकीचे देणे... @,,®© गिरी श्यामसुरेश गुमानगिरी जिल्हा परिषद प्रशाला अंबुलगा( बु.) ता.निलंगा जि.लातूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा