रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

कविता कविता मला सुचत नव्हती मी शब्दांचा शोध घेतला एकएक शब्द मी पेरत गेलो कवितेचा मळा फुलुन गेला वृत्त आणि अलंकारानी रचनेचे सौंदर्य बहरत गेलेे शब्दांच्या नवनव्या छटांनी भाषा सौंदर्य बहरत गेले कल्पनेच्या अंगणात प्रतिभा चैतन्याने बहरु लागली नवरसांच्या पावसातुन शब्दांची कळी खुलु लागली भाषेच्या नभात शब्दांचे ढग मनाच्या मृदेवर चिंब बरसात चिंब भिजलो शब्द पावसात मनाच्या बनात कवितेची धग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा