रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

[1/27, 7:51 PM] @: आई मूल लहान असताना आईचा पदर सोडत नाही तेच मूल मोठं झाल्यावर आई जवळ रहात नाही बालपणी मुलगा आईसाठी टाहो फोडुन मोठ्याने रडतो मोठेपणी आईचा टाहो त्याला कमी ऐकू येऊ लागतो बालवयात त्याला हवा आईचा सारखा सहवास मोठेपणी आईला मात्र देत नाही एक घास ती येते आणि तो बिघडतो तो नाचतो तिच्या तालावर वाळु सिमेंटच्या जंगलावर आठवतो आईला कधीतर गावातील पडक्या वाड्यात आई वडील धुराळ्यात तो मात्र चकचकीत बंगल्यात पिझ्झा बर्गरच्या संस्कृतीत आई घरी तळमळते हवा असतो मुलाचा सहवास तो मात्र बिग बाजारात सुखाचा घास शोधत असतो आईला कोण सांभाळावे❓ भावात,जावात असते भांडण प्रश्न काही मिटत नाही आईचे हाल संपत नाहीत आई मृत्यु शय्येवर सर्वांची उडते तारांबळ आई केंव्हा जाईल ❓म्हणुन डॉक्टरांना जाते निमंत्रण डॉक्टर, हाल बघवत नाहीत द्या तिला इंजेक्शन आता तिचं काय राहिलय❓ तोडुन टाका कनेक्शन फटाक्याच्या आवाजात गर्दीला येतो महापूर आई चाललीय म्हणुन डोळ्यात खोटाचं अश्रुंचापूर तेरवीला आईचा फोटो पडक्या वाड्यात अडकवतो तेरवीचा हिशोब मात्र भावाभावात वाटत रहातो खोट्या नाट्या रडण्याने दिवस सारे संपुन जातात बाप जाण्याच्या अगोदरचं प्रॉपर्टीची विल्हेवाट लावतात बापाचे हाल हाल हाल कुणाला काही घेण देण नाही हाय रे अभाग्या तुझे हाल बघवत नाहीत तुझ्या पिंडाला कावळा माणसा कसं शिवल❓ आई वडीलांचा श्राप पिढ्यानपिढ्या भोवल @,®© गिरी श्यामसुरेश गुमानगिरी [1/27, 7:54 PM] @: माध्यमिक शिक्षक जिल्हा परिषद प्रशाला अंबुलगा ( बु.) ता. निलंगा जि.लातूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा