रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

लेख:- क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीबाईंचे नाव घेताचं मनामध्ये एक आदर्श प्रतिमा उभी राहते.यमाच्या हातातुन जसे सत्यवानाचे प्राण सावित्रीने परत आणले त्याच अर्थाने शिक्षणरुपी पतीचे प्राण सावित्रीबाई फुलेंनी परत आणुन मृतप्राय झालेल्या स्रियांच्या जीवनाला नव संजीवनी दिली.चांडाळ चौकडीला न घाबरता सावित्रीबाईने मुलींच्या शिक्षणाची गंगा दारोदार फिरवली.स्वर्गातून गंगा आणणा-या भगीरथालाही सावित्रीबाईंचा अभिमान वाटला असेल.देशातील पहिली स्री शिक्षिका व मुख्याध्यापिका होण्याचा बहुमान सावित्रीबाईंना मिळाला.सावित्रीबाईंचे कार्याचा गौरव पुणे विद्यापीठाला त्यांचे नाव देऊन सरकारने केला.आज ही सरकार दरबारी फुले दांपत्य भारतरत्न पुरस्कारापासुन पासुन वंचित राहिले आहेत. अविद्येने भरुन गेलेल्या समाजात ज्ञानाची पहाट उगवणे व फुलणे तारेवरची कसरत होती.हजारो वर्षांची गुलामी व बुरसटलेल्या परंपरा यांनी समाजाचे अध: पतन झालेले होते.सुर्याचा प्रकाश पसरताच तिमिर दूर होतो त्याचप्रकारे स्रियांच्या जीवनाच ज्ञान सूर्य येताचं त्यांच्या जीवन प्रकाशमान झाले आहे.सेवा करताना सेवेकरी मेवा पहात नाहीत.सावित्रीबाईंचे कार्य हे निस्वार्थ होते.समाजाकडुन त्यांना कसलीच अपेक्षा नव्हती.समाजसेवेचे सोंग आणणा-या विविध संस्थांना सावित्रीबाईंने कानशीलात लगावलेली निस्वार्थपणाची चपराक आहे.पुण्यासारख्या शहरात क्रांतीची मशाल पेटवणे हे काम सोपे नव्हते. रंजल्या गांजल्याबद्दलचा आतून वाटणा-या कळवळ्यामुळे हे सर्व शक्य झाले.बुडता हे जग देखवेना डोळा,येतो कळवळा या तुकोबांच्या वचनाप्रमाणे सावित्रींच्या मनात मुली शिकाव्यात म्हणुन कळवळा व प्रेम निर्माण झाला. 'हातात लेखणी ,मुखी गोड वाणी' या वचनाप्रमाणे जात,धर्म, पंथ भेद यांच्या पलिकडे जाऊन शिक्षणाची शिदोरी सावित्रीबाईंनी समाजात वाटली.ज्योतीराव फुलेंनी सावर्जनिक सत्यधर्म सांगितला त्याचे सावित्रीबाईंनी कार्यात रुपांतर केले. विद्यमुळे मती आली मतीमुळे गती आली गतीमुळे वित्त आले वित्तामुळे शुद्र तरले एवढे सारे सार्थक सावित्रीबाईंनी केले. प्लेग झालेल्या रुग्णाची सेवा करताना सावित्रीबाईंना प्लेग झाला व त्यातचं त्यांचा अंत झाला. सावित्रीबाईंच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा. रचनाकार गिरी श्यामसुरेश गुमानगिरी माध्यमिक शिक्षक बी.ए.इंग्रजी,बी.ए. वृतपत्रविद्या एम.ए.मराठी,एम.ए. शिक्षणशास्त्र,एम.ए. शै.संप्रेषण, बी.एड. भ्रमणध्वनि-9923060128 जिल्हा परिषद प्रशाला अंबुलगा ( बु.) ता.निलंगा जि. लातूर पिन 413521

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा