रविवार, ११ एप्रिल, २०२१
बालपणीच्या आठवणी
*डॉक्टर वाघ काका*
*शब्दांकन*
*श्यामसुरेश गुमानगिर गिरी मु.पो.लामजना ता.औसा जि.लातूर*
" ओ, डॉक्टर काका !" मी थोड्याशा क्षीण आवाजात हाक मारली.
" कोण आहे रे तिकडे? " असा खणखणीत आवाज माझ्या कानावर पडला.
" डॉक्टर काका , मी श्याम आहे ,येऊ का आत ? "मी दारात उभा थोडासा जोरात बोललो." कुत्रं अंगावर येतय का तुमचं" , चावलं तर?
मला त्याची लई भीती वाटते.
माझा आवाज ऐकून कुत्रा जोरजोरात भुंकू लागला. डॉक्टरांनी "चुप कर" असं म्हणताच तो गप्प झाला.
डॉक्टरांनी आपल्या डोक्यावरील चष्मा काढुन डोळ्यावर चढवला "अरे श्याम तू आहेस का? ये की आत , मोतीला मी बांधुन ठेवलोय. असा दूरुनचं काय ओरडतो आहेस? " डॉक्टर काका बोलले.त्यांचा चष्मा पाहुन मला हिंदी तील " मामा की ऐनक" पाठाची आठवण झाली. पांढ-या शुभ्र फुल्ल बाह्याचे पातळ बनियन व पांढ-या रंगाची पँट हा डॉक्टर काकांचा बारमाही वेष. ते गांधीजींसारखा चष्मा घालत.वयोमानामुळे त्यांच्या डोक्यावर एकही केस शिल्लक नव्हता.डॉक्टरांच्या मॅडम आम्ही त्यांना नन्नी म्हणत असु मी गेलो त्या सकाळी नास्ता बनवत होत्या.फोडणीचा दरवळ सर्वत्र पसरला होता.डॉक्टर वाघ यांच्या हातांना धन्वंतरीचा स्पर्श होता.रावण पुत्राच्या हातुन लक्ष्मणाला शक्ती लागली तेंव्हा उचलबांगडी करुन ( पकडुन )आणलेल्या डॉक्टरांपेक्षा मला डॉक्टर वाघ काका खुप अभ्यासु वाटत.अत्यंत दूर्धर आजारावर डॉक्टर वाघ काका रामबाण औषध देत. रुग्ण बरा झाल्यावर डॉक्टरांची आवर्जुन भेट घेत असे. लामजना पंचक्रोशीत काविळ, गोवर, टायफाईड , कॉलरा,मलेरिया,धनुर्वात यासारख्या कित्येक आजाराचे निदान व उपचार करण्यात डॉक्टरांचा हातखंडा होता.ते रुग्णाकडुन अत्यंत कमी पैसे घेत.ब-याच वेळेला अर्धी गोळी देत.आवश्यक असेल तर इंजेक्शन देत.परंतु रुग्ण पथ्य पाळत नसेल वेळेवर औषध घेत नसेल तर खुप राग राग करत.त्यांच्या क्लिनिक मध्ये कमालीची स्वच्छता असे.त्यांचे सर्व साहित्य एका लाकडी कपाटात अत्यंत टापटीप रितीने मांडुन ठेवलेले असायचे.रुग्ण सेवेत डॉक्टरांची संपुर्ण हयात गेली.
वयाची साठी ओलांडून सुद्धा डॉक्टरांचा आवाज अत्यंत खणखणीत होता.घरासमोर अडकवलेल्या पिंज-यातुन एक पोपट येणा-याला " या बसा. राम राम" असं म्हणत असे.त्याचे ते मधुर बोल ऐकून रुग्णाला क्षणभर खुप चांगलं वाटत असे.डॉक्टर काका मूक पशुंबरोबर सहज संवाद साधत.ते सहज प्रतिसाद देत.डॉक्टर काकांचं ते ऐकत.हे पाहून मला खूप नवल वाटे.डॉक्टर काकांच्या पुर्वजांनी वाघ पाळला असावा म्हणुन त्यांचे आडनाव वाघ असावे.असा मी विचार करत असे.
मी डॉक्टर काकांना हळू आवाजात म्हणालो, " डॉक्टर काका तुमचा मिठु कसा काय राम राम करतो, बोलतो?हे संगळं त्याला कसं येतं? त्यांनी मला सांगितलं, " हे बघ श्याम, तो मिठु रात्री माझ्या उशाजवळ असतो. रात्री मी त्याच्याशी खुप गप्पा मारतो. ऐकून ऐकून हळूहळू तो बोलायला शिकला.
त्यांच्या जवळ जाताचं डॉक्टरांनी माझ्या पाठीवरुन मायेने हात फिरवला व माझे चिमुकले हात हातात घेतले.त्यांच्या हाताला एकदम चटका बसला. अरे,तुझ्या अंगात तर किती ताप आहे?
" हो, डॉक्टर काका दोन- तीन दिवस झाले,खुप ताप येतोय.गोळी पण घेतलो.काही फरक पडत नाही."
" सध्या घरी कोण आहे का? जा त्यांना सोबत घेऊन ये. अजुन कोणीतरी आलं. डॉक्टरांनी हिटर लावुन त्यात इंजेक्शनच्या सुया उकळायला टाकल्या होत्या.त्यांचा सुइं सुइं आवाज येत होता.मध्येचं गाईचे हंबरणे व वासराचा आवाज ऐकू येई. त्यांनी एक गाय पाळली होती.खुप दूरवरुन तिला आणलं होतं. पूजा मांडून गाईचं स्वागत अतिथी सारखं केलं होतं .मूक पशूंचा ते जीव लावून सांभाळ करत.सकाळी डॉक्टर काकांच्या वाड्यात गेल्यावर खुप प्रसन्न वाटे. पारिजातकांचा सुगंध सर्वत्र दरवळत असे. डॉक्टरांच्या वाड्यात वेळ कसा जातो ते मला समजत नसे.भूकंपानंतर त्यांनी मला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या खुप गोष्टी सांगितल्या. डॉक्टर काकांना युद्धकथा, शौर्यकथा खुप आवडत.ते नित्य नियमाने पेपर वाचत. रेडिओवरच्या बातम्या ऐकत.त्यांना साहित्याची पण आवड होती.ते कधीतरी घरा बाहेर पडत.त्यांच्या घरी रुग्ण अधुन मधुन येत.त्यांच्या बाहेर फिरण्याला मर्यादा येत असे.
मी घरी जाऊन आईला सोबत घेऊन आलो. डॉक्टरांनी मला तपासले. जीभ दाखव असं म्हणाले. "टायफडवर जाण्याची जास्त शक्यता दिसत आहे", डॉक्टर चष्मा हटवत बोलले. हिटरमध्ये उकळत असणा-या इंजेक्शनच्या सुयांचा आवाज ऐकुन माझ्या पोटात गोळा आला.त्यांनी काही गोळ्या दिल्या व पथ्यपाणी करायला सांगितलं.पंधरा दिवसानंतर पुन्हा मी नॉर्मल झालो.काही कालावधी नंतर मला गोवर व कांजिण्या झाल्या.डॉक्टर वाघ काकांनी केलेल्या ट्रिटमेंटमुळे मी लवकर बरा झालो .काहीही म्हणा डॉक्टरांच्या उपचारात एक अलौकिक जादू होती.त्यांचे निदान व त्यावरील उपचार अचूक असल्यामुळे रुग्ण हमखास बरा होणारचं प्रत्येकाला खात्री असायची.पथ्य पाणी न करणा-या रुग्णांचा समाचार घेत.समजावुन सांगत.आवाक्याबाहेरचा रुग्ण ते दूसरीकडे लातूरला वगैरे रेफर करत.सल्ला अचूक देत.
डॉक्टर काकांचे मोजकेचं मित्र होते.ते त्यांना घरी बोलावत.नन्नी विविध पदार्थ तयार करुन आतिथ्य करत.त्या अत्यंत नम्र, प्रेमळ होत्या.त्यांचा चेहरा अत्यंत प्रसन्न व हसरा दिसे. डॉक्टरांची शिस्त कमालीची होती.त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान सखोल होते.डॉक्टरांनी रुग्णसेवा चांगली केली .एका दुर्धर आजाराचा त्यांनी स्वत: अत्यंत खंबीरपणे सामना केला.पण कधीही भासू दिले नाही. अत्यंत कठोर, खंबीर, कणखर,रागीट वाटणारे डॉक्टर वाघ काका मनाने खुप चांगले व प्रेमळ होते.अनेक लोकांना डॉक्टरांनी वेळ प्रसंगी धावून मदत केली.डॉक्टर काका सध्या जगात नाहीत. त्यांचे पुण्यस्मरण नेहमी होते.पारिजातकाच्या फुलांतील गंधाप्रमाणे दरवळावे व आसमंतात मिटुन जावे असे डॉक्टर जीवन जगले.
*बालपणीच्या आठवणी*
शनिवार, १० एप्रिल, २०२१
बालपणीच्या आठवणी
*रात्र अभ्यासिका*
*शब्दांकन*
*श्यामसुरेश गुमानगिर गिरी मु.पो.लामजना ता. औसा*
लांडगे मामांनी घड्याळात न पाहताचं टंग टंग टंग टंग घंटा वाजवली.बरोबर साडेचार वाजले होते.शाळा सुटली. घंटेच्या लयबद्द आवाजावर पोरं डान्स करत घराकडे पळत सुटली. लांडगे मामाला टोल टाकताना घड्याळाची कधीही गरज भासत नसे. शाळेत सर्व गुरुजींच्या हातात घड्याळ हायतं मी कशाला घेऊ ? हा लक्ष्मण लांडगे मामांचा " घड्याळ का विकत घेत नाहीत." या सवालावर जवाब असायचा.शाळा सुटली पाटी फुटली चला पटकन घरी.आरडाओरडा करत मुले घराकडे निघाली.
"माझा तर लई अभ्यास हाय बाबा." पोत्याची पिशवी सावरत गण्याने घराकडे धूम ठोकली.
त्याच्या पिशवीचा एक बंद तुटला होता.तुटलेला बंद तोंडात पकडुन गण्या घराकडे जाऊ लागला.सर्कशीतला जोकरासारखे तो हातवारे करु लागला.मी त्या वेळी सातवीत होतो.चौथी व सातवीला बोर्डाची परीक्षा होती.शाळेतील बोर्डाचा ( फलक) व बोर्ड परीक्षेचा काहीतरी संबंध असलाचं पाहिजे याचा मी विचार करीत असे.खाताच्या पोत्याची किंवा महाबीज बियाची पिशवी दफ्तराची पिशवी म्हणुन बरेचं जण वापरत.जीन्सची पँट कोणीचं घालत नसे.टी शर्ट तर कुणालाचं माहित नव्हता. रेडीमेड दफ्तराचा तर पत्ताचं नव्हता.प्रत्येक मुलाचं दफ्तर म्हणजे जादूगारासारख्या पिशवीसारखा असे.अनेक वस्तू त्यात लपवुन ठेवलेल्या असत.प्रत्येकाच्या दफ्तरात पकान्या गोट्या तर हमखास सापडत.
जून उजाडला की टेलरकडे मुलांची दफ्तराची पिशवी शिवण्याकरीता गर्दी होई. त्याचंबरोबर शालेय गणवेश ही शिवुन घेतला जात असे.खाकीरंगाची हाफ चड्डी व तसाच हाफ शर्ट सातवी आठवी पर्यंत मुलं घालत असत.खो-खो,कबड्डी,सुरपारंब्या,लगोरचे,कोया,गोट्या,भोवरे,चिर- घोडी असे अनेक खेळ मुले मैदानावर खेळत असत.
रस्त्याने उड्या मारत जाणारा गण्या आभाळात बगळ्यांची माळ पाहुन हरखुन गेला.संत्याने " बगळे - बगळे चुन्ना चघळे" हे गाणं गाऊन आपल्या बोटांवरील नखात बगळ्यांचे पांढरे ठिपके दाखवले.परीसरातील प्राणी,झाडे,ओढे,शेती याच्याशी मुले घट्टपणे बांधली गेली होती.शाळा हे मुलांचे सर्वात आवडते ठिकाण होते.रविवारी सुद्धा दफ्तर घेऊन झाडांच्या गर्दीत बसुन मुले अभ्यास करत असत.
दहावी बोर्ड परीक्षेला त्या काळात आजच्यापेक्षा सुद्धा खुप महत्त्व होते.दररोज रात्री आठ वाजता दहावीची मुले रात्र अभ्यासिकेला शाळेत जात.शाळेत एका खोलीत लाईटची व्यवस्था केली होती.शाळेच्या भिंतीत तयार केलेल्या एका अलमारीत ती मुले अंथरुण -पांघरुन ठेवत असत.देवु,महेबुब,आरेफ,
राजु,ओम, दहा बारा जण जेवण करुन शाळेकडे गडबडीने निघाली. वाटेत त्यांना सुधाकर भेटला दफ्तर घेऊन सर्वजण लगबगीने चालु लागले.
जुन्या पिढीतली मुले शाळेत मिळुन अभ्यास करत.मुख्याध्यापक सर रात्र अभ्यासिका चालवत असत.काही शिक्षकांची दररोजची ड्युटी त्यांनी या कामी लावली होती.मुले कधी वेळेवर कधी उशीरा पोहचत.जेवण अधिक झाल्यामुळे काही मुले अभ्यास करताना डुलकी काढत व पेंगत असत.
एकदा एक तानु नावाचा मुलगा रात्री शाळेत अभ्यासाला उशीरा गेला.त्याला काही अडचणीमुळे उशीर झाला होता.अभ्यासीकेत खुप उशीरा येणा-या मुलाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले जात असे.त्याचे मित्र स्वागताच्या तयारीत होते.एकाच्या हातात रया गेलेला फडा होता ,एकाच्या हातात उशी व एकजण हातात खपट घेऊन उभा होता.एक जण लाईटच्या बटणा जवळ थांबला होता.काही मुलांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती.सर्वजण काहीतरी मोहीम फत्ते होईल का? याचा अंदाज करत होते.मध्येचं सर आले तर सर्वांनाचं सरांकडुन चांगला मार पडणार होता.मी खिडकीजवळ उभा राहुन अभ्यास कसा करतात हे पहात होतो.तो मुलगा आला.काही कळण्याच्या आत एकाने लाईट बंद केली.सर्वजण त्या मुलावर मारण्यासाठी तुटून पडले.सापडल त्या वस्तुने त्याचा समाचार घेऊ लागले.परंतु आरडा ओरडा अजिबात नव्हता.एका मिनिटाने परत लाईट सुरु झाली.सर्वजण आपापल्या जागेवर चिडीचुप बसले.थोड्या वेळाने सर्वजण खो- खो हसु लागले.हा नवीन अभ्यास पाहुन मी अचंबित झालो.अभ्यासिकेला उशीरा येणा-यांचा मुले वेगवेगळ्या पद्धतीने समाचार घेत असत.हे प्रकार वारंवार घडत.गंमत करुन हसणे मुलांना आवडायचे.टिंगल टवाळी बरोबरचं ही मुले अभ्यासातही हुशार होती.भल्या पहाटे उठुन व्यायाम करत असत.हिंदी व मराठी विषयातील 100 निबंध या मुलांनी लिहुन काढले होते.ब-याचं मुलांचे अक्षरही अप्रतिम,वळणदार होते.शाळेतील विविध स्पर्धात ही मुले भाग घेत असत.भाषणही अप्रतिम करत असत.त्यांचे अनुकरण करुन मी भाषण करायला शिकलो.
रात्री बारा एक पर्यंत ही मुले अभ्यास करीत असत. शाळेतील दोन लाकडी बाकं एकत्र करुन मुले त्यावर झोपत असत.एके दिवशी त्याचं मुलाला बाकड्यावर झोपी गेल्याचे काही मुलांनी पाहिले. त्याचे हातपाय टारगट मुलांनी बाकड्याला सुतळीने बांधले व भूत आलय-या बाबो.असा त्यांनी गोंधळ केला.तो मुलगा खुपचं घाबरला होता.परंतु आपले मित्रांनीचं असं केलय हे लक्षात आल्यावर हसु लागला.तिघांच्या असभ्य वर्तनाबद्दल मुख्याध्यापक सरांनी त्यांच्या पेट्या, सतरंज्या डोक्यावर देऊन मैदानाला एक फेरी मारुन घरी हाकलुन देण्याची कारवाई केली होती.बाकीच्या मुलांचे धाबे दणाणुन गेले.
मगर सर गावात आले आणि सर्वजण व्यायामाला लागलो.मी पहाटे लवकर उठुन शाळेत व्यायाम करायला जात असे. ब-याच मुलांना हे जमेनासे झाले.कारण व्यायाम ही संकल्पना आमच्या दृष्टीने नवीन होती.कोणीतरी शाळेत भूत असल्याचे सांगितले.मोठ्या चिंचेजवळ भूत रात्री फिरते असे कानावर आले.कोणीतरी लांडगे मामाचे भूत असल्याचे सांगितले.मग माझ्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.मी पहाटे चार वाजता निघालो.पहातो तर भल्या पहाटे अंधारात पांढरे कपडे घातलेली व्यक्ती फिरत होती.ती बरोबर चिंचेच्या झाडाजवळ होती.माझी घाबरगुंडी उडाली.तरी सुद्धा मी जवळ गेलो.मी म्हटलो कोण आहे? ती व्यक्ती काहीच बोलली नाही.मी आणखी जवळ गेलो.मी म्हणालो,"कोण लांडगे मामा का?" ती व्यक्ती म्हणाली ,"हो मीच!"मी म्हणालो ,"इथं लांडगे मामाचं भूत फिरतय मला बघायचं आहे." त्यावर लांडगे मामा म्हणाले," बघा हो ते दहावीचे पोरं मला भूत म्हणलाल्यात ,गावात काय बी सांगत फिरत्यात."मला मात्र हसु आवरलं नाही.
रात्र अभ्यासिकेला जाणारी मुले पहाटे उठुन निलगिरीच्या 150 ते 200 झाडांना पाणी घालत.मैदानाची साफसफाई करत.ही मुले पुढे खुप मोठी झाली.मला अजुनही त्यांचे निर्मळ,निरागस,हसरे,खेळकर, विनोदी चेहरे आठवतात.
*बालपणाच्या आठवणी*
गुरुवार, ८ एप्रिल, २०२१
बालपणीच्या आठवणी
*नागनाथ मास्तर*
*शब्दांकन*
*श्यामसुरेश गुमानगिर गिरी मु.पो.लामजना ता.औसा*
"ओ मास्तर सूर नीट लावा की पेटीचा?"
विडी फुंकणा-या मास्तरकडे गंप्या वैतागुन म्हणाला. गावात सार्वजनिक ठिकाणी नाटक दाखवण्याची प्रथा होती.नाटक म्हटलं की गावक-यांचा उत्साह भरभरुन वाहे. नाटकाची तालीम ऐन रंगात आली होती. खांद्यावरील लाल गमचा सावरत मास्तर धुराचे गोल काढु लागले.आभाळातील पांढ-या ढगांचे या धुराशी काहीतरी कनेक्शन असावे असा विचार मी करु लागलो.एका गावात निदान शंभर तरी माणसं विड्या ओढतात. मग जगात किती? पांढरे ढग यामुळे विडीच्या धुरामुळे बनले असावेत असा मी अंदाज काढला.खिडकीतुन काही हौशी मंडळी नाटकाची तालीम डोळे भरुन पाहु लागली .काही मंडळी हातात स्क्रीप्ट घेऊन डायलॉग पाठ करु लागली.त्यांची ती पोपटपंची पाहून मला डॉ.वाघ यांचा पाळलेला पोपट आठवु लागला.
" आरं गंप्या,जरा बुद्धिला टॉनिक, म्या काही सराईत बिड्या फुंकु नाही हो ,गेली तीस वर्षं मी पेटी वाजवतोय. माझ्या विडीबद्दल कोणी ब्र काढलं नाही."
नाकातुन धूर काढत नागनाथ मास्तर म्हणाले.गावातील धार्मिक ग्रंथाचे पोथी वाचक नागनाथ मास्तर पंचक्रोशीत रामायण वाचक म्हणुन प्रसिद्ध होते. भजनातील गायक म्हणुन लोकप्रिय होते.
कठीण कठीण कठीण किती??? पुरुष ह्दय बाई...
हे तालमीत नवीनचं पद गाऊन त्यांनी पेटी चेक केली.सुरांची जुळवाजुळव केली. मास्तरांची बोटे पेटीवर सहज खेळु लागली, नाचू लागली .बोटांचा पदविन्यास पाहुन मी आश्चर्यचकित होऊन पाहु लागलो. मास्तरांनी डोळे मिटुन सुरेल स्वरांची लकेर घेत गंप्याकडे पाहिले मग म्हणाले ,
" गंप्या ,कालचं गाणं सुरु कर." तो नाटकातील गाणे मोठमोठ्याने आळवु लागला.मास्तरांनी सूर जुळवले.सिरसले गुरुजी तबल्याची साथ करत.तबलजींनी मान डोलावुन धान तिरकीट तान तिरकीट करत ताल धरला.तबल्याच्या साथीने सर्व कलाकारात उत्साहाचे भरते आले.मी सर्वांच्या चेह-यावरचे क्षणाक्षणाला बदलणारे भाव वाचु लागलो.
संगीताची प्रचंड आवड असलेले नागनाथ मास्तर म्हणजे एक अवलिया सुरांचे जादूगारचं होते. ते पेटी वाजवत.पेटी वाजवणारा पेटी मास्तर.म्हणुन गावातील बरेचं लोक त्यांना मास्तर म्हणत.डोक्यावर पांढरी टोपी,अंगात पांढरा सदरा वजा गुडघ्यापर्यंत लांब गुरु शर्ट,निळ घातलेले स्वच्छ धोतर, उजव्या खांद्यावर लोंबणारा गमजा असे .नागनाथ मास्तर पितळेच्या तांब्यात पेटलेला कोळसा टाकुन कपड्यांना प्रेस करत. त्यांच्या पेटीला तालाची साथ करणारे सिरसले गुरुजी बोडकं दिसत.धोतराच्या ऐवजी पांढरी पॅंट घालत.मला त्यांची हेअर स्टाईल हिंदी सिनेमातील नट व गायक किशोर कुमार,अशोक कुमार यांच्यासारखी वाटे.चेहराही तसा गोलकार दिसे.सिरसले गुरुजी आले की मला साक्षात बालगंधर्व आल्याचा भास होई.नागनाथ मास्तर पायात जुन्या वळणाच्या बांधीव वहाणा घालत.सिरसले गुरुजींना मात्र बुट आवडे.
नागनाथ मास्तरांच्या वहाणा कधीचं चोरीला जात नसत कारण त्यांच्या जुन्या वळणाच्या बांधीव वहाणा कोणाच्याही पायात येत नसत.खास ऑर्डर देऊन ते बनवुन घेत.त्या टिकाव्यात म्हणुन घाण्याचे तेल लावत.आपल्या पायातील वहाणा बाबत नागनाथ मास्तर बिनघोरी असत.त्या चोरीला जातील याची त्यांना कधीही थोडी सुद्धा चिंता वा फिकीर नसे.इतरांना पण चांगल्या नवीन वहाणा घालुन लग्न समारंभास न जाण्याचा सल्ला नागनाथ मास्तर आवर्जुन देत.नागनाथ मास्तरांना गावोगावी लोक पोथी वाचण्यासाठी बोलावत.त्यांचा सत्कार करत.मिळालेला सत्कार गमच्छ्यात बांधुन पाठीवर टाकुन मोहिम फत्ते केल्याच्या अविर्भावात नागनाथ मास्तर गावात अवतरीत होत.
एका गावात नागनाथ मास्तर साधु महाराजांचा वेष घेऊन गेले.गळ्यात माळा,हातात कमंडलु घेतले.सायकल गावाबाहेर एका झाडाखाली सोडली.नागनाथ मास्तरांनी त्या गावातील एका मंदिरात डोळे मिटुन समाधी लावली. गावात एक थोर संन्यासी महाराज आले आहेत ही बातमी वा-यासारखी पसरली.पंचारती घेऊन लोक येऊ लागले.सर्व लोक साधु महाराजांची स्तुती करु लागले.ते खुप ज्ञानी आहेत; आशीर्वाद देतात आपलं चांगलं होईल म्हणुन पाया पडु लागले. चरणावर लोटांगण घालू लागले. बघता - बघता लोकांची तोबा गर्दी जमु लागली.लोक चरणावर दक्षिणा ठेवु लागले. नागनाथ मास्तर डोळे मिटुन बसलेले पाहुन त्यांच्या चेह-याकडे गर्दीतील एक माणुस न्याहाळू लागला.त्या माणसाने हे तर नागनाथ मास्तर म्हणुन अचूक ओळखले.तो गर्दीतुन वाट काढत लगबगीने पुढं आला.
"काय हो मास्तर कसं काय दौरा? कवा आलात? म्हणुन त्याने मास्तरांना हटकले.
आपले डोळे किलकिले करुन मास्तरांनी त्याच्याकडे तिरछ्या नजरेने पाहिले. त्यांच्या पोटात कालवाकालव झाली.आपलं आता काही खरं नाही.आता आपले बिंग फुटणार हे समजताचं.मास्तर गडबडले.त्यांची बोलती बंद झाली.तत पप होऊ लागलं.
"शिव.शिव.शिव.देवाचे बोलावणे आले.मला आता या क्षणी जावेचं लागणार ",असं म्हणुन नागनाथ मास्तरांनी तिथुन धूम ठोकली.आमचं काय चुकलं हो? असं म्हणुन लोकं गयावया करु लागली.त्या माणसाला काहीबाही म्हणू लागली.काही गावकरी त्यांच्या मागं धावू लागले .गावकूसाबाहेर लावलेली सायकल घेऊन नागनाथ मास्तरांनी कसे- बसे आपलं गाव गाठले.
गावातील लग्नसमारंभात मास्तर आवर्जुन हजेरी लावत. तबकातील बिड्याचा गठ्ठा, पानसुपारी,सिगारेटची पाकीटं, चुन्याची डब्बी,पानं यावर यथेच्छ ताव मारीत. आठ दिवसांची सोय केलो असं ते आपल्या जीवलग मित्राला हसत- हसत सांगत.त्यांच्या हातात सदैव एक पेपर दिसे. मास्तरांनी आपल्या उभ्या आयुष्यात पेपर कधीही विकत घेतला नाही.आजचा पेपर उद्या शिळा होतो.लोक रद्दी समजुन टाकुन देतात.पेपर टाकुन देण्यापेक्षा पुन्हा वाचलेला कवाबी चांगलाचं असा त्यांचा वृत्तपत्रविषयक दैनिक सिद्धांत होता.पेपर विकत घेऊन वाचण्यात काही मजा नाही असा त्यांचा पक्का निर्धार होता. ज्यांच्या घरी पेपर नित्यनियमाने येई त्यांचे घर मास्तर सकाळी लवकर गाठत.जुने पेपर हक्काने मागुन घेत.कोणी त्यांना नाही म्हणत .मिळवलेला पेपर ते बगलत मारत.हवालदार जसा बगलत हंटर ठेवतो या रुबाबात पेपर घेऊन गावभर मिरवत.दूपार झाली की मास्तर म्हैस घेऊन रानात जात.सोबत पेपर हमखास असे.जगात काय घडून गेले? या शिळ्या बातम्या नागनाथ मास्तर वाचत व रात्री गावभर सांगत.पेपरमधील ओळ न ओळ, शब्द न शब्द वाचुन काढत.गोठ्यात पेपर कोंबुन ठेवत.सा-या गोठ्यात जिकडे पहावे तिकडे त्यांनी पेपर कोंबुन ठेवलेले असत. त्यांची जेवण करण्याची पारंपारिक पद्धत होती.नागनाथ मास्तर ताट जमीनीवर ठेऊन जेवण करत नसत.पाट टाकुन पाटावर बसत.समोर अडंगी ठेवत अडंगीवर मोठे ताट ठेवुन जेवण करत. ताक,कढी, वरण,भात, भाकरी ,खीर,लोणचे हे नागनाथ मास्तरांचे आवडते जेवण.कढीवर जोरदार फुरका मारत.जमीनीवर ताट ठेवुन जेवणे हलकं आहे असं सांगत.पुर्वजांचा दाखला देत.
नागनाथ मास्तरांचा एक जिगरी दोस्त म्हणजे जवळपास त्यांच्याच वयाचा गावातील शिवा दाजी.गावात सर्वजण त्यांना दाजी म्हणत.लक्ष्मण शक्तीची पोथी वाचावी तर नागनाथ मास्तरांनी व अर्थ सांगावा तर शिवा दाजी यांनी.शाळेत मी कधीही गेलो नाही तरीही वाचन करु शकतो हे शिवा दाजी गर्वाने सांगत.रामायण - महाभारत- शिवलिलामृत, भागवत हे ग्रंथ शिवा- दाजींना तोंडपाठ होते.नागनाथ मास्तर भजनातही हजेरी लावत.गावातील मोठ्या घरी शिवा दाजी पोथीचा अर्थ सांगत. अखंड हरिनाम सप्त्यात नागनाथ मास्तर पेटी वाजवण्याची सेवा देत. हरिपाठालाही हजर रहात.तर शिवा दाजी विणा वाजवत किंवा टाळकरी होत.
नागनाथ मास्तर कोणाला फोन लावायचा असेल तर स्वच्छ अंघोळ करुन टेलीफोन असणा-या सुशिक्षीत माणसांच्या घरी सकाळी- सकाळी हजेरी लावत .अहो माझा एवढा एक फोन लावा हक्काने म्हणत.टेलिफोनमधले फ्री कॉल सरकारने माझ्यासाठीचं ठेवलेत असं सांगत. खिशातुन डायरी काढुन फोन नंबर सांगत.मी कधीही पेन विकत घेतलेला नाही हे ही मोठ्या अभिमानाने सांगत व हळुचं जरा पेन बघु अस म्हणत.
एके दिवशी मी स्टेशनरी दूकानात गेलो होतो.तेथे नागनाथ मास्तर दिसले.त्यांनी दूकानदाराला प्रश्न केला, "ओ दुकानदार झंडु बाम आहे का? आज डोकं दुखत आहे " दूकानदार म्हणाला," नाही.माल संपलाय."
"दुसरं काही आहे का? " नागनाथ मास्तरांनी प्रश्न केला.
"व्हिक्स" चालतयं का? दुकानदार बोलला." " बघु कसलाय? असा प्रश्न मास्तरांनी केला.दूकानदाराने व्हिक्सची डबी मास्तरांच्या हातात दिली .तीचे टोपण उघडुन मास्तराने वास घेतला.डाव्या हातात डबी धरली.उजव्या हाताच्या पहिल्या बोटाने व्हिक्सच्या डबीचा मास्तरांनी तळ गाठला व व्हिक्स डोक्यावर चोळु लागले.
"यात काही दम नाही व वास तर जरा सुद्धा नाही " मास्तर म्हणाले.दुकानदाराला भलताचं राग आला.मास्तरांनी व्हिक्सचे सील तोडलेले पाहुन त्याच्या तळपायाची आग मस्तकाला पोहंचली. तो तावातावाने म्हणाला, " बघु ती डबी,उतरा खाली".नागनाथ मास्तर गडबडीने उतरले व डोकं चोळीत तिथून ते निघून गेले.
"घेणं ना देणं, वाजवा रे, वाजवा" असं तो दुकानदार म्हणु लागला."सकाळी - सकाळी भारी गि-हाईक भेटलं.आताचं उदबत्ती लावलाव तर..." मला हसू फुटलं.मी म्हणालो, " असा कसा माल संपला?" तो म्हणाला," माल आहे पण? जाऊ द्या तुम्हाला समजायचं नाही मास्तर. "
मला मास्तर म्हणताचं मी दूकानदाराकडे तोंड आ वासुन पाहु लागलो.नागनाथ मास्तरांच्या धुरातील स्वर मला दिसू लागले.
*बालपणीच्या आठवणी*
®©
बुधवार, ७ एप्रिल, २०२१
शाळेच्या आठवणी
[06/08, 4:21 PM] 👏🏻: इतिहासाचा मागोवा
लामजना जि.प.प्रशालेची स्थापना स्वातंत्र्यापुर्वी झाली.या शाळेचा इतिहास पाहता मनात खुप आठवणी दाटुन येतात.आम्ही कालपरवाचे परंतु या शाळेबद्दल पंचक्रोशीत आदराने नाव घेतले जात असे व आताही घेतले जाते.शाळेचा नावलौकीक त्या शाळेतील शिक्षक,अभ्यासु विद्यार्थी ,व जागरुक ग्रामस्थामुळे होतो हे काही वेगळे सांगायला नको.शाळेला चांगले गुरुजन लाभले त्यामुळे संस्था येथे येऊ शकली नाही.काही प्रयत्न वावटळी सारखे झाले असतील.कै.साखरे गुरुजींचे कार्य,गांधीजींचा पुर्णाकृती पुतळा,हनुमान मंदिर,लक्ष्मी व खंडोबाचे मंदिर,बालाजी मंदिर,सरकारी दवाखाना,जुनी मशीद,शेख सुल्तान साहेबांची दर्गा,मारुतीवाडी,भव्य वाडे,गढ्या,जुनी आडं या सारख्या कित्येक भौतिक सांस्कृतिक खुणांनी गावपण भरुन गेलेलं.लोकमान्य क्रीडा मंडळ,माऊली गणेश मंडळ,नवरात्रमहोत्सव,गांधी क्रिकेट क्लब,ग्रामविकास वाचनालय यासारख्या कित्येक मंडळांच्या कार्याची आठवण येते.गावाची समृद्ध बाजारपेठ,गावात वेळेवर येणा-या बसेस,बँका,टेलीफोन ऑफीस,तलाठी सज्जा,ग्रामपंचायत कार्यालय व तेथे मँच पाहण्यासाठी होणारी गर्दी,गावातील अखंड हरिनाम सप्ताह यासारख्या कित्येक गोष्टींनी गावपण कसं भरलेलं असे.सर्वात महत्वाची गोष्ट सर्वांचा एकोपा नजरेत भरण्यासारखा होता.मतभेद,धर्मभेद,जातीभेद याला काही मुळी थारा नव्हता.
दसरा ,रंगपंचमी व पोळा हे सण कायम लक्षात राहिले.गावातील राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते पुन्हा सर्वजण एकोप्याने रहात असत.गावातील प्रत्येकाची सर्व नागरिकांना ओळख असायची.गावात येणा-या व कायम रहाणा-याला काही जण पाणी लागलं वाटतं इथलं असं विनोदानं म्हणत असत.
३० सप्टेंबर १९९३ ची भीषण पहाट मला आठवते.मी जागा होतो.पृथ्वीचे ते भीषण रुप पाहुन बोबडीचं वळाली.एका दणक्यात या सा-या ऐतिहासिक खुणांना तडे गेले.गाव मेन रोडवर आले.मग नवीन संस्कृती.नवीन घरे.शेजारी बदलले.गावात कोण नवीन आले कोण गेले फक्त कांहीजणांना समजते.एकमेकांना भेटायचे म्हंटले तर दोन घरात बरेचसे अंतर.जुन्या गावात वर्षभर पाणी भरपूर मिळायचे.आता ही मिळते परंतु नियमित मिळेल का? याची काही गँरंटी नाही.कारण पाऊस नाही तर नळाला तरी पाणी कोठुन येणार?जुन्या गावात गरजा कमी व प्रश्नही कमी होते.कष्ट करणारे शेतकरी व शेतमजुर यांनी गावाला गावपण आणलं होतं.येथे येणा-या कित्येक राजकारणी ,समाजसुधारक,
शिक्षकांनी वैचारिक बैठक पक्की केली होती.सावळकर साहेबांपासुन ,प्रशासन व इतर अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक,वकील,इंजिनिअर,पोलीस,वायरमन या पदावर जाण्याची अनेकांना संधी मिळाली.
इतिहासाच्या पाऊलखुणा पाहने महत्वाचे आहे.कारण नव्या पिढीला काहीतरी शिकायला मिळते.आपण ही जुन्या पाऊलखुणा मांडा!
संकलन श्याम गिरी
[06/08, 4:42 PM] 👏🏻: लक्षात राहिलेले शिक्षक
किल्लारीचे जिडगे सर
लामजना प्रशालेत लक्षात राहिलेले शिक्षक म्हणजे किल्लारीचे जिडगे सर.ते नियमित शाळेत येत असत.स्वच्छ पांढरे धोतर,डोक्यावर गांधी टोपी तसाच सदरा.सर खुप कडक पण तितकेच मायाळु होते.मी पाचवीला होतो सर आम्हाला विज्ञानाचे प्रयोग करुन दाखवत असत.सर पान खात असत पण त्यांना इतरत्र थुंकताना कधी पाहिलेलं नव्हतं.सर कधी आजारी पडत नसत.त्यांची शिकवण्याची पद्धत चांगली होती. सर विज्ञानाचा पाठ शिकवताना चार्टचा वापर करीत असत.सरांना मी तासावर कधीचं लेट आल्याचे पाहिले नव्हते.शाळेतील त्यांचे वर्तन आदर्श होते.त्यांनी पुरस्कारासाठी कधीही फाईल केली नाही.
[06/08, 7:25 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक
श्री वसंत सिताराम टेंकाळे
नाव काढताचं हात आपोआप जोडले जातात असे विज्ञान विषय शिकवणारे कडक शिस्तप्रिय,शांत स्वभाव,प्रचंड अभ्यास ,शांत व संयमी मुर्ती,मनाने तितकेच चांगले व प्रेमळ मुर्ती डोळ्यासमोर उभी रहाते.तास पडला की पटकन वर्गात पाऊल टाकुन कामाला लागणारे.हातात प्रयोगाचे साहित्य
घेऊन शिस्तबद्धपणे उभे रहात किंवा हातात भौतिकशास्र,जीवशास्त्र,रसायनशास्र यापैकी एखादे पुस्तक असे.
विषयावर प्रचंड प्रभुत्व असणारे टेकांळे सर दिसले की प्रचंड आदर वाटत असे.सरांना पुस्तक पाठ होते.त्यांच्या अध्यापनामुळे विज्ञाननिष्ठा निर्माण होऊन विद्यार्थी डोळस बनले.पाठ्यपुस्तकातले ज्ञान ते सहजपणे जीवनाशी जोडत असत.मायक्रोस्कोपचा वापर करुन स्पायरोगायरा ही वनस्पती आम्ही पाहिल्याचे आठवते.टेंकाळे सर वैज्ञानिक जाणिवा रुजवण्यासाठी विविध परीक्षा घेत असत.वाचनाची प्रचंड आवड असणारे टेंकाळे सरांची प्रयोगशाळा सदैव सज्ज असे.विविध भारतीय सणांमागील वैज्ञानिक पार्श्वभूमी सर सांगत असत.सर जानेवारी २०१७ महिन्यात भेटले .प्रकृती अतिशय चांगली दिसली.चेहरा प्रसन्न वाटला.सरांचे जीवन सुखाचे जावो ही ईश चरणी प्रार्थना.
संकलन. श्याम गिरी
[06/08, 10:25 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक
वाघोलीकर सर
विनोदाचा बादशहा ,इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व असणारे सर म्हणजे वाघोलीकर सर.संपुर्ण बालपण व दहावीचे शिक्षण लामजना गावात पुर्ण झाल्यावर सरांनी बी.एड केलं व त्यानंतर इंग्रजी विषयाचे माध्यमिक शिक्षक म्हणुन त्यांनी पदभार स्विकारला.त्यांचे वडील गावातचं शिक्षक होते.वाघोलीकर सर खुप वेळा प्रभारी मु.अ.म्हणुन राहिले.प्रशासनाचा सरांना प्रदीर्घ अनुभव होता.सरांचे गावावर निस्सिम प्रेम होते.सरांबरोबर त्यांच्या मँडमही प्रशालेत शिक्षिका होत्या.
सरांचे अध्यापन उत्कृष्ट होते.इंग्रजी भाषेतल्या कथेचा प्रसंग ते वर्गात उभा करीत असत. त्यांनी शिकवलेली kidnapped कथा अजुनही आठवते.सर मुलांना खुप हसवत असत.पुर्वी शाळेतल्या अध्यापनाची गावात खुप चर्चा केली जात असे.वाघोलीकर सरांचा स्वभाव प्रचंड विनोदी व ते अभिनय उत्तम करायचे.मुले माराच्या भीतीने खुप अभ्यास करत असत.बेस कच्चा असणा-या मुलांना सरांचे इंग्रजी कळत नसे.सरांचे ग्रामरवर प्रभुत्व होते.त्यांना गावात खुप मान होता.
ते शाळेत रात्रअभ्यासिका चालवत असत.गडबड करणा-या ब-याच मुलांना डोक्यावर पेटी देऊन घरी हाकलुन लावत असत.
सर योग करत असत.अजुनही प्रकृती उत्तम आहे.त्यांच्या कार्याला नमन.
[07/08, 3:40 AM] 👏🏻: आठवणीतले शिपाई लांडगे मामा
मोगरगा गावचे लांडगे मामा एक दीर्घ कर्मयोगी माणुस.सतत शाळेत दिसायचे.ब-याच वेळेस शाळेत मुक्कामाला असायचे.लांडगे मामा म्हटलं की डोक्यावर पांढरी टोपी,पांढरा शर्ट,पांढरी पँट असणारा सावळ्या रंगाचा कष्टकरी मुर्ती डोळ्यासमोर
उभी रहाते.वर्गाची स्वच्छता असो की ऑफीसमधले काम असो लांडगे मामा आळस कधी करत नसत.पंधरा ऑगस्टला चुरमुरे देताना त्यांच्या चेहरा खुप मोठा कृतार्थ भाव रहात असे.वाघोलीकर सर त्यांना "लक्ष्मण" नावाने हाक मारत असत.लांडगे मामांना कधी गणवेशात नसताना कधीच पाहु शकलो नाही.त्यांचा तो नियमितपणा मला खुप आवडायचा.लांडगे मामा मुलांचे, शिक्षकांचे मित्र होते.येणा-या पाहुण्यांचे ते हसत मुखाने स्वागत करत असत.त्यांच्या सेवानिवृतीच्या कार्यक्रमास मी हजर होतो.लांडगे मामा या दोन चार वर्षात भेटले नाहीत.मोगरगा गावात रहाणारे लांडगे मामा सदैव स्मरणात राहतील.ईश्वर त्यांना दीर्घ आयुष्य प्रदान करो.
[07/08, 3:53 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक
मोगरग्याचे निकम सर
दीर्घआयुष्य लाभलेले निकम सरांचे वय ८० च्या पुढे आहे.ते लामजना गावात सतत येतात.शरीर पोलादी .मला ते नेहमी सरदार वल्लभभाई पटेलांसारखे पोलादी पुरुष वाटत.शाळेला उशीरा येणा-या मुलांच्या मनात निकम सरांची भीती होती.कांही जणांनी त्यांचा चांगलाच मार खालेल्ला असेल.निकम सर सरळ स्वभावी.अनलंकृत भाषा (अलंकार नसणारी भाषा ) वापरणारे नेहरु शर्ट ,धोतर पायात करकर करकर वाजणारा जोडा घालणारे सर अजुनही स्मरणात आहेत.कै.जगताप सर,कै.वडवळे सर यांना निकम सरांबाबत खुप आदर वाटते.विद्यार्थाच्या ढोंगी पणावर सर सतत लक्ष ठेवत असत.सर गावात येतात.बँकेत येतात.खुप छान वाटते.त्यांची साधी रहाणी व उच्च विचार सरणी कायम स्मरणात राहिल.सरांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
[07/08, 4:08 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक नंदर्गे सर
कसगी कर्नाटक गावचे रहिवासी नंदर्गे सर जॉईन झाले भूंकपापुर्वी दोन वर्ष अगोदर.मी सातवी वर्गात शिकत होतो सर आम्हाला इ.भू.ना विषय शिकवत असत.सर कार्यानुभव विषयाचे शिक्षक होते.परंतु वाघोलीकर सरांनी त्यांना इ.भू.ना विषय शिकवण्यास सांगितले होते.सरांचे इ.भू.ना विषयावर प्रचंड प्रभुत्व होते.खेळ व कवायत हे सरांचे आवडते विषय असत.त्यांचा तो पहाडी आवाज आजही लक्षात आहे.राष्ट्रीय सण व नंदर्गे सरांचा उत्साह प्रचंड असायचा.शाळेतील लाऊडस्पीकर व लाईटींगचे काम सर सहज करत असत.अनेक तांत्रिक विषय त्यांना येत असत.टारगट पोरांना नंदर्गे सरांनी वळण लावले.ध्वज के लिए सलामी दो! हे सरांचे बोल कानात घुमतात.नंदर्गे सर अजुनही सेवेत आहेत.त्यांचा तो उत्साही स्वभाव तिळमात्रही कमी झालेला नाही.सरांच्या कार्याला प्रणाम.
[07/08, 4:14 PM] 👏🏻: लक्षात राहिलेले शिक्षक
कै.मधुकर दत्तात्रय जोशी
गाव गुडसूर ता .उदगीर
असावे घरटे आपुले छान...
या लाडक्या मुलांनो..
यासारख्या कित्येक गाण्यातुन जोशी सरांनी मुलांवर संस्कार केले.जोशी सरांचा आवाज खुप चांगला होता.सर कै.दिगंबर पाटील यांच्या नवीन वाड्यात रहात असत.शेजारी श्री अरविंद शिंदे मामा यांचे दुकान होते.सर कुटुंबापासुन खुप दूर होते.स्वत: हाताने स्वयंपाक करत असत.सरांना सांस्कृतिक कार्यक्रमाची खुप आवड होती.धोतर व सदरा हा त्यांचा साधा वेष.त्यांच्या डोक्यावर मी कधी टोपी पाहिली नाही.जोशी सर खुप प्रेमळ होते.उशीरा येणा-या मुलांच्या तळपायावर छडी मारत.सर संयमी,शांत,वृत्तीचे होते.प्राथमिक वर्गाला शिकवताना ते तन्मय होऊन जात.जोशी सर दोन ते तीन महिन्यानंतर गावाकडे जात असत.त्यांनी मी कधीच आजारी पडल्याचं पाहिलो नाही.सरांच्या खोलीवर मी कधीतरी जात असे.सर या जगात नाहीत असं ऐकलो.स्वातंत्र्य दिना दिवशी त्यांच्या चेह-यावर आनंद ओसांडुन वाहत असे.सर विद्यार्थी प्रिय शिक्षक प्रिय होते.त्यांनी पुरस्कारासाठी कधी फाईल केल्याचे आठवत नाही.सर निर्व्यसनी होते,त्यांच्यासम आम्ही निर्व्यसनी राहिलो.
सरांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.
[07/08, 4:15 PM] 👏🏻: त्यांना मी कधी आजारी पडल्याचं पाहिलो नाही.
असं वाचा.
[07/08, 4:38 PM] 👏🏻: सुतार सर
आठवणीतले गुरुजी.
मी चौथी वर्गात होतो.वर्गशिक्षक म्हणुन सुतार सरांचे आगमन झाले.सरांमुळे मला पहिल्या बाकड्यावर बसायला मिळे.सुतार सर पाढंरे धोतर,डोक्यावर टोपी,पांढरी टोपी घालत.त्यांच्या रंगाकडे पाहिल्यानंतर पंढरीच्या सावळ्या विठोबाची आठवण येत असे .सर शेडोळ गावचे रहिवासी.लामजना गावात बहुतेक ८०% शिक्षक रहात असत.सुतार सरांच्या कडक शिस्तीमुळे अभ्यासाकडे वळलो.सुतार सर विषय समजुन देत व त्याचबरोबर फलकावरील मजकुर वाचायला लावत असत.मी सुतार सरांमुळे चांगल्या प्रकारे वाचायला शिकलो.माझे हस्ताक्षरही हळूहळू सुधारले.सुतार सर आले नसते तर चौथीच्या वर्गात प्रथम येऊ शकलो नसतो.सरांजवळ फक्त गुणवत्तेला किंमत होती.कधीच अभ्यास न करणारी मुले त्यांच्या मुळेच तर अभ्यासाला लागली.सरांना सेवानिवृत्ती पुर्वी डायबिटीझचा त्रास जाणवु लागला होता.सर कर्मयोगी होते.मेहनतीनेच सर्व कांही मिळते.जगताप सरांना प्रेमाने सावकार म्हणत असत.
[07/08, 4:57 PM] 👏🏻: लांडगे मामाचे भूत
मगर सर गावात आले आणि सर्वजण व्यायामाला लागलो.मी पहाटे लवकर उठुन शाळेत व्यायाम करायला जात असे. ब-याच मुलांना हे जमेनासे झाले.कारण व्यायाम ही संकल्पना आमच्या दृष्टीने नवीन होती.कोणीतरी शाळेत भूत असल्याचे सांगितले.मोठ्या चिंचेजवळ भूत रात्री फिरते असे कानावर आले.कोणीतरी लांडगे मामाचे भूत असल्याचे सांगितले.मग माझ्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.मी पहाटे चार वाजता निघालो.पहातो तर भल्या पहाटे अंधारात पांढरे कपडे घातलेली व्यक्ती फिरत होती.ती बरोबर चिंचेच्या झाडाजवळ होती.माझी घाबरगुंडी उडाली.तरी सुद्धा मी जवळ गेलो.मी म्हटलो कोण आहे? ती व्यक्ती काहीच बोलली नाही.मी आणखी जवळ गेलो.मी म्हणालो,"कोण लांडगे मामा का?" ती व्यक्ती म्हणाली ,"हो मीच!"मी म्हणालो ,"इथं लांडगे मामाचं भूत फिरतय मला बघायचं आहे." त्यावर लांडगे मामा म्हणाले," बघा हो ते दहावीचे पोरं मला भूत म्हणलाल्यात ,गावात काय बी सांगत फिरत्यात."मला मात्र हसु आवरलं नाही.
[07/08, 9:33 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक
कै.विठ्ठल काशिनाथ जगताप
मी एकदा वाचनालयात गेलो पेपर वाचल्यानंतर रजीस्टर मध्ये स्वाक्षरी केली.रजीस्टर मधील पाने चाळताना मला जगताप सरांची स्वाक्षरी दिसली .मी चौकशी केली तेंव्हा सर येथे येत नसतात कोणीतरी दुस-याच व्यक्तीने त्यांची हुबेहुब सही केली होती मी ही अचंबित झालो.√''''''''''' त्यांच्या आडनावाची सुरुवात J ह्या इंग्रजी अक्षराने होते .जगताप सरांनी गणितातील वर्गमुळच्या चिन्हाचा व कँपिटल J अक्षराचा स्वाक्षरीमध्ये सुंदर मिलाफ घातला होता.
जगताप सर गणित व भूमिती विषय शिकवत असत.आज ही त्यांनी शिकवलेले प्रमेय लक्षात आहेत. त्यांचे विषयावरील प्रभुत्व अचाट होते.अतिशय शिस्तीत फलकावर भौमितीक आकृत्या कंपास पेटीच्या सहाय्याने काढत असत.जगताप सरांचे संकल्पना ज्ञान पक्के होते.बीजगणितातील उदाहरणे फलकावर समजावुन देऊन मुलांचा सराव सर घ्यायचे.सर मितभाषी,स्पष्ट वक्ते होते.कमी बोला व अधिक वाचा.हे सुत्र सर मुलांना वहीत लिहायला सांगत असत.गृहपाठावर Good मिळवण्यासाठी मुले स्पर्धा करत.एखाद्याचा सदगुण व दुर्गूण सर समोर सांगत.हाफ शर्ट व पँट हा त्यांचा आवडता पोशाख .सर नियमितपणे तासावर जात असत.कुणाची निंदा व टवाळी यापासुन सर दूर रहात.सरांनी पहिले वाहन M 80 घेतली होती.सेवानिवृत्ती पुर्वी एक वर्ष अगोदर सरांनी पांढरी टाटा कार घेतली होती.त्यांचे गाव उत्का होते.परंतु सर लामजन्यात रहात असत.सर म्हणत मी केलेल्या कष्टाचं चीज झालं म्हणुन लामजनापाटी येथे असलेल्या कापड दुकानाचे नाव मी 'श्रमसाफल्य' ठेवलं आहे.तुम्ही सुद्धा कष्ट करा.असा त्यांचा कानमंत्र होता.सर सेवानिवृत्त झाले कांही महिन्यातचं त्यांचं अकाली निधन झालं.
मी एकदा दीपावलीचा पगारीचा चेक घेऊन कारकुन पठाण सोबत सरांच्या घरी गेलो होतो.सर मळ्यात गेले होते.मग आम्ही मळ्यात गेलो.सर ऊसाला पाणी देत होते.मी सरांना हाक दिली.सर आले व म्हणाले "अरे ,गिरी तू माझी सही केलास तर चालले असते की ,कशाला बेजार झालास ."
एकदा सर मला म्हणाले ,"तुम्ही कोरे बॉंड पेपर घेऊन या व माझ्या सह्या घ्या."सरांचा आपल्या विद्यार्थ्यावर खुप विश्वास होता.सर अजातशत्रु स्वभावाचे होते.

[08/08, 4:02 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक
वडवळे सर
"मी सकाळी सात वाजता ग्राऊंडवर असतो;कुणाला कांही प्रश्न असतील तर विचारत चला."
अस वडवळे सर म्हणत.ते ग्राउंडवर आहेत की नाहीत हे पहाण्यासाठी मी जात असे. असत.वडवळे सर पर्यवेक्षक होते.बीजगणित व भूमिती हा विषय शिकवायचे.प्रत्येक शिक्षकाला रुजु करुन कार्यान्वित करणे हा वाघोलीकर सरांचा स्वभाव होता.सरमान्यता हीच संचमान्यता होती.त्यांच्या काळात ४० ते ५० शिक्षक कार्यरत असल्याचे मी पाहिले होते.वडवळे सर राठोडा गावचे.शिकवताना खुप तन्मय व्हायचे.खुर्चीवर बसल्यानंतर त्यांचा उजवा पाय थरथर कापत असे.आम्हा मुलांना त्यांचे खुप हसू येई.वडवळे सर उशीरा आलेल्या मुलांना कोपरावर वाळुत चालवायला लावत असत.पांढरा शुभ्र सदरा व धोतर हा त्यांचा पोशाख.वडवळे सर कधी आजारी पडत नसत.वडवळे सर कर्मयोगी शिक्षक होते.ते शिस्तप्रिय शिक्षक होते.ते मुलांमध्ये सतत रमलेले असत.सर आता जगात नाहीत.त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.
[08/08, 4:19 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक
बाबुराव मुळजे सर
गळ्या शपथ हो! माईचान खरं सांगतो! पाप! .हे डायलॉग त्यांच्या तोंडात सतत असत.बाबुराव मुळजे हे क्रीडा शिक्षक होते.सांगवी( को.) हे त्यांचे गाव.सर शांत ,मनमिळावु,संयमी शिक्षक होते.सरांचा तास केंव्हा येतो हे आम्ही आतुरतेनं वाट पहात असु.सर उत्कृष्टरित्या कवायत घेत असत.कदम ताल शुरु कर.बाए मुड ,दाहिने मुड.हे शब्द अजुनही आठवतात.सर खुप उत्साही होते.त्यांचा एक नावलौकिक होता.त्यांचा मुलगा धनराज उत्तम कवायत करत असे.सरांमुळे मला खो- खो या खेळाचा परिचय झाला.त्यांच्या काळात मुलांना व्यायाम व खेळाचा परिचय झाला.चिंचेच्या झाडाखाली थांबलेली ती सावळी मुर्ती मला अजुनही आठवते.स्वातंत्र्य दिनादिवशी ते मैदान आखत असत.सर वृक्षप्रेमी होते.ते गंगाधर मुळजे सरांचे सोयरे असतील असं मला आडनाव साधर्म्यावरुन वाटत असे.स्वामी सर त्यांना बाबुराव या नावाने हाक मारत असत.सरांचा साधेपणा व गरीब स्वभाव खुप लक्षात राहिला.
सरांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी वंदन..
संकलन गिरी एस.जी
[08/08, 4:38 AM] 👏🏻: लक्षात राहिलेले शिक्षक
बोधले सर लांबोटा
गावातील शिक्षक संमद खजुरे यांचा वाडा शिक्षकाने सदैव भरलेला असे.त्यांच्या वाड्यात आम्ही किरायाने रहात असु.तिथेच बोधले सर रहात असत.त्यांच्या मंडळी १६ सोमवार व्रत करत असत.बोधले सर भूकंपापुर्वी जुन्या गावात शिक्षक होते.मुले कोणाचही का ऐकत नसतात याची एक कथा ते मनोरंजकपणे सांगत असत.बोधले सर मराठी विषय शिकवत.ते शांत,संयमी होते.त्यांनी कुणाला मारल्याचे आठवत नाही.सर नियमितपणे तासावर येत असत.त्यांचा तो निर्वीकार चेहरा मला अजुनही तुकारामांच्या, चित्ती असु द्यावे समाधान! या श्लोकाची आठवण येते.बोधले सरांच्या नावातचं बोध हा शब्द होता.बोध (ज्ञान) ले (घे) असं मिश्किलपणे ते सुचवत असत.मी चुकीचे उत्तर सांगितल्यावर सर हसत असत.त्यांचे ते हसणे जिवाला लागायचे व अभ्यासात सुधारणा असे.
बोधले सरांची प्रकृती चांगली आहे.सेवा चांगली केल्याचा कृतार्थ भाव त्यांच्या चेह-यावर दिसतो.
कृतार्थ मी .कृतज्ञ मी.🌷🙏🏻
[08/08, 5:01 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक
खरोश्याचे स्वामी सर
मी पाचवी वर्गात होतो.सर आमचे क्लास टीचर होते.
ABCDEFG Come on Meena read with me...
या गाण्यातुन मला इंग्रजी विषयाची अवीट गोडी लागली.त्यांच्यामुळेच तर मी स्पेशल बी.ए.सहा पेपर इंग्रजी विषय घेऊन करु शकलो.स्वामी सरांचा नियमित तीन वर्षे सहवास लाभला.मी सातवीला आल्यावर इंग्रजी उत्तमरित्या वाचु लागलो.निबंधलेखन करु शकलो.स्वामी सर खरोश्याहून बरेच वर्ष नियमित चालत येत असत.नंतर ते सायकलवर येऊ लागले.स्वामी सर प्रेमळ होते.सरांचे हस्ताक्षर अप्रतिम होते.स्वामी सरांच्या नियमित अध्यापनामुळे इंग्रजी विषयाची गोडी वाढली नंतर कधीच भीती वाटली नाही.गाडीवरुन पडल्यामुळे सरांचा पाय मोडला होता.याचे मला खुप वाईट वाटत असे.सर्व स्टाफ सोबत त्यांचे वर्तन प्रेमाचे होते.सर मत्सरापासून कोसो दूर होते.ते पेटी उत्तम वाजवत असत.गायन उत्कृष्टपणे करत असत.त्यांनी गाईलेले बलसागर भारत व शारदे वंदन तुला ही गीते आठवतात.प्रसिद्ध लेखक यदुनाथ थत्ते यांनी शाळेला भेट दिली त्यावेळचा प्रसंगात स्वामी सर आठवतात.
शिक्षक वयानं वृद्ध झाला तरी ज्ञानानं तरुण असतो.याची आज ही प्रचिती स्वामी सरांना भेटल्यावर येते.
[08/08, 6:06 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक
श्री बाबुराव मडोळे ( परीट सर)
करील मनोरंजन जो मुलांचे
जडेल नाते प्रभुशी तयाचे!
या साने गुरुजींच्या वचनानुसार दिसणारे सर म्हणजे परीट सर.परीट सर डोक्यावर गांधी टोपी,पांढरा नेहरु शर्ट व पांढरी पँट घालत असत.सर साने गुरुजींचे प्रतिरुप.मुलांनी उत्कृष्ट काम करताच ते मुलांना खांद्यावर घेत असत.खरा तो एकचि धर्म ! जगाला प्रेम अर्पावे ! ,या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार, बलसागर भारत होवो हीवगीते सर शाळेत सतत गात असत.मुलांना ज्ञानाबरोबर संस्काराचे बाळकडु सरांनी पाजले.त्यांच्या हातातुन घडलेली मुले सर्वाधिक संख्येने शिक्षक झाले.सर एका मला विद्यापीठासारखे दिसत होते. सोज्वळ प्रसन्न हसरा चेहरा.त्यांचे ते विनोद झाल्यावर खळाळुन हसणे.सरांचा चेहरा तणावमुक्त होता.सर विनोदी स्वभावाचे होते.सर मुलांकडुन पसायदान पाठ करुन घेत असत.पाढे पाठांतरावर भर देत असत.सुबक हस्ताक्षराकडे मुलांना वळवत असत.
ग्रामस्थांचा गुरुजींवर प्रचंड विश्वास होता.मोकळेपणा हा त्यांचा स्वभावविशेष होता.त्यांचा मुलगा निलमकुमार मडोळे हे ही प्रशालेत शिक्षक म्हणुन आले होते.सरांचा तो स्पष्ट आवाज अजुनही कानात घमतो...
ध्यास एक साधका ,
अंतरात ठेव तू,
जाण यत्न देव तू....
सर योगा शिकवतात.प्रकृती उत्तम आहे.किल्लारीत रहातात.सामाजिक कार्य करतात.सरांच्या चरणी साष्टांग दंडवत...🌷👏🏻
[08/08, 8:24 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक
निगडीकर सर
हिंदी विषयाची अवीट गोडी लावणारे निगडीकर सर एक अजब रसायन होते.निगडीकर सरांच्या चेह-यावर विद्वता ओसांडुन वहात असे.निगडीकर सर पाठ शिकवताना मन रमुन जायचे.तास केंव्हा संपला हे समजायचे नाही.निगडीकर सर वाघोलीकर सरांचे पाहुणे होते असं ऐकलो होतो.निगडीकर सरांच्या पिळदार मिशा पाहुन भीती वाटत असे.काळा चष्मा ,चेह-यावर मिश्किल हसु दिसत असे.सर हसताना गालावर खळी पडे.निगडीकर सरांच्या शब्दांच्या जादूने विद्यार्थ्यांना अभ्यासाचा छंद लागला होता.
निगडीकर सरांची पुन्हा भेट होऊन शकली नाही.
जिंदगी के सफर गुजर जाते हैं मकाम ओ फिर नहीं आते...
[08/08, 8:41 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक
बिडवे सर
सर आले पळा पळा....
एक काळ असा होता.कोणीतरी सहज म्हंटलं की बिडवे सर आले -या बाबो..पळा रे..पळा रे...असं म्हणत मुलं सापडलं त्या दिशेनं पळत सुटायचे.भीतीनं त्यांचा थरकाप होत असे.मी मुद्दाम सर आले रे म्हणत पळत सुटत असे.कारण दुस-या दिवशी बिडवे सर चांगली हजेरी घेत.बिडवे सरांचं नाव घेताचं मुलांची बोबडी वळत असे.बिडवे सर कडक शिस्तीचे होते.शाळेत बिडवे सर आहेत म्हटल्यावर विद्यार्थ्यी चिडीचुप असत.बिडवे सर धार्मिक होते.पोथीचा अर्थ सांगत असत.गावात सर्वत्र त्यांना खुप मान होता.बिडवे सरांनी टारगट पोरांना वेळोवेळी सरळ केलेलं होतं.
लामजना प्रशालेतील शिक्षकांमुळे मुलांची आयुष्ये बनली. कित्येकांना नौक-या लागल्या.प्रशालेत माणुसकीचे शिक्षण मिळाले.प्रशाला ही संपुर्ण मराठवाड्यात नावारुपास आली.
बिडवे सरांचं गाव मुरुड( अकोला)
[11/08, 1:04 PM] 👏🏻: आदर्श गावकरी
होतकरु नागरिक
श्री सुग्रीव हरिदास सगर...
घरची परिस्थिती नाजुक,शिकण्याची प्रचंड आवड,मितभाषी ,मनमिळावु स्वभाव,कष्ट करण्याची वृत्ती व चिकाटी असणारा धडपड्या माणुस म्हणजे श्री सुग्रीव हरिदास सगर.या तरुणाचा होतकरुपणा पाहुन रामप्रसाद बजाज भाऊ यांनी त्यांच्याकडे वाचनालयाची जबाबदारी दिली.बरीच वर्षे ते सायकलवर पेपर वाटत असत.त्यांच्या या कष्टाळु स्वभावाचे फळ त्यांना मिळाले गावच्या पोस्ट ऑफीस मध्ये ब्रँच पोस्ट मास्तर म्हणुन नौकरी लागली.सतत कामाचा व्याप लोकांना बचतीची सवय त्यांनी लावली.अनेक वेळा डाक जीवन विमा कलेक्शन योगदानामुळे त्यांना उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार मिळाला.मी त्यांच्याकडुन वक्तशीरपणा व कोणाचेही काम पेंडींग न ठेवणे हे गुण शिकलो.अजुनही त्यांचे कार्य सतत चालु आहे.उत्कृष्ट रेकॉर्ड व अचुकता हा त्यांचा हातखंडा आहे.त्यांच्या कार्याला प्रणाम.
संकलन श्याम गिरी
[11/08, 3:59 PM] 👏🏻: आदर्श नागरिक
श्री विठठ्ल (आण्णा) बिराजदार
गावातील प्रत्येक माणसाची बारीकसारीक माहिती असणारा व्यक्ती म्हणज श्री विठ्ठल आण्णा बिराजदार.विठ्ठल आण्णा गेली चाळीस वर्षे ग्रामपंचायत कार्यालयात काम करतात.विठ्ठल आण्णा मनमिळावु,मिश्किल व नर्म विनोद करणारे म्हणुन प्रसिद्ध.पांढरा शर्ट ,तशीच पँट ,व डोक्यावर गांधी टोपी घालत असत.विठ्ठल आण्णा नेहमी प्रसन्न दिसतात.गावातील अनेक त्यांचे मित्र आण्णाभोवती दिसतात.गावातील अनेक समस्या अण्णांनी चुटकीसरशी सोडवल्या असतील.ग्रामपंचायत मध्ये मुला़ंना क्रिकेट दाखवणारे आण्णा आठवतात.विठ्ठल आण्णांना काही लोक प्रेमाने गांधी म्हणताना दिसत.विठ्ठल आण्णा ग्रामपंचायत मध्ये अजुनही कार्यरत आहेत.आण्णांचा सल्ला बरेच जण ऐकताना दिसतात.ग्रामपंचायत मध्ये आण्णा दिसतातच.ग्रामपंचायत मध्ये गेल्यावर आण्णा हसुन स्वागत करतात.
संकलन श्याम गिरी
[11/08, 7:09 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक
मगर सर
मगर सर भुकंपापुर्वी आलेले शिक्षक मला ते खुप आदरणीय वाटत.ते मुलांना भल्या पहाटे शाळेत बोलवत असत.सर सुंदर योगासने करत.सरांमुळेच मी व्यायामाकडे वळलो.सर निर्व्यसनी होते.सरांना मी कधीही आजारी पडल्याचे पाहिले नाही.सर खुप लवकर उठत असत याचेच मला खुप नवल वाटायचे.सर शरीराचा गाडा करुन फरशीवरुन वेगाने जात असत.योगामुळे सर प्रसन्न व तेजस्वी दिसत. इतिहास कधीही नष्ट होत नाही.तो कोठेतरी दडलेला असतो.त्याचा मागोवा घेतल्याने भविष्याचा अचूक वेध घेता येतो.भविष्यात पुन्हा सावरता येते इतिहासामुळेे.
मगर सरांमुळे आम्हाला व्यायामाची गोडी निर्माण झाली.येडशी रामलिंग हे त्यांचे गाव.
मगर सरांना मनापासुन कोटी कोटी प्रणाम💐
संकलन श्याम गुमानगिर गिरी
[11/08, 7:23 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक
कै.गाडे सर ( तपसे चिंचोली)
माझ्या हि-यांनो व हिरकणींनो असं म्हणुन पाठाची सुरुवात करणारे गाडे सर खुप आठवतात.त्यांचे आडनाव गाढे असेल असं वाटायचं.कारण सर खुप अभ्यासु होते.पांढरा सदरा,तसेच धोतर व डोक्यावर गांधी टोपी घालणारे गाडे सर सायकलवर येत असत.मुलांना पाहताच त्यांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत असे.गाडे सर मुलांना इ.भू.ना विषय शिकवत असत.सर शैक्षणिक साहित्य चार्ट,नकाशा वापरुन अध्यापन करत असत.गाडे सर पाठ शिकवतांना खुप तन्मय होऊन जात.गाडे सरांवर हिटलरचा प्रभाव होता म्हणुन ते त्याच्यासारख्या मिशा कट करत असत.त्यांचा तो चेहरा पाहुन खुप हसु येई.गाडे सर विद्यार्थीप्रिय शिक्षक होते.त्यांना मी कधीच रागात आल्याचं पाहिलो नाही.जसा शिक्षक तसे विद्यार्थी गाडे सरांमुळे शांत व स्थिर व विचारी झालो.गाडे सरांच्या कानावर केस होते.याचे मला खुप नवल वाटे.
गाडे सर या जगात नाहीत.पण मी त्यांची आठवण काढतोय.हे त्यांना कदाचित समजले असेल.
त्यांच्या पुण्य स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.💐💐
[11/08, 8:39 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक
श्री बंडू गुरुजी ( अंबुरे सर)
जुन्या पिढीतील साधी रहाणी व उच्च विचार असणारे शिक्षक म्हणजे बंडु गुरुजी.पांढरा सदरा,तशीच टोपी,व पांढरी पँट घालणारे लामजना गावातील बंडु सर दूसरी"ब" वर्गाचे वर्गशिक्षक होते.गावातील कांबळे सर रजेवर गेल्यावर सर आम्हाला शिकवण्याकरिता येत असत."गप्प बसा रे आता. अभ्यास करा बरं !नाहीतर पाठीचं भद्द करीन एकेकाच्या.बाल्या आता तू थंड बसतूस का येऊ तिथं" सरांचे हे शब्द अजुनही कानावर घुमतात.बंडु गुरुजी मुलांना भींतीवर वस्तुसारखं उचलुन धरत असत.कोंबड्याचा आवाज काढत असत.बंडु गुरुजी मुलांचे आवडते शिक्षक होते.सर प्रमोषन होऊन निलंगा तालुक्यात बरेच वर्ष होते.मला प्रेमाने बोलत असत.सर आता खुप थकलेत.आजारी असतात.सरांचा तो शांत,संयमी,गरीब स्वभाव मुलांना खुप आवडायचा.सर आल्यावर मुलांना खुप आनंद होत असे.सर प्रत्येक मुलाची चौकशी करत असत.
सरांना दीर्घायुष्य लाभो.हीच प्रार्थना.
[11/08, 8:55 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक
श्री शेषेराव शिंदे गुरुजी
गावातील अनेक शिक्षकांपैकी जुन्या पिढीतले शिक्षक म्हणजे श्री शिंदे सर . सर कर्मयोगी म्हणजे फक्त कामावर विश्वास ठेवणारे.सर सायकलचा वापर करत असत.नियमित शेताकडे जाणे ही त्यांची सवय होती अजुनही आहे.सरांचा मुलगा युवराज हा उच्चपदावर कार्यरत आहे.आपले कर्म चांगले असतील तर त्याची फळेही चांगली मिळतात असं सर सांगत असत.सरांच्या घराशेजारी मी रहात असे.त्यांच्या मंडळी काकु खुप माया करत असत.सर खुप कष्ट करत असत.जे कष्टाने मिळते तेच कायम टिकते असं सर सांगत असत.
सर सेवानिवृत्त आहेत गावात असतात.प्रकृति चांगली आहे.सरांच्या कार्यास प्रणाम.💐👏🏻
सरांकडुन श्रमसंस्कृती शिकलो.
[11/08, 9:52 PM] 👏🏻: इतिहासाचा मागोवा
लामजन्याची माती म्हणजे फकीराची पांढर असं म्हटलं जात असे.याचा अर्थ मी असा काढला या मातीत शांतता,सुसंस्कार,स्थिरता,त्याग याचे भांडार आहे.मी व माझे बांधव या मातीत खेळलो याचं मातीने संस्काराचं बळ दिलं.या मातीला ज्ञानेश्वर गिरी माऊली महाराज उत्तरेश्वर पिपंरीकर ,नाशिकचे गहिनीनाथ महाराज व तपोनिधी तापीनाथ महाराजांचा ,हजरत शेख सुल्तान ,संत मक्सुद मामु यांच्या चरणाचा स्पर्श होऊन ती पवित्र झालेली आहे.फकीराची पांढर म्हणजे कष्टक-यांची भूमी.
मराठवाडा व हैद्राबाद मुक्तीसंग्रामात येथील तरुणांनी उडी घेतली होती.कोणाकडे तरी त्याचे पुरावे असतीलचं.हटकरवाडीत(मारुतीवाडीत) हत्ती विकला म्हणुन गाव सोडुन जुन्या गावात वस्ती झाली अशी आख्यायिका आहे.
आपण ज्या गावात सध्या रहातो आहे.इथं दुपारी सुद्धा येण्याची भीती वाटत असे.जुन्या गावातुन लोक दत्तापाटीला ( लामजनापाटी) चालत जात असत.पुर्वी गावच्या भोवताली खुप झाडी होती.जुन्या गावातील तकवा या भागात अजुनही दाट झाडी दिसते.तिथं शाडु मिळत असे मी लहानपणी त्याच्यापासुन गणपती बनवत असे.काही भागाला खटकाळी,लेंडकी,मोरंडी,
माळ अशी नावे गाववाल्याकडुन ऐकायला मिळत असत.मी त्या जागी जात असे व त्यांना अशी नावे का दिली याचा विचार करत असे.लोक मोठमोठ्या वाड्यात व गढीत रहात असत.श्री रामप्रसाद बजाज भाऊ यांचा तो जुना ऐतिहासिक वाडा पाहुन खुप नवल वाटत असे .महेश शर्मा( पापु) यांच्या वाड्यात मी जात असे त्यांच्या वडीलांकडे १०० वर्षाचे पंचांग होते.कै.दिंगबर पाटील यांच्याही घरी मी जात असे त्यांच्या वाड्यात ग्रंथाचे नियमित वाचन होत असे.त्यांच्या वाड्यातील पुर्वजांचे फोटो पाहुन माझे मन हरखुन जात असे.कै.दर्शन पाटील यांनी तसाच वाडा बांधण्याचा प्रयत्न केला. कै.नागनाथाप्पा कलशेट्टी यांच्या तेल घाण्याची घरघर कानावर येत असे.कै.सिद्रामप्पा मुळजे यांचा वाडा प्रशस्त होता.कै.दादाराव गोटे यांच्या वाड्यात पिठाची गिरणी होती.माळ्याच्या मळ्यातील नारळाचे उंचच उंच झाड पाहताना सुर्यामुळे डोळे दीपल्याचे आठवते.
जुन्या गावात एक अख्यायिका आहे.लामजना गावातील शेताजवळ निळकंठेश्वराचे मंदिर होते.त्याची सावली मोगरगा पाटीवर पडत असे.कांहीतरी घडले व लामजन्याचा देव रुसला व किल्लारीत जाऊन बसला.ही आख्यायिका कोणीतरी सांगितल्याचे व त्याच्या चेह-यावरील हावभाव पाहुन हसु आल्याचे आठवते...
क्रमश:
गांधीजीच्या त्या वट्टयावर शिवराज पाटील चाकुरकर पाऊस आल्यावर सुद्धा हातात छत्री घेऊन भाषण करताना आजही आठवतात.बापुसाहेब काळदाते,कै.विलासराव देशमुख साहेब,दिलीपराव देशमुखयांच्यासारख्या कित्येक नेत्यांनी गावाला भेटी दिल्या होत्या.
गावाला लागुन बांधलेली दगडी शाळा हे माझे सर्वात आवडते ठिकाण.उंच निलगिरी वृक्षांचे कुंपन होते शाळेला.शाळेबद्दल सर्व नागरिकांमध्ये खुप आस्था होती व ती आजही आहे.
[11/08, 11:22 PM] 👏🏻: आदर्श नागरिक
श्री रामप्रसाद बजाज (भाऊ)
जुन्या पिढीतील भाऊ म्हणजे एक प्रचंड अनुभवी व्यक्तिमत्त्व आहेत. सर्वांनाच भाऊंचा आदर वाटतो.भाऊंच्या हातावर जुने व नवीन हनुमान मंदिर ,पाटीवरील दत्तमंदिर,जुन्या गावातील शाळेचे बांधकाम झालेले आहे.पारमार्थिक ( धार्मिक वृत्ती) असलेले भाऊ गावच्या सरपंच पदावर खुप वर्ष राहिले.गावात प्रथम ते शिक्षक होते जुन्या गावातील मंदिराजवळ शाळेत ते जात असत.भाऊंचा नित्य नियम म्हणजे सकाळी शेताकडे जाणे.दररोज रात्री रोजनिशी लिहिणे.ग्रंथाचे वाचन करणे.वाचनालयाकडे फेरफटका मारणे.गावात भाऊनी वाचनालय आणले.गावातील ब-याच लोकांना बांधकामाबद्दल भाऊंचे मार्गदर्शन लाभले.भाऊ शाळेकडे नियमित जाऊन चौकशी करत असत त्यांना कै. श्रीमंत बिराजदार यासारख्या अनेकांची साथ लाभली.लामजना पाटीवरील दत्तजयंती कार्यक्रमात भाऊ पशुप्रदर्शन व कुस्त्यांची दंगल ठेवुन बक्षीस देत असत. ब-याच उपक्रमात पंच म्हणुन भाऊ असत.त्यांची वृत्ती धार्मिक असल्यामुळे गावातील अखंड हरिनाम सप्ताहात मुख्य भूमिका बजावत असत.शिस्त व निटनेटकेपणा हा भाऊंचा स्वभावविशेष.जुन्या काळातील सर्व दिग्गज नेते भाऊंना ओळखत असत.जेवण झाल्यावर शतपावली करताना खुप वेळा भाऊ दिसतात.कल्याण या मासिकाचे भाऊ आजीव सभासद असुन त्याचे सर्व वार्षिक व विशेष अंक भाऊकडे पहायला मिळतात.पांढरे स्वच्छ धोतर,तसाच नेहरु शर्ट,व डोक्यावर गांधीटोपी हा भाऊंचा पोशाख.
भाऊ प्राणायाम व योगा करतात.त्यांची पुढील पिढी बिझनेस व शेतीत गुंतली आहे.परंतु जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद पुढे घेऊन जाणारे भाऊंचे व्यक्तिमत्त्व पुढील पिढीला मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.त्यांच्या कार्याला प्रणाम💐👏🏻
[12/08, 8:44 PM] 👏🏻: आदर्श नागरिक
कै. शेषेराव ग्यानदेव बिराजदार
पांढरे स्वच्छ तसेच धोतर परीधान करणारे कै.शेषेराव गुरुजी लक्षात राहिले.साधी रहाणी,स्वाभिमानी,गांधीवादी शेषेराव गुरुजी गावच्या सरपंचपदी राहिले.गावात एकोपा रहावा म्हणुन गुरुजी खुप झटत.त्यांचे मित्र म्हणजे शिवराज पाटील चाकुरकर साहेब.दीपावली व इतर सणाला त्यांचे मित्र भारत सरकार लोगो असलेले शुभेच्छा पत्र पाठवत असत.
जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण
याप्रमाणे चांगल्या माणसाला यातना सोसाव्या लागतात.गुरुजी कितीही संकटे आली तरी डगमगले नाहीत.राजकारणातुन लोकांचा विकास व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींनी रात्रंदिवस झटले पाहिजे असं गुरुजी सांगत.गुरुजी रोज वर्तमानपत्र वाचत असत.गुरुजींना पान खाणे आवडायचं.गुरुजी बरीच वर्षे पोस्टमास्तर होते.नंतर सरपंच झाले.गुरुजींना पैसे कमवण्याचे अनेक मार्ग होते.परंतु गुरुजी निर्मोही होते.जनतेच्या पैश्यावर फक्त जनतेचा हक्क असुन आपण जनतेचे सेवक आहोत असं गुरुजी सांगत असत.गुरुजींचे त्यांच्या गणेश या नातुवर खुप प्रेम होते.गुरुजी समाजसेवक व सच्चे देशभक्त होते.नियमित फिरायला जाणे गुरुजींचा आवडती दिनचर्या होती.गुरुजी एल आय सी चे काम पण करत असत.राजकारणात कशाचीच लालुच न ठेवता कसे काम करावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे गुरुजी.नशीबाला सुख आले काय नि दु:ख आले काय जे प्रारब्धात आहे ते होणारचं यावर गुरुजींची निष्ठा होती.स्वत: कष्ट करुन जीवन जगावे कोणाचे लुबाडु नये याची शिकवण गुरुजींनी दिली.
कै.शेषेराव गुरुजी राजकारणातले संत होते.त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.💐👏🏻
[12/08, 9:07 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक
मोरखंडे सर
मोरखंडे सरांचा तो प्रसन्न चेहरा आजही आठवतो.मोरखंडे सर आमच्या गल्लीत रहात असत.मोरखंडे सर कोणता विषय शिकवत हे काही लक्षात राहिले नाही.मी शाळेत असताना जवळपास ४० ते ५० च्या दरम्यान स्टाफ होता.शिक्षकांच्या बदल्यांचं प्रमाणही खुप कमी होतं.शिक्षक फक्त मुलांच्या प्रगती बद्दल चर्चा करत असत. मोरखंडे सरांचा सहवास कमी लाभला.
मोरखंडे सरांची ती सोज्वळ प्रसन्न मुर्ती पाहुन मन हरखुन जायचे.मोरखंडे सरांचे शिस्तीत काम चाले.मुलांना रागावतांना व छड्या मारतांना मी मोरखंडे सरांना कधी पाहिलो नाही.
सर अजुन सेवेत असतील.त्यांचीही आठवण प्रत्येकाला असेलचं.
[12/08, 9:20 PM] 👏🏻: आठवणीतील शिक्षिका
आळंगे मँडम ( माहेर लामजना)
मी पाचवीच्या वर्गात असताना वर्गशिक्षिका आळंगे बई होत्या.दर गुरुवारी वर्गात पूजा होत असे व मुलांना गोड खाऊ मिळत असे.आळंगे बई सर्व मुलांना समान वागणुक देत असत.छडीचा वापर कमी करत असत.मुलांना वाचन ,लेखन देत असत.त्या सर्व मुलांना विषय समजावुन सांगत असत.मायाळूपणा,नियमितपणा,
शांत स्वभाव या गुणांनी बई परीपुर्ण होत्या.
एक शिकलेली स्री शंभर शिक्षकांच्या बरोबरी इतकी असते.बईंच्या संस्कारात आम्ही वाढलो.मनात थोडीही भीती वाटत नसे.शाळा व घर यातले अंतर बईंनी दूर केले.माझ्या वर्गात १००% मुले हजर रहात असत.प्रेम,ज्ञान, व शक्ती यातुन व्यक्तीचा विकास होतो.
पगारासाठी नौकरी करणा-या लोकांसाठी बई आजही आदर्श आहेत.बईंना खुप दीर्घायुष्य लाभो हीच देवाजवळ प्रार्थना.💐👏🏻
[12/08, 9:45 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक
रामराव कांबळे सर (लामजना)
मी तपसे चिंचोली येथील जि.प.शाळेतुन पहिली पास झालो व लामजना येथे दूसरीला प्रवेश घेतला.माझे नाव दूसरी 'अ' वर्गात घातले गेले.कांबळे सर वर्गशिक्षक होते.सरांचा तेंव्हा परिचय झाला.पांढरा नेहरु शर्ट व पांढरी पँट घालणारे कांबळे सर खुप मनमिळावु होते.मुलांच्या मनावर कसलाही ताण नसे.ताणरहित आम्ही शिकलो.पाटीवर क,का कि,की...कित्येक वेळा काढुन सरांना दाखविणे हे माझे आवडते काम असे.सर अजुन काढु का? हा प्रश्न विचारताचं सर मान डोलावुन होकार देत असत.कांबळे सर मुलांना मारत नसत.कांबळे सर बरीच वर्षे गावात होते.सध्या सेवानिवृत्त झाले आहेत.सरांना अर्धांगवायुचा अँटक आला होता.सर घरीच असतात.माझे मित्र मात्र विसरुन गेले असतील.कांबळे सर स्वभावाने खुप चांगले आहेत.त्यांचे आरोग्य चांगले रहावे म्हणुन ईश्वराजवळ प्रार्थना करतो.
💐👏🏻
[12/08, 10:11 PM] 👏🏻: आठवणीतील सेवक
गोविंदमामा ( जि.प.शाळा सेवक)
नवीन पिढीला गोविंदमामा कोण होते ? हे माहिती नसेल.गोविंदमामाचे घर शाळेजवळ होते.गोविंद मामा शाळेत शिपाई होते.लामजना शाळेच्या घंटीचा एक विशिष्ट आवाज होता.प्रत्येक टोलच्या आवाजावरुन वेळ समजत असे.सकाळी,दूपारी व शाळा सुटल्यानंतर प्रत्येक वेळच्या घंटेच्या आवाजाची लय व गती वेगळी होती.उदा.मधल्या लघु मध्यंतराची बेल लवकर वाजत असे व चौथा तास काही वेळाने लगेचच पडत असे.गोविंद मामाच्या बोटात ती जादू होती.लांडगे मामा व गोविंद मामा आळीपाळीने टोल टाकत असत.त्यांनी कधी उशीरा टोल दिल्याचे आठवत नाही.गावाचा पसारा पहाता गावाच्या संपुर्ण टोकाला घंटेचा आवाज जात असे.
गोविंद मामाच्या चेह-यावर प्रदीर्घ सेवा केल्याचा भाव असे.सुरकुत्या पडलेल्या चेह-यावर झुपकेदार पांढ-या मिशा वद्धत्वाच्या खुणा सांगत असत.गोविंद मामा मुलांना गोष्टी सांगत.त्यांना कुत्रे पाळण्याचा छंद होता.ते काठीचा आधार घेऊन चालत असत.शाळेतील साफ सफाई चांगली ठेवत असत.सर्वांना प्रेमाने बोलत असत.
मरावे परी किर्तीरुपी ऊरावे .
कै.गोविंदमामा जग सोडुन गेले.त्यांनी माणसाने माणसाला माणुसकीप्रमाणे वागायला काही पैसे लागत नाहीत याची आपल्या सहज वागणुकीतुन शिक्षण दिले.प्रेमळ गोविंदमामा आज आठवतात.
त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी वंदन💐💐👏🏻
[12/08, 10:42 PM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक
गुलाबसाहब (लालासाहब)शेख ( सर)
यांचा तर बहुतेक जणांना विसर पडलेला असेल.मी सहाव्या वर्गात असताना शेख सरांचे शाळेत आगमन झालं.शेख सरांचा चेहरा लालसर दिसे.मला नेहमी वाटे त्यांच्या या गुलाबी रंगावरुन त्यांच्या आईने त्यांचे नाव ठेवलेले असे.सरांची मुलगी तबसुम (रुक्साना) अभ्यासात तितकी हुशार नव्हती.सर परीक्षेत तिला हुशार विद्यार्थ्याजवळ बसवत असत.शिक्षकांची मुले हुशार असतात असं मला वाटे परंतु तबसुम याला अपवाद होती.शेख सर हिंदी विषय शिकवल्याचे आठवते.सरांचा सहवास दीर्घ काळ लाभला नाही.शेख सर प्रेमळ होते.पांढ-या पोशाखातली ती प्रसन्न मुर्ती पाहुन मन हरखुन जाते.
सर कुठे आहेत माहित नाही.परंतु खुप आनंदात असतील.इतरांना आनंदी ठेवणा-यांना देव नेहमी सुखात ठेवतो.
[12/08, 11:12 PM] 👏🏻: आठवणीतील शिक्षक
श्री कोळसुरे सर ( चंद्रकांत यशवंतराव)
30 सप्टेंबर १९९३ च्या भूकंपानंतर कोळसुरे सरांचे शाळेत आगमन झाले.गणित विषयात माहिर असणारे कोळसुरे सर प्रदीर्घ सेवेनंतर प्रशालेतुन रीटायर झाले.मी नववीला असताना काही महिने सरांचे मार्गदर्शन लाभले.कोळसुरे सर हाफ शर्ट व पँट घालत असत. ब-याच जुन्या व नवीन शिक्षकांना सरांचा सहवास लाभला.मूळचे माळेगाव(कल्याणी) निलंगा तालुका हे सरांचे गाव.सर नियमितपणे गणिताचा ज़्यादा वर्ग घेत असत.मनापासुन हसणारे कोळसुरे सर लोकनिंदेला जास्त भीत असत.आपलं काम भलं या विचाराने ते जगताप गुरुजीप्रमाणे गावात जास्त रमले नाही.साधेपणा हा त्यांचा श्रेष्ठ गुण .मितव्यय ( कमी) खर्च करत.पैशाची उगीचच उधळपट्टी करु नये असं सर सांगत असत.सर सुरुवातीला प्राथमिक शिक्षक होते.पदोन्नतीने माध्यमिक शिक्षक म्हणुन लामजना गावात रुजु झाले.सरांना विनाकारण कोणी वाद घातलेले आवडत नसे.शाळेतील शिक्षक सुजाण असतात त्यांना आपली कामे समजतात.प्रत्येकानं स्वत:ची बाजु तरी सुरक्षित ठेवावी असं सर सांगत असत.जि.प.प्रशालेचे प्रभारी मु.अ.म्हणुन सरांनी काम पाहिले.मुलांना शिकवण्याचा सरांना छंद होता.मी प्रशालेत सरांसोबत दहा वर्षे होतो.
सरांच्या दीर्घ अनुभवाचा फायदा सर्व विद्यार्थांना झाला.सेवानिवृतीनंतर सर लातूर शहरात रहातात.
त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच मंगल कामना करतो.💐👏🏻
[13/08, 6:24 AM] 👏🏻: आठवणीतले प्रयोगशाळा सहाय्यक
आतराम डी.बी
जि.प.प्रशाला लामजना येथे भूकंपापुर्वी श्री आतराम डी बी सरांचे आगमन झाले.ते मूळचे नांदेड जिल्ह्याच्या किनवट भागातील आदीवासी भागातुन आलेले.आतराम सर प्रयोगशाळा सांभाळत असत.नंतर सरांना विविध विषयाचे अध्यापन करावे लागले.काही वर्षे त्यांनी लिपिकाचेही काम केले.आतराम सर स्वभावाने शांत मनमिळावु व संयमी होते.अभ्यास न करणा-या मुलांनी सरांचा भरपूर मार खाल्लेला आहे.आतराम सर वेळेवर येत असत.राष्ट्रीय सणाला उत्साही दिसत.सर याच प्रशालेतुन या वर्षी रिटायर झाले.नवीन व जुन्या पिढीतील सर्व शिक्षकांना आतराम सर ओळखत असत.त्यांना कधी आजारी पडल्याचे पाहिलो नाही.
आतराम सरांना सुदृढ आरोग्य लाभो हीच प्रार्थना.
[13/08, 6:50 AM] 👏🏻: आठवणीतले शिक्षक
संमद खजुरे सर ( लामजना)
संमद सर गावातले शिक्षक .सरांच्या वाड्यात बरेच शिक्षक रहात असत.संमद सर पांढरा सदरा व पँट घालत असत.प्रकृतिने धिप्पाड असलेले सर उपक्रमशिल होते.सरांची बरीच सेवा तांबरवाडी गावात झालेली होती.सर कडक शिस्तीचे होते.सरांचा मुलगा मुजीब प्रथम वकील व नंतर न्यायाधीश झाला.सरांच्या वाड्यात बायोगँस व शौचालय होते.सरांच्या घराचे दार दगडी व भव्य होते.सर कुटुंबाकडे खुप लक्ष देत असत.सरांचा सहवास लाभला.त्यांनी मला कोणता विषय शिकवला नाही.परंतु त्यांच्याकडुन खुप काही शिकलो.बरेच शिक्षक सरांचा सल्ला घेत असत.सरांचा आजारपणामुळे मृत्यु झाला.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.💐👏🏻
[13/08, 2:25 PM] 👏🏻: रात्रअभ्यासिका
जुन्या पिढीतली मुले शाळेत अभ्यासाला जात असत.वाघोलीकर सर रात्र अभ्यासिका चालवत असत.काही मुले अभ्यास करताना डुलकी काढत व पेंगत असत.एकदा एक मुलगा रात्री शाळेत अभ्यासाला उशीरा गेला.त्याला काही अडचणीमुळे उशीर झाला होता.त्याचे मित्र स्वागताला तयारीत होते.एकाच्या हातात फडा,एकाच्या हातात उशी व एकजण हातात चप्पल घेऊन उभा होता.एक जण लाईटच्या स्वीचजवळ थांबला होता.सर्वजण काहीतरी मोहीमेची तयारी करत होते.मी खिडकीजवळ उभा होतो.काही कळण्याच्या आत लाईट बंद करण्यात आली.सर्वजण त्या मुलावर मारण्यासाठी तुटून पडले.
दुस-या दिवशीपण तोच प्रकार.अभ्यासिकेला उशीरा येणा-याचा असा समाचार घेतला जात असे.एका दिवशी त्या मुलाला बाकड्यावर झोपी गेल्यावर त्याचे हातपाय टारगट मुलांनी सुतळीने बांधले व भूत आलय -या बाबो..असा त्यांनी गोंधळ केलो.त्यांच्या असभ्य वर्तनाबद्दल वाघोलीकर सरांनी डोक्यावर पेटी,सतरंजी देऊन शाळेला एक फेरी मारुन घरी हाकलुन देण्याची कारवाई केली होती.
रात्र अभ्यासिकेतली मुलं पहाटे लवकर उठुन झाडांना पाणी देत असत.दहावी वर्गात थोडा हुडपणा मुलात असतोच.ते वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त करत असतात.आजकालची फार कमी मुलं पहाटे उठतात व जी उठतात ती व्यायाम करतील का? हे सांगता येत नाही.आधुनिक काळात पालकांच्या अपेक्षा खुप वाढल्या आहेत.खेड्यात मुलांना अभ्यासाचे कमी गांभीर्य आहे.मुलांचे हात काही निर्माण करण्यापेक्षा फक्त लिहिण्यात गुंतलेले दिसतात.बुद्धिमत्ता आहे पण चिंतन कमी आहे.लोकसंख्या वाढीबरोबर प्रत्येकाचे तितकेच प्रॉब्लेम वाढलेले आहेत.कौशल्य नसल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे.निखळ बालपण जाईल असे खेळ संपलेले आहेत.मोबाईल गेम व क्रिकेट यातच तरुणाईचा वेळ व्यर्थ चाललेला आहे.तरुण मुलांनी आई वडीलांना समोर ठेवुन अभ्यास करावा व त्यांचे स्वप्न पुर्ण करावे.
[15/08, 5:08 PM] 👏🏻: एकांताची शाळा...
मौन अभ्यास...
फलप्राप्ती काय होईल माहिती आहे?
सर्व शास्त्र तेथे चालत येतात..
[16/08, 6:37 PM] 👏🏻: नवे वारे नवे विचार
तरुण मुलामुलींनी पुढील कृती करावी व नवे वारे व नवे विचार रुजवावेत.
१) विकास या एकाच मुद्दयावर एकत्र यावेत .
२) लोकशाही मार्गाने निवडणुका लढवाव्यात.
३) भ्रष्टाचार करणा-यांना घरचा रस्ता दाखवावा.
४) आपल्या कामातुन तरुण मुले काय करु शकतात.हे जगाला दाखवावे
५) गावातील मुख्य समस्यांची यादी करुन त्यावर उपाय करावा.
६) जो काम करत नाही .त्याला पदावर रहाण्याचा हक्क नाही हे लोकशाही मार्गाने सांगावे.
७) गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता मोहिम राबवावी.
८)सार्वजनिक शौचालय निर्मिती व वापर,वैयक्तिक शौचालयाचा वापर, जनजागरण,स्वच्छता,कच-याची विल्हेवाट,स्पर्धापरीक्षा वर्ग,अभ्यासिका,क्रीडामंडळे,
सांस्कृतीक कार्यक्रम,आरोग्य तपासणी शिबिर,जलपुनर्भरण,
धार्मिक कार्यक्रम राबवावेत.
९)जनतेचा पैसा योग्य कामासाठीच वापरणे.
१०) गरीब व होतकरु मुलामुलींना शैक्षणिक साहित्याची मदत करणे.
११)दारुबंदी व मटकाजुगार बंदी यासाठी प्रयत्न करणे.
१२) व्यसनापासुन दूर रहाण्याकरीता विविध उपक्रम घेणे.
१३) गावातील अभ्यासात कच्च्या मुलांना वाचन व गणित शिकवणे.
१४) विविध उपक्रम राबवुन लोकात एकोपा निर्माण करणे.
१५) विविध क्षेत्रातील गुणवंत लोकांना पुरस्कार देणे.
उदा. आदर्श पालक, गुणवंत मुले,नवीन नौकरी लागणारे,आदर्श नागरीक, आदर्श माता,आदर्श शेतकरी,आदर्श व्यापारी
१६) सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावुन लोकांना विविध विषयावर प्रबोधन करणे.यातुन लोकांच्या चुकीच्या समजुती दूर होऊन जादूटोणा ,चमत्कार यापासुन लोक दूर जातील.पर्यायाने घरचा पैसा वाचेल.
१७) संपुर्ण गावातील लोकांच्या विमा पॉलीसी काढुन विमा संरक्षण मिळवुन देणे.
१८) गावात रात्री मोटारसायकलवरुन गस्त घालण्यासाठी पथक स्थापन करणे.महिन्यातुन तारखेनुसार एकदा किंवा दोनदा ड्युटी मिळेल अशी जबाबदारी घेणे.
१९) जो अनाथ आहे.किंवा आई किंवा वडील यापैकी एकजण वारले आहेत.शाळकरी मुला मुलींना शैक्षणिक साहित्याची मदत करणे.समाजातील दानशूर व्यक्तीकडुन मदत मिळवुन देणे.
२०) महिन्यातून कमीत कमी दोनदा सामाजिक विषयावर व्याख्यान आयोजित करणे.
२१) तरुणांना उद्योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा उद्योग मंडळाचे अल्पमुदतीचे रोजगार प्रशिक्षण व उद्योगासाठी मदत बँकेकडुन अर्थसहाय्य मिळवुन देणे.
२२) गावातील सर्व शासकीय कार्यालयांचा ,तेथील निधी व योजनांचा आढावा घेणे.
२३) उदगीर येथील नेत्र संस्थेमार्फत नेत्रतपासणी शिबीर व उपचार यांचे आयोजन करणे.
२४) गावातील बेरोजगार तरुणांना काम मिळुन देण्याचा प्रयत्न करणे.
२५) विविध शासकीय कार्यालयाशी उदा. जि.प.लातूर यांच्याशी संपर्क करुन विविध योजना गावात आणण्यासाठी प्रयत्न करणे.

*माझ्या बालपणाची रंगपंचमी*
*शब्दांकन :- श्यामसुरेश गुमानगिर गिरी,लामजना ता.औसा*
मला लामजना गावातील बालपणाची रंगपंचमी खुप आठवते.रंगपंचमीच्या आदल्या दिवशी स्टेशनरी दुकानात मी जात असे.कोणकोणते रंग आलेले आहेत त्याची चौकशी करत असे.रंगांची निवड करताना या रंगांमुळे कोणाला त्रास तर होणार नाही ना? हे आग्रहाने विचारत असे.चमकीचे पॉलीश पण आलेले आहे हे दुकानदाराने सांगताचं काळजी वाटत असे.कोणी आपल्याला हे पांढरे पॉलीश लावले व डोळ्यात गेले तर काय वाईट होईल? याची चिंता वाटत असे.
भल्या सकाळी दुस-या दिवशी रंगपंचमीला मोठ्या उत्साहाने सुरुवात होई.जुने शर्ट व पँट, टी- शर्ट गाठोड्यातुन काढुन अंगावर घालुन मी सकाळी लवकरचं घराबाहेर पडत असे. 7 ते 10 वेळात लहान मुले रंगपंचमी खेळुन दमुन जात.रांजणातील थंड पाण्याने व साबणाने स्वच्छ अंघोळ करत.नंतर त्यांच्या चेह-यावर गुलाबी,हिरव्या,निळसर , पिवळ्या रंगांची छटा दिसे.मला रंगांचे हे कवडसे पहायला मौज वाटे.सकाळी दहाच्या नंतर मग रंगपंचमीला जोरदार बहर येई तरुण मुले हातात रंग कालवलेले बकेट व मग घेऊन गावातुन फिरुन सापडेल त्याच्या अंगावर रंग टाकत.त्यांना पाहुन रामजी की वानरसेना निकली असं वाटे.गर्द गुलाबी किंवा हिरव्या रंगांने रंगलेला खरा चेहरा कोणता हे ओळखणे खुपचं मुश्किल होत असे.प्रत्येक चेह-यावरचे रंगकाम पाहुन मला खुप हसु येई.एखादा शुभ्र वस्रात घराबाहेर पडलेला माणुस थोड्या वेळाने एक तर त्याची टोपी रंगलेली दिसे किंवा पांढ-या शुभ्र ढगावर एखाद्या रंगांची लकेर उमटावी तसा हा माणुस मला ढगोबा भासे.त्याच्या शर्टाची बाही किंवा समोरील भाग ताज्या गुलाबी फुलांच्या रंगासारखा गुलाबी,पिवळसर,दिसे. चमकणा-या पॉलीशने चेहरा व डोक्याचे केस माखलेला माणुस मला सर्कशीतल्या जादूगारासारखा वाटे व तो आपल्या करामती दाखवुन सर्वांना हसवत असे.युवकांप्रमाणे युवतीनीं सुद्धा कमी प्रमाणात रंगपंचमी खेळलेली आहे हे दुस-या दिवशी समजत असे. घरा-घरात रंगपंचमी रंगलेली दिसे.युवकांची रंगपंचमी संपताचं दूपारी तीन नंतर वाजत गाजत गावकरी रंगपंचमीची गावातून फेरी काढत.शाळेतले सर्वांचे लाडके मुख्याध्यापक व बैठकीतले काही खास शिक्षक आपल्या चेल्यांना सोबत घेऊन स्वारी गावातुन निघत असे.घरात लपुन बसलेल्या प्रतिष्ठित व इतर गुरुजींच्या घरी ही मंडळी पोहचत असत.रंगपंचमी नको म्हणुन व रंग कोणीतरी टाकेल? म्हणुन गुरुजी घरात बसत.रंगांपासुन घरात लपुन बसलेल्या गुरुजींना घराबाहेर बोलावुन त्यांना रंगांची अंघोळ घातल्यावरचं या टिमचे समाधान होत असे.गुरुजी फुल्ल बाहयाच्या बनियनवर घराबाहेर पडताचं त्यांच्यावर रंगांची प्रचंड उधळण होई.लुंगीने चेहरा पुसताचं परत रंग लावला जाई.कारवाँ बढ़ता रहे या म्हणीप्रमाणे त्यांना पुढील मोहिमेवर सामील करुन घेतलं जाई.रंग लावण्याचा एक अलौकिक आनंद सर्वांच्या चेह-यावर विजयोत्सवासारखा दिसे.यात काही झिंगणारी माणसे पण सामील होत.हलगी वाजवणारा जोरात हलगी वाजवुन सर्वांना तालावर नाचायला मजबुर करत असे.काही चिल्लर पैसे मिळाल्यावर त्याचा आनंद द्विगुणीत होत असे.रंगपंचमीची ही दूपार फेरी गावभर फिरुन प्रतिष्ठित व्यक्तींना रंग लावत असे.मोटार सायकल वरुन जाणारा कर्मचारी किंवा नागरिक यांच्या तावडीतुन कधीही सुटला नाही.दूपारी येणारी बस व त्याचा कर्मचारी यांनाही रंग लावण्यात येई.ते ऑन ड्युटीवर आहेत म्हणुन काही जण विरोध करत.गावातील माणसाच्या खिशातली डायरी,पैसे याचा कसलाही विचार न करता बिनधास्त रंग टाकण्यात त्यांना मजा वाटे.किराणा दुकानदार, व्यापारी यांना दुकानाच्या बाहेर बोलावुन त्यांच्या अंगावर रंग टाकण्यात येई.पराक्रमी व विजयी मुद्रेने टीम पुढे सरकत असे.रंगपंचमी दिवशी कुठेही तक्रार,भांडण झाल्याचे आठवत नाही." पैसे घ्या, पण रंग टाकु नका." म्हणणा-यांच्या अंगावर मुद्दाम रंग टाकला जाई.ते ही पैसे घेऊन हे वेगळं सांगण्याची गरज नाही.गावभर रंगपंचमीने मने व शरीर दोन्ही रंगुन जात.सर्वजण आनंदात व उल्हासीत दिसत.रस्त्यात सापडणारे कुत्रे,वासरं,गाढवं यांच्याही अंगावर रंग टाकत असतं.नंतर ही सर्व मंडळी स्व- घरी पोहचुन रंगपंचमी उतरवत असतं.रॉकेलचा, कपड्याचा साबण वापरुन रंग उतरवण्याचा कार्यक्रम दोन तीन तास चाले अर्थात रांजणातल्या किंवा हौदातल्या थंड पाण्यानेचं सर्व पार पाडलं जाई .रात्री आठ नऊ वाजता हॉटेलात,मंदिरात,दुकाना बाहेर,गांधीजीच्या पुतळ्याजवळ बसुन रंगपंचमीच्या गप्पा रंगत.मंडळी मोठमोठ्याने हसतं.चहा वाल्या हॉटेलचे भरपूर गि-हाईक होई.
दुस-या दिवशी रस्त्यावर, भींतीवर,खिडकीवर,मोटारसायकलवर, शाळेतील फरशीवर मला रंगांच्या खुणा बघण्यात खुप मौज वाटत असे.जिथं रंग जास्त पडला त्या ठिकाणी कोणा-कोणाला रंग लावला याची कल्पना करत असे.हाता-पायांच्या बोटांवर,कोप-यावर रंगांचे कवडसे दिसत. परंतु रंगपंचमीच्या रंगापेक्षा मातीवर पडलेले रंग अधिक गर्द वाटत.आभाळावर पडलेली रंगांची मुक्त उधळण बघुन मला रंगपंचमीचे खुप अप्रुप वाटे.शर्टवरील रंगांचे डाग साबणाने व कशानेही जात नाहीत याचे मला नवल वाटे.
©®
*#बालपणाच्या आठवणी*
बालपणीच्या आठवणी
*बालपणीचा खारेमुरे वाला*
*शब्दांकन*
*श्यामसुरेश गुमानगिर गिरी मु.पो.लामजना ता.औसा*
टण....टण....टण...जि.प.
प्रशाला लामजना शाळेची घंटा वाजली.
"चला बे लवकर ! चला पळा! निकम गुरुजी आल्यात बे!! आताचं सर चौकातून शाळेकडे गेल्यात. उशीर झाल्यावर लई मारत्यात रे!.....मित्राचा हा आवाज ऐकून मी शाळेकडे धावत - पळत सुटलो. शाळेत गेल्यावर पांढ-या शुभ्र कपड्यातले लक्ष्मण लांडगे मामा शाळेचा परिसर स्वच्छ करत होते हे दिसुन आले.ते मोगरगा गावचे आहेत.काही मुले निलगिरीच्या झाडांना पाणी घालत होती.मैदानावर काही मुले गोट्या खेळत होती.काही मुले आभाळात चेंडु उंच फेकून अचूकपणे झेलण्याचा प्रयत्न करीत होती.
"बंद करा बे, बिडवे गुरुजी व निकम सर येऊलालेत.तुमची पाठ लई सुळसुळ करलालीय का रे?गोट्या खेळणा-या मुलांकडे मी वळुन म्हणालो,"थांबा ,मीचं तुमचं नाव सर ला सांगतो".मला मारण्यासाठी दोन- तीन पोरं धावुन आली तसा मी तिथुन वेगाने पळत सुटलो.
चिंचेच्या झाडाखाली काही मुले क्रिकेट खेळत होती तर काही मुले निलगिरीच्या सावलीत पुस्तकं वाचत होती.मैदानावर मुले तुरळक होती.परंतु त्यांचा खेळण्यातला उल्हास मात्र मनाला प्रसन्न करणारा होता.9:45 वा. मैदान मुलांनी गच्च भरुन जात असे.
"जगताप सरांनी सांगितलेले गणितं केलासं का रे ? आज गाढे सर इतिहासाचे प्रश्न विचारणार आहेत.वाघोलीकर सर इंग्रजीचे शब्द विचारणार आहेत व वर्कबुक बघणार आहेत.टेंकाळे सर प्रयोग वही तपासणार आहेत.सदाफुले सरांनी हिंदी चा पाठ वाचायला सांगितला आहे.दहावीच्या मुलांची चर्चा ऐकून मी अवाक् झालो.दहावीला लई अभ्यास करावा लागतो हे चित्र डोळ्यासमोर येऊ लागले .मुले ऐकमेकांना हळूहळू बोलत होती.काही जण निबंध जास्त लिहिले का हे दाखवत होती.उन्हाळ्याच्या सुट्टीत झालेल्या वासंतिक वर्गातील गंमतीजमती मुले सांगु लागली.
तेवढ्यात दूसरी घंटा झाली.घंटीच्या लयबद्ध तालावर काही मुले नाचू लागली.थोड्या वेळाने सर्व वर्गाच्या आपोआप रांगा तयार.विद्यार्थी वयात असताना ऑर्डर द्यायचे काम माझ्याकडे होते.मी सावधान म्हणताचं जन गण मन या राष्ट्रगीताचे सूर संपुर्ण मैदानभर घुमायला लागले.मग एका सुरात प्रतिज्ञा झाली.आम्ही फक्त मराठी भाषेतचं दररोज प्रतिज्ञा म्हणत असु.यानंतर मधुकरराव जोशी गुरुजींनी 'खरा तो एकचि धर्म 'या प्रार्थना गीताने वातावरण प्रसन्न केले.‘कध्यास एक साधका अंतरात ठेव तू,जाण यत्न देव तू', या सामुदायिक गिताने मैदान दुमदुमुन गेले.सर्व मुले एका आवाजात दररोज गीत गात असत.सकाळचा परिपाठ संपला.उशीरा आलेल्या मुलांना शिक्षा झाली.मुले वर्गात गेली.पहिला तास,दूसरा तास,तिसरा तास संपला.मी माझ्या मिचमिच्या ( डीजीटल वॉच) घड्याळात पाहिलो.12:05 झालेले चला रे इंट्रोल ( इंटरव्हल) झाला.लांडगे मामांनी ब्रेकचा टोला दिला.वर्गावर्गातून मुले मैदानावर येत होती.मला तो 10 मिनिटाचा इंटरव्हल ( ब्रेक) खुपचं आवडायचा कारण या वेळात खुप काही करण्याचा मुले प्रयत्न करत.काही मुले मैदानावर खेळायला धावत तर काही मुले पाण्याच्या हौदाकडे पळत सुटत.सकाळी उपाशी आलेली मुले घरचा रस्ता पकडत.काही जण दूपारी शाळेत येत नसत.बालवयात आम्हाला पाण्याचा फिल्टर माहित नव्हता की वॉटर बॉटल .वॉटर बॉटल फक्त प्रवासात ठेवत असत.शाळेतील पाणी भरलेल्या टिपाकडे काही मुले धाव घेत.काही मुले खाऊ खाण्यासाठी खारेमुरे वाल्याकडे धाव घेत.काही मुलांना पांढरी बंबई मिठाऊ खुप आवडे.आम्ही त्या मिठाईला म्हातारीचे केस म्हणत असु.काही जण चिंचेच्या झाडावर चढुन चिंचा खात .काही जणांचा पिकलेले बदाम वर्गात पिशवीत ठेवुन लपुनछपुन विकण्याचा बिझनेस चाले.दूपारी 12:00 वाजता शाळेच्या मुख्य रस्त्यावरील प्रवेशद्वारावर एक खारेमुरेवाला नित्यनेमाने येई.आमच्या शाळेला कंपाऊंड वॉल नव्हते.शाळेत येण्यासाठी ब-याचं वाटा होत्या.खारेमुरेवाला शाळेच्या हद्दीत कधी येत नसे.त्याच्या अंगावर पांढरा शर्ट व पांढरीचं पँट. त्याने डोक्यावर टोपी घातल्याचे आठवत नाही.त्याने एक रुमाल गळ्यात बांधलेला असे.रुमाल हिरवा किंवा निळा असे.या रुमालात मळ दिसुन येत नाही असा एक नवीन शोध काही मुलांनी लावल्याचा आठवतो.त्याचा तो चार चाकी जुना गाडा होता.त्याला सायकलचे चाक बसवलेले होते.त्याने त्या लाकडी गाड्याला बसवलेल्या सायकलच्या टायरमध्ये कधीचं हवा भरल्याचे आठवत नाही.हवा नसल्यामुळे रिंगा व तारा वाकड्या झाल्या होत्या.पुढच्या दोन टायरांना वळवण्यासाठी त्याने एक पट्टीचे स्टेअरींग केलेले होते.पट्टी डावीकडे ढकलताचं त्याचा गाडा उजवीकडे वळत असे.अगदी आरामात खारेमुरे वाला येत असे.एका छोट्या मटक्याला तार बांधुन त्यात त्याने लाकडाचे तुकडे ठेवुन पेटवत असे.त्याच्या गाड्याजवळ गेलं की धूर डोळ्यात जात असे.मुलांना गरमागरम खारेमुरे देण्याचा तो सतत प्रयत्न करत असे.खारेमुरे देतांना त्यावरील टरफल तो काढत नसे.त्या छोट्या मटक्याला त्याने छिद्रे पाडली होती.त्यातुन धूर निघताना मला विडी फुंकणा-या माणसाची आठवण येई.शाळेवरुन जाणारे पांढरे ढग त्याच्या धुरामुळे काळे होत असावेत असं वाटे.त्याने आपल्या गाड्यावर लाकडी फळ्या अंथरल्या होत्या.तो दोन- तीन तास उन्हात, वा-यात थांबलेला दिसे. गि-हाईकाची तो चिंता करीत नसे.शाळेपासुन काही हाकेच्या अंतरावर त्याचे चार पत्र्याचे घर होते.घराच्या भिंती मातीने सारवलेल्या. घराच्या समोर गवताचे छप्पर होते.तेथे खुप थंडगार वाटत असे.काही काळानंतर त्यांचा अपघात झाला एक - दोन वर्षे तो दिसला नाही.कोणी म्हणे गळ्याला पोळलय त्यांच्या. काही जण म्हणाले गळ्याचे ऑपरेशन झाले.गळ्याच्या संपुर्ण भागावर शिवल्यासारखे दिसे.मुले त्यांना नंतर " वेल्डर" म्हणु लागली.कारण त्यांना खारेमुरे वाल्याचा गळा लोखंडी वेल्डींग केल्यासारखा वाटत असावा.
मोठी मुले त्याच्या गाड्यावर बसुन खारेमुरे खाण्याचा प्रयत्न करीत."आबे उतरा बे खाली,ए शाण्या उतरतुस का? मोडुन टाकताव का रे? पोट भरुन खाऊ द्या की आम्हाला.गरीबाला जगु द्या की ." असं तो काकुळतीला येऊन म्हणायचा. एका पांढ-या ट्रेमध्ये त्याने किलो दोन किलो खारेमुरे भरलेले असायचे.गाड्याच्या मधोमध तो ठेवत असे.काही मुले एखादा खारमुरा उचलुन टेस्ट बघण्याचा अफलातुन प्रयत्न करीत.त्याला तसे करणे आवडत नसे.त्याचा माल संपल्याचा कधी दिसला नाही.सोबत तो गाड्याखाली पिशवी भरुन स्टॉक ठेवत असे.तो कडक वाळु तापवुन त्यात खारेमुरे भाजायचा.एकही खारमुरा करपणार नाही याची काळजी घ्यायचा.मिठाचं प्रमाण पण तंतोतंत.एका विशिष्ट आकाराचे मेडीयम आकाराचे शेंगदाणे तो वापरायचा.खारेमुरे विकण्यासाठी त्याच्याकडे दोन छोटे मोज पात्र होते.एक अल्युमिनियम पासुन बनवलेला होता तर दूसरा प्लॅस्टिकचा .सतत वापर केल्यामुळे त्यांचा अर्धा भाग काळसर दिसायचा. त्याने बनवलेल्या खारेमु-यांना एक विशेष प्रकारची चव होती.ते खारे शेंगदाणे तोंडात पडताचं खाणारा अहाहा! किंवा वा! छान! !नक्कीचं म्हणत असणार.खमंग,चविष्ट,
अत्त्युत्तम भाजलेले,खारेमुरे खाण्यासाठी मुलांची झुंबड उडायची .पैसे नसणारी मुले खिशात हात घालुन पहात थांबत.मुलांची गर्दी संपताचं मुली पण उत्साहाने गाड्याभोवती थांबत.10 मिनिटं त्याच्या गाड्याभोवती भलतीचं गर्दी असे.दूपारी दिड पर्यंत तो तिथचं थांबत असे.तीन नंतर तो शाळेत कधीचं दिसत नसे.
फेब्रुवारी नंतर त्याला गॅरेगॅर वाल्याची साथ मिळे.तो गारेगार वाला निलंग्याहून सायकलवरुन येत असे.अजुनही तो भर उन्हाळ्यात येतो.तो डोक्याला एका विशिष्ट पद्धतीने रुमाल बांधत असे.डोक्यावर केस उघडे व दोन कान रुमालाने बंद.त्याला पाहुन खारेमुरेवाला नाक डोळे मुरडत असे.कारण त्याचं गि-हाईक त्याने पळवलेलं असे.कधी बोरं तर कधी जांबं विकणारे येत.परंतु खारेमुरे वाला नित्यनेमाने यायचा.त्याच्या डोक्यावर सावली पण कमी असे ती पण फारचं कमी कारण चिंचेसारख्या गर्द झाडाखाली तो थांबत नसे.त्याच्या डोक्यावर कमी सावली देणारे झाड आपले हात पसरुन उभं असे.आपल्या हातावरील घड्याळात तो वेळ बघत असे.मला तो काही तरी पार्टटाईम जॉब काम वगैरे करत असेल याचा भास होई.त्याचे ते चावीचे घड्याळ हातातील मनगटावर चमकत असे.कुल्फीवाला मात्र गावात फेरी मारुन कुल्फी विकत असे.मुलांच्या रंगलेल्या अति गर्द गुलाबी,लाल,जांभळ्या जिभेवरुन गारेगार खाल्लं की नाही हे समजत असे.वर्गात काही जणांनी गारेगार खाल्ल्याबद्दल मार खाल्ल्याचा आठवते.खारेमुरे वाल्याचा नियमितपणा,मोजकं बोलण्याची पद्धत,हळूचं खारेमुरे मोजण्याची पद्धत,माप भरल्यावर ट्रेमध्ये भरलेला माप सांडणार नाही याची त्याने घेतलेली काळजी.हळूचं दोन तीन खारेमुरे पुड्यात टाकण्याची रीत,त्याचे बोलके डोळे,एका डोळ्यात कालांतराने पांढरा ठिपका हळूहळू दिसू लागला,स्वाभिमानी वृत्ती,कष्ट करण्याची तयारी पाहुन मला खुप नवल वाटे.बोरं,जांभळं,कारं,जांबं,निवडुंगं,रानमेवा खाणा-या मुलांचा खारेमुरेवाला लाडका होता. मी शाळा शिकुन दयानंद महाविद्यालय लातूर येथे गेलो मला तीथं तसाचं खारेमुरेवाला भेटला.त्याचा वेश ही तसाचं.पण डोक्यावर पांढरी टोपी होती.त्याच्याही खारेमु-यात मला तीचं चव दिसली.लामजना पाटीवर बस आली की खारेमुरे म्हणणारा माणुस हमखास येणारचं.काळ बदलला खारेमुरे वाले पण बदलले.पण बालपणी खारेमुरे वाल्यांनी जिभेला एक विशिष्ट चव दिली ती आज खुप शोधुनही सापडत नाही.खुप खारेमुरे वारे भेटले पण तो शाळेसमोरील खारेमुरे वाल्यांने जगण्याची एक शिस्त दाखवली.
*बालपणाच्या आठवणी*
बालपणाीच्या आठवणी
*गोट्यांचा डाव*
*शब्दांकन*
*श्यामसुरेश गुमानगिर गिरी मु.पो.लामजना ता.औसा*
"आबे ,बघा बे! माझा शेर भरला की गोट्यांनी गच्च "
खुळखुळ.
"हाय का कुणाच्यात दम? ,येताव का माझ्या संग गोट्या खेळायला.?"
खुळखुळ.
आमच्या वाड्यातील तात्यांचा नातू दत्त्या मोठ्या तो-यात बेडकावानी छाती फुगवुन बोलला. गर्वाने त्याचा चेहरा फुलुन गेला.
आमच्या गावात नावाला " या " जोडण्याची एक निराळी पद्धत होती जी सर्वत्र असते.मित्रांच्या नावाला "या" जोडण्याच्या सुपीक कल्पनेचे मूळ अतिप्रेमात असावे असं मला नेहमी वाटायचं.त्याचा तो आवाज ऐकुन त्याचे बालसंवगडी , काल्या,वाल्या,ना-या,गज्या,मुन्या,कैल्या नेहमीप्रमाणे धावत - पळत आले.
डोक्यातून निघालेला घामाचा लोंढा दत्तुने डाव्या शर्टाच्या बाहीने पुसला. डोळे मिचकावुन व किलकिले करुन त्याने माझे आव्हान कोण स्विकारतो का?असा सवालबद्ध चेहरा करुन युद्धातील सैनिकाप्रमाणे इकडे-तिकडे पाहू लागला.दूपारी दीड नंतर नित्यनेमाने शाळा बुडवून आमच्या गल्लीत मुलांचा मोठ्ठा गोंधळ उडायचा.आम्हाला मात्र गोट्या खेळण्याची घरुन परवानगी नसे.गोट्या खेळल्यामुळे माणुस बिघडतो हे नेहमी सांगितलं जायचं. उपदेशाचे डोस सरकारी डोसाप्रमाणे दिले जाई.गोट्या राष्ट्रीय खेळाच्या यादीत नसलेल्या खेळापासुन मी थोडासा वंचित राहिलो. मुलांचा गोंधळ पाहुन काही माणसं गोट्या खेळणा-या मुलांच्या अंगावर धावुन जात.
"आरं जावा की घरात बसा की जरा थंड.उन मन उन झालय आण तुमचा नुस्ता धिंगाणा. "
दूपारी जेवणानंतर गल्लीतील माणसांचा जरा डोळा लागला तर कार्टे मोठ्याने आरडाओरडा करत असत . अंगावर धावुन आलेल्या माणसाच्या मारापासुन वाचवण्यासाठी ही गोट्या खेळणारी मंडळी मग तिथुन धूम ठोकत.आपलं ठिकाण तात्पुरतं बदलत. एकतर नेहमीच्या गोटे गल्लीत नाहीतर तेल्याच्या पिठाच्या गिरणी समोर नेहमीच्या जागेवर मुलांचा खेळ सायंकाळ होईपर्यंत चाले.पिठाची गिरणी सकाळपासुन सुरुचं असायची.पंचक्रोशीतील भरपूर लोकांची गिरणीत गर्दी होत असे.म्हातारीचा तोंडाचा पट्टा चालावा तसा गिरणीतून आवाज येई.गिरणीच्या आवाजात मुलांचा गोंधळ मिसळुन जाई.तेल घाण्याचा पट्टा जोरात चाले.परगावाहून घणा गाळण्यासाठी आलेल्या बैलगाडी खाली बसुन मुले प्रेक्षक बनुन गोट्याचा डाव मजेने पहात असतं.काही मुलं गाडीला वानरासारखं लोंबकळत असत.दहा- वीस मुलं बैलगाडीत जाऊन बसत मग बैलगाडी ओझं वाढत जाऊन अचानक उनाळ होई.मुले बैलगाडीतुन उड्या ठोकत.बैलगाडीच्या खाली सावलीची जागा त्यांना सिनेमाथियटर प्रमाणे बाल्कनीची वाटे.तिथं थोडी सावली असे.मुलं गर्दी करुन बसत.मध्येचं पाण्याचा टॅंकर आला की मुलांचा खेळखंडोबा होई.पाण्याचा टँकर गेला की पुन्हा नव्याने डाव रंगत असे.काही वेळा एकमेकांना ते शिव्याही देत भांडणं, मारामारी पण करत.कधी - कधी जोरदार रडण्याचा आवाजही कानावर येई.दूपारच्या जेवणाच्या सुट्टीत आईचा डोळा चुकवुन मी मुलांचा खेळ पहायला जात असे.गोट्या खेळणा-या एकाच्याही पायात चप्पल नसे.भर उन्हात फुफुर्ट्यात त्यांचा खेळ चाले.गोट्याचा डाव ऐन रंगात आला की कोणीतरी "आण्णा आले रे " म्हणुन जोरात ओरडायचा. मुलं कावरीबावरी होऊन आण्णा ज्या रस्त्याने येत तिकडं मुलं पहात असत. आण्णा दिसताचं धूम ठोकत. मुलांच्या मनात आण्णाची इतकी दहशत होती की समोर साक्षात यमराज आल्याचा त्यांना भास होई.आण्णाचे दात पडल्यामुळे तोंडाचं पार बोळकं झालेलं दिसायचं. धोतर सावरत आण्णा मुलांचा पाठलाग करीत. पोरं गोट्या तिथचं टाकुन वाट सापडल तिकडं पोबारा करत. समदी मुलं इकडं- तिकडं लपून बसत.बैलगाडी खाली बसलेली मुलं आण्णा लांब असतानाचं गोट्या मांडलेल्या डावावर तुटून पडत व गोट्या सावडुन तिथून पोबारा करीत."तुमच्या बायलीला थांबा जरा.पुन्हा हिकडं या मग दावतो तुम्हाला. "असं म्हणुन आण्णा बैलगाडीच्या खालुन गोट्या सावडण्यासाठी आलेल्या मुलांचा पाठलाग करत.राहिलेल्या सर्व गोट्या सावडुन आण्णा तिथुन निघत.आण्णांचा हा दशावतार पाहुन मुलांची दोन दिवस घाबरगुंडी उडे. थोडे दिवस वेळ गल्लीत मसणवाट्यासारखी शांतता पसरे पण हे गिरणी बंद असल्यावर लई जाणवत असे. एरवी हे सर्व नेहमीचं होतं. कधी-कधी रंगलेल्या डावात वाडीकर आण्णा धोतरासकट मांडी घालुन बसत मग मुलांची पाचावर धारण बसे.ते गुपचूप मुलांच्या पाठीमागे येऊन थांबत.त्यांची ती भलीमोठी सावली मुलांना गिळुन टाकत असे. यापुढे मुलांनी आण्णांचा जाण्या येण्याचा टाईम टेबलचं पाठ केला.चार गोट्या देऊन एका मुलाला आण्णाकडे लक्ष ठेवण्याची नामी शक्कल त्यांनी शोधुन काढली.
तेवढ्यात दत्त्याकडं पाहुन माडीवरुन रम्या गर्जला,
"ये थांब की रे मी यीवलालाव ; तुझ्यासंगं म्या एकटाचं बस्स. पुरुन उरताव तुला बे. मी ग्रबु पट्ट्या खाली आलोचं की आता "
माडीवरुन खाली डोकावत रम्या जोरात बोलला.दत्त्याचे आव्हान त्याने सहज, अलगद स्विकारले.दत्त्या त्याची वाट पाहु लागला.
गोट्यांनी भरलेला शेर वाजवत तो माडीवरुन खाली आला.आपल्या हातातील गोट्यांनी भरलेला शेर त्याने विजयी मुद्रेने सर्वांना दाखवला.दत्त्याजवळ असा शेर ( धान्य मोजण्याचे माप).वगैरे नव्हता.त्याच्या पँटचे दोन्ही खिसे व शर्टचा मोठा खिसा गोट्यांनी सदैव गच्च भरलेला दिसे.तो चालतांना गोट्यांचे तालबद संगीत ऐकू येई.कोणताही डाव दत्त्या सहज जिंके.गावातील गोट्या चॅंपीयन कडुन त्याने महत्त्वाचे डाव व मंत्र शिकुन घेतले होते.रम्या शेरातील गोट्या वाजवत खाली आला हे दत्त्याने पाहिले .एका मुलाला त्याने गोट्या सांभाळायची जबाबदारी दिली.
"शादी की गलपाणी? रम्या म्हणाला.
दत्त्याने "शादी" म्हणुन आपला आवडता डाव निवडला.
आपली मांडी थोपटुन "तुला आता खेळ दाखवितो बघ असं तो पुटपुटला.तसा पॅंटमधुन धुराळा उडाला.
" काय नेमं हायतं बे यांचे , केवड्याबी लांबुन नेम धरत्यात दोघं ,कवाचं नेम चुकत न्हाय त्यांचा."
खेळ पहाणारी पोरं चर्चा करु लागली.रम्यानं खेळ असा दाखवला की दत्त्या चारी मुंड्या चित झाला.गोट्याच्या खेळात दत्त्या एवढा रमुन गेला की,तेवढ्यात कोणीतरी त्याच्या डोक्यात खडा मारला हे ही त्याच्या लक्षात आले नसावे .थोडी जखम झाली.दत्त्याने त्याकडे साफ दुर्लक्ष केले.सात- आठ दिवस गेले.त्याच्या डोक्यातील टेंगुळ सदृश्य सुजलेल्या भागाकडे वाड्यातील किरायाने राहणा-या मावशीचे लक्ष गेले.तो खेळताना डोकं सतत खाजवु लागला.काय झालयं म्हणुन बघितलं तर डोक्यातुन एक अळी वळवळत खाली आली.नीटं पाहिलं तर डोक्यात जखम झालेली. सात-आठ आळ्या जखमेतुन निघाल्या मग त्याला गल्लीतील दवाखान्यात नेण्यात आले लहान मोठ्या चाळीस आळ्या डॉक्टरांनी काढल्या .डॉक्टरांनी मग शिव्या दिल्या.दवाखान्यात काय झालय हे पहायला बघ्यांची गर्दी वाढु लागली. लेकरं सांभाळता येत नसतील तर संन्यासी होऊन मठात बसण्याचा डॉक्टरांनी मोफत उपदेश केला.मलमपट्टी जोरदार झाली.काळ्या कुट्ट चेह-यावर पांढरी पट्टी दिसु लागली. इंजेक्शन ,गोळ्या देण्यात आल्या. बघ्यांनी दत्त्याच्या घरच्यांची फजिती केली.त्यांचा चेहरा ओशाळला.खेड्यात पालकांचा वेळ काबाडकष्ट करण्यात जातो.पालक मुलांच्या शिक्षणाची कधीतरी चौकशी करत.दिवसातुन दोन- तीन वेळा हळदेचा बखमा त्याच्या डोक्यात भरला जाऊ लागला.दोन - तीन दिवस गेले.जखम तशीचं घेऊन तो गोट्या खेळायला नव्या उत्साहाने पळ काढु लागला. गोट्या खेळताना दत्त्याचे डोके पिवळसर दिसू लागले.पांढरी पट्टी गळुन पडली.त्याच्या डोक्याकडे पाहताना मला बाभळीच्या झाडावर बसुन डोकं पिवळं करणा-या चिमण्यांची आठवण झाली.
रम्याकडुन हार स्विकारुन बाजीगरचा फिल्मसारखा तो डायलॉग मारु लागला. आपली गल्ली सोडुन दुस-या गल्लीतील पोरांसोबत तो गोट्या खेळु लागला.संध्याकाळी तो आपल्या विजयाची कहाणी सर्वांना सांगु लागला. मला समजतं तसं अपघाताने सुद्धा त्याची पुस्तकांची गाठ- भेठ कधीही होत नसे.गोट्या या एका खेळापुढे बाकी सर्व गोष्टी त्याला बिनकामाच्या वाटत.थोड्याचं दिवसात रामायण - महाभारत यासारख्या मालिकांचा त्याच्यावर परिणाम झाला.लिंबाच्या फोकाचा त्याने धनुष्य तयार केला.ज्वारीच्या गंडकाळ्यांचा बाण बनवला .गावात फिरणा-या डुक्करांवर त्याचं लक्ष गेलं.त्यांना तो राक्षस समजु लागला.आपल्या मित्रकंपनीला घेऊन तो त्यांचा पाठलाग करु लागला.या नवीन खेळात त्याचे मन फार काही रमले नाही.काही दिवसानंतर आपले पुराने साथी एकत्र करुन तो पुन्हा नव्याने डाव मांडु लागला.निलंग्याहून येणारा गॅरेगार वाला तिथं उभा राहुन यांचे खेळ बघु लागला.मनोरंजनाबरोबर त्याचे गि-हाईकही होऊ लागले.पोरं गॅरेगॅर साठी गल्लीत पतरस,लोखंड शोधु लागले.ते मिळताचं विजयी मुद्रेनं ते गॅरेगॅर वाल्याला देऊन बर्फाच्या तुकड्यावर ताव मारु लागले.गॅरेगॅर च्या रंगांने त्यांच्या जीभा रंगु लागल्या.तेचं रंग मला उन्हात चमकणा-या गोट्यात दिसु लागले.
*बालपणीच्या आठवणी*
®©
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)